दिवाळी २०२१
देवांकडून देवांकडे
अनेक देव, देवता, कर्मकांडं, आणि पुजाऱ्यांचं वाढतं प्रस्थ असताना सगळी सत्ता असूनही राजा त्या परिस्थितीत आणि समाजात किती बदल करू शकतो? प्राचीन मिस्र (इजिप्त) संस्कृतीबद्दल अभिरूचीचा लेख.
विशेषांक प्रकार
- Read more about देवांकडून देवांकडे
- 7 comments
- Log in or register to post comments
- 3472 views
तुझे आहे तुजपाशी
'क्रिस्पर' तंत्रज्ञान वापरून इच्छित पेशींमधल्या डीएनएचा फक्त हवा तेवढाच तुकडा कापता येतो किंवा हवं तिथं नवा तुकडा घालता येतो. आणि हे तंत्रज्ञान आपल्याला एंब्रियोवर वापरता येतं…"
विशेषांक प्रकार
- Read more about तुझे आहे तुजपाशी
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2335 views
एक जानेवारी एकनंतर…
वस्तुस्थिती अशी होती की लॅपटॉपमध्ये सिनेमा आणि पॉर्न सोडून तुम्ही दुसरं काही करायला घेतलं की रिजनल सर्व्हर सेंटरला अलर्ट मेसेज जात असे. लॅपटॉपमधून एकमेकाला जाणारे मेल, फोटो, व्हीडीओ, एआयच्या सेन्सॉर स्कॅनमधून पास झाल्यावर पुढे जात. लॅपटॉपचे रेग्युलर स्कॅनिंग होऊन कोण किती रिस्की आहे त्याची ग्रेड ठरविली जात असे. रामभाऊंना एवढंच कळलं की आपण कुठलंही यंत्र वापरलं तर फसणार. पुन्हा तीच अस्वस्थता वाढत चालली. त्यांना काहीच सुचेनासं झाल्यावर त्यांनी घर आवरायला काढलं आणि हाती घबाड लागलं. जुन्या कोऱ्या डायऱ्या, बॉलपेन्स आणि खूप पेन्सिली मिळाल्या. ते नाचायचे बाकी होते.
विशेषांक प्रकार
- Read more about एक जानेवारी एकनंतर…
- 7 comments
- Log in or register to post comments
- 3946 views
कॉफी पुराण
चवदार कॉफीसाठी नेमके काय करता येईल हा प्रश्न नेहमीच विचारला जात असतो. मुळात त्यासाठी दुकानाच्या फळीवरील सुबकपणे मांडलेल्या कॉफी पावडरला 'राम राम' करणे इष्ट ठरेल. कारण तेथे उत्तम कॉफी कधीच सापडणार नाही. त्यामुळे आपल्याला ज्या स्थानिक हॉटेलमधील कॉफी आवडली असेल तेथे जाऊन तेथे कॉफी कशी बनवली जाते त्याची चौकशी करावी लागेल.
विशेषांक प्रकार
- Read more about कॉफी पुराण
- 11 comments
- Log in or register to post comments
- 6335 views
जी-८ रहस्यकथा (मीर बहादुर अली) : एक धावती ओळख
कथानकातले काही तपशील अपरिहार्यपणे कोव्हिड-१९ साथीशी गुंतलेले आहेत. तरी ही कोव्हिड-कथा आहे, असे म्हणणे वावगे ठरेल. रेसच्या घोड्यांच्या प्रजननाचे बाजारशास्त्र आणि जनुकशास्त्र या दोहोंची तत्त्वे कथेतल्या गुन्ह्याच्या आणि तपासाच्या मुळाशी आहेत -- आणि सध्याच्या ज्ञानानुसार घोड्यांना कोव्हिड-१९ रोगाची लागण होत नाही!
विशेषांक प्रकार
- Read more about जी-८ रहस्यकथा (मीर बहादुर अली) : एक धावती ओळख
- 54 comments
- Log in or register to post comments
- 18976 views
वास्तुविचार : पहाडापासून धुळीपर्यंत
अनेक ठिकाणांपैकी घारापुरी व वेरूळ येथील लेणी अशा रीतीने स्थापिल्या आहेत की अख्खा डोंगर हीच बांधकामाची सामग्री होती. पूर्ण डोंगराच्या आकाराचा पाषाणच कोरला आणि नको असलेला दगड काढून टाकल्यावर साक्षात भव्यता उरली. कैलास मंदिरानंतर एक-दोन शतकांत अंबरनाथ व औंढ्या नागनाथसारखी मोठी मंदिरे बांधण्यात आली.
