शब्द
शब्द सुंदर केवढा
पारिजातकाचा सडा
शब्द पाउस हा वेडा
शब्द जमिनीचा ओढा
शब्द संतांच्या दारी
शब्द मंदिरात हरी
शब्द कबिराचे करी
शब्द झाले एकतारी
शब्द पाखरांच्या दिठी
तुका-ज्ञानियाच्या भेटी
शब्द भिमेच्याही काठी
शब्द सिंधूच्या ललाटी
शब्द बासरीची धून
शब्द श्रावणाचे ऊन
शब्द पायात रुतून
शब्द बंबाळ अजून
© राहुल अहिरे
प्रतिक्रिया
क्यूटी पाय!
क्यूटी पाय!
सुंदर!
सुंदर! आवडली!
मी शब्दांचा जादूगार...
व्वा. आवडली
व्वा. आवडली
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
दिठी म्हणजे काय?
दिठी म्हणजे काय?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
दृष्टी. लै जुना मराठी तद्भव
दृष्टी. लै जुना मराठी तद्भव आहे-मला वाटते ज्ञानेश्वरकालीन असावा कमीतकमी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं