Skip to main content

विदा-भान - प्रतिसाद

लोकसत्तामध्ये माझं सदर विदा-भान २ जानेवारीपासून सुरू झालं.

विदा म्हणजे काय, ती कशी जमवली जाते, आपल्यासाठी-विरोधात कशी वापरली जाते, याची लोकांना माहिती मिळावी, यासाठी हे सदर आहे. आजूबाजूच्या लोकांशी बोलताना, त्यांना या विषयाची अजिबातच कल्पना नाही, असं वाटलं म्हणून ही लेखमाला.

लेखांचे दुवे इथे चिकटवेनच. त्यावर तुम्हाला काही आक्षेप असतील, चुका काढायच्या असतील, किंवा एखादा महत्त्वाचा मुद्दा आलाच पाहिजे, काही स्पष्टीकरणं फारच उडतउडत लिहिली आहेत, असं वाटत असेल तर जरूर प्रतिसाद द्या. पुढे ५१ आठवडे मी काय लिहिणार, हे अजून पक्कं ठरवलेलं नाही. त्यासाठीही तुमच्या प्रतिसादांचा उपयोग होईल.

अतिशहाणानं या पुस्तकाची खरडफळ्यावर सूचना केली - Data And Reality

विदाविज्ञान, प्रोग्रॅमिंग संदर्भात काही उपयुक्त चर्चा झाली तरीही हरकत नाही. त्याचा नवा धागा काढायची गरज पडली तर तेही करता येईलच.

हा पहिला लेखांक - हा डबा काय साठवतो? (इपेपरचा दुवा.)
लेखांक २ - 'विदा' म्हणजे नक्की काय?
लेखांक ३ - नफ्यासाठी कायपन
लेखांक ४ - वाढदिवसाच्या शुभेच्छा
लेखांक ५ - नजरबंदीचे खेळ..
लेखांक ६ - विदा म्हणजे सांगोवांगी नव्हे
लेखांक ७ - विचारकूपांचे मांडलिक
लेखांक ८ - कूपातील मी मंडूक..
लेखांक ९ - ढासळणाऱ्या तीरावरचे तटस्थ
लेखांक १० - न-नैतिक बघ्यांचे जथे
लेखांक ११ - विदेच्या पलीकडले...
लेखांक १२ - शितावरून भाताची परीक्षा
लेखांक १३ - ..व वैशिष्टयपूर्ण वाक्य
लेखांक १४ - आडातली विषमता पोहऱ्यात
लेखांक १५ - पगडी आणि पगडे
लेखांक १६ - पूर्णातून पूर्ण
लेखांक १७ - तुमच्यासाठी खास!
लेखांक १८ - माहितीपासून ‘हुशारी’कडे..
लेखांक १९ - प्रतिभा आणि प्रतिमा
लेखांक २० - नसतं तसं कसं दिसतं?
लेखांक २१ - चूक, त्रुटी की अन्यायही?
लेखांक २२ - गूगलशी कशाला खोटं बोलू?
लेखांक २३ - नफ्यापुरतीच पाळत
लेखांक २४ - शोधसूत्राची सोय कुणाची?
लेखांक २५ - माहितीपासून पाळतीकडे?
लेखांक २६ - ‘निर्णयवृक्षा’ला माहितीची फळे
लेखांक २७ - प्रारूपांचे ताटवे..
लेखांक २८ - भाकीत चुकणारच; पण..
लेखांक २९ - शिफारस करण्याचा धंदा
लेखांक ३० - बिन ‘आँखों देखी’
लेखांक ३१ - ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’चं किल्मिष
लेखांक ३२ - खऱ्याची दुनिया नाही, सायेब!
लेखांक ३३- माझ्या दारचं जास्वंद
लेखांक ३४ - सांगोवानगीदाखल..
लेखांक ३५ - दुर्बळांची मुखत्यारी
लेखांक ३६ - आधुनिक विषमतेचे वैषम्य
लेखांक ३७ - दिखावे पे न जाओ
लेखांक ३८ - वादे वादे न जायते गूगललाभ:
लेखांक ३९ - वाटेवरती काचा गं..
लेखांक ४० - गोस्ट हाये पृथिविमोलाची..
लेखांक ४१ - आली लहर.. झाला कहर!
लेखांक ४२ - लोकानुनय की लोकहित?
लेखांक ४३ - विदा मिळाली, पुढे?
लेखांक ४४ - सावध ऐका पुढील टिकटॉक?
लेखांक ४५ - सामाजिकतेचा आलेख सिद्धांत
लेखांक ४६ - डेटा देता एक दिवस बरेच काही मागावे
लेखांक ४८ - विडा उचलताना.
लेखांक ४८ - गोंगाटाचा फायदा कोणाला?
लेखांक ४९ - कृत्रिम प्रज्ञा खरंच बुद्धिवान आहे?
लेखांक ५० - समाजमाध्यमांवरची ‘तण’तण
लेखांक ५१ - सरसकटीकरणाची अटकळ..
लेखांक ५२ - मतांवरची, मनांवरची सत्ता..

