आधुनिक शकुन - अपशकुन

प्रत्येक समाज वा संस्कृती पिढीजात काळापासून आलेल्या रूढी परंपरांचे शक्य होईल तितके पाळण्याच्या प्रयत्नात असतो. व अशा रूढी परंपरामध्ये श्रद्धा - अंधश्रद्धांचा वाटा फार मोठ्या प्रमाणात असतो. काही वेळा त्यांच्यातील फोलपणा स्पष्टपणे दिसत असूनसुद्धा त्यामुळे काही नुकसान तर होत नाही ना म्हणत त्या पाळल्या जातात. मांजर आडवे गेल्यास एक क्षण थांबून पुढे गेल्यामुळे अपशकुनाचा परिणाम होणार नाही याची खात्री असते. मानसिकता तशीच ठेवून सामान्यपणे त्या त्या काळातील जीवनशैलीप्रमाणे शकुन अपशकुनांचे आयकॉन्स बदलतात. बैलगाडींची पूजा करणारे आता मोटार गाड्यांची पूजा करतात. परंतु पूजा करण्याची मानसिकता नष्ट झाली नाही. भारतीय परंपरेने याबाबतीत तर कहर केला आहे व अजूनही आपण त्या जंजाळापासून मुक्त होऊ शकलो नाही. गंमत म्हणजे स्वत:ला अत्याधुनिक म्हणून घेणारे श्रीमंत व अतीविकसित राष्ट्रातील समाजसुद्धा याला अपवाद नाहीत. अत्याधुनिक जीवनशैलीनुसार या समाजातील शकुन अपशकुन विमान, डॉक्टर्स, सिगारेट्स इत्यादीत शोधल्या जातात. यातील काही नमुनेदार गोष्टींखाली दिल्याप्रमाणे आहेत.

विमान: विमान प्रवासात फुलाचा गुच्छ नेणे अशुभ समजले जाते. रिकाम्या असलेल्या आसनांचे सीट बेल्ट्स क्रॉस करून ठेवतात. तसे न ठेवल्यास भूत त्या सीटवर बसून प्रवास करतो. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यास ग्रेमलिन नावाच्या भुतामुळे बिघाड होतो, असा समज आहे. त्यासाठी बीअरचे नैवेद्य दाखविले जाते.

अम्ब्युलन्स: घाई गर्दीच्या वेळी अम्ब्युलन्समधून लिफ्ट घेणे अशुभ समजले जाते. वाटेत अम्ब्युलन्स दिसल्यास गाडी जाईपर्यंत श्वास रोखून धरले जाते. तसे न केल्यास अम्ब्युलन्समधील रुग्णाचा मृत्यु अटळ आहे, असे समजतात.

कॅलेंडर: वर्ष, दिवस वा महिना संपायच्या आत कॅलेंडरचे पान बदलणे अशुभ समजले जाते. लीप वर्षाच्या 29 फेब्रुवारीला जन्मलेल्या मुलीचे लग्न लवकर होते. व ती आयुष्यभर निरोगी राहते.

खुर्ची: खुर्चीसारख्या निरुपद्रवी वस्तूभोवतीसुद्धा अंधश्रद्धा आहेत. खुर्ची खाली पडणे अशुभ समजले जाते. कुणीतरी उठून गेल्यानंतर खुर्ची पडल्यास ती व्यक्ती खोटे बोलते, असा समज आहे. दवाखान्यातील खुर्चीवर झाकून ठेवलेले कापड खाली जमीनीवर पडल्यास नवीन रुग्ण येणार. खुर्ची उलटे ठेवल्यास घरात भांडण होणार, अशा समजुती खुर्चीबाबत आहेत.

सिगारेट: एकाच काडीने तीन सिगारेट पेटवणे अशुभ समजले जाते. बाळाच्या पाळण्यात सिगरेट ठेवल्यास भूत पळून जातो म्हणे. सिगरेटचे रिकामे पाकीट पायाने तुडवणे शुभ समजले जाते.

डॉक्टर्स: डॉक्टर्सचा सल्ला शुक्रवारी घेतल्यास रुग्ण बरा होत नाही. दवाखान्यात प्रथम येणारा रुग्ण ठणठणीत बरा होतो. डॉक्टरचे बिल पूर्णपणे चुकते करणे दुर्दैवाला आमंत्रण दिल्यासारखे होईल. काळ्या रंगांच्या गोळ्याने रुग्ण बरा होऊ शकत नाही. पांढऱ्या वा तांबड्या रंगांच्याच गोळ्याने रुग्ण बरा होतो, असा समज आहे.

