तडा

शाळेच्या आवारात दोन मैत्रिणी मजेत खेळत होत्या.
दोघींचेही बाबा आले. थोडाकाळ रेंगाळले.
एक दुस-याशी थोड्याफार गप्पा मारून आपापल्या मुलींना घेऊन निघून गेले.
---
" बाबा आरक्षण म्हणजे नेमकं काय हो? " एकीने तिच्या बाबाना विचरले.
" आरक्षण म्हणजे राखीव जागा! आपल्या देशात काही जातींसाठी जागा राखून ठेवल्या असतात शिक्षण नोकरी सगळीकडे " तिचे बाबा उत्तरले.
" आपल्याला का नाही मिळत ते? " मुलगी म्हणाली.
" पाप केलंय ना बेटा वरच्या जातीत जन्म घेउन! त्यामुळे तू कितीही हुशार असलीस कितीही मेहनत केलीस तरी तुझा नंबर नेहमीच त्यांच्या नंतरच लागणार " बाबा म्हणाले.
" का बरं? " मुलीचा प्रश्न.
" ज्या देशात गुणवत्ते पेक्षा कोणत्या जातीत जन्म घेतो ह्यालाच महत्व असतं तिथे दुसरं अजून काय होणार? " बाबा म्हणाले.
---
" बाबा xxxxx म्हणजे काय हो? " दुस-या मुलीने तिच्या बाबांना प्रश्न केला.
" तो अपशब्द आहे बेटा आपल्या जातीतल्या लोकांसाठी " बाबा म्हणाले.
" असं का म्हणतात? '' मुलीने विचारले.
" शाप आहे ना आपल्याला! खालच्या जातीत जन्माला आल्याचा डाग आयुष्यभर मिटणार नाही. तू कितीही हुशार असलीस अगदी बोर्डातून पहिली जरी आलीस ना तरीही तू लोकांसाठी नेहमीच xxxxxच राहशील " तिचे बाबा उत्तरले.
" का बरं? " मुलीचा प्रश्न.
" ज्या देशात गुणांपेक्षा कोणत्या जातीत जन्म घेतो ह्यालाच महत्व असतं तिथे दुसरं अजून काय होणार? " दुसरीचे बाबा म्हणाले.
---
" ते असंच असतं बेटा! " दोघींचेही बाबा उत्तरले
" असं का? " ह्या दोघींच्याही एकाच प्रश्नाला हे एकच उत्तर त्यांच्या जवळ होते.
(समाप्त)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

समाजातले सारे घटक आपापल्या सामाजिक स्थितीशी बरेच कम्फर्टेबल असतात. पण उच्चवर्णीय अतिसंवेदनशील लोकांच्या मेंदूमधे सगळ्या समाजांच्या सगळ्या लोकांची तथाकथित रड ऐकू येत असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असंवेदनशील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उच्चवर्णीय अतिसंवेदनशील लोकांच्या मेंदूमधे सगळ्या समाजांच्या सगळ्या लोकांची तथाकथित रड ऐकू येत असते.

बरोबर.

समाजातले सारे घटक आपापल्या सामाजिक स्थितीशी बरेच कम्फर्टेबल असतात.

याचा नक्की अर्थ काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करुन द्या; म्हणजे तो पेटून उठेल " ह्या अर्थाचं बाबासाहेब नामक कुणी बॅरिस्टर म्हणाले होते. गुलामाला तो गुलाम असल्याची पुरेशी जाणीव झालेली नाही असा अरुण काकांच्या प्रतिसादाचा अर्थ असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नक्की त्यांनाच विचारू बॉ काय ते. ही कदाचित भाषेची मर्यादादेखील असू शकेल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरुण जोशी,शहराजाद,बॅटमॅन आणि मन प्रतिसादा साठी धन्यवाद.

@मन <<<<"गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करुन द्या; म्हणजे तो पेटून उठेल ">>>>
कदाचित हे विधान कार्ल मार्क्स ह्यांचे आहे. (चु. भु. ची शक्यता आहेच ) असो आंबेडकरांचे ही योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे जातीभेद निर्मुलना चा बाबतीत तर त्यांचा वाटा सर्वात मोठा आहे.

असो. ह्या वरून मला मार्क्स ह्यांचे दुसरे विधान आठवले.

'जसा माणसाचा वर्ग बदलतो तश्या त्याच्या संवेदनाही बदलतात'

वर्ग तर मनुष्याचा बदलू शकतों तो वर किंवा खालीही जाऊ शकतो पण वर्णा बद्दल ते शक्य नाही.

वर्ण हा बदलू शकत नाही तरीही मनुष्याच्या संवेदना मात्र नक्कीच बदलू शकतात.

-------------
दुसरा मुद्दा <<<<समाजातले सारे घटक आपापल्या सामाजिक स्थितीशी बरेच कम्फर्टेबल असतात.>>>>
हे अरुण जोशी ह्यांचे विधान.

<<<<नक्की त्यांनाच विचारू बॉ काय ते.>>>>

बॅटमॅन ह्यांच्याशी सहमत मीही त्याची वाट बघत होतो. कारण अरुण जोशीचे प्रतिसाद अतिशय विचारपूर्वक दिलेले असतात.

पण त्यांच्या प्रतिसादा वरून मला जे काही वाटते ते सांगतो,
त्यांचे मत वेगळे असल्यास त्यांनी जरूर तसे सांगावे.

माझ्या मते अरुण जोशी ह्यांचे म्हणणे काही चूक नाही.

उदा. कित्येक सहस्त्रेके विविध जाती अन वर्ण आपापल्या सामजिक स्थितीशी कम्फर्टेबल होतेच.
मांत्र जेव्हा ते अन कम्फर्टेबल झाले तेव्हाच जग बदलले.

हीच गोष्ट आर्थिक बाबतीत ही लागू होतेच.
शहरात झोपडपट्टीत राहणारे लोक, घर/फ्लॅट मध्ये राहणारे मध्यम वर्गीय आणि मोठ्मोठ्या बंगल्यांमधे राहणारे अती श्रीमंत आपापल्या जगात कम्फर्टेबल असतातच. मध्यम वर्गीय माणसाला झोपडपट्टी बद्दल जे काही वाटते तसे बरेचसे अती श्रीमंत उच्च वर्गीयांना दोघांबद्दलही कमीजास्त प्रमाणात तसेच वाटत असते.

राजकीय बाबतीत ही तेच म्हणता येईल परकीय सत्तेच्या गुलामगिरीत बहुसंख्य प्रजा कम्फर्टेबल होतीच. आपण गुलामीत आहोत ह्याचीच त्यांना जाणीव करून देण्यासाठीच संबधीत देशातल्या स्वातंत्र्यवीरांना सर्वात जास्त परिश्रम घावे लागले. जेव्हा प्रजेला त्याची जाणीव झाली तेव्हा कुठल्याही देशाला स्वातंत्र्य मिळावयास फार काळ लागला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही जातीतल्या लोकांना आपल्या मेहनतीचे अजिबात फळ मिळत नाहीये असं खरंच वाटत असतं तर दोन्ही प्रकारच्या जातीतील व्यक्तींनी मेहनत करणे थांबवले असते असे वाटते.

वास्तवात, सद्य स्थितीत सर्व समाजानेच ५० वर्षांपूर्वीच्या स्थितीशी तुलना केल्यास प्रगती केली आहे असे म्हणायला हवे. बाकी, लेखात उमटलेले नाराजीचे/निराशेचे सूर नवे नाहितच. आणि ते प्रगतीच्या वेगाबद्दल असतात, प्रगती होतेय यावर शंका घेण्याबद्दल नव्हेत असे निरिक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दोन्ही जातीतल्या लोकांना आपल्या मेहनतीचे अजिबात फळ मिळत नाहीये असं खरंच वाटत असतं तर दोन्ही प्रकारच्या जातीतील व्यक्तींनी मेहनत करणे थांबवले असते असे वाटते.

हा प्रतिवाद चुकीचा आहे.
आपल्या हिश्श्याची रोटी कुणीतरी ओरबाडून नेतय किंवा आपल्याला कुणी हिणवून बोलतय असं वाटलं म्हणून लोक मेहनत करणं थांबवतातच असं काही नाही.
शेवटी पोट भरण्यासाठी काही ना काही करावे लागते. ओरबाडून नेले जत असले तरी उरलेल्यात आपले पोट भरण्याची धडपड सुरु आहे; ह्याचा अर्थ तक्रार नाहिच; असे वाटू नये.

"अजिबात फळ मिळत नाहिये" ऐवजी "पुरेसे फळ किंवा न्याय्य हक्क मिळत नाहिये" असे वाटत असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"अजिबात फळ मिळत नाहिये" ऐवजी "पुरेसे फळ किंवा न्याय्य हक्क मिळत नाहिये" असे वाटत असावे.

याच्याबद्दल दुमत नाहीच. मात्र असे वाटणे एकुणच समाजाच्या प्रगतीसाठी पोषक - प्रसंगी गरजेचे - आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"आपल्यावर तीव्र अन्याय होतोय" असे समाजातील एका घटकाला वाटते असे मला म्हणायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"आपल्यावर तीव्र अन्याय होतोय" असे समाजातील एका घटकाला वाटते असे मला म्हणायचे आहे

असे कोणत्याही एका'च' घटकाला वाटत नाहीये तोवर चिंतेची गरज वाटत नाही.

दुसरे असे की कोणत्याही एकाच घटकावर तीव्र अन्याय होतोय यावर माझी सहमती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश प्रतीसादा बद्दल धन्यवाद. सध्या थोडं घाईत असल्या मुळे शक्य नाही, उद्या मात्र सविस्तर लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0