मराठी संकेत स्थळां चा "तेचतेच" पणा

गेल्या आठवड्यात मी मराठीतील तीन संकेत स्थळांची सदस्यता घेतली. त्याचं मुख्य कारण म्हणजे मला हि मराठी / देवनागरी मधे ड्रूपल वापरुन एक "आग्रिगेटर ब्लॉग / संकेत स्थळ" तयार करावं अशी इच्छा आहे. ह्या स्थळां वर लिहिणार्या लोकांशी ओळखी करुन घेणे आणि त्यांच्या कडुन काहि सल्ला घेणं हा हि ह्या मागचा उद्देश !
मराठी संकेत स्थळां विषयी माझी निरीक्षणे : (ऐसी अक्ष्र्रे , मिसळपाव , मीमराठी )

१) तेच तेच लेख आणि त्याच लोकांचा ( आय डि / हॅन्डल्स) चा तिनही साइटस वर वावर !
२) जरी मेंबर्स बरेच असले तरी अ‍ॅक्टिवली भाग घेणारे / लिहिणारे हे मोजकेच आहेत
३) एकच लेख हे तिनहि साइटस वर टाकतात .. असे का ते कळत नाहि
४) जवळ जवळ सगळे लोकं तिनहि साइट्स चे मेम्बर आहेत
५) बरेच मेम्बर्स तिनहि साइटस वर लॉग इन झालेले असतात !

ह्या मागिल राजकारण किंवा अर्थकारण काय आहे हे मला माहित नाहि पण मला असं वाटतं कि जर लेखकांनी एका प्रकारचे लेखन एका साइट वर ठेवले आणि नैतिकता म्हणुन एक लेख फक्त एकाच साइट वर प्रसिध्द केला तर ते वाचकांना खुप सोइस्कर होइल. त्या मुळे साइट्स क्रॅश / बंद पड्ण्याचे प्रमाण हि कमी होइल. (हे वाक्य उपहासात्मक होतं ...सार्कास्टिक)
अजुन मी मायबोली चा मेंबर झालेलो नाहि पण लवकरच होइन.

माझी निरीक्षणे लिहिण्याचा उद्देश्य हा फक्त मैत्रीपुर्ण उपयोगी फीडबॅक देणे येवढाच. त्यात खुद्द मेंबर्स आणि लेखकांनी काहि बदल केले तर खुप मजा येइल.. प्रकाशित साहित्य / थ्रेड्स चं अ‍ॅग्रिगेशन हि हवं तर करता येइल !
( वैयक्तिक : मला ऐसी अक्षरे चं यु आय , दर्जा , लेखन आणि एकंदर साइट आवडली )

धन्यवाद !

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

नवे आहात. मराठी संकेतस्थळांबाबत तुम्हाला जे कळलं आहे ते त्रिकालाबाधित सत्य आहे. तरीही तुमच्या सूचनांचे स्वागत आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
नवे आहात (किंवा चांगलेच मुरले आहात Wink ).. स्वागत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्या मागिल राजकारण किंवा अर्थकारण काय आहे हे मला माहित नाहि

राजकारण हे इथे नॉन अ‍ॅप्लिकेबल आहे. आय मीन इथे राजकारण जरुर आहे पण तिन्ही किंवा जास्त संकेतस्थळावर आपला एकच लेख एकाचवेळी टाकणारी व्यक्ती अजिबात अशा राजकारणात इनव्हॉल्व नसते असं सांगू इच्छितो. याचा व्यत्यासही खरा नाही. म्हणजे एक लेख एकाच संस्थळावर लिहीणारे लेखक हे त्या संस्थळाचेच लॉयल असतात आणि इतर संस्थळांविषयी आकस असतो किंवा ते मुरलेले राजकारणी असतात असंही मुळीच नाही. तोही एक स्वनिर्मित नियम असतो बर्‍याचदा.

अर्थकारण हा तर अगदीच परीघाबाहेरचा मुद्दा आहे कारण ही बहुतांश संस्थळं हौसेपोटी,पदराला खार लावून चालवली जातात.

हे चूक का बरोबर हे सांगत नाही, पण राजकारण आणि अर्थकारण हे शब्द अस्थानी आहेत.

आणि नैतिकता म्हणुन एक लेख फक्त एकाच साइट वर प्रसिध्द केला तर

नैतिकता हा शब्द इथे नाही योग्य वाटत. एक लेख सर्व साईट्सवर टाकायचा नाही असं ठरवलं आणि तरीही प्रत्येक साईटवर लेखक म्हणून सक्रिय रहायचं असेल तर तिप्पट चौपट लिखाण करावं लागेल.

प्रत्येक संस्थळावरचा प्रतिसाद वेगवेगळ्या प्रकारचा असतो हे निश्चित. मिसळपाववर सदस्यसंख्या आणि त्यांचा वावर मोठा असल्याने सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया मोठ्या संख्येने येतात, शिवाय अवांतर, कोपरखळ्या, हाणामारी, आणि प्रतिकूल प्रतिसादही सढळपणे येतात.

मीमराठीवर अधिक कौटुंबिक वातावरण आहे. तिथे व्यक्तिगत घट्ट नात्याच्या विणीने लोक गप्पा मारतात. अनेक धागे हे चावडी स्वरुपाचे असतात.

ऐसी अक्षरेवर गंभीर विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चेचं प्रमाण जास्त आहे आणि त्या तुलनेत अवांतर कमी आहे. ऐसीवर प्रतिसादाला गुणांकन देण्याची सोय असल्याने नुसते उपप्रतिसाद वाचण्याखेरीज आपल्या प्रतिसादाची लोकप्रियताही पाहता येते हे एक आकर्षण आहे.

तस्मात प्रत्येक वेबसाईटवर एकाच लेखाला वेगळाले प्रतिसाद मिळत असल्याने सर्वत्र लेख प्रकाशित करण्याची इच्छा सदस्यांना स्वाभाविकच होत असते.

यामुळे रिपीट कंटेंट एकूण जालावर येत असला तरी वेबसाईट क्रॅश होण्याचं कारण नाही. प्रत्येक साईटवर लेख एकेकदाच येतो. अजूनतरी लोड कमी होण्यासाठी लेखच कमी यावेत अशी कोणत्याच संस्थळाची इच्छा अथवा अवस्था नसावी असा अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेच सदस्य, निदान मी तरी, काही लेख तिन्ही ठिकाणी प्रकाशित करतो, तर काही लेख त्या त्या संस्थळाच्या प्रकृतीशी अनुरुप असलेले पाहून फक्त तिथेच एका ठिकाणीही प्रकाशित करतो.

उदा.

निव्वळ ललित स्वरुपातला लेख - मिपावर (भरपूर प्रतिसाद आणि मनमोकळेपणाने बरेवाईट मत देणारे असंख्य सदस्य. चर्चेला वाव नसल्याने अवांतराचा चान्स कमी Wink )

आपल्याला माहीत असलेल्या फुलफॉर्मचे कलेक्शन: मीमराठीवर
आवडत्या गाण्यांविषयी: मीमराठीवर

अन्य संस्थळांवर "इथेही फेसबुक बनवून टाकताय का?" "फालतू विषय" म्हणून टॉमॅटोचा मार मिळण्याची भीती Wink )

केमिकल कॅस्ट्रेशनविषयी /अन्य बोल्ड विषयांवरची जनमताची चर्चा: ऐसी अक्षरे

(अन्य संकेतस्थळांवर अवांतर जास्त होण्याची भीती)

विनोद हा समाजमन बदलण्यासाठी परिणामकारक फॉर्मॅट आहे का? : ऐसी अक्षरे

(उच्चभ्रू विषय म्हणून उडवले* जाण्याची भीती कमी Wink )

महितीयुक्त सीरीजः तिन्ही ठिकाणी
कथा: तिन्ही ठिकाणी

इत्यादि.. Smile

* उडवले जाणे म्हणजे धागा उडवला जाणे नव्हे, तर रेवडी उडवली जाणे.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि
तुमचं लेखन वाचलं मी .. सगळी कडे .. आवडलं मला !

१)मला व्यक्तिगत काहि टिका करायची नव्ह्ती .. फक्त एक निरीक्षण म्हणुन लिहिलं !
२)मी एका "ऐसी अक्षरे" च्या सिनियर "हॅन्डल" ला भेटलो तेव्हा त्यांच्या बोलण्यात राजकारण , ग्रुपिझम, वैगरे शब्द आले म्हणुन ते समजलं !
३)मी ह्या सर्व मराठि साइटस केवळ एक मार्केट रिसर्च / बिझनेस ओपॉर्च्युनिटि आणि माझी वैयक्तिक आवड म्हणुन अभ्यास करत होतो
४)१९९९-२००० साली मी मायबोली चा सदस्य होतो ..तेव्हा ती एकच साइट होती आणि जवळ जवळ ९०% लोकं हि यु एस बेस्ड ..तेव्हा चे "मराठी फेसबुक" म्हणुन ते स्थळ वापरायचे ! आता मायबोली जवळ जवळ कमर्श्यल झाली आहे ..मोस्ट्ली यु एस बेस्ड मराठी देसीज.
५)गेली १० एक वर्ष मी मराठी साइट्स, मायबोली कडे बघितलं नव्हतं .. गेल्या वर्षी मराठी चं प्रेम एकदम जागं झालं माझं .. एक वर्ष भर ब्लॉग लिहित आहे .. आता खुमखुमी एक वेब साइट घेण्याची आहे ! बघु !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी

"सोडू"???

(आणि, "कासेची"??? नाही म्हणजे, एकदा "सोडायची"च म्हटल्यावर, मूळ शब्दाची लाज कशाला?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आग्रिगेटर ब्लॉग / संकेत स्थळ"

ह्याबद्दल अधिक वाचायला आवडेल. माझ्या माहितीत डुपल वरचे काही मराठी अ‍ॅग्रिगेटर ऑलरेडी आहेत, तुम्ही वेगळे काय देणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो बरेच बघितले मी पण

मराठिब्लॉग्स.नेट सारखे आग्रिगेटर ब्लॉग्स माझ्या मनात आहेत. वेग-वेगळ्या विषयां वर ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

गवि : सहमत
१) तेच तेच लेख >>>
३) एकच लेख हे तिनहि साइटस वर टाकतात ..
हे दोन्ही एकच आहे का ? ( असेल तर वेग्ले क लिहिले?) नसेल तर 'तेच तेच लेख' याचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

१) आणि ३) हे वेगळे मुद्दे आहेत .. परत वाचुन पहा ! Smile .. फक्त मिश्किली म्हणुन हा प्रतिसाद असेल तर इग्नोर करा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

"आमची अन्यत्र शाखा नाही" हा बोर्ड बघायची जरा जास्तच सवय झाली की काय? पण इथे दुकानदारापेक्षा गिर्‍हाईक महत्वाचं आहे हे समजून घ्या. गविंनी तेच विस्कटून सांगितलं आहे.

