कथा

लेले आनंदले

सचिन पिळगावकर आणि वसंत सबनीस जर लेले आजोबांना भेटले असते, तर 'अशी ही बनवाबनवी'च्या पूर्वार्धात दाखवलेल्या पुणेरी घरमालकाच्या पात्रात त्यांनी बदल केला असता. इतका प्रेमळ, आतिथ्यशील आणि विनोदी पुणेकर माझ्या तरी पाहण्यात नाही. (ही कथा काल्पनिक आहे. घटना, स्थळं आणि पात्रं प्रत्यक्षात आढळली तर केवळ योगायोगच समजू नये, अयोग्यही समजावं ही विनंती.) खुलासा - इतर पुणेकर प्रेमळ, आतिथ्यशील आणि विनोदीच असतात, लेले आजोबांइतके नसले तरी.

ललित लेखनाचा प्रकार: 

बग फिक्सिंग

'भगवान जब देता है तब गधे को भी छप्पर फाड के ही देता है' या उक्तीची विश्वासार्हता पटण्याची , हि काही दिनूची पहिलीच वेळ नव्हती. अनेकदा असे हृदयाला इंगळ्या डसणारे प्रसंग दिनूने अनुभवले होते, पचवले होते आणि त्यांचा स्वतः:वरती यत्किंचितही परिणाम होऊ ना देण्यात निदान तसे भासविण्यात दिनू एव्हाना वाकबगार झालेला होता. पण यावेळचा प्रसंग फारच जिव्हारी लागणारा होता. याबद्दल वाचकांना सविस्तरचं सांगितले पाहिजे.

ललित लेखनाचा प्रकार: 

विक्रमादित्याची दिनचर्या

बरीच वर्षे, रसायन कंपन्यांच्या 'शोध आणि विस्तार' (कसला बोडक्याचा शोध! भारतांत तरी बहुतांशी विस्तारच) विभागात नोकरीची उमेदवारी केल्यावर, नोकरीच गेल्यामुळे, 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार', अर्थात कन्सल्टन्सी करायला लागलो. मूळचा स्वभाव भिडस्त असल्यामुळे, सुरवातीला अनेकांनी फसवलेच. पण तरीही नेटाने काम करत राहिलो. कामे बहुतेक लहान रासायनिक उद्योगातीलच असायची. त्यासाठी, लांबलांबच्या उद्योगसमूहात प्रवास करुन जावे लागे. अशा ठिकाणी, अनेक वेळा, काही वल्ली भेटत. अशाच एका व्यक्तिमत्वाची ही ओळख! यशाची धुंदी वगैरे, आपण कथा-कादंबऱ्या, नाटके, चित्रपट अशा माध्यमातून पहातो.

ललित लेखनाचा प्रकार: 

खानावळ - एक शतशब्दकथा

एक जुनी, सरकारी अनुदानावर चाललेली खानावळ होती.
सर्व मेंबरं, तिथे गुण्यागोविंदाने जेवत असत.
जेवण साधेच असे, रविवारी एखादी स्वीट डिश असे.
तर, हळुहळु मेंबर्सची संख्या वाढत गेली.
काही नवीन मेंबर आले.
त्यांनी रोजच स्वीट डिशची मागणी केली.
कंत्राटदार गयावया करु लागला.
शेवटी आमटीतले पाणी वाढवून, ही मागणी त्याला पुरी करावी लागली.
त्यानंतर आणखी मेंबर आले.
ते स्वतःचे स्वीट खाऊन शेजारच्याचेही मागू लागले.
जुन्या मेंबरांनी निषेध नोंदवला.
पुढे पुढे तर, ते हिसकावून घेण्यापर्यंत मजल गेली.
वातावरण फार गढुळ झाले.

ललित लेखनाचा प्रकार: 

स्पर्श ...तसाही आणि असाही ..

स्पर्श ...तसाही आणि असाही ..

ललित लेखनाचा प्रकार: 

त्रिकथा १: अंधाराची ^खरी चव

दोस्तांनो तुम्ही कधी त्या "अंधाराची चव" नावाच्या हॉटेलात गेलतात का?
आपल्या टुमदार पेन्शनर शहरात ते चालू झालं तेव्हा प्रचन्ड हाइप झालं होतं आठवतंय?
म्हणजे त्यांचा मेन सेलींग पॉईंट होता की ते आपल्या गिऱ्हाईकांना चक्क आंधळेपणाचा तात्पुरता आणि थरारक अनुभव देऊ करायचे वगैरे...

ललित लेखनाचा प्रकार: 

जत्रातील प्रेमाची गोष्ट

पाराकं आरगन वाजल.बॅन्डवाल आलं.ते आलं की सलामी देत्यात. आरगनाचा मोठा आवाज सा-या गावात घूमू लागला. तशी बारकाली पोरं...पोरी चींगाट पाराकं पळाली. मोठाली बरीचं माणसं तिथचं होती. कुणी रावश्याच्या दुकानाच्या दारात.. कुणीबुणी चावडीच्या दगडाला बूड टेकून बसलेली… आज गावची जत्रा.शेताभीतात कुठं जाता येतं? तिथचं टायमपास करीत बसलेली.चार पाच टोळभैरी पोरं भी व्हती.सांवताच्या घराला पाठ देउन बसलेली. पोरं कुठं नुसते गप बसत आसतेत व्हयं? मोबाईल चिवडीत होती.बँन्डवाल्यानं सलामी दिली.आगोदर.. गणपतीची आरती.मग एक मस्तं गाणं.. वाजवल.त्यांच्या भोवती गर्दी जमा झाली आणि ते थांबले.सलामी झाली की ते पारावर टेकलं.

ललित लेखनाचा प्रकार: 

हिममानव यती - सत्य की मिथक?

हिममानव यती
----------------------------------------

२२ सप्टेंबर १९२१

ललित लेखनाचा प्रकार: 

क्रिकेट फिल्डींगचा सम्राट हरपला - कॉलीन ब्लँड

१९६५ सालचा जुलै महिना....

ललित लेखनाचा प्रकार: 

Dead Man's Hand - १० (अंतिम)

सिनीयर इन्स्पे. रोहित प्रधान आ SS वासून समोर बसलेल्या रोशनीकडे पाहत होता.
सब् इन्स्पे कदम आणि हेड कॉन्स्टेबल नाईकांचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती.

या संपूर्ण केसला अशी काही कलाटणी मिळेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

हे लॉकेट स्वप्नाचं आहे याचा अर्थ....
सापुतारा पोलीसांना वर्षभरापूर्वी सापडलेला तो स्केलेटन स्वप्नाचा आहे? माय गॉड!
दोन महिन्यांपासून ज्या मुलीला पकडण्यासाठी आपण अखंड धावपळ करत होतो, तिचा वर्षाभरापूर्वीच खून झाला होता?

.... आणि अचानक विजेसारखा तो प्रश्नं सर्वांच्या मनात चमकून गेला.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा