पोतराजाचं पोर

पोतराजाचं पोर

रणरणती दुपार,
भूक अपार.
डोळ्यात अंधारी ,
झाकीनं बेजार.

पोतराजाचं पोर,
भूकेतंच गिरकी.
आसूडाच्या दाबात,
नशिबाची फिरकी.

निषेधाचे डोळे,
दुबळे हात.
पुण्याच्या वाढीला,
भिकेची साथ.

सुखे मरीआई,
टोपल्यात बसून.
सोहळा पाहते,
निर्लज्ज हसून.

पोतराजाचं पोर,
चराचरा वाकलं.
भूकेच्या डोँबानं ,
पुन्हा ऊभं ठाकलं.

-----------------------------------------------------------------------
सतीश वाघमारे. पुणे

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

चार तासांत दोन धागे. उत्तम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

'पोतराजा'चं रुपक कशासाठी आहे त्याचा अंदाज आला पण ती कहाणी माहित नसल्याने कविता माझ्यापर्यंत तितकीशी पोचली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पोतराजाचं पोर,
चराचरा वाकलं.
भूकेच्या डोँबानं ,
पुन्हा ऊभं ठाकलं.

हे भिडलं मनाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋषिकेश. रुपक वगैरे काही वापरले नाही कवितेत.आज शहरात पोतराजाच्या अवतारात भुकेल्या पोटी अंगावर आसूड ओढत गनगन फिरणारी बरीच पोरं आहेत. त्यातल्या एकाचं चित्रण आहे कवितेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिनने ती नामक एक कथा(?) लिहीली होती तिची आठवण झाली. http://www.misalpav.com/node/11015

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.