विशेषांक प्रकार
- Read more about वास्तुविचार : पहाडापासून धुळीपर्यंत
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3144 views
चंगळवाद : त्यात दडलेले सौंदर्य आणि राजकारण
अमेरिका म्हणजे उपभोक्त्यांसाठी नंदनवनच आहे. अगदी विरोधी मतालाही इतर कुठेही नसेल इतकी मागणी तिथे असते. त्याचेही अधाशासारखे आणि सर्वदूर सेवन होते. ह्या उपभोगवृत्तीवरील टीकेचादेखील आस्वाद घेतला जाऊ शकतो.
विशेषांक प्रकार
- Read more about चंगळवाद : त्यात दडलेले सौंदर्य आणि राजकारण
- 30 comments
- Log in or register to post comments
- 13884 views
मी चोरलेलं पुस्तक
त्यांच्या दृष्टीनं अनेक पुस्तकांपैकी हे एक पुस्तक. खरी उपयुक्तता आपल्याला आहे. आपण ते पुस्तक ढापू या. पण मग मला त्या पुस्तकावरच्या पहिल्या दोन कोऱ्या आणि शेवटच्या दोन कोऱ्या पानांवरचा ग्रंथालयाचा लंबगोल शिक्का मानसिक त्रास द्यायला लागला. नुकतंच एक व्यंगचित्र पाहिलं होतं . त्यात एक चोर चोरी करायला एका ठिकाणी येतो. तिथे तिजोरीजवळ एक पुतळा असतो. तो त्याच्याकडे रोखून पाहतोय असं त्याला वाटत असतं...
विशेषांक प्रकार
- Read more about मी चोरलेलं पुस्तक
- 14 comments
- Log in or register to post comments
- 7566 views
काळाकभिन्न
निसर्गाचे नियम असतात काही. लहानग्या रोपट्याचं झाड होतं. डेरेदार होतं. मग फुलाफळांनी लगडायला लागतं. वर्षं सरतात नि खोडाचं वठणं स्वाभाविक होऊन जातं. निसर्ग हळूहळू आवरतं घेत असतो. म्हाताऱ्या, वठलेल्या, आखुडलेल्या, सुकलेल्या झाडाची एकच फांदी नेहमी हिरवीगार राहिली तर? पण फरक असा की झाडांना नसतात असे चौकटीतले नियम! निसर्गाचं रूप समजायचं नि सोडून द्यायचं नाहीतर देवत्व द्यायचं आणि उदोउदो करायचा. प्रश्नार्थक भुवई उठते ती फक्त चालत्याबोलत्या माणसांसाठीच.
विशेषांक प्रकार
- Read more about काळाकभिन्न
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2041 views
क्विअर डेटिंग ॲप्स - एक 'Indian' क्रांती?
खेड्यातून आलेल्या आणि प्रादेशिक भाषांमधून शिकलेल्या LGBTQIA वापरकर्त्यांसाठी या अडचणींची तीव्रता जास्त भासते कारण भिन्नलिंगी लोकांइतक्या जोडीदार शोधण्याच्या संधी त्यांना त्यांच्या खेड्यात/छोट्या गावात उपलब्ध नसतात. याबरोबरच खेड्यातील वापरकर्त्यांना इतरही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. स्वतःचा स्वतंत्र असा स्मार्टफोन नसणे, एकच फोन अनेकांनी वापरणे आणि त्यामुळे अशी ॲप फोनवर कायमची ठेवता न येणे. लहान गाव असल्याने ओळखी अधिक असणे आणि त्यामुळे आपली लैंगिक ओळख लपवून ठेवायचा अधिक ताण येणे - अशाप्रकारच्या अडचणींना ग्रामीण भागातील वापरकर्त्यांना तोंड द्यावं लागतं.
विशेषांक प्रकार
- Read more about क्विअर डेटिंग ॲप्स - एक 'Indian' क्रांती?
- 23 comments
- Log in or register to post comments
- 13225 views