समीक्षेचा विषय निवडा

शुभांगी कुलकर्णी Tue, 02/04/2019 - 16:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुळीच नाही. उलट पाठवणे.अगदी छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागल्या.मागच्या जन्मी तुम्ही कोण यापासून ते एखादी गोष्ट आपण गुगलवर सर्च केल्यावर त्याच्या जाहिराती आपल्याला मेल मध्ये येणं व फेसबुक वा इतर माध्यमातून येणं. मी पुढच्या रविवारची वाट पहात आहे.

सामो Fri, 26/04/2019 - 19:52

१६ व १७ भाग आवडले. १७ व्या भागात लिहीलेली माहीती नवीन नाही.
'अमंगळ भेदभाव' हा शब्द आवडलेला आहे.

चिमणराव Sat, 27/04/2019 - 06:51

बऱ्याच दिवसांनी या लेखाकडे परतलो.

शिवाय एकदा गरीब असा शिक्का बसला की त्यातून प्रत्यक्षात बाहेर येणं कठीण असतं.

रेल्वेच्या एसी डब्यात चढताना आतले लोक गरीब दिसणाऱ्या लोकांना अगोदरच सांगतात "हा फर्स्टचा डबा आहे." गरीब असा शिक्का लोकांना घालवता येत नाही. गुगल किंवा इतर बॅाटही काही साम्पल्सना गरीब म्हणूनच समजत असेल तर दोष नाही.
तुमच्या हिस्ट्रीचा वापर करून तुमची खरेदी
शक्ती आणि आर्थिक स्तर ओळखण्याचा कोड लिहिलेला असतो.
आपण दुकानात काही खरेदीला जातो तेव्हा दुकानदार आपले कपडे,चपला,बुट पाहून लगेच ठरवतो की हे या स्तरातले माल घेणारे गिऱ्हाइक आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 27/04/2019 - 07:36

In reply to by चिमणराव

आपण दुकानात काही खरेदीला जातो तेव्हा दुकानदार आपले कपडे,चपला,बुट पाहून लगेच ठरवतो की हे या स्तरातले माल घेणारे गिऱ्हाइक आहे.

मला अतिशय उलट अनुभव आहेत, विशेषतः चपलांच्या दुकानात.

मला हव्या तशा चपला किंवा सँडल बहुतेकदा दुकानात नसायच्या. मग उपलब्ध असलेल्या चपलाच कशा 'चालतात' किंवा चांगल्या आहेत, किंवा मला चांगल्या दिसतात, वगेैरे काहीही फेकायचे सेल्समन. मला काय हवंय, हे मी नाही हे विक्रेते ठरवणार! आता ही तक्रार कितीतरी मोठी आहे; मला काय हवं आहे, यासाठी माझं मत मला माहीत असलं पाहिजे. तेच ठरवण्याचा प्रयत्न आता फेसबुक, ट्विटर आणि फेक-न्यूज-बॉट्स करत असतात.

सामो Thu, 30/05/2019 - 19:32

भाग २१ फार फार आवडला. मस्तच आहे.
तळपते आहेस अदिती. खूप छान माहीती देते आहेस. याचं जर पुस्तक निघालं तर किंडलवर अथवा कसेही मी घेइन.

प्रभाकर नानावटी Fri, 23/08/2019 - 08:35

Telecom Regulatory Authority of India या दूरसंचार व्यवस्थेचे शासकीय नियंत्रक एजन्सीने अलिकडेच विदाच्या व्यापारी मूल्याविषयी व त्याच्या वापराविषयी काही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. (या पूर्वी न वाचलेल्या) ऐसीच्या वाचकांच्या माहितीसाठी ही टिप्पणी.
मोबाइलच्या 1914 सालच्या तुलनेने 1 GBच्या किंमतीत 95 टक्के घट होऊनसुद्धा गेल्या 5 वर्षातील या क्षेत्रातील उलाढालीत अडीच पट वाढ झाली आहे. 1914 साली विदाचा वापर 828 मिलियन GB होता. तो आता 46404 मिलियन GB आहे. (2017 साली 20092 मिलियन GB होता) विदाचा वापर 0.27 GB प्रति ग्राहक होता. तो आता 7.6 GB आहे. यात 4G तंत्रज्ञानाचा सिंहाचा वाटा आहे (4G: 86.85 %, 2G: 0.95%, 3G: 1.18% व CDMA: 0.01%) मोबाइलच्या वाढीव वापरामुळे महसुलातही लक्षणीय प्रमाणात भर पडली आहे. 2017सालचा महसूल 38882 कोटी रु होता तो आता वाढून 2018 साली 54671 कोटी रु झाला आहे. प्रती ग्राहकापासून मिळणारा महसूल 2014 साली 71.25 रु होता. तो 2018साली 90.12 रु झाला आहे.
यावरून विदाचे व्यापारीकरण किती झपाट्याने होत आहे, याची कल्पना येईल.
संदर्भ: Business Standard, 22 Aug 2019

डीप पर्पल ऋग्वेदी Sat, 07/09/2019 - 14:37

तुमचे लेख फारच छान आहेत, मुख्य म्हणजे सोप्या भाषेत आहेत आणि उदाहरणं पण चपखल असतात

लिहीत रहा

ऑल द बेस्ट

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/09/2019 - 02:41

In reply to by डीप पर्पल ऋग्वेदी

काही समजलं नाही, किंवा एखादा विषय फार महत्त्वाचा वाटला तर त्याबद्दलही प्रतिसाद द्या. न समजलेल्या गोष्टी नीट समजावून सांगणं, किंवा तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयावर लिहिणं शक्य होईलच असं नाही; पण प्रयत्न जरूर करेन.

चिमणराव Sun, 08/09/2019 - 04:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नक्कीच. सर्वच लेख वाचले नाहीत.
-सर्वसामान्य लोक थेट अथवा आडून महत्त्वाचा डेटा /माहिती उघड करतात. एकमेकांशी बोलताना किंवा फेसबुक वगैरे माध्यमांतून. यावर काम करून डेटा पाखडून किंवा चाळून डेटा अनलिस्ट काही तत्व /अनुमान काढतात. ते कुणासाठी उपयोगाचे असते.

- लोकांनी काय करायचे किंवा डेटा अनलिस्टांसाठी मार्गदर्शक टीप्स देण्याचा प्रयत्न आहे का?

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/09/2019 - 08:07

In reply to by चिमणराव

महत्त्वाची विदा म्हणजे काय, ही गोष्ट फारच सापेक्ष असते. विदा वापरून नक्की काय करायचं आहे, त्यावर महत्त्व कशाला द्यायचं हे ठरतं.

विदा-भान ह्या सदराचा हेतू विदा आणि संबंधित विज्ञान-तंत्रज्ञानाचा आपल्यावर, आपल्या मूल्यांवर, आपल्या आयुष्यांवर कसा परिणाम होतो, ते लिहिण्याचा आहे. विदाविज्ञानाचं टेक्स्टबुक लिहिण्यात मला रस नाही; जालावर त्यासाठी चिकार फुकट-आणि-विकत स्रोत उपलब्ध आहेत.

दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांमध्ये एक समान धागा आहे. विदाविज्ञान हा विषय सैद्धांतिक नाही. त्यामुळे स्वतः त्यात हात घालून काम केल्याशिवाय काही समजणं, शिकणं, सांगणं कठीण आहे. दोन वर्षांपूर्वी मी शिकत असताना काही गोष्टी मी फक्त ऐकून सोडून दिल्या होत्या. आता काम करून मला त्या आकळतात.

विदा-भान हे सदर त्यासाठी नाही. गणित आणि सांख्यिकी न समजणाऱ्या लोकांनाही विदा-भान येणं गरजेचं आहे. त्यासाठी आजच्या जगात काय आणि कशा गोष्टी घडत आहेत, त्याचा आपल्यावर आणि जगार काय-कसा परिणाम होत आहे ह्याची चर्चा लोक ज्या-ज्या भाषा बोलतात त्या-त्या भाषांमध्ये होणं गरजेचं आहे. ह्या विषयाची स्वतंत्र परिभाषा तयार होणं महत्त्वाचं आहे. त्या चर्चेची सुरुवात करून देण्यासाठी हे सदर आहे.

ते वाचून लोकांनी काय करायचं, ह्याचा निर्णय लोकांनी आपापला घ्यावा. लोकांनी कोणाला मत द्यावं, आणि कोणता साबण विकत घ्यावा वगैरे सल्ले द्यायला आधीच केंब्रिज अनालिटिका आणि फेसबुक आहेत. मला त्यांची री ओढावीशी वाटत नाही.

चिमणराव Sun, 08/09/2019 - 09:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विदा-भान ह्या सदराचा हेतू विदा आणि संबंधित विज्ञान-तंत्रज्ञानाचा आपल्यावर, आपल्या मूल्यांवर, आपल्या आयुष्यांवर कसा परिणाम होतो, ते लिहिण्याचा आहे.

-ओके.

कासव Wed, 30/10/2019 - 21:42

सावध ऐका पुढील टिकटॉक? आवडला. जबरी माहिती दिलीत. टिकटॉकबद्दलची यातली काही माहिती ऐकून, वाचून होतो; पण बहुतांशी माहिती सजग जाणिवांसट नव्याने माहिती पडली. ‛शत्रुसंधो’च्या (शक्तीस्थाने - त्रुटी - संधी - धोके यांच्या) विविध बाजू पूर्ण होताना दिसत आहेत. भूक मात्र आणखीन वाढली आहे. धन्यवाद.