(आळस देणारा स्मायली(!!)) कट्टे झाले अनंत, का करीता खंत, करा निवांत रवंथ, अन्यथा सोडा हा पंथ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा !! आवडला प्रतिसाद ! बरोबर " दुकानदारा पेक्षा गिर्र्‍हाइक महत्वाचे " हे अगदि बरोबर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

गविंचा प्रतिसाद पटला. माझी थोडी भर.

लेखन करणं हा एक छंद आहे. तो छंद असलेले लोक तसे थोडेच. संस्थळांवर किंवा ब्लॉगवर लेखन करण्याचा छंद बाळगणारे लोक हा त्याही लोकांचा उपसंच. असे लोक अगदीच मोजके असल्यास आश्चर्य नाही. तशी संस्थळंही शेकड्यांनी नाहीत. हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच. त्यांवर वाचक म्हणून अॅक्टिव्ह असणारे लोकही कमीच. पण त्यामानाने लेखन करणारांपेक्षा अधिक. अनेक संस्थळांवर कॉमन असणारे काही असले तरी एका विशिष्ट संस्थळावर अधिक प्रमाणात वावरणारांचं प्रमाण मोठं असतं. प्रत्येक संस्थळाची त्या वाचकवर्गामुळे प्रकृती वेगळी बनते. यामुळे लेखन वाचन करणाऱ्यांच्या वेगवेगळ्या कम्युनिटी तयार होतात. या एकमेकांपासून एक्स्क्लुझिव नसतात. त्यामुळे काही ओव्हरलॅप दिसतो. पण तरीही त्या त्या विशिष्ट संकेतस्थळावर येणाऱ्या लेखनाचं प्रमाणही कमी नसतं.

सुमारे दीड वर्षाभरापूर्वी मी एक सर्वेक्षण घेतलं होतं. फक्त ऐसी वर येणाऱ्या लेखनाचं प्रमाण किती आहे? त्यावेळी संस्थळाचा जन्म होऊन फक्त एक महिना झाला होता. संस्थळाची प्रकृती निश्चित झाली नव्हती. असं असूनही ऐसीवर आलेल्या लेखनापैकी सुमारे ६०% लेखन केवळ ऐसीवर आलेलं आहे असं आढळून आलं होतं. आता पाहिलं तर खात्रीने आकडा मोठा येईल.

माझ्या मते लेखन कुठे प्रसिद्ध करावं हे लेखकाने ठरवावं. इतरत्र वाचलेलं असलं तरीही इकडे लोक काय म्हणताहेत याचंही कुतुहल इतर वाचकांनाही असतं. नसेल तर अर्थातच टायटल बघून दुर्लक्ष करण्याची सोय असतेच.

सगळ्याच संस्थळांचं लिखाण एकत्र सादर केल्याने नक्की काय फायदा होईल माहित नाही. संस्थळांच्या वेगवेगळ्या प्रकृती आहेत, यातच संस्थळांवर लिखाण-वाचन करण्यातली गंमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेचसे मुद्दे वरील प्रतिसादांत आलेच आहेत. माझे वैयक्तिक मत म्हणाल तर एक लिखाण एकाच ठिकाणी टाकावे. ते लिहिताना त्या बाजानेच लिहावे. अर्थात काही वेळा मीही एकच लिखाण एकसमयावच्छेदेकरुन अनेक संकेतस्थळांवर टाकले आहे, पण त्यासाठी त्या त्या वेळी मला पटलेली काही तत्कालिन कारणे होती. आणि असे म्हणून एकदा पदराआड दिवा घेतला की मग पुढचे बोलणेच संपते! बाकी राजकारण, कंपूबाजी वगैरे .आयायाया. जबरदस्त जांभईदार विषय. कोणे एके काळी मनोगतावर एक भद्रपुरुष 'बघ, मनात आणलं तर मला एका दिवसात पन्नास प्रतिसाद काही अशक्य नाहीत..' अशा वल्गना करायचे. तसे साकळलेले आत्मे जिकडेतिकडे आहेत. त्यांच्याबद्दल बोलण्यासारखे काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मी मायबोलीवर कै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक हा लेख नुकताच टाकला होता. हा लेख मनोगत दिवाळी अंकात २००७ मधे या अगोदर टाकला होता. तसे नमूद केले होते. तेच तेच लेख परत परत लिहिला असा आक्षेपवजा भाष्य तिथे आले. तेव्हा तिथे खालील प्रतिक्रिया दिली होती..
प्रबोधन/ विचार प्रसार यात त्याच त्याच गोष्टी पुनःपुनः सांगायच्या असतात. कारण एक वाचक वर्ग असा नक्की असतो कि त्यांच्यासाठी ही माहिती नवीनच असते. जुन्या वाचकांच्या कदाचित विस्मृतीत गेलेला असू शकतो किंवा पुनर्वाचनाने आकलनाची नवी दृष्टी त्याला मिळालेली असू शकते. समजा तसे नसेल तर दुर्लक्ष करण्याचा पर्याय खुला असतोच. रेडिओवर तीच तीच गाणी पुनःपुनः लागत असतात. कुणी पुनर्प्रत्ययाचा आनंद घेतो तर कुणी स्टेशन बदलतो वा रेडिओ बंद करतो. अनेक लेखकांची तीच तीच पुस्तके पुन:पुन्हा छापली जात असतात. पुस्तके ज्यांना आवडतात ते पुन्हा वाचतात तर काही लोक ती रद्दीत टाकतात. रद्दीतील पुस्तके घेउन पुन्हा ती कुणी तरी वाचतो.
फक्त लिंक देण्यापेक्षा एखादा लेख / पुस्तक थेट पुढ्यात आणी सहज पणे आले तर ते वाचले जाते असा आमचा अनुभव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

प्रतिसाद फार आवडला. नंदन यांचा- पुनर्वाचनाय च हा या विषयावरील लेख देखील अत्यंत वेधक आहे. वाचकाला पुन्हा वाचताना नव्याने गोष्टी कळू शकतात. पुनर्प्रत्यय तर येतोच पण काही नव्याने गवसते.

