जंगलगोष्ट - ४

जंगलगोष्ट - ४

जंगल स्वतंत्र झाल्यापासून जंगलात जेव्हा माझं राज्य आलं तेव्हापासूनच विकास झाला, जंगलातील प्राण्यांची भरभराट झाली अशा डरकाळ्या फोडत सिंह देशोदेशीच्या दौऱ्यावर तर कधी जंगलात विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी लोकांची वाहवा मिळवत होता. पण काही केल्या सत्तेवर येतानाची लाट काही सिंहाला काही दिसत नव्हती. मग सिंहाने जंगलातील सगळ्या विभागांना आणि अधिकारी प्राण्यांना आदेश दिला पुढच्या शंभर दिवसांत सगळ्या विकासकामांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करा. दरम्यान महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष न दिल्याने एक वर्ग चांगलाच नाराज झाला होता. अर्थात एका वर्गाच्या मागण्या दुसऱ्या वर्गांचे अधिकारासाखेच बहाल करा अशा होत्या. वेळ पडल्यास कायदे करा पण आमच्या समाजाला हक्काचे फायदे द्या असा एककलमी कार्यक्रम होता. असे कार्यक्रम जंगलात वेळोवेळी होत होते. पण यंदा त्यांचे उग्र स्वरूप झाले होते. एकूण सिंह चतुर होता त्याची राजकीय प्रगल्भता आणि ठराविक प्राणीमात्रांवरील पकड मजबूत होती. मागण्या करणारी वा नेतृत्व करणारी मंडळींना कसे गोत्यात आणायचे आणि त्यांचे उखळ जंगलातील प्राण्यांसमोर कसे पांढरे करायचे हे सिंह आणि त्याची भलामण करणारी मंडळी चांगलेच जाणून होते. जंगलात अनेक छोटी-मोठी जंगले होती त्यावर सत्ता मिळवून वर्चस्व स्थापित करणे एवढाच एककलमी कार्यक्रम जोरात चालू होता. त्यासाठी सिंहाचा पक्ष निवडून येणाऱ्या लोकांना(विरोधी पक्षात का असेना) स्वपक्षात घेउन पवित्र करून पॉलिटिकल ईमेज मेकओव्हर करण्यात पटाईत होता. जंगलातले भाबडे प्राणीमात्र मात्र कमी नालायक आणि जास्त नालायक या पर्यायातून कमी नालायक नेता निवडत होते. बुरसटलेल्या व्यवस्थेसमोर सकलजन प्राणी हतबल झाले होते.
(क्रमशः)

-------------------------
© भूषण वर्धेकर
-------------------------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.
गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय मत कसे सांगणार ?
पण गोष्ट संपायला 8 ते 10 महिने लागतील. .....आणि तरीही गोष्ट संपणार नाहीच. न संपणारी गोष्ट आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभिनंदन तुम्ही नेटाने तुमचे जुने / नवे लेखन इथे प्रसिद्ध करून संस्थळाची पत सावरत आहात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कार्यकारणभाव समजला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

?
>>संस्थळाची पत सावरत आहात.>>
- घसरत होती?
- कधीपासून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- पत होती?
- कधीपासून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

त्या दुसऱ्या संकेतस्थळावरील कथा वरवर चाळल्या. प्रस्तुत कथांत आणि त्या कथांत शीर्षकाव्यतिरिक्त काहीही साधर्म्य आढळले नाही.

शिवाय, त्या 'जंगलकथा' आहेत, तर या 'जंगलगोष्टी'.

सबब, प्रस्तुत कथा भिकार आहेत, असा आक्षेप (असल्यास) एक वेळ समजू शकतो, परंतु प्लेजियरिझमचा आरोप (असल्यास) साफ नामंजूर.

इत्यलम्|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा कुठल्याही प्रकारचा आरोप नाही. निव्वळ, नामसाधर्म्यामुळे तशी प्रतिक्रिया लिहिली. प्रस्तुत कथा भिकार आहेत, असे मी कधीच म्हणणार नाही. त्या कथा मात्र अतिभिकार आहेत, हे मी ठामपणे म्हणू शकतो, कारण त्या मीच लिहिल्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

पुढे???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.

तुम्ही रुपक कथा लिहीता आहात का?

"जंगलातले भाबडे प्राणीमात्र " हे काही बरोबर वाटत नाही.. इतकही कुणी भोळसट/ निरागस नसतं आजकाल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्‌च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||

एकवार सग्गळ जंगल घुसूनच द्या ऐसित. खरडफळ्यावर तो पिसाळलेला हत्ती अन् इथं त्याला सपोर्टींग गोष्टी. खफचा पार चुतडा झालाय. ह्यालाच जंगलराज म्हणाव का?

/न'बा' मोड चालू/

जंगलाची बदनामी थांबवा!!!


//न'बा' मोड चालूच/
क्रमशः

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी