आनंदाची अशी एक व्याख्या होऊ शकते : आपण अजाणतेपणे बाळगून असलेल्या क्षमता स्वतःमध्ये सक्रिय क्षमता म्हणून असल्याचा शोध लावणं. जग कसं बदलायचं? याचं उत्तर खरोखरच उत्साहवर्धक आहे : आनंदी राहून. पण याची आपल्याला किंमत मोजावी लागते, ती म्हणजे, वेळोवेळी खरोखरच असमाधानी असणं. ही एक निवड आहे, आपल्या आयुष्यामधील खरी निवड. ही खरी निवड खरं आयुष्य जगण्याशी निगडित आहे.