कॉमेडी ऐसपैस

" तर आता पहा, नवराबायकोतील हा धम्माल संवाद!!" एक तोकड्या कपड्यांतली वाळकी मुलगी, तिच्या कमावलेल्या आवाजात सांगत असते. तिच्या शब्दाशब्दाला मागचा वाद्यवृंद ठणाणत असतो.

एक अत्यंत जाडी,बेढब पण साडी नेसलेली बाई स्टेजवर प्रवेश करते. आताशा, स्टेजवर प्रत्येक पात्राने नाचत नाचत आणि वाजत गाजतच प्रवेश करायचा असतो. तसा डिफॉल्ट प्रोग्रॅमच आहे ना! शिवाय प्रत्यक्ष काही वाक्य उच्चारण्याच्या आधीच नुसत्या आगाऊ देहबोलीवरच प्रेक्षकांचे आणि परीक्षकांचे हंशे वसूल करायचे असतात.

तर ही बे.बा.(बेढब बाई) स्टेजवर एक राऊंड मारतीये तोच तिचा अत्यंत अंगविक्षेपी काटकुळा नवराही(का. न.) येतो आणि ते दोघेही कुस्तीतल्या मल्लांसारखे एकमेकांभोवती फिरु लागतात. एकमेकांच्या एवढे जवळ असूनही त्यांचे आक्रस्ताळी संवाद मात्र तारस्वरांत सुरु होतात.

बे.बा.: अहो, कधीपासून मेली एक गंमत सांगायची आहे तुम्हाला, पण तुमचं लक्ष कुठाय ?

का. न. : गंमत ? म्हणजे परत पाळणा हलणारे की काय ? अरे देवा, आता या गाळीव रत्नाचं काय करु?

बे.बा. : इश्य्!(असं म्हणून ते धूड बेक्कार लाजतं) तुमच्या जिभेला काही हाड ?

का. न. : जिभेलाच काय, माझ्या बर्‍याच अवयवांना हाड नाहीये.

बे.बा. : शी, तुमचे ते नेहमीचेच पीजे पुरे झाले हं. मी काय म्हणत होते....

टी.व्ही. समोर बसून आपल्याला जराही हंसू येत नसले तरी तिथे प्रेक्षक आणि परीक्षक वाक्या वाक्याला हंसून टाळ्या वाजवत असतात.

का. न. : (वेड पांघरुन) तू काहीतरी पाळण्याचं म्हणत होतीस.

बे.बा.: काहीतरीच काय, मी आता मांजर सुद्धा पाळणार नाही.

का. न. : अगं त्या पाळण्याचं नाही गं, या पाळण्याचं. (जोजावल्यासारखे हातवारे करत)

बे.बा. : गपा आता. मला तुम्ही कुठली गोष्ट सांगूच देत नाही. असा वैताग आलाय! आणि त्यांत कायम असा एरंडेल घेतल्यासारखा चेहरा काय करुन बसता ?

का. न. : मग काय करु? उगाचच त्यांच्या सारखं(परीक्षकांकडे बोट दाखवून) हंसायला मला नाही जमत. साला विकेंडला सुद्धा रमी खेळायला नाही मिळत.

बे.बा. : अग्गंबाई! म्हणजे त्या सटवीला आता रमी म्हणण्यापर्यंत मजल गेली वाटतं तुमची ?

का. न. : ह्यॅ! त्या रमू बद्दल नाहीये बोलत. रमी म्हणजे ते सिक्वेन्स लावून खेळतात नं पत्याचे डाव? त्याबद्दल बोलतोय.

बे.बा. : बघा, बघा, त्या सटवीचा उल्लेख झाल्याबरोबर गालाला खळ्या पडल्या, आणि माझ्यासमोर मात्र कायम दुर्मुखलेले.

का. न. : अगं, विळ्या-भोपळ्याची मोट बांधल्यावर तो विळा कधीतरी हंसेल का ? मी तुझा नवरा आहे, म्हणजे ईंग्रजीत हसबंड!

बे.बा. : ही काय नवीन बातमी आहे का ?

का. न. : ज्याचं हंसणं कायमचं बंद झालेलं असतं ना, त्यालाच हसबंड, म्हणजे हंसणं बंद असं म्हणतात.

बे.बा. त्यावरुन आणखी काहीतरी कंठाळी बोलते, मग तो बोलतो. सगळी जुगलबंदी जास्तीत जास्त अंगाभिनय करुनच चालते. शेवटी त्या दोघांनाच दम लागून ते थांबतात. मग परीक्षक त्यांची भरभरुन स्तुती करतात. दहा पैकी नऊ गुण देतात. ती दुक्कल खाली उतरते, दुसरे कोणी त्यांची जागा घेऊन(वर चढताना उगाचच त्या निर्जीव रंगमंचाच्या 'पायी लागु' करुन) रंगमंच दणाणून सोडतात. वाद्यवृंदातील वादकांसकट सगळे अगदी, पुल किंवा पीजी वुडहाऊस च्या तोडीचा विनोद ऐकल्याच्या थाटात हंसत रहातात आणि आपला हात नकळतपणे चॅनेल बदलतो.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

हाहाहा ROFL
"हसबंड" सॉल्लिड. ROFL
ये तो घरघर के कहानी लिखी आपने Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुलंचे आणि पीजी वुडहाऊसचे विनोदी लेखनही वाचतानाच छान वाटते. त्याचे नाट्यरुपांतर करायला गेलं की आपल्या मनातल्या पात्रांशी प्रत्यक्षातल्या नटांचे काडीमात्रही साम्य नसल्याने बिल्कुल मजा येत नाही.
बाकी टीव्हीवर, व्हॉट्सॅपवर, चेपुवर इनोदाचा अतिरेक झाला आहे यात शंकाच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टीव्हीवर, व्हॉट्सॅपवर, चेपुवर इनोदाचा अतिरेक झाला आहे यात शंकाच नाही.

हाहाहा खरय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वुडहाऊसचे विनोदी लेखनही

बीबीसीची जीव्हज आणि वूस्टर मालिका मात्र भारी आहे, आवडेल तुम्हाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0