निखारा मिसळ| तंदूर मिसळ |झणझणीत कट /सँपल by Namrata's CookBook: १
लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
2 कप मटकी
2 मोठे चिरलेला कांदा
12-15 कढीपत्ता
20-25 लसूण
अदरक
2 चमचे मिसळ मसाला (सुहाना)
1/2 चमचे हळद पावडर
1 चमचा लाल तिखट
1 चमचा काळ तिखट
जिरे
मोहरी
2 बारीक चिरलेला कांदा
कोथिंबीर
फरसाण
तेल
लिंबाचा रस
गुळ
क्रमवार पाककृती:
१. मटकी संपूर्ण रात्री ७ ते ८ तासात भिजवून घ्या
२. एका कॉटन च्या कपड्यामध्ये मटकी मोड येण्यासाठी 5 ते 6 तास बांधून ठेवा
३. आता मटकी एका भांड्यामध्ये घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी , हळद , चवीनुसार मीठ घालून मिक्स करुन घ्या
४. मध्यम गॅसवर शिजवून घ्या (4 शिट्ट्या ) .(मटकी जास्त शिजवू नका )
- आता मिसळ कट / तर्री तयार करुन घेऊ
५. गॅसवर पॅन गरम करावे त्यामध्ये तेल घालावे
६. तेल गरम होत आले की त्यात जिरे,, मोहोरी घाला नंतर लसूण ,आल, कढीपत्ता मंद आचेवर 3 मिनिटे परतून द्यावे
७. चिरलेला कांदा घाला आणि नंतर ते रंग बदलेपर्यंत परतून घ्यावे
८. आता गॅस बंद करा आणि लसूण ,आलं , कढीपत्ता ,कांदा मिश्रण थंड करा
९. मिक्सर मध्ये एकदम बारीक करुन घ्या (पाणी वापरू नका)
१०. आता एक पॅन घ्या,४ ते ५ मोठे चमचे तेल घ्या (त्याला जास्त तेल घ्यावे )
११. तेल गरम झाल्यावर मिक्सर मधले मिश्रण घाला
१२. मिश्रण (१० ते १२ मिनिटांपेक्षा जास्त)शिजवून घ्यावे .मध्ये मध्ये परतावे
१३. आता हळद, लाल तिखट, काळ तिखट, मिसळ मसाला घालून 5 मिनीटे परतावे (मध्ये मध्ये परतावे)
१४. आता पाणी आणि चवीनुसार मीठ घालावे
आणि ते १० ते १५ मिनिटे मस्त उकळून घ्यावे
१५. १५ मिनिटांनंतर लिंबाचा रस घाला आणि गॅस बंद करा (तुम्हाला आवडत असेलतर तुम्ही गूळ/साखर घालू शकता)
१६. मिसळ सँपल / कट / तर्री तयार आहे
१७. आता कोळसा गॅसवर गरम करायला ठेवू , त्या दरम्यान प्लेटिंग सुरू करु
१८. आता मातीचे भांडे घ्या, प्रथम फरसाण घाला, नंतर मटकी , बारीक चिरलेली कांदा, कोथिंबीरआणि फरसाण घाला.
कोळसा गरम झाल्यावर तो स्टील वाटीत / लहान मातीच्या पणतीमध्ये घ्या . आत कोळसा ठेवून त्यात 2 चमचे तेल घालावे.
झाकण बंद करा
१९. 2 मिनिटांत झाकण काढा . कोळसा बाहेर काढून त्यामध्ये मिसळ सँपल / कट / तर्री घाला आणि निखारा / तंदूर मिसळ तयार आहे
अधिक टिपा:
मटकी शिजवताना जास्त पाणी वापरु नये
रेसिपीचा पूर्ण विडिओ : https://youtu.be/EdGJ3gl36LY
धन्यवाद
प्रतिक्रिया
फोटो - एक शंका (अवांतर)
त्या मोठ्या मडक्यात वरून खुपसलेले ते काय आहे?
(जरा बऱ्या क्वालिटीच्या) प्लास्टिकच्या (पारदर्शक) चमच्यांची भुते?
पोष्टकर्त्याचे/कर्तीचे नाव
पोष्टकर्त्याचे/कर्तीचे नाव "नमो"युक्त आहे हे रोचक.
बाकी पाककृती ठीक. पदार्थांची मापे नीटपणे द्यायला हवी.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
उत्तम तपशील आणि छायाचित्र.
उत्तम तपशील आणि छायाचित्र.
एकच गोष्ट जाणवली. मिसळ मसाला "सुहाना" अर्थात तयार मसाला पॅकेट आणून वापरायचा यात मिसळीची चवीबाबत स्पेशालिटी काय उरेल? फक्त प्रोसेस आणि प्रेझेंटेशन उरेल.
"सुहाना"
हा कोठला ब्रँड आहे?
कधी ऐकला नव्हता.
पुण्यात कोल्हापुरी मिसळ मसाले
पुण्यात कोल्हापुरी मिसळ मसाले बरेच बनतात.
(आता एक आहे आमच्याकडे. खफवर पाहा)
प्रवीण लोणची आणि मसाले हा
प्रवीण लोणची आणि मसाले हा ब्रँड ऐकला आहे का?
तेच सुहानावाले आहेत.
https://www.loksatta.com/pune-news/pravin-suhana-ambari-lonchi-masala-14...
न.बा.
न.बां.ना असलेच तर बहुधा बेडेकर आणि के.प्र.च माहीत असावेत
त्यांची आई मसाले घरीच करत असणार.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हो/नाही
हो, खरे आहे. ४११०३०च्या तत्कालीन भटांमध्ये१ हेच ब्राण्ड जास्त करून प्रचलित होते.२
नाही म्हणायला, प्रवीण लोणची/मसाल्यांचे नाव तेव्हासुद्धा (उडतउडत का होईना, परंतु) ऐकले होते, नाही असे नाही. परंतु (शेवटी भटेच असल्याकारणाने) आमच्या घरात ते वापरले जात नसत, इतकेच.
नाही ब्वॉ. वेळ नसायचा. नोकरी करायची. (कॉलेजात लेक्चरर वगैरे होती.) त्यामुळे, लोणची-मसालेच काय, परंतु क्वचित्प्रसंगी इतरही खाद्यपदार्थ (जसे की, पोळ्या, भाजी, चटण्या, लाडूचिवडे, झालेच तर इडल्या वगैरे) घरात (भटे असूनसुद्धा) बाजारातून येणे वर्ज्य नव्हते. (त्याबद्दल कंटेंपररी ४११०३०करीण भटबायकांकडून अनेकदा कुत्सित टोमणेसुद्धा मिळत; मात्र, त्यांना कोणी नि काय म्हणून भाव द्यावा? परंतु तेही एक असोच.)
----------
('आपल्या मातुःश्री मसाले थेट इंग्लंडातून मागवीत असत काय?' हा प्रतिप्रश्न (भटे असूनसुद्धा) सभ्यताजन्य संकोचास्तव तूर्तास आवरता घेतला आहे. असो.)
----------
तळटीपा:
१ हे साधारणतः 'त्या काळातले ते मुसलमान म्हणजे...'च्या चालीवर वाचावे.
२ त्यातसुद्धा केप्रच. कारण, कितीही झाले, तरी बेडेकर मुंबईचे. म्हणजे उपरे. तरी, माझी आई मूळची मुंबईकरीण - त्यातसुद्धा बॉर्न अँड ब्रॉट अप गिरगावकरीण - असल्याकारणाने, तिचा कल बेडेकरांच्या उत्पादनांकडे अधिक असे. परंतु ते एक असो.
प्रतिप्रश्न कराच मी म्हणतो .
प्रतिप्रश्न कराच मी म्हणतो . करूनच टाका. तुमच्याहून जास्त उत्सुक....
जाऊ देत !!!
भाषिक शंका (सवांतर)
जिच्यात पाव बुचकळून खाता येतो अशा (मिसळीबरोबर दिल्या जाणाऱ्या) तिखट पातळ तर्रीला 'सँपल' का म्हणत असावेत? या शब्दाची व्युत्पत्ती तथा उद्गम काय असावा?
बुचकळून की बुडवून? अर्थात
बुचकळून की बुडवून? अर्थात Dunkin'१ म्हणजे बुचकळूनच२ बहुधा.
१ - पण त्यांनी बुचकळून म्हटले म्हणजे आपण अम्हणायलाच हवे असे नाही.
२ - पण पाव बुचकळला तर तो इतका soggy ३होइल की ज्याचे नाव ते.
३ - soggy ला मराठी शब्द?
Embrace your inner sloth.
soggy
पचपचीत?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हो.
हो.
