ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
बॅटमॅन दंडवत रे _/\_ मस्त
बॅटमॅन
दंडवत रे _/\_
मस्त लिहीलयस!
युद्धभुमीवरुन आँखोँदेखा हाल.. अगदी क्रिकेटच्या रनिँग कॉमेँट्री सारखा वाटतोय.
जरा जास्तच रक्तरंजीत व्हायला लागलं की 'काय काय काय बै सहन करायचं या माणसांचं' अशा वाक्यामुळे खुद्कन हसु येतं. मग परत पुढची घमासान लढाई वाचणं सुखकर :-)
खूप छान. धन्यवाद.
बादवे एक वात्रट शंका. छाती, पोट, खांदा सगळीकडेच भाले लागतायत तर मग चिलखत नक्की कोणत्या भागाचं संरक्षण करत होत? :-P
आणि मेलेल्याचं चिलखत पळावापळवी मोमेँटो म्हणुन की वापरायला?
धन्यवाद अस्मिता चिलखत हे
धन्यवाद अस्मिता :)
चिलखत हे सर्व शरीराचं संरक्षण करायचं, पण भाले-बाण वगैरे प्रसंगी भेदूनही जायचे आणि एखादी मोकळी जागा सापडेल तिथेही वार लागायचे. चिलखत पळवापळवी मोमेंटो/देवाला अर्पण करणे आणि वापरणे या दोन्ही कारणांसाठी केल्याची उदाहरणे आहेत. याच लेखात डोलोनचे चिलखत आणि अन्य सामान मिनर्व्हा देवीला अर्पण केल्याचा उल्लेख शेवटी आहे.
जबराट...
धुम्श्चक्री सुरु दिसतिये निस्ती.
इजिप्तमधील थीब्स सारखे अख्ख्या दुनियेत श्रीमंत असलेले शहर देऊ केले तरी नकोच.
?
थीब्स हे ग्रीकांचे गाव होते ना? सु/कु प्रसिद्ध इडिपस हा थिब्सचाच राजा बनला होता ना? ते इजिप्तकडे कधी गेलं भौ?
.
डायोमीड चॅम्प दिसतोय भलताच.
डायोमीडच्या मनात अजून काही सैनिकांना मारावे किंवा थ्रेशियन राजाचे चिलखत चोरावे याबद्दल संभ्रम होता
हायक्लास.
.
-दहा टॅलेंट भरून-जवळपास २५०-३०० किलो-सोने.
किलो,तोळे की ग्रॅम?
थीब्स या नावाचे गाव
थीब्स या नावाचे गाव ग्रीसमध्ये होते तसेच इजिप्तमध्येही होते.
http://en.wikipedia.org/wiki/Thebes,_Egypt
http://en.wikipedia.org/wiki/Thebes,_Greece
टॅलेंट हे मेजरमेंटचे युनिट होते. त्याबद्दलच्या विकी आर्टिकलनुसार एक जुना टॅलेंट म्हंजे साधारण २६ ते ३० किलो असे दिसते.
आणि डायोमीड चँप तर होताच.
इलियडशी संबंधित दोन शिल्पांच्या कथा
नुकताच मी रोमला काही दिवस गेलो होतो. तेथे मी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये ट्रॉयच्या कथेशी संबंधित पुढील वर्णिलेल्या दोन प्राचीन कलाकृति आहेत. त्यांची मी घेतलेली छायाचित्रे आणि वर्णन ही थोडी अवान्तरच आहेत पण वाचकांस मनोरंजक वाटतील म्हणून येथे देतो.
पोप दुसरा ज्यूलिअस (पोप असण्याचा काळ १५०३-१५१३), मायकेलअँजेलोचा आश्रयदाता, ह्याने वॅटिकनमधील शिल्पे, चित्रे इत्यादींच्या संग्रहाचा प्रारंभ केला. त्याच संग्रहाला आज वॅटिकन म्यूझियम्स ह्या नावाने ओळखले जाते. ह्या संग्रहात दाखल झालेले जवळजवळ पहिले शिल्प म्हणजे लेऑकॉन (Laocoön) आणि त्याच्या दोन मुलांची सर्पांपासून सुटका करून घेण्याची पराकाष्ठेची आणि मरणान्त धडपड दर्शविणारा विख्यात पुतळा. वॅटिकन संग्रहालयाच्या प्रवेशस्थानी ठेवलेल्या ह्या शिल्पाची आणि त्याच्या वर्णनाची पुढील दोन छायाचित्रे:
ग्रीकांनी आणून ठेवलेला घोडा ट्रॉय शहरात आणला जाऊ नये असे लेऑकॉनने ट्रॉयवासीयांना वारंवार सांगितले होते कारण "Do not trust the horse, Trojans. Whatever it is, I fear the Greeks even when they bring gifts." ह्यामुळे त्याच्यावर कोप पावून ग्रीकांचे पक्षपाती देव पोसायडन आणि अथीना ह्यांनी समुद्रातून दोन सर्प पाठविले आणि त्या सर्पांनी लेऑकॉन आणि त्याच्या दोघा मुलांना वेढून घुसमटवून मारून टाकले अशी ही कथा आहे. हा प्राचीन पुतळा थोरल्या प्लिनीने (Pliny the Elder) रोममध्ये पाहिलेला होता अशी नोंद आहे. तदनंतर मधली सुमारे १५०० वर्षे हा पुतळा कोठे होता ह्याबाबत काहीच माहिती नाही पण १५०६ साली फेलिची फ्रेडी नावाच्या व्यक्तीच्या द्राक्षाच्या मळ्यामध्ये तो जमितीत गाडलेला आढळला. (त्याच्या दफनाच्या स्थानाच्या लेखाबाबत मला ही माहिती जालावर सापडली - FELICI DE FREDIS QVI OB PROPRIAS VIRTVTES ET REPERTVM LACOOHONTIS DIVINVM QVOD IN VATICANO CERNIS FERE RESPIRAN(.s ) SIMVLACR(um) IM(mo)RTALITATEM MERVIT (‘to Felice Fredi, who earned immortality both for his own merits and for the discovery of the divine, well-nigh breathing effigy of Laocoön that you behold in the Vatican’). ह्या मळ्याच्या जागी १५०० वर्षे पूर्वी सम्राट् नीरोचे आरामघर होते.
शिल्प पुन: सापडल्याबरोबर प्लिनीने खास उल्लेखिलेले तेच हे शिल्प आहे असा तर्क केला गेला आणि पोपने ते खरेदी करून आपल्या संग्रहात दाखल केले.
वरच्या छायाचित्रात लिहिल्याप्रमाणे लेऑकॉनच्या सांगण्यावर एनीअसचा विश्वास होता आणि म्हणून आपला वृद्ध पिता आणि लहान मुलगा ह्यांना बरोबर घेऊन एनीअसने ट्रॉयमधून यशस्वी पलायन केले आणि तदनंतर बर्याच दीर्घ प्रवासानंतर तो इटलीत पोहोचला आणि रोमचा एक संस्थापक झाला. वर्जिलच्या ’अनीड’ ह्या काव्याचा हाच विषय आहे. रोममध्ये कलोसियमच्या शेजारीच ऑगस्टस, ट्रेजन, नर्वा अशा सम्राटांनी निर्माण केलेले ’फ़ोरम्स’ ( सार्वजनिक उपयोगाची स्थाने) आज भग्नावस्थेत आहेत आणि रोमला भेट देणार्यांसाठी ती महत्त्वाची आकर्षणे आहेत. त्यांपैकी ऑगस्टसच्या फोरममध्ये एका शिल्पाचे काही तुकडे मिळाले आहेत आणि ते शिल्प एनीअसच्या ह्या पलायनाची कथा दाखविते. मूळ शिल्प कसे आणि कोठे होते हे दर्शविणारी काल्पनिक चित्रे आणि त्या शिल्पाच्या उर्वरित तुकडे ह्यांची मी घेतलेली छायाचित्रे पुढे आहेत.
मुळातील शिल्प कसे होते ह्याचे काल्पनिक चित्र:
फोरममध्ये आपल्या जागी हे शिल्प आणि फोरमचा आसपासचा भाग ह्यांचे काल्पनिक चित्र. मध्यभागातील शिल्प पहा:
मूळ शिल्पापैकी सापडलेल्या तुकडयांच्या जागा निळ्या रंगात:
प्रत्यक्ष सापडलेले तुकडे:
वाह, बहुत धन्यवाद कोल्हटकर
वाह, बहुत धन्यवाद कोल्हटकर सर!!! लाओकॉनची कथा माहिती होती. हे वरचे शिल्पही नेटवर पाहिले होते. पण तुम्ही सांगितले ते भग्न शिल्प नेटवरही आज प्रथमच पाहिले, मजा वाटली. थोरल्या प्लिनीपासूनचा त्याचा इतिहासही तितकाच रंजक आहे. एनिअस हे पात्र रोमच्या सांस्कृतिक एक्स्ट्रापोलेशनमधले केंद्रीभूत पात्र आहे हे बाकी खरंच आहे.
पुन्हा एकदा माहिती शेअर केल्याबद्दल बहुत धन्यवाद :)
तुमचा होमर झालाय!!
हेक्टरने अजॅक्सच्या युद्धकौशल्याची स्तुती केली आणि त्याला एक चांदीच्या मुठीची तलवार दिली. बदल्यात अजॅक्सने त्याला जांभळ्या रंगाचे एक गर्डल दिले.
हे म्हणजे उदाहरणार्थ थोरच, हे लोक संध्याकाळनंतर युद्ध थांबवत असतं काय? व त्यांच्याकडे शव-दहनच करत असत काय?
शैली आवडली हे परत नमूद करतो.
ऋष्टि
हे ठीक आहे. मोविप्रमाणे 'ऋष्' ह्या धातूचे अर्थ to go, move, stab, kill, push, thrust असे दिले आहेत आणि 'ऋष्टि' ह्याचे spear, lance, sword. तोमर+ऋष्टि हा सन्धि 'तोमरर्ष्टि' असा होईल. 'तोमरर्ष्टिभि:' म्हणजे 'तोमरैश्च ऋष्टिभिश्च' - द्वन्द्व समास.
धन्यवाद.
वाह! थ्यांकू बरं का... आता
वाह! थ्यांकू बरं का... आता सावकाश, चवीचवीनी वाचते. :)
***
_/\_
काय शैली आहे लेका तुझी! खल्लास! लैच विचित्र प्रकरण, लैच हिट प्रकार, वाईन वाढ पावन्यास्नी, काय काय बै सहन करायचं.... अशी असंख्य उदाहरणं. हाबार्स!