त्याच लेखातील हा पुढील उतारा तर केवळ देखणा आहे -

एकूणच ’या हृदयीचे त्या हृदयीं’चे ध्येय गाठताना होणारी दमछाक ज्ञानेश्वरीतल्या नवव्या अध्यायातल्या एका ओवीत फार सुरेखपणे व्यक्त झाली आहे -

जें जाल जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें ।
परि थडिये काढूनि झाडिलें । तेव्हां बिंब कें सांघे ॥

पाण्यात दिसणारे चंद्रबिंब जाळं फेकल्यावर, क्षणभर त्यात अडकल्याचा भास होतो खरा; पण बाहेर ओढून पाहिल्यावर ते हाती काही लागत नाही; असा हा दृष्टांत जसा लेखकाच्या अभिव्यक्तीच्या मर्यादा स्पष्ट करतो, तसाच वाचकाच्या जाणीवांचाही. मात्र अंतिम ध्येय कधीच हाती लागणार नाही, हे ठाऊक असूनही पुन्हा पुन्हा केले जाणारे हे प्रयत्न वाचकाच्या फाटक्या झोळीत कधी कधी अनपेक्षित दान टाकून जातात, हे नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी मनकवडी आहात ब्वॉ. आत्त्ताच मनात म्हणले होते कि पुनर्वाचनायच ची लिंक द्या की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रबोधन/ विचार प्रसार यात त्याच त्याच गोष्टी पुनःपुनः सांगायच्या असतात. कारण एक वाचक वर्ग असा नक्की असतो कि त्यांच्यासाठी ही माहिती नवीनच असते.
सहमत आहे. नरेंद्र दाभोळकर त्यांच्या भाषणांत तेच तेच बोलतात असा त्यांच्यावर आरोप केला जातो. मराठी संकेतस्थळांवर यनावाला, नानावटी यांच्याबाबतही असे म्हटलेले वाचले आहे. जोवर प्रश्न तेच आहेत तोवर त्यांवरचे भाष्यही तेच असणार. त्यामुळे असे लिखाण एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वाचकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित करणे समजण्यासारखे आहे.
माझा हा प्रतिसाद आधीच्या प्रतिसादाशी विसंगत वाटू नये म्हणून मी आधीच्या प्रतिसादात पळवाट ठेवलेली आहे हे चाणाक्ष वगैरे वाचकांच्या ध्यानात आले असेलच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

वरील दोन-तीन प्रतिक्रिया वाचल्यावर असं लक्षात येतय कि लोकं स्वत: ची वैयक्तिक एक-दोन लेखां ची उदाहरण देउन "जनरलायझेशन" करताहेत. माझ्या लेखा तील जी ऑब्सर्वेशन्स होती ती अशी कि एकच लेख लिहुन कॉपी पेस्ट तीन साइट्स वर करायचा हि पध्द्त ..जवळ-जवळ एक नियम झाला आहे ! ते काहि बरं वाटत नाहि. मला तर वाटतं ६०-८० % मेम्बर्स हे तिनहि साइट्स चे कॉमन आहेत. प्रतिसाद तेच देत असतात आणी ते थ्रेड्स वर येत रहातात..
माझं एक सजेशन आहे ... चांगल्या लेखकांनी त्यांचं एका प्रकारचं लेखन एका साइट वर ( गवि यांनी वर सुचवल्या प्रमाणे) टाकावं .. तो लेख ब्लॉगपोस्ट किंवा अन्य कुठे हि कॉपी पेस्ट करुन ठेवावा ! पाहिजे तेव्हा लिंक देता येइल.

दुसरा मुद्दा : जर एखादा चांगला लेख उद्या कोणी दुसर्याने कॉपी केला तर त्याने तो कुठुन कॉपी केला हे सांगणं कठिण होइल .. जसं कॉपिराइट महत्वाचं तसंच एक पब्लिक डोमेन आणि एका पर्सनल डोमेन वर कंटेन्ट असणं हि तितकच महत्वाचं. ( हा मुद्दा लिगल आहे .. तो अत्तापुरता बाजुला ठेवु )

मुख्य मुद्दा : एक लेख एकाच साइटवर टाका .. चांगला असेल..विषय आवडत असेल तर वाचक तिन पैकि जिथे असेल तिथे येउन वाचतिल .. प्रतिसाद देतील !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

>>वरील दोन-तीन प्रतिक्रिया वाचल्यावर असं लक्षात येतय कि लोकं स्वत: ची वैयक्तिक एक-दोन लेखां ची उदाहरण देउन "जनरलायझेशन" करताहेत. <<<

मला असं वाटलं की तुम्ही जे जनरलायझेशन केलेलं आहे त्याला लोक आपापली उदाहरणं देऊन रद्दबातल ठरवत आहेत. अशी दोन-तीन उदाहरणं प्रत्येकाने दिल्यावर मूळ हायपोथेसिस कोलमडून पडते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

याला इलाज म्हणून (राजेश करतो तसंच, कोणी विद्रट म्हणेल याची पर्वा न करता) आकडेवारी दिली की अशा अर्थाचे प्रतिसाद कमी येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला मराठी आंतरजालावर जगप्रसिद्ध व्हायचे आहे म्हणून मी एकच लेख जमेल तितक्या ठिकाणी टाकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... उंबरी करिती लीला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

>लोकं स्वत: ची वैयक्तिक एक-दोन लेखां ची उदाहरण देउन "जनरलायझेशन" करताहेत. माझ्या लेखा तील जी ऑब्सर्वेशन्स होती ती अशी कि एकच लेख लिहुन कॉपी पेस्ट तीन साइट्स वर करायचा हि पध्द्त ..जवळ-जवळ एक नियम झाला आहे ! ते काहि बरं वाटत नाहि. मला तर वाटतं ६०-८० % मेम्बर्स हे तिनहि साइट्स चे कॉमन आहेत. प्रतिसाद तेच देत असतात आणी ते थ्रेड्स वर येत रहातात..<

हे दोन-तीन प्रतिक्रियांवरून जनरलायझेशन नाही होत का? माझ्या प्रतिक्रियेत व्यवस्थित सर्वेक्षण करून आकडेवारी दिली आहे. सुमारे साठ टक्के लेखन हे त्यावेळीही युनिक होतं. आता परिस्थित सुधारली असावी. या आकडेवारीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? 'मला तर वाटतं' पलिकडे तुमच्याकडे काही आकडेवारी आहे का? थोडा अभ्यास करून तो सादर केलात तर तुमचा आणि वाचकांचाही फायदा होईल.

दुसरा मुद्दा : जर एखादा चांगला लेख उद्या कोणी दुसर्याने कॉपी केला तर त्याने तो कुठुन कॉपी केला हे सांगणं कठिण होइल

गूगलने सगळीकडे सर्च करता येतो, टाइमस्टॅंप दिसतात. त्यामुळे एकदा कॉपी केली हे सिद्ध झालं तर कुठल्या संस्थळावरून कॉपी केली हा मुद्दा गौण ठरतो. जर तर च्या पलिकडे तुमच्याकडे उदाहरणं आहेत का?

मुख्य मुद्दा : एक लेख एकाच साइटवर टाका .. चांगला असेल..विषय आवडत असेल तर वाचक तिन पैकि जिथे असेल तिथे येउन वाचतिल .. प्रतिसाद देतील !

हे तुमचं मत अर्थातच नोंदणीय आहे. पण अशा नियमापेक्षा 'लेखकाने हवं तिथे, हवं तितक्या ठिकाणी लेखन टाकावं' हे स्वातंत्र्य का नको?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासकवडि,
तुम्हि ह्या साइट चे ओनर (मालक) आहात का ? (हे वाक्य सार्कास्टिक नाहि .. माहिती साठि आहे !)
माझ्या लेखा चे मुद्दे आणि लेख नीट वाचलेत तर लक्षात येइल कि त्यात ओबसर्वेशन्स आहेत .. अन बाएस्ड
जे आवडेल ते करा .. तीन साइट काय शंभर साइट्स वर टाका लेख..
कोण आडवणार तुम्हाला ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

ते घासकडवी आहेत. वडि नव्हेत. Wink

ट्विडी,
तुमचा हा लेख तुम्ही किती ठिकाणी टाकला आहेत?

***

भले तरी देऊ कासेची लंगोटी असे हवे का स्वाक्षरीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हाहाहा होय मला वाटते तसेच हवे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश चा विद्रटपणा अजून गेला नाही बाई! कुठे गेल्या रमाबाई कुरुसुंदीकर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अवांतर -

रिसबूडांविषयक हा लेख वाचनीय आहे.

"ग्रह कारक नसून सूचक आहेत, ते फक्त संकेत देण्याचे काम करतात ही संकल्पना ज्योतिषात मांडली जाते. त्या विषयी ते म्हणतात," कोणी एक श्रीमान रूपगर्विता पुरंध्री आपल्यावर अनुरक्त झाली आहे, असा भ्रम झालेल्या भणंग खरबुजाने तिच्या प्रत्येक कटाक्षातून आणि कृतीतून आपल्याला हवा तसा अर्थ काढत बसावे, तसाच प्रकार नियतीचे संकेत हुडकणाऱ्यांच्या बाबतीत आहे."

हा लेख नक्की वाचेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्थळाला सुधारण्याचे मोलाचे कार्य तुम्ही करत आहात, यात कोणी खोडा टाकत असेल तर दुर्लक्ष करा ही विनंती.

गेल्या आठवड्यात मी मराठीतील तीन संकेत स्थळांची सदस्यता घेतली. त्याचं मुख्य कारण म्हणजे मला हि मराठी / देवनागरी मधे ड्रूपल वापरुन एक "आग्रिगेटर ब्लॉग / संकेत स्थळ" तयार करावं अशी इच्छा आहे. ह्या स्थळां वर लिहिणार्या लोकांशी ओळखी करुन घेणे आणि त्यांच्या कडुन काहि सल्ला घेणं हा हि ह्या मागचा उद्देश !

उरलेल्या संकेतस्थळांचेही सदस्यत्व घेऊन हाच धागा सर्व ठिकाणी सुरु करावा ही विनंती. जेणेकरून हा चांगला उद्देश सर्वांपर्यंत पोहोचेल.