नाही चिंता, पचपचीत आमटी असते
नाही चिंता, पचपचीत आमटी असते किंवा ऊसाचा रस पचपचीत असतो (पाणी घातले) वरुन तर किंवा कसेही.
पावाचा लगदा होणार त्यामुळे त्याला लिबलिबीत हाच शब्द बरोबर आहे.
Embrace your inner sloth.
लगदा
दाते-कर्वे कोशात लगदा ह्या शब्दाचा अर्थच असा दिला आहे :
अर्थात, लिबलिबीतही चालावा, कारण त्याचा अर्थ असा आहे :
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ओह ओके धन्यवाद
ओह ओके धन्यवाद
Embrace your inner sloth.
माझ्या माहेरी "बदामी हलवा" या
माझ्या माहेरी "बदामी हलवा" या प्रकाराला लगदा म्हणण्याची पद्धत होती. त्यामुळे लगदा म्हणजे चिकट असायला हवा असा माझा उगाचच समज होता.
--------------
रच्याकने पेपर पल्प ला कागदाचा लगदा म्हटले जाते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
बुचकळूनच.
पाव तर्रीत घुसवल्यानंतर, आपण तसे काही केले आहे हे पूर्णपणे विस्मरणात घालवून तो तेथे तसाच (जगाच्या अंतापर्यंत, कायमस्वरूपी अथवा दीर्घकालाकरिता, पुन्हा बाहेर न काढण्याच्या इराद्याने) तेथून बाहेर काढू पाहणाऱ्या दुसऱ्या कोणा त्रात्याची वाट पाहात सोडून दिला, तर तो 'बुडविला', असे म्हणता येईल. मात्र, तर्रीत घुसविल्यानंतर त्वरित, किंवा किमानपक्षी नजीकच्या भविष्यकाळात, तो हेतुपुरस्सर पुन्हा बाहेर काढल्यास, त्या कृतीस 'बुचकळणे' म्हणून संबोधण्यावाचून गत्यंतर नाही.
पावापावावर अवलंबून आहे.
इतालियन पाव (स्थानिक ताजा बेकऱ्योष्ण१), पुण्यातल्या हिंदुस्थान बेकरीचा पाव, किंवा (पुण्यातल्याच) कॅफे गुडलकचा किंवा गेला बाजार कोठल्याही इराण्याच्या बेकरीतला ताजा पाव असेल, तर असे सहसा होऊ नये. उलटपक्षी, हिंदुस्थानातला मॉडर्न बेकरीचा पाव, किंवा इथला वंडरब्रेड, सनबीम किंवा तत्सम कोणताही घाऊक प्रमाणात बनविलेला ब्राण्डेड पाव वापरल्यास तो बुचकळल्यावर त्वरित गलितगात्र व्हावा, तथा त्याने तर्रीतच देह टाकावा.
(अवांतर: कधी चहात पाव बुचकळून खाता की नाही?)
----------
तळटीप:
१ बोले तो, कमर्शियल तत्त्वावर घाऊक भावात फॅक्टरीत बनवून दुनियाभरच्या ग्रोसऱ्यांच्या शेल्फांवर मांडून ठेवलेला ब्राण्डेड पाव नव्हे. तुमच्या स्थानिक ग्रोसरीच्या ताज्या बेकरीच्या सेक्शनात पारदर्शक प्लाष्टिकच्या वेष्टनात मिळणारा पाव.
निखाराधूरमार्जित मिसळीचे
निखाराधूरमार्जित मिसळीचे काहीही होवो पण soggy पासून उगम पावलेली पर्यायी विशेषणं, बुडीत क्रियापदं, झालंच तर मसालेपुराण खूपच आनंददायी झाले आहे. ज्यानेत्याने आपापली श्रेयं घेऊन टाकावीत.
परंतु माझ्या मूळ शंकेचे निरसन
परंतु माझ्या मूळ शंकेचे निरसन झालेच नाही!
सँपलला 'सँपल' का म्हणतात?
("मग काय 'टेलिफोन डिरेक्टरी' म्हणायचे?" हे - किंवा अशा प्रकारचे - उत्तर अपेक्षित नाही.)
सँपल?
इथे वापरण्यात येणारा ‛सँपल’ हा अपभ्रंश (अशुद्ध स्वरूपाचा) असावा असे मला वाटते. आम्ही तर बुवा असले शब्द निदान असले मागवताना तरी कधी कधी ऐकले नाहीत. आम्हाला जास्ती कळत नाही म्हणून आम्ही सरळ रस्सा द्या असे म्हणतो. इथली व्युत्पत्ती असमाधानकारक आहे. पण असो.
डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…
नक्की खात्री नाही, परंतु...
...हा शब्द बहुधा पुण्याच्या बाहेर फारसा प्रचलित नसावा.
तशीच शक्यता वाटते. (पण नक्की कशाचा अपभ्रंश?)
वापरण्यात येणारा ‛सँपल’ हा
वापरण्यात येणारा ‛सँपल’ हा अपभ्रंश नसून
नवीन दुकानात/टपरीत मिसळ शुरु केल्यावर चोखंदळ गिऱ्हाइक साम्पल टेस्टिंगला (तर्रीचा जहालपणा) येते. मग हळूहळू हेच नाव पडले. "तुमचे तर्रीचे साम्पल बघू."
साम्पलचे तीन ग्रेड असतात.
१) अतिजहाल पाण्यात उकळलेली मिरची पावडर.
२) तेलात टाकलेली मिरची पावडर
३) फक्त उसळीत टाकलेली मिरची पावडर.
हम्म्म्म्म्...
हे सयुक्तिक वाटते.
आभार.
यालाच जोडून :
यालाच जोडून :
पुणेरी मराठीतला 'सँपल'चा ध्वन्यार्थ 'निवडक' असा काहीसा आहे. लहानपणी वाण्याच्या दुकानात शेलकी वस्तू आणायला पाठवताना 'सँपल बघून आण' असा आदेश माझ्या पुणेतीसकर पालकांकडून मिळे.
सँपलचा 'रँडमाईज्ड' अर्थ ऐकल्यावर सांस्क्रूतीक धका बसला होता.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
सँपलचा 'रँडमाईज्ड' अर्थ
हाहाहा
Embrace your inner sloth.
थपथपीत.
थपथपीत.
शब्द आठवला - लिबलिबीत.
शब्द आठवला - लिबलिबीत.
Embrace your inner sloth.
थपथपीत शब्द छान आहे की.
थपथपीत शब्द छान आहे की.
Embrace your inner sloth.
नाय .
नाय .
बीलबीलीत
बीलबीलीत
नाय.
नाय.
जास्त का अतिजास्त?
चार शिट्या मारेस्तोवर मटकीचा लगदा होत नाही का? आमच्यांत शिट्या मारायची तयारी दिसल्यावरच गॅस बंद करतात; त्याला अर्धा मिनीट उशीर झाला तरी खाताना "आज उसळीचा लगदा झालाय" अशा स्वतःच्या आवाजातल्या तक्रारी ऐकाव्या लागतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
?
(वर नुकत्याच शिकलेल्या) 'लगदा' या शब्दाचा वाक्यात उपयोग करण्याचा प्रयत्न चालू आहे काय?
(अवांतर: वर 'लगदा' या शब्दाचा अर्थ दाते-कर्वे शब्दकोशातून दिलेला आहे. पक्षी, 'लगदा' हा कोकणस्थी शब्द आहे, असा तर्क मांडता यावा काय?
अतिअवांतर: इतःपर, मोल्सवर्थ शब्दकोशातून शोधून काढलेला प्रत्येक शब्द हा आंग्लोद्भव आहे, असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.)
मन सुद्द तुजं...
सुदैवानं, कोकणस्थ नव्हते ते माझे वडील१ आता हयात नाहीत. एरवी त्यांच्या अस्मिता दुखावल्या असत्या.
१. इतक्यातच इतरत्र भीषण भाषांतराच्या गंमती वाचत होते. मग दिलं डकवून!
पण खरोखरच, शिट्टीचा आवाज जऽरा मोठा झाला की आमच्यांत गॅस बंद करतात. नाही तर उसळ अति शिजते; दाताखाली काही येत नाही आणि वर पुन्हा खाऊनपिऊन कुपोषण२ होतं आणि त्याचा मानसिक त्रास होतो, ते निराळंच.
२ मिसळ हेच मुळात कुपोषण असल्यामुळे त्यात आणखी काय अपेक्षा ठेवायच्या असं कोणी म्हणत असेल, तर सहमतीशिवाय पर्याय नाही.
अवांतर - घराजवळच एक कॉफीचं दुकान आहे. तिथे चुलीवरची कॉफी विकतात. तिथे गेल्यावर फोटो काढून दाखवण्यात येईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
त्या छोट्या मडक्यात ताक आहे
त्या छोट्या मडक्यात ताक आहे ना ?