हातरुमाल: हातरुमाल खाली पडल्यास स्वत: उचलणे अशुभ समजले जाते. घडी केलेला रुमाल सतत बाळगणे संकटांना आमंत्रण देवू शकते. एखाद्याचा/ एखादीचा रुमाल उसने घेणे म्हणजे त्याचे/ तिचे दु:ख/अश्रू मागून घेतल्यासारखे समजतात. रुमालाला गाठ बांधून ठेवल्यास भूतबाधा होत नाही.

सुई दोरा: काळा दोरा ओवलेली सुई रस्त्यावर दिसणे अशुभ समजले जाते. गर्भिणीने अशी सुई बघितल्यास तिला मुलगी होणार. दिवसाची सुरुवात सुई या शब्दाने केल्यास दिवस वाईट जाणार. मित्राला सुई देणे हे मैत्री तोडल्याचे लक्षण आहे. शिवत असताना सुई मोडल्यास ते शुभशकुन असे समजले जाते.

फोटो: भिंतीवर टांगलेली फोटोची फ्रेम अचानक पडल्यास संकट कोसळणार. एखाद्या प्राण्याबरोबर फोटो काढून घेणे हे भुताच्या स्वरूपातील प्राण्याचा फोटो काढल्यासारखे होईल. तिघांचाच फोटो काढल्यास मधल्या व्यक्तीवर संकट येणार. आवडत्या व्यक्तीचे फोठो स्टीअरिंग व्हीलजवळ ठेवल्यास गाडीला अपघात होत नाही.

साबण: एकमेकांना साबण देणे मैत्री तोडण्याचे लक्षण मानले जाते. आंघोळ करताना साहण निसटणे संकटाला आमंत्रण दिल्यासारखे असते.

चमचे: चमचा खाली पडल्यास घरात लहान मूल येणार. मोठा चमचा स्वयंपाकाच्या ओट्यावर किंवा डायनिंग टेबलवर पडल्यास 8-10 माणसं जेवायला येणार. चमचा उलटा पडल्यास मनासारखी गोष्ट होणार नाही.

या यादीत आपणही भर घालू शकता.

संदर्भ:Cassel Encyclopaedia of Superstitions

field_vote: 
3.25
Your rating: None Average: 3.3 (4 votes)

प्रतिक्रिया

'भारत' आणि 'भारतीय परंपरा' यांचे लत्ताप्रताडन ऐकून ऐकून कान विटले होते. आम्ही भारतीय जनुकिय बिघाड झालेले कि काय असे वाटावे इतके दोष आमच्यात निघायला लागले. आत्मग्लानी यायला लागली होती. शिवाय भूमध्य सागर, ब्लॅक सी, कॅस्पियन सी, अटलांटिक महासागर यांच्यावर प्रचंड धुके दाटलेले. पलिकडचे काही दिसेना. "टचवूड" आपला लेख वाचायला मिळाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वाटायचं काये?
आपली जनुके बिघडलेलीच आहेत.
कोलेस्ट्रॉल अन हार्ट डीसिज, फॅट डिस्ट्रीब्युशन इत्यादी अभ्यास केलात, तर दुनियेतील इतर लोकांच्या तुलनेत, आमचे मास्तर सांगत, तसे,
'वी इंडियन्स हॅव गॉट शिटी जीन्स'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

'वी इंडियन्स हॅव गॉट शिटी जीन्स'

बरोबर बोलेले आपले मास्तर. आणि ती शिटी जीन्स अमेरिकेत असती तर त्यांचा किमान एक तरी फायदा झाला असता पण आमच्याकडे बद्धकोष्ठाची समस्या देखिल व्यापक ती व्यापकच! नशीबच फुटकं साला!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अगदी बरोबर. जे जे भारतीय ते ते सगळे शिटि. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भुभुने नुसता हात पुढे केल्यावर आढेवेढे न घेता पंजा दिला तर मी तो शुभशकुन मानतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

श्री नानावटी आणि 'मौजमजा' सदर? बघुन जरा गडबडलो. पण मग हा ऐसीसाठी शुभशकुनच आहे समजून धागा उघडला आणि अंदाज बरोबर आल्याचे समजले Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुपरस्टिशनांची यादी आवडलेली आहे.