१) तेच तेच लेख आणि त्याच लोकांचा ( आय डि / हॅन्डल्स) चा तिनही साइटस वर वावर !

तुमचे निरीक्षण बरोबर आहे का हे पहायला मीही सर्व संस्थळांवर लॉग ईन करून पाहिले. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे!

५) बरेच मेम्बर्स तिनहि साइटस वर लॉग इन झालेले असतात !

मराठी लोकांचा स्वभाव हो, दुसरं काही नाही! फुकटात हाफिसातलं इंटरनेट आहे, प्रामाणिकपणे काम करायला नको, सुधारणार नाहीत मेले!

३) एकच लेख हे तिनहि साइटस वर टाकतात .. असे का ते कळत नाहि

एकदम सहमत! गंमत म्हणजे संस्थळांवर एकच एक लेख येतात हा विषयही सगळीकडे अनेकदा चर्चून झालेला आहे, तरी सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच प्रकारचे लेख. कारण काय कळत नाही ब्वॉ!

ह्या मागिल राजकारण किंवा अर्थकारण काय आहे हे मला माहित नाहि

'मराठी बाणा' हो! अजून काय असणार?

नैतिकता म्हणुन एक लेख फक्त एकाच साइट वर प्रसिध्द केला तर ते वाचकांना खुप सोइस्कर होइल.

मराठी संस्थळं अन नैतिकता? काय परदेशात वगैरे वास्तव्य आहे का काय तुमचं?

अजुन मी मायबोली चा मेंबर झालेलो नाहि पण लवकरच होइन.

शुभस्य शीघ्रम्!

माझी निरीक्षणे लिहिण्याचा उद्देश्य हा फक्त मैत्रीपुर्ण उपयोगी फीडबॅक देणे येवढाच.

अहो, गेली चार-पाच वर्षे याच उद्दात्त उद्देशाने मी ही संस्थळांवर वावरतो आहे. तरी सुद्धा पन्नास वेळा तरी बॅन झालो असेन. संस्थळांना असल्या उद्देशांनी काही फरक पडत नाही हो! काहीही फलित झालं या उद्देशाचं तरी निराश होऊ नका, हा अनाहूत सल्ला. काही वर्षात तुम्हालाही याची सवय होईलच.

हा प्रतिसादच पहा ना, अगदी मैत्रीपुर्ण आहे. तरी सुद्धा लोक ओरडतीलच, पहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

धन्यवाद नाइल
तुमचं म्हणणं पटलं ..
मुद्देसुद बोलण्या पेक्षा उगाच काहितरी विचित्रच वळण देतात काहि लोकं. लगेच "येडछाप" पणा दिसुन येतो त्या प्रतिसादांचा. वयानी मोठी आहेत हि मंडळी म्हणुन जास्त काहि लिहिता येत नाहि .. म्हणुन फक्त इग्नोर करायचं ..
मी असल्या प्रतिसादांना "घास" देत नाहि.. अतिशहाणपणा करणारया "विक्षिप्त" लोकांना एक दोन वेळा स्री दाक्षिण्य म्हणुन माफ करु .. नंतर "मुक्त" पणे पार्श्व भागावर लाथ घालुन जागा दाखवण्याचे काम हि करताना कचरणार नाहि !

माझी नवी सिग्नेचर

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
-------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

अरे वा ! बरेच उत्साही आहात. जालीय प्रवासासाठी शुभेच्छा.

मी फक्त ऐसीची सदस्य आहे आणि मायबोलीवरील लेखन कधीकधी वाचते. ('ऋता' या नावानी आणखीन कुठल्या संकेतस्थळावर कोणी असल्यास ती मी नव्हेच.)
ऐसीच्या धाग्यांवर वैयक्तिक स्वरूपाचे (सदस्यांमध्ये आपापल्या वैयक्तिक ओळखीचे संदर्भ घेऊन प्रतिसाद- थोडक्यात 'चॅट') प्रतिसाद कमी असल्याने लेखन+प्रतिसाद वाचायला आवडतात. मायबोलीवर ढीगानी प्रतिसाद असतात पण तो प्रतिसादांचा डोंगर कोण पोखरत बसणार? त्यामुळे फक्त लेखांचे वाचन करते.

तुमच्या या धाग्याच्या निमित्तानी सदस्यांनी त्यांची भूमिका लिहिली आहे तीही आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी फक्त ऐसीची सदस्य आहे आणि मायबोलीवरील लेखन कधीकधी वाचते. >> +१ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे जवळजवळ सर्व लेख या तिन्ही स्थळांवर आहे. कारण अगदी साधे आहे - या तिन्ही ठिकाणे जो काही वेगळा वाचकवर्ग आहे त्यापर्यंत आपला लेख पोहोचवावा व त्यांच्याही प्रतिक्रिया मिळाव्यात. या अनैतिक काय आहे? अजून बाकी ठिकाणी सुद्धा टाकले तर काय चूक आहे? लेखाला मिळणार्‍या प्रतिक्रियांचे स्वरूप या तिन्ही ठिकाणी (माबो, मिपा व ऐसी अक्षरे ही तीन. तुम्ही जी तीन म्हणत आहात ती हीच की कोणती ते नीट कळाले नाही) वेगळे असते हे वरती कोणीतरी म्हंटले आहे ते खरे आहे. पण माझ्या दृष्टीने हा नंतरचा शोध आहे. मूळ कारण म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे.

बाकी मायबोलीवर अमेरिकन मराठी जास्त आहेत हे आता खरे नाही. भारतातील लोकांची संख्या बहुधा जास्त आहे. तुम्ही कोणत्या वेळी अ‍ॅक्सेस करता यावर असेल ते. कारण तुम्ही सभासद नसाल तर बरेच धागे दिसतच नसतील कदाचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी लेखात नमुद केलं आहे कि .. ऐसी अक्षरे , मिसळ्पाव आणि मीमराठी
माय्बोली ची सदस्यता अजुन घेतली नाहिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

Never ask two business questions in a mail. The response will contain details about the least important one and say nothing about the other Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा जे काही तुमचे नाव आहे ते..
वा! मराठी संकेतस्थळांवर नवीन आहे म्हणता आणि बरेच धाडसी बोलता की! खुदा के वास्ते परदा न काबेसे उठा जालिम, कहीं ऐसा न हो यों भी वही कातिल सनम निकले. बाकी शुद्धलेखनातल्या चुका वगैरे सोडून द्या हो. ये पैंतरे बहोत पुराने हो चुके है. एक अनाहूत सल्ला. घाई करु नका. जरा थांबा. काही पुण्य कमवा. नॅटली टीगर म्हणते तशा कर्मा चिप्स. मग बोला. नाहीतर सगळीकडून लाथा खाऊन शेवटी फेसबुकवर आज क्लायंटच्या पैशाने कशी बॅगपायपर प्यालो असलं लिहीत बसावं लागेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

ओके ..

माझं मराठि साइट्स चं ऑबसर्वेशन प्रामाणिक पणे नमुद केलं आहे ..मी फक्त एक वाचक म्हणुन हे लिहिलं .. मला धाडसी म्हणा नाहि तर अजुन काहि. बाय !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

एकच लेख हे तिनहि साइटस वर टाकतात .. असे का ते कळत नाहि

हा धागा पकडून ऐसी अक्षरेवर आलेले मागचे पन्नास धागे पाहिले. पैकी ३८ धागे अन्य संस्थळांवर नाहीत. (काही धागे लेखकांनी आपापल्या ब्लॉग्जवर टाकले आहेत, ते इथे मोजलेलं नाही.) बारा धागे अन्य संस्थळांवरही आहेत. टक्केवारीत, फक्त २४% धागे अन्यत्र आहेत, एक चतुर्थांशपेक्षा कमी. त्यामुळे नेमकी तक्रार कशासंदर्भात आहे ते समजलं नाही.

सुमारे साठ टक्के लेखन हे त्यावेळीही युनिक होतं. आता परिस्थित सुधारली असावी.

परिस्थिती 'सुधारली' आहे याला सांख्यिकी पुरावा दिलेला आहे. याला 'सुधारणं' म्हणावं का अन्य काही शब्द वापरावा याबद्दल वेगळी चर्चा करता येईल.

लिखाण ही लेखकांची बौद्धिक मालमत्ता असावी; ते कुठे आणि किती ठिकाणी प्रकाशित करावं याचा निर्णय लेखकाने घ्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> तेच तेच लेख आणि त्याच लोकांचा ( आय डि / हॅन्डल्स) चा तिनही साइटस वर वावर
>> एकच लेख हे तिनहि साइटस वर टाकतात .. असे का ते कळत नाहि

आपले लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावेत, म्हणून लेख २-३ ठिकाणी टाकले जात असतील. लेखकाने/लेखिकेने कुठे आणि किती लिहावे, हे संकेतस्थळाचा मालक कसं काय ठरवणार?

>>ह्या मागिल राजकारण किंवा अर्थकारण काय आहे हे मला माहित नाहि

माझ्या मते बहुतेक मराठी संकेतस्थळे ही मराठीचे प्रेम किंवा केवळ हौस किंवा दुसर्‍या संकेतस्थळाशी भांडण झाले म्हणूनच चालवली जातात. वेळप्रसंगी मालक खिशातून पैसे खर्च करून हा उपद्व्याप करतात. (असा माझा अंदाज आहे, कृपया विदा मागू नये).

>> जवळ जवळ सगळे लोकं तिनहि साइट्स चे मेम्बर आहेत
>> बरेच मेम्बर्स तिनहि साइटस वर लॉग इन झालेले असतात !
>> जरी मेंबर्स बरेच असले तरी अ‍ॅक्टिवली भाग घेणारे / लिहिणारे हे मोजकेच आहेत

खरा मुद्दा हा आहे. सदस्य जुने झाले, मित्र/मैत्रिणी झाल्या की कंपूबाजी होते. कधीकधी (किंवा बरेचदा) कमरेखाली वार होतात, संपादक कंपूतल्या लोकांना संभाळून घेतात, स्वतः शिव्या खातात, तर कधीकधी उघड-उघड भेदभाव करतात. या व अश्या अनेक गोष्टींमुळे माझ्यासारखे लोक लिहायला बिचकतात. त्यातल्या त्यात, ऐसीवर वातावरण पोषक वाटले, म्हणून मी इथे लिहायला सुरुवात केली आहे. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत ..

मराठी साइट्स मधे सर्वात चांगला यु आय ह्या साइट चा आणि काहि अंशी मिसळपाव साइट चा आहे. तुमचे मुद्दे बरोबर आहेत . काहि साइट्स म्हणजे अगदि फेसबुक पेक्षा वाइट अवस्थेत आहेत ..चॅट मोड मधे ! मोठ्या मोठ्या गप्पा ..टिंगल टवाळी .. फालतु अ‍ॅनीमेटेड इमोटिकॉन्स .. आणि मोठ्या लांब लचक सह्या !
खरं सांगितलं कि लोकांना जिव्हारी लागतं .. इथले एडिटरस स्वतः आणि त्यांचे मित्र-मैत्रीणि वेग-वेगळ्या आयडिज घेवुन कॉमेन्ट्स करतात एका मेका च्या कॉमेन्ट्स वर प्रतिसाद देतात. गुण देतात .. एकदम फेसबुक स्टाइल नी !
ह्याला काय म्हणणार ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

धागा वाचून आधी काही वाटले नाही.

नंतर प्रतिसादांवर धागाकर्त्यांनी दिलेले प्रतिसाद वाचून हे आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उत्तम लेखाची लिंक दिलीत ! धन्यवाद .. फेवरेट करत आहे
ह्या माझ्या पहिल्याच पोस्ट ("चर्चे") ची २ दिवसात ७७५ वाचनं झाली .. शिवाय जवळ जवळ सर्व लिस्टेड एडिटर्स च्या कॉमेन्ट्स ! वाह !
ह्या शिवाय फक्त गेल्या २४ तासात माझ्या ब्लॉग ला ५९५ हिट्स ह्या फक्त ऐसीअक्षरे.कॉम ह्या लिंक वरुन आल्यात !! Smile

http://veedeeda.blogspot.in/

तुमचे परत धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

तुमचे इतरांपेक्षा 'वेगळे' असे संस्थळ पहाण्यास व वाचण्यास उत्सुक आहे. आधीच सर्वे करुन धागा टंकण्यापेक्षा 'आधी केले आणि मग सांगितले' याप्रमाणे केलेत तर तुमची अधिक वाहवा होईल.
अवांतरः -'वाहवा' वरुन उगाचच ही जुनी कविता आठवली.

कावळा म्हणे मी काळा
पांढरा शुभ्र तो बगळा
दिसतसे
वाहवा तयाची करिती
मज लागे धिक्कारिती
लोक हे
मग विचार त्याने केला
पैशाचा साबू आणिला
झडकरी
घाशिले अंग बहुबळे
रक्त त्यामुळे वाहू लागले
घाबरा झाला
बापुडा शेवटी मेला
नदीवरी|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिरशिंगराव .. साइट तयार करायची का एखादि विकत घेयची...का दोनिहि नाहि .. ह्या साठि इतका खटाटोप (मार्केट रिसर्च) .. युजर्स कसे आहेत , लेखक कसे आहेत , कुठल्या प्रकारच्या लोकांन पर्यत पोहोचायचय .. कॉम्पिटिशन कोणा कडुन आहे .. आत्ता अवेलेबल वेन्डर्स मधे नक्कि काय कमतरता आहे... ऑपचुनिटि कॉस्ट काय आहे .. आर ओ आय आहे का नाहि इ.इ.इ स्वॉट अनालिसिस वैगरे
ह्या बद्दल एक लेख लिहिन.. पण जी बेसिक माहिती होती ती इथे आणि मी मराठि मधील एका धाग्यावर टाकली आहे.

मायबोली.कॉम सारखं बाकिच्या साइटस ना कमर्श्य्ल होता येइल का ..कस्टमर बेस काय असेल .. किती वाढ होउ शकेल हि उत्तरं महत्वाची आहेत. मौज / हौस म्ह्णणुन ओपन सोर्स वापरुन बरेच लोकं साइटस बनवतात .. पण अ‍ॅड रेवन्यु मिळवणं खुप अवघड गोष्ट वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

चालले आहे ते ठिक आहे...त्यातच मजा घ्यायची..

पर्यायी व्यवस्था नकरता आहे ते उद्धस्थ करण्याचा विचार न मानवणारा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपला जालवावर दीर्घकालाचा असावा असे वाटते. 'तेच तेच'पणाचा विषय इतरत्रही चर्चिला गेला आहे, हे आपल्याला ठाऊक असेलच. तात्काल संदर्भासाठी एक दुवा देत आहे. इथे प्रामुख्याने एका विवक्षित संस्थळाविषयी चर्चा असली तरी त्यातल्या काही प्रतिसादांतील मुद्दे हे सर्वच संस्थळांना लागू होण्यासारखे आहेत
दुवा : http://www.mimarathi.net/node/9804.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला धागे गुंफायला आवडतात..्मी अत्ता पर्यंत २००० च्या वर धागे निरनिराळ्या समुहावर गुंफले आहेत..

लिहित जावे..समुहाच्या राजकारणा पासुन दुर असावे..कंपु नसला तरी आमचे धागे हिट्ट..मोडरेटर्शी वाद न घालता नियम पाळावेत..

धागा उडवला तर हुज्जत घालु नये नेटाने धागे गुंफावे...

धग्यात दम असला तर चालतो नसला तर उडतो..

धागा चालणे न चालणे..हि एक प्रक्रिया आहे..

कलाकृति लक्षात रहाते..टिका व टिकाकार नाहि..हा मुलमंत्र आहे धागेगिरी चा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परफेक्ट ----> " कलाकृति लक्षात रहाते..टिका व टिकाकार नाहि..हा मुलमंत्र आहे धागेगिरी चा "

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

Tveedee हे लॉगिन ब्लॉक केल्याबद्दल ऐसीअक्षरेचे अभिनंदन. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, विकिलिक्स, स्नोडेन इइ समर्थक ऐसीचा विजय असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0