सिंहगडावर मातीच्या मडक्यात असेच थंडगार ताक मिळते, ते आठवले.
पाककृती छान आहे. यात अंबारीचा कांदा लसूण मसालाही वापरून बघा तुम्ही. अगदी थोडा, साधारण अर्धा (चहाचा) चमचा. छान चव येते.
*********
तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||
यावरून आठवले - उलटी अंबारी (अवांतर)
यावरून कवि यशवन्तांच्या
या काव्यपंक्ती (उगाचच) आठवल्या.
(असो चालायचेच.)
हरकत नाही ...
कुणाला, कशावरून, कधी आणि काय आठवावे? याला काही नियम अथवा बंधने नाहीत.
शक्य असल्यास ती पूर्ण कविता द्या की इथे.
*********
तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||
शाळेत असताना होती.
बहुधा कुमारभारतीत. (आठवीला की नववीला, ते आठवत नाही.)
(तोंडी परीक्षेला आली, तर आम्ही मुद्दाम मंगलाष्टकांची चाल लावून म्हणत असू. शार्दूलविक्रीडितात असल्याकारणाने आमचे फावत असे.)
(शाळेत होती, म्हणून आम्हांस ठाऊक. अन्यथा, कविता हा आमचा प्रांत नव्हे.)
ज्या संग्रहात आहे, तो संग्रह इथून उतरविता येईल. (कवितेचे नाव: 'अढळ सिंहासन'.)
----------
('उलटी अंबारी' हे भिकाऱ्याच्या वाडग्याचे प्रतीक आहे.)
अत्यन्त वाचनीय दुवा.
अत्यन्त वाचनीय दुवा.
अनेक अनेक आभार!
*********
तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||
न'बांनी शाळेत जीव लावून कविता
न'बांनी शाळेत जीव लावून कविता धडे वाचलेत.
मन लावुन.
मन लावुन.
Embrace your inner sloth.
('उलटी अंबारी' हे
हे काही डोक्यात जात नाहीये. गेले नाही.
जे लोक श्रीमंत होते ते आता
जे लोक श्रीमंत होते ते आता भिकारी झालेत च्रट्जी त्यामुळे अंबारीत फिरणारे लोक उलटी अंबारी (= वाडगा/कटोरी) घेउन फिरत आहेत.
Embrace your inner sloth.
साइझ डज मॅटर
अंबारी ती केवढी
वाडगा तो केवढा
पण समजा वाईट दिवसांची इन्टेसीटी इतकी असेल की उलटी मोठी अंबारी घटुन छोटा वाडगा झालाही असेल कदाचित्
उसने बात की कुछ ऐसे ढंग से सपने दे गया वो हज़ारो रंग के,रह जाऊँ जैसे मैं....
'उलटी अंबारी' हे भिकाऱ्याच्या
उपमा आवडली आणि कवितेच्या कॉन्टेक्स्टमध्ये सार्थच आहे.
Embrace your inner sloth.
.
.
एकूण कितीही मन लावले तरी जीव
एकूण कितीही मन लावले तरी जीव वाडग्यात काही (आतासुद्धा) पडला नाही तर शाळेत असतानाची कल्पना आली असेल. (तीसुद्धा रिटायर झाली.)
ऐसीवर एवढा ट्रोल खपवतात हे नशीब. दुसरीकडे वर्गाबाहेरच काढलं असतं.
ऐसीचे हेडमास्तर / रीण विक्षीप्त् सुधारकी आहेत
ऐसीवर एवढा ट्रोल खपवतात हे नशीब. दुसरीकडे वर्गाबाहेरच काढलं असतं.
ते जर ट्रोल जास्त झाला तर अशा ट्रोलांना बाहेर न काढता आख्खाच्या आख्खा वेगळा वर्गच काढुन देतात बसायला
आभाळ वेगळे द्यावे मग अशा वेलींना अस काहीतरी ग्रेसफुल ब्रीद आहे म्हणे त्यांचे
कधी कधी माजघरात जास्त कल्ला झाला तर ते मग संघी स्टाइल मैदानात येउन बौद्धिक घेऊ देतात असेही ऐसिताहासात नोंद आढळते
( बाकी संघाचे बौद्धिक म्हणजे गंमत च असते निष्कर्षा वरुन सुरुवात मध्य अंत )
उसने बात की कुछ ऐसे ढंग से सपने दे गया वो हज़ारो रंग के,रह जाऊँ जैसे मैं....