पाश्चात्य देशांतही असल्या समजूतींची कमी नाही. क्रॉप सर्कल्सना तर कल्टचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. माझी एक कलीग जी गेली ३३ वर्षं सीनियर इंजिनियरचं काम करते, ती असल्या बऱ्याच न्यू-एज गोष्टी करत असते. ती इंग्लंडला आठवडाभर या क्रॉप सर्कल्सविषयीचा काहीतरी कोर्स करायला गेली. त्यात या सर्कल्समध्ये पडून मेडिटेशन वगैरे केल्याने आत्म्याचा कसा उद्धार होतो वगैरे काय काय सांगितलं होतं. तिच्याकडे गेलेलो असताना तिने क्रॉप सर्कल्सचा एक व्हिडियो दाखवला. त्यातही ही क्रॉप सर्कल माणसांनी बनवणं कसं शक्य नाही वगैरे म्हटलेलं होतं. तिच्याकडे आलेल्या ग्रूपचं एकंदरीत मत असं होतं की ही क्रॉप सर्कल्स म्हणजे परग्रहवासींनी आपल्याला दिलेला एक संदेश आहे. तो आपण डीकोड करायला हवा वगैरे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्रॉप सर्कलचा कोर्स करायला गेली हे ठीके, पण मुळात यावर असा काही कोर्स ठेवणे म्हंजे हद्दच आहे. ज्योतिषशास्त्र वगैरेंचे कोर्स समजू शकतो एकवेळ (काही झालं तरी ते शिकून लोक पैसे मिळवतात-मग कसेही असो) पण हे म्हंजे हैट्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणखी खूप अंधश्रद्धा आहेत.

  • नावेत मांजरा सोबत प्रवास करणे अशुभ मानले जाते. माणसे अरभाट आणि चिल्लर या पुस्तकात जी. ए. कुलकर्णी यांनी या अंधश्रद्धेवर एका पाश्चात्य कथेचा संदर्भ दिला आहे. याच संकेत स्थळावर या विषयी वाचल्याचे आठवते.
  • बसमध्ये चढल्यानंतर पहिल्यांदा जी सीट नजरेस पडेल, तिच्यावर बसणे अशुभ समजले जाते.
  • मिक्सरमधून कोणताही मसाला किंवा पदार्थ काढण्यापूर्वी शेंगदाणे मिक्सरमधून काढणे शुभ समजतात.

इ.इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आस्तिकता/नास्तिकता आणि त्याच्या अनुषंगाने येणारे विषय संस्थळाच्या टॉप १० मधे असल्यास मी तो अपशकुन समजतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगायायायायायायायाया _/\_

मार्मिक अन नेमके!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सोमवारी निळा टी-शर्ट घालणं अशुभ समजतात... असा माझा समज झाला होता. मग लक्षात आलं ते मंडे ब्लूजबद्दल बोलत होते. त्यापुढे आणखी ट्यूब पेटली. आमच्या शाळेत कायम रद्दळ, रटाळ वातावरण का असायचं? मुलींच्या गणवेशात निळ्या चौकडींचा पिनोफोर होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकाच काडीने तीन सिगारेट पेटवणे अशुभ समजले जाते.

या अंधश्रद्धेचा उगम पहिल्या महायुद्धाच्या वेळेचा आहे. पहिल्या महायुद्धात युरोपात दीर्घकाळ खंदकांची लढाई (trench warfare) चाललेली होती. शत्रुपक्षाचे खंदक हाकेच्या अंतरावर असत, आणि सैनिकांचा वेध घ्यायला शत्रूचे नेमबाज स्नायपर्स टपून बसलेले असत. अशावेळी पेटलेल्या काडीसारखा प्रकाशाचा स्रोत फार काळ राहिला तर शत्रूला आमंत्रणच. एकाच काडीने तीन सिगरेटी पेटवल्या की काडी बराच वेळ पेटती राही, शत्रूचं लक्ष वेधलं जात असे आणि त्या अग्निहोत्री तिघांपैकी कोणीतरी गोळीचा बळी होई. त्यामुळे आजही एका काडीने तीन सिगरेटी पेटवल्या की तिघांपैकी एक मरणार असं समजलं जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रोचक श्रेणी देऊ की माहितीपूर्ण? माहिती आवडली एकदम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या गोष्टींमागची कारणं लक्षात न घेता टिका कराणार्‍या या "तथाकथित" "पुरोगामी" "डाव्या" लोकांचा मला वीट आला आहे! ओल्ड टेस्टामेंटात यातल्या अनेक गोष्टींची शास्त्रीय कारणं लिहलेली आहेत! काही टोराहमध्ये आहेत.

उदाहरणार्थ;

इंजिनमध्ये बिघाड झाल्यास ग्रेमलिन नावाच्या भुतामुळे बिघाड होतो, असा समज आहे. त्यासाठी बीअरचे नैवेद्य दाखविले जाते.

इंजिनवर (विशेषत: चारचाकीचे) काम करणार्‍या लोकांच्या ग्रेमलिन हा शब्द प्रचलित आहे. ग्रेमलिन या फिक्शनल कॅरॅक्टरप्रमाणे इंजिनमध्ये किरकोळ प्रॉब्लेम्स असतात आणि एक दिवस अचानक हे प्रॉब्लेम्स भयानक रुप धारण करतात असे समजले जाते. आता अमेरीकन इंजिन मेकॅनिक्स म्हणजे ते बिअर ढोसणारच, मग त्यांचे देव किंवा त्यांची भुतं अजून दुसरं काय मागणार?

घाई गर्दीच्या वेळी अम्ब्युलन्समधून लिफ्ट घेणे अशुभ समजले जाते.

अमेरीकेतल्या मोठ्या शहरात अ‍ॅम्ब्युलन्स किंवा 'फायर ब्रिगेड' चा आवाज आला की सगळे जण पटापट रस्त्या कडेला जातात (पॅनिक होतात), घाई गर्दीच्या वेळी ज्या प्रकारे अ‍ॅम्ब्युलन्स जाते ते पाहता प्रोबॅलिटीटी काढली तर अ‍ॅम्ब्युलन्सचा अ‍ॅक्सीडेंट होण्याचे चान्सेस जास्त निघतील.

वर्ष, दिवस वा महिना संपायच्या आत कॅलेंडरचे पान बदलणे अशुभ समजले जाते.

अर्थात. अहो इथे काल काय खाल्लं लक्षात राहत नाही, चुकुन पुढल्या महिन्याच्या तारखेला ऑफिसात गेलो तर वांदा नाही होणार?

लीप वर्षाच्या 29 फेब्रुवारीला जन्मलेल्या मुलीचे लग्न लवकर होते. व ती आयुष्यभर निरोगी राहते.

हो, कारण ही मुलगी चार वर्षात एकाच वर्षाने मोठी होते, अधिक काळ तरूण असणार्‍या मुलीला डीमांड जोरदार असणारच ना!! आणि तरूण वय म्हणजे तसं निरोगीच नाही का?

डॉक्टर्सचा सल्ला शुक्रवारी घेतल्यास रुग्ण बरा होत नाही. दवाखान्यात प्रथम येणारा रुग्ण ठणठणीत बरा होतो. डॉक्टरचे बिल पूर्णपणे चुकते करणे दुर्दैवाला आमंत्रण दिल्यासारखे होईल.

अर्थात. अहो गुरूवारी हॅप्पी हवरला जाऊन आल्यामुळे तसाही डॉक्टर हँगओव्हर मध्ये असतो. शिवाय विकेंडला डॉक्टरच्या बायकोने नेमून दिलेल्या घरकामांचं टेन्शन त्याला असतं, अशा वेळात काय डोंबल डायग्नोसीस करणार तो?
संपूर्ण बिल चूकतं गेलं म्हणजे तूमचं 'चालू' खातं संपणार की काय अशी त्या डॉक्टरला भिती असते, आता तुमच्या डॉक्टरची नाराजी म्हणजे दुर्दैवाला आमंत्रण नाहीतर दुसरं काय?

हातरुमाल खाली पडल्यास स्वत: उचलणे अशुभ समजले जाते.

आता हातरुमालावरती मैत्रिणींच्या लिपस्टीकांचे डाग (अरेरे, डाग नाही रे, सौंदर्यखुण म्हणतो!) असतील तर तो रुमाल स्वतः उचलताना बायकोने (किंवा दुसर्‍या मैत्रिणीने) पाहिले तर स्वतःच पुरावा दिला असे होणार नाही का!! अहो खिशातला रुमाल सव्वालाखाचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile