कथा

Cold Blooded - ६

दुसर्‍या दिवशी सकाळी नऊच्या सुमाराला रोहित हेडक्वार्टर्सला पोहोचला तेव्हा कोहली त्याची वाटच पाहत होते.

"सरजी, हा फिंगर प्रिंट्सचा रिपोर्ट! जवाहर कौलच्या घरात सापडलेली ती फिंगर प्रिंट ट्रेस झाली आहे."

"प्रिंट ट्रेस झाली?" रोहितने अधिरतेने विचारलं, "कोणाची आहे ही प्रिंट?"

ललित लेखनाचा प्रकार: 

धोका

एका लग्नाची गोष्ट

ललित लेखनाचा प्रकार: 

सूतक

ललित लेखनाचा प्रकार: 

Cold Blooded - ५

हवालदार माधोसिंग चांगलाच वैतागला होता!

ललित लेखनाचा प्रकार: 

Cold Blooded - ४

रोहित सिमल्याला पोहोचला तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. सिमल्याला पोहोचल्यावर त्याने ताबडतोब रोशनीचं कॉलेज गाठलं. जीन्स - टी-शर्ट आणि पाठीवर मोठी सॅक अशा अवतारात असलेला हा तरुण पोलीस अधिकारी असेल यावर कॉलेजच्या स्टाफचा आधी विश्वासच बसेना. रोहितने आपलं आयकार्ड त्यांच्यासमोर ठेवल्यावर अखेर त्यांची खात्री पटली! रोशनी द्विवेदीबद्दल त्याने चौकशी करताच तिचं सर्व रेकॉर्ड त्यांनी त्याच्या पुढ्यात ठेवलं. द्विवेदींच्या घरी मिळालेल्या सर्टीफिकेट्सप्रमाणे रोशनीने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं, पण तिचं कॉलेजमधलं रेकॉर्ड काही वेगळंच सूचित करत होतं.

ललित लेखनाचा प्रकार: 

Cold Blooded - ३

रोशनीच्या मृत्यूला आठवडा उलटला होता. अद्यापही केसचा तपास फारसा पुढे सरकत नव्हता. तिचा मित्रं रुपेश हवेत विरुन गेल्याप्रमाणे अदृष्यं झाला होता. त्याचा मोबाईल स्विच्ड ऑफच होता. रोहितच्या सूचनेप्रमाणे रेशमीने रुपेशचा फोटो त्याला पाठवला होता, परंतु त्याचाही फारसा काही उपयोग झालेला नव्हता. डॉ. भरुचांनी हैद्राबादच्या ज्या लॅबमध्ये रोशनीचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला होता त्या लॅबमधूनही काहीही कळलेलं नव्हतं. रोहितने आपल्या एकूण एक खबर्‍यांना कामाला लावलं होतं, पण परंतु चौफेर शोध घेवूनही रोशनीची पर्स किंवा तिच्या फोनचा अद्यापही पत्ता लागला नव्हता.

ललित लेखनाचा प्रकार: 

ओजबिंदु

कविश:"आग आहे लागलेली अंतरींच्या मोहळा
आणि आकाशांत आहे आसवांचा सोहळा
चालल्या आहेत धारा तोंवरी न्हाऊन घे"

कैलाश:"कविश बस कर यार, तुझा हा आसवांचा सोहळा. बघ तू असं जीभेवर कच्चं मांस ठेवून चाखलंय का, बघ!"

कविश:"तू झाडांना आजारी पडतांना पाहिले आहेस का रे कधी, वेड्या; ह्या प्राण्यां-पक्ष्यांच्या जगात परग्रहवासियांसारखी आजारी पडतात रे ही झाडं."

कैलाश:"झालास का परत तू सुरू, तू तर ना हा सुरा काही दिवस तुझ्याकडे ठेव आणि हा; वापर सुद्धा.. चित्र काढून ठेवू नकोस, मांस कापायला वापर, जीव घे मुक्या जनावरांचा; मग बघ कशी कविता उतरते तुझ्याआतून ते!"

ललित लेखनाचा प्रकार: 

Cold Blooded - २

Cold Blooded - Final - २

"हॅलो, वरळी पोलीस स्टेशन, सब् इन्स्पे. महाडीक बोलतोय..."

"गुड मॉर्निंग ऑफीसर! मी डॉ. सदानंद देशपांडे बोलतो आहे. इथे वरळी सी फेसवर एका मुलीची डेडबॉडी पडलेली आहे. तुम्ही ताबडतोब इथे या!"

"ठीक आहे डॉक्टरसाहेब! आम्ही लगेच येतो आहोत. फक्तं आम्ही तिथे येईपर्यंत कोणालाही बॉडीला हात लावू देवू नका, आणि तुम्ही तिथेच थांबा!"

"ओके ऑफीसर!"

भल्या सकाळी सहाच्या सुमाराला आपल्यासमोर अशी काही भानगड येईल याची महाडीकांना अजिबात अपेक्षा नव्हती, त्यामुळे त्यांची तारांबळच उडाली. परंतु या प्रकरणाचे पुढचे सोपस्कार त्यांनाच आटपावे लागणार होत.

ललित लेखनाचा प्रकार: 

Cold Blooded - १

रात्रीचा एक वाजून गेला होता....

ललित लेखनाचा प्रकार: 

भयकथा: त्या वळणावर..

"भेटलास का तू धर्मेंद्र साहेबांना? झालं ना तुझं काम?", जितेंद्र मला फोनवर म्हणाला.

"अरे, काम झालं. अगदी मनासारखं. हा क्लायंट मला मिळाला. धर्मेंद्र साहेबांकडे माझ्याखातर शब्द टाकल्याबद्दल धन्यवाद. मी त्यांच्यासोबत चांगला बिझिनेस करून त्यांचे मन जिंकेल, चांगल्या दर्जाचे प्रॉडक्ट त्यांना देऊन तू त्यांना माझ्यासाठी दिलेला शब्द सार्थ करून दाखवेन!", मी म्हणालो.

आता रात्रीचे आठ वाजून गेले होते. हे काम सहा वाजता आटोपणार होते पण होता होता या ना त्या कारणाने उशीर झाला.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा