विवाह कायदा आणि विधी

मी पूर्वी सप्तपदी विधीच्या आधुनिक काळातील अव्यवहार्यतेबद्दल पुरुषांची बाजु घेऊन लिहीले होते. त्याला बराच काळ लोटला आहे आणि तेव्हा उडालेली धूळ आता खाली बसली आहे. तरीही मी दरम्यानच्या काळात माझी भूमिका परत-परत तपासत होतो. ही भूमिका तपासत असताना काही गोष्टी नव्याने लक्षात आल्या...

स्त्री बद्ध असताना, स्त्री हे परक्याचे धन अशी समजुत समाजात प्रचलित असताना पुरुषाला जबाबदारीची जाण यावी म्हणून ’नातिचरामि’चा उच्चार करणे ही अपेक्षा स्वाभाविक ठरते. पुरुषवंशाची वृद्धी आणि स्थैर्य यासाठी समर्पण करून स्त्रीने माहेरचे पाश तोडणे हे समाजाला अपेक्षित होते. त्यामुळे विवाह विधींच्या तपशीलात डॊकावले तर समाजाची गरज ठळकपणे दिसते.

पण मी माझ्या मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे आजची स्त्री मुक्त आहे किंवा मुक्त होऊ पहात आहे. पूर्वी डझन-अर्धा डझन मुलं होणे हे ’नॉर्मल’ असताना ’स्त्री परक्याचे धन’ ही कल्पना समाज स्वीकारू शकत होता. आज हे शक्य आहे का? मला वाटते नाही...

एकेकटी मुले असणारी कुटुंबे हे आज सर्वत्र दिसणारे चित्र आहे. अशा वेळेस जर एकुलती एक मुलगी असेल, त्यात ती शिकलेली आणि कमावती असेल तर ती मुक्त किंवा मुक्त होऊ पहाणारी स्त्री "परक्याचे धन" मानायला कितीजणी (किंवा त्यांचे आईबाप) तयार होतील?
अशा परिस्थितीमध्ये ’माहेरचे पाश’ स्त्रीने तोडायची अपेक्षा ठेवणे हे पण अव्यवहार्यच ठरते. असो...

आता आपण ’नाते’ ही संकल्पना तपासुन पाहु. सुरुवातीला नात्याची व्याख्या करणे योग्य ठरेल - दोन व्यक्तीमधला व्यवहार (अथवा संबंध) त्या कोणत्याही एका किंवा दोन्ही व्यक्तींची तात्कालिक अथवा दीर्घकालीन कोणतीही गरज भागवत असेल तर त्या दोन व्यक्तीमध्ये तात्कालिक अथवा दीर्घकालीन नाते असते. यातील काही नात्याना मित्र, मालक-नोकर, आईबाप, नवरा-बायको अशी नावे मिळालेली आहेत तर कदाचित काही नात्याना अशी नावे नसतील.

दीर्घकालीन नात्याना स्थैर्य लाभावे म्हणुन जबाबदारीचे भान यावे यासाठी आकारीक/कायदेशीर करार, शपथा या अपरिहार्य ठरतात. शपथांचे/करारांचे गांभीर्य टिकावे म्हणुन त्या मोडणे दंडनीय ठरते.

या सर्व पार्श्वभूमीवर नवरा-बायकोचे नाते दीर्घकाळ टिकावे किंवा त्या नात्यात प्रवेश करताना जबाबदारीची जाणीव परस्पराना अधिक थेटपणे व्हावी याठी सुस्पष्ट "शपथ" घेतली जावी असे मला वाटते.

मला सध्याच्या बदलत्या संदर्भात "मी अमुक-तमुक चा पति-पत्नी म्हणुन स्वीकार करतो. मी पति-पत्नी म्हणुन अमुक-तमुकच्या शारिरीक, मानसिक, भावनिक, बौद्धिक गरजा भागविण्याची जबाबदारी घेतो/घेते." अशी शपथ घेणे जास्त योग्य ठरेल.

मला असं वाटतं अशा प्रकारच्या शपथेने "लग्न" समाजात जास्त गांभीर्याने घेतले जाईल. कृपया हे अभिप्रेत असतच असा प्रतिवाद करु नये. देशाच्या घटनेवर विश्वास आहे हे गृहित धरणं आणि तसे ऍसर्ट करणे यात बराच गुणात्मक फरक आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

गुरुजी शपथ घेतील व वधू वरांनी फक्त मम म्हणायच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मला स्त्रीवाद्यांची प्रतिक्रिया जाणुन घेण्यात जास्त रस आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा रस का आहे हे समजलं नाही.

असो. मी (आणि माझ्या आताच्या नवऱ्याने) लग्न केलं तेव्हा स्पेशल मॅरेज अॅक्टाखाली केलं. त्यामुळे तुम्ही म्हणता तशी शपथ घ्यावीच लागली. (नक्की काय होतं हे आठवत नाही, पण काहीतरी विनोदी प्रकार आहे असं माझं तेव्हा मत झालं. एवीतेवी सही केलीच तर मग वेगळं बोलायचं कशाला?) कागदावर सही केलेलं इतर कागदी घोडे नाचवण्यासाठी उपयोगी पडतं म्हणून तेवढं केलं. बाकी लग्न केल्यामुळे आम्हां दोघांमधेही काही फरक पडलाय असं काही वाटत नाही. (जो फरक झालाय तो तसाही झालाच असता.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी (आणि माझ्या आताच्या नवऱ्याने) लग्न केलं तेव्हा स्पेशल मॅरेज अॅक्टाखाली केलं.

वाक्यातील एका अतिरिक्त शब्दामुळे काही अनपेक्षित अर्थबोध होत आहे, असे वाटते. कृपया शब्दयोजना पुनः एकवार तपासून, प्रतीत होणाराच अर्थ अभिप्रेत आहे, याची खात्री करून घ्यावी, एवढेच नम्रपणे सुचवू इच्छितो.

आगाऊ आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लग्न केलं तेव्हा तो नवरा नव्हता ना. आता तो नवरा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...म्हणजे तुम्ही तुमच्या नवर्‍याबरोबर लग्न नाही केले, दुसर्‍याच कोणाबरोबर तरी केले; फक्त, आता तो तुमचा नवरा आहे, असे काहीसे?

'मी आणि माझ्या नवर्‍याने लग्न केले' अशा वाक्यात माझ्या कल्पनेप्रमाणे 'म्हणजे तेव्हा तो माझा नवरा नव्हता, आता त्या लग्नामुळे झाला' हे अध्याहृत असते.

===============================================================================================

उद्धृत वाक्य. थोडक्यात, हे माझ्या तोंडचे शब्द नव्हेत. अशा प्रकारचे वाक्य मी म्हटले असते, तर ते साधारणतः पुढीलप्रमाणे असते: 'मी आणि माझ्या बायकोने लग्न केले, तेव्हा...'. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अध्याहृत असतं हे मान्य आहे, पण अतार्किक वाटतं. म्हणून ...

शिवाय ठरवून विनोद करायला काय हरकते? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुरुजी शपथ घेतील व वधू वरांनी फक्त मम म्हणायच

आमचे लग्न मराठीतून लागले. एकमेकांना द्यायची वचने दोघांनी मराठीतूनच एकमेकांना दिली. ( दोघांनी एकमेकांना, ,जोडीदार म्हणून निवडले असून स्वतःचा स्वीकार करावा' असे सांगणे, नातिचरामी प्रकारचे काहीतरी, एकमेकांना साथ देण्याबद्दल काहीतरी इ इ)

वचनविधी करून काय किंवा नुसते रजिष्टात सह्या करून लग्न केले असते तरीही आमच्या पुढच्या आयुष्यात काही फरक पडला असता असे वाटत नाही.
बाकी लेखाच्या भावनेशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात नी प्रीन्युपमध्ये काय फरक आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यात नी प्रीन्युपमध्ये काय फरक आहे?

बराच फरक आहे. माझ्या समजुती प्रमाणे प्रीन्युपमध्ये करार मोडल्यास आर्थिक जबाबदारीची वाटणी कशी करायची याची आखणी असते. मी इथे फक्त जबाब्दारीचे भान देणारी कायदेशीर शपथ विधीमधे आणावी असे सुचव्त आहे. कारण करार/नाते कुणी कसे मोडले यावर पुढचे बरेच काही अवलंबुन असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग अशी परिणामशुन्य शपथ घेण्याने सद्य परिस्थितीत फार काही फरक पडेलसे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परिणामशुन्य शपथ

प्रकरण जेव्हा कोर्टापुढे जाते तेव्हा कोणी कोणता कायदा/करार कसा मोडला याचा विचार नक्कीच होतो. तेव्हा परिणामशून्य म्हणणे मला धाडसाचे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिणामशुन्य म्हणजे जर ही शपथ मोडली तर काय परिणाम होतील हे शपथेत स्पष्ट नसल्याने कोर्टात शपथ टिकणार नाही.
बाकी शपथ मोडण्याचे परिणाम एखाद्या कायद्यात घालून ठेवले तर सध्याच्या कोणत्याही 'मॅरेज अ‍ॅक्ट' परिस्थितीत काय फरक?
आणि शपथेतच मोडल्याचे परिणाम घालून ठेवले तर एकप्रकारचे प्रीन्युपच झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मग अशी परिणामशुन्य शपथ घेण्याने सद्य परिस्थितीत फार काही फरक पडेलसे वाटत नाही.

सहमत.
लग्न लागणे ( नोंदणी, जाहिर लग्नविधी) इ. नंतर कायद्यानुसार हक्क आणि कर्तव्ये लागू होतात. ते, लग्नाच्या विधीचा भाग म्हणून जे काही म्हटले जाते त्यापेक्षा जास्त बंधनकारक असते. बदल करायचे झाले तर कायद्यात असलेल्या हक्क- कर्तव्यात करावे लागतील. लग्नातल्या विधीतल्या शब्दांनी काय फारसा फरक पडणार आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>जबाब्दारीचे भान देणारी कायदेशीर शपथ

जाबाबदारीचे भान आणून देण्यास श्री (हिंदु विवाह कायदा १९५५) आणि श्री (भादंवि कलम ४९८अ) समर्थ आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नितिन थत्ते

हिंदु विवाह कायद्याची इम्प्लीकेशन्स आणी स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट्ची इम्प्लीकेशन्स किती लग्नाळुना माहिती असतात? असे सर्वेक्षण केल्यास विदारक सत्य पुढे येईल याची मला खात्री आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यवहारात सारीच कायद्याची कलमे सर्वांनाच ठाउक असत नाहित.
काही संकेत,conventions रुढ झालेले असतात, तयनुसार सगळं चाललेलं असतं.
जेव्हा संकेत स्पश्ट नसतात, व जबाबदार्‍या नाकारल्या/लादल्या जातात किम्वा धुरकट रेषा समोर येतात तेव्हाच कायदा आठवतो.
कायदा फारसा माहित नसला, तरी समजूतदार व पुरेसं संवेदनशील असं मानवी व्यक्तिमत्व असलं तर बहुतांश केसेसमध्ये घडी सुरळित सुरु राहते.
कायदा धाक द्यायला बरा आहे, प्रेम मिळवण्यास नाही. जाउ दे. माझे दवणीय इन्स्टींक्ट्स जागे होउ लागलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सर्व प्रतिसाद वाचुन एक गंमत वाटली. शपथेच्या पातळीवरतरी होणारे नवरा-बायको इक्वल फुटींगवर असावेत असं कुणाला वाटत नाहीत याची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"नवरा-बायको इक्वल फुटींगवर असावेत असं कुणाला वाटत नाही" असं का वाटलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.