Skip to main content

हत्तीखाना

(आता तिथे खरडफळा निघालेलाच आहे, म्हटल्यावर, Separate But Equal तत्त्वास अनुसरून…)

मारवा Sat, 01/11/2025 - 09:34

तर मग प्रत्येक सभासद एक बेट बनून जाणार नाही का ?
मग परस्पर संवाद कसा होणार ?
म्हणजे वन टू वन च संवाद होईल सामाजिक संवाद एकसाथ कसा होणार ?
आणि हे थोडं अस्पृश्यते सारखं नाही का होणार ?
की बाबा आमच्या पंगतीला बसू नकोस.

anant_yaatree Sat, 01/11/2025 - 11:08

असे इथे नसेल ना?
"टवाळखाना" असे नाव धाग्याला द्यायला हवे होते असे राहून राहून वाटते.

सच्चिदानंद हत्ती Sat, 01/11/2025 - 18:27

धन्यवाद न. बा

मी एक हलकल्लोळसिंग हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

सच्चिदानंद हत्ती Sun, 02/11/2025 - 20:12

आज वार्ताहरांविरुद्ध गुन्हे माफ न करण्याचा दिवस आहे. त्यानिमित्त सर्व ऐसीकरांना, विशेषतः वार्ताहरांविरुद्ध गुन्हे माफ न करण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा.

या निमित्ताने वार्ताहरांविरुद्ध गुन्हे माफ न करण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ऐसीकरांनी त्यांच्या क्षेत्राविषयी माहिती करून देणारा एखादा लेख लिहिल्यास ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही.

सच्चिदानंद हत्ती Mon, 03/11/2025 - 18:16

नाट्यकर्मी, 'पृथ्वी थिएटर'चे संस्थापक व अभिनेते-दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर (१९०६),  संगीतकार लक्ष्मीकांत (१९३७), अभिनेता सदाशिव अमरापूरकर (२०१४)

 

विनम्र अभिवादन

सच्चिदानंद हत्ती Mon, 03/11/2025 - 18:19

स्वातंत्र्यदिन : पनामा, डॉमिनिका, मायक्रोनेशिया.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पनामा, डॉमिनिका आणि मायक्रोनेशियाच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.

सच्चिदानंद हत्ती Tue, 04/11/2025 - 19:16

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : टोंगा 

राष्ट्रीय दिन/स्वातंत्र्यदिनानिमित्त टोंगाच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.

 

 

सच्चिदानंद हत्ती Tue, 04/11/2025 - 21:36

क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (१८४५),
संगीतकार जयकिशन (१९३२),
कोशकर्ते व इतिहासकार स. मा. गर्गे (२००५)

विनम्र अभिवादन

सच्चिदानंद हत्ती Wed, 05/11/2025 - 21:52

मी एक हलकल्लोळसिंग हत्ती. प्रचंड मोठा, महाकाय, कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

सच्चिदानंद हत्ती Mon, 10/11/2025 - 09:20

ख्रिस्ती धर्मसुधारक मार्टिन ल्यूथर (१४८३),स्वातंत्र्यचळवळीतील नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी (१८४८), 

 

विनम्र अभिवादन

 

सच्चिदानंद हत्ती Mon, 10/11/2025 - 09:22

शांततेसाठी आणि प्रगतीसाठी विज्ञान दिन. 

आज शांततेसाठी आणि प्रगतीसाठी विज्ञान दिन आहे. त्यानिमित्त सर्व ऐसीकरांना, विशेषतः शांततेसाठी आणि प्रगतीसाठी विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा.

या निमित्ताने शांततेसाठी आणि प्रगतीसाठी विज्ञानक्षेत्रात काम करणाऱ्या ऐसीकरांनी त्यांच्या क्षेत्राविषयी माहिती करून देणारा एखादा लेख लिहिल्यास ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही.

सच्चिदानंद हत्ती Mon, 10/11/2025 - 09:24

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : तुर्कस्तान. 
 

राष्ट्रीय दिन/स्वातंत्र्यदिनानिमित्त तुर्कस्तानच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.

सच्चिदानंद हत्ती Tue, 11/11/2025 - 16:00

हरियाणातील हिस्सारच्या हरचरणसिंग हुडाच्या हलकल्लोळसिंग हत्तीने हेक्टरभर हिरवे हरभरे हादडल्याने हसतमुख हरचरणसिंग हुडाही हादरला.

सच्चिदानंद हत्ती Wed, 12/11/2025 - 09:41

क्रांतिकारी सेनापती बापट (१८८०), 
पक्षीतज्ज्ञ सलीम अली (१८९६),
लेखक, सामाजिक कार्यकर्ते व समाजवादी नेते एस्. एम्. जोशी (१९०४),
बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक शिक्षणतज्ज्ञ पं. मदन मोहन मालवीय (१९४६),
सत्यशोधक पत्रकार व कार्यकर्ते केशवराव जेधे (१९५९),
समाजवादी नेते व संसदपटू मधू दंडवते (२००५)

विनम्र अभिवादन

 

सच्चिदानंद हत्ती Wed, 12/11/2025 - 09:44

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : अझरबैजान

राष्ट्रीय दिन/स्वातंत्र्यदिनानिमित्त अझरबैजानच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.

 

सच्चिदानंद हत्ती Wed, 12/11/2025 - 11:13

आज कोणताही विशेष दिन नसल्याने कोणत्याही क्षेत्रात, विशेषतः त्या क्षेत्रात कामाला असलेल्या ऐसीकरांना शुभेच्छा नाहीत. कोणत्याही क्षेत्रात कामाला असलेल्या ऐसीकरांना त्यांच्या क्षेत्राची ओळख करून देण्यासाठी लेख लिहायची विनंती नाही. मुळात लेखच लिहिला नाही तर मग तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करायचा प्रश्नच नाही.

सच्चिदानंद हत्ती Wed, 12/11/2025 - 11:14

मी एक सच्चिदानंद हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

सच्चिदानंद हत्ती Wed, 12/11/2025 - 11:24

मुंबईच्या मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या माजोरड्या मारकुट्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मतभेदांमुळे मारामारी मिरजच्या महापौरांच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मित्रमंडळींनी मिठाई मांडून मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

सच्चिदानंद हत्ती Wed, 12/11/2025 - 20:52

In reply to by सच्चिदानंद हत्ती

मुंबईच्या मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या माजोरड्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मारकुट्या मोराची मुंडी मुरागळण्यावरूनच्या मतभेदांवरील मारामारी मिरजच्या महापौरांच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मिरजेच्या महापौरांच्या मोहनमामाने मागविलेली मणभर मिठाई मित्रमंडळींनी मटा मटा मटकावून मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

सच्चिदानंद हत्ती Wed, 12/11/2025 - 21:49

In reply to by सच्चिदानंद हत्ती

मुंबईच्या मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या माजोरड्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मारकुट्या मानभावी मोराच्या मिसळपावरील मोठ्या मनाच्या मालकाचे मनगट मुरागळण्यावरूनच्या मतभेदांवरील मारामारी मिरजच्या महापौरांच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मिरजेच्या महापौरांच्या मोहन मामाने, मृणाली मामीने मुसळे मिष्टानमधून मागविलेली मणभर मिठाई मित्रमंडळींनी मटा मटा मटकावून मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

सच्चिदानंद हत्ती Fri, 14/11/2025 - 13:53

In reply to by सच्चिदानंद हत्ती

मादागास्करच्या मारकुट्या मानभावी मोराच्या मिसळपावरील मोठ्या मनाच्या मालकाचे मनगट मुरागळण्यावरूनच्या मुंबईच्या मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या माजोरड्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मतभेदांवरील मारामारी मिरजचे महापौर मनोज माधव मराठेंच्या मोहनमामाच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मधल्या मंगळवारी मध्यान्हीनंतर मृणाली मामीने मुसळे मिष्टानमधून मागविलेली मणभर मिठाई मित्रमंडळींनी मटा मटा मटकावून मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

सच्चिदानंद हत्ती Sun, 16/11/2025 - 13:15

In reply to by सच्चिदानंद हत्ती

मादागास्करच्या मारकुट्या मानभावी मठ्ठ मोराच्या मिसळपावरील मोठ्या मनाच्या मालकाचे मनगट मुरागळण्यावरूनच्या मुंबईच्या मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या माजोरड्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मतभेदांवरील मारामारी मिरजचे महापौर मनोज माधव मराठेंच्या मोहनमामाच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मे महिन्यातील मधल्या मंगळवारी मध्यान्हीनंतर मृणाली मामीने मदुराईतील मुसळे मिष्टानमधून मागविलेली मणभर मिठाई मित्रमंडळींनी मटा मटा मटकावून मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

सच्चिदानंद हत्ती Thu, 27/11/2025 - 18:50

In reply to by सच्चिदानंद हत्ती

मादागास्करच्या मारकुट्या मानभावी मठ्ठ मोराच्या मिसळपावरील मोठ्या मनाच्या मालकाच्या मामेभावाच्या मावसभावाचे मनगट मुरागळण्यावरूनच्या मुंबईच्या मनोज मधुकर मिराशी, मलकापूरच्या माजोरड्या मिशिवाल्या मनोहर मधुसुदन मोरे मधील मतभेदांवरील मारामारी मुळचे महाबळेश्वरचे, मिरजचे महापौर मनोज माधव मराठेंच्या मोहनमामाच्या मध्यस्थीमुळे मिटल्यानंतर महिन्याभराने मे महिन्यातील मधल्या मंगळवारी मध्यान्हीनंतर मुळच्या मनमाडच्या मृणाली मामीने, मुळच्या महाडच्या मधुरा मावशीने मालवण मधील मुसळे मिष्टानमधून मागविलेली मणभर मिठाई मित्रमंडळींनी मटा मटा मटकावून मोकाशी मंगलकार्यालयात मंगल मिलनाचा महोत्सव मानला.

सच्चिदानंद हत्ती Wed, 12/11/2025 - 13:47

हा हत्तीखान्यावरील २३ वा मेसेज आणि हत्ती परिवारातील सदस्यांचा २० वा. पूर्वी खरडफळा असताना आम्हाला उगीच बदनाम केले होते की हत्ती उगीच जास्त खरडी करतात. इथे हत्तीखान्यावर २३ पोस्ट होत असताना खरडफळ्यावर ९३ पोस्ट झाल्या आहेत. त्यातूनच लक्षात येईल की हत्तींनी इतरांना त्रास व्हावा असे काहीही केले नव्हते.

देशात गांधी परिवाराने आणि ऐसीवर हत्ती परिवाराने खूप काही केले आहे. गांधी परिवाराचे दोन सदस्य देशासाठी धारातीर्थी पडले तसे हत्ती परिवाराच्या दोन सदस्यांनी ऐसीसाठी आपल्या खात्याचे बलिदान केले - माझा मामा आणि मामेभाऊ.

सच्चिदानंद हत्ती Thu, 13/11/2025 - 16:35

जागतिक कनवाळूपणा दिवस.

आज जागतिक कनवाळूपणा दिवस आहे. त्यानिमित्त सर्व ऐसीकरांना, विशेषतः कनवाळू ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा.

या निमित्ताने कनवाळू ऐसीकरांनी कनवाळूपणाची माहिती करून देणारा एखादा लेख लिहिल्यास ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही.

सई केसकर Thu, 13/11/2025 - 19:27

In reply to by सच्चिदानंद हत्ती

जगात चांगुलपणाला काही किंमत नसते हत्ती. तुम्ही चांगले आणि कनवाळू आहात म्हणजे तुम्ही बावळट आहात असं गृहीत धरलं जातं.

'न'वी बाजू Thu, 13/11/2025 - 19:49

In reply to by सई केसकर

हत्ती (१) चांगले आणि/किंवा (२) कनवाळू आहेत, या गृहीतकास आधार काय?

(हत्तींबद्दल ठाऊक नाही, परंतु, त्यांच्यावर हा असला बिनबुडाचा आरोप निदान मी तरी सहन करणार नाही.)

सच्चिदानंद हत्ती Thu, 13/11/2025 - 20:29

In reply to by 'न'वी बाजू

तुम्ही चांगले असे सईताईंनी आम्हा हत्तींना उद्देशून नव्हे तर सर्वच चांगल्या लोकांना उद्देशून म्हटले असावे.

तसेही आम्ही चांगले नाही असे अजिबात नाही. हा मधून मधून कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडवत असलो म्हणून काय झालं? (आमचे बाबा आहेत ना ते खूप शक्तिमान आहेत - पोट पुढे असलं म्हणून काय झालं या धर्तीवर वाचावे).

सच्चिदानंद हत्ती Thu, 13/11/2025 - 20:31

In reply to by सई केसकर

जगात चांगुलपणाला काही किंमत नसते हत्ती

पटले. म्हणूनच आम्हा हत्तींना अशी वर्तणूक सगळीकडे दिली जाते.

सच्चिदानंद हत्ती Sat, 15/11/2025 - 10:55

काल बिहारमध्ये नितीश कुमारांनी मोठे यश मिळवले त्याबद्दल समस्त हत्ती परिवाराकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन. नितीश कुमार हे नाव जरी उच्चारले तरी बहुतेक लोकांच्या डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते.

नितीश कुमार यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाची तुलना हत्तीशी करणे अनेक अर्थांनी योग्य वाटते. हत्ती हा स्थिर, संयमी आणि दीर्घकालीन विचार करणारा प्राणी मानला जातो. त्याचे पाऊल जरी जड असले तरी ते विचारपूर्वक टाकले जाते — हा गुण नितीश कुमार यांच्या राजकारणात नेहमीच दिसतो. ते कोणताही निर्णय घाईघाईत घेत नाहीत; परिस्थितीचे सर्व बाजूंनी परीक्षण करूनच पुढचे पाऊल टाकतात.

हत्तीप्रमाणेच त्यांच्यात मोठा सहनशीलपणा आहे. बिहारच्या गुंतागुंतीच्या सामाजिक-राजकीय वातावरणात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले, परंतु स्वतःची शांतता आणि संतुलन जपले. हत्तीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याची स्मरणशक्ती आणि दीर्घ अनुभवावर आधारित वागण्याची पद्धत. नितीश कुमार यांचे तीन दशके ओलांडणारे सार्वजनिक जीवन हे याच गुणांचे प्रतीक आहे.

हत्तीच्या नेतृत्वात एक दिमाख असतो; तो गर्जना करत नाही, पण त्याची उपस्थिती पुरेशी प्रभावशाली असते. नितीश कुमार यांची राजकीय शैलीही तशीच—निखळ, अलंकाररहित, पण परिणामकारक. त्यामुळे “हत्ती” ही उपमा त्यांच्या नेतृत्वातील स्थैर्य, संयम आणि प्रगल्भतेचे उत्तम रूपक ठरते.

सच्चिदानंद हत्ती Sun, 16/11/2025 - 11:59

अभिनेता डॉ. श्रीराम लागू (१९२७),
संगीतकार रोशन लाल (१९६७),

विनम्र अभिवादन

सच्चिदानंद हत्ती Sun, 16/11/2025 - 13:12

जागतिक सहिष्णुता दिन

जागतिक सहिष्णुता दिनाच्या सर्वांना, विशेषतः सहिष्णु ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने सहिष्णु ऐसीकरांनी सहिष्णुतेवर एखादा लेख लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही.

राष्ट्रीय प्रसारमाध्यम दिन

राष्ट्रीय प्रसारमाध्यम दिनाच्या सर्वांना, विशेषतः राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी कोणत्याही प्रकारे संबंधित असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी कोणत्याही प्रकारे संबंधित असलेल्या ऐसीकरांनी राष्ट्रीय प्रसारमाध्यमांवर एखादा लेख लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही.

सच्चिदानंद हत्ती Sun, 16/11/2025 - 21:23

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन – इस्टोनिआ

राष्ट्रीय दिन/स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्टोनिआच्या लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने तो लेख म्हणजे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा अशी आग्रहाची विनंती.

सच्चिदानंद हत्ती Sun, 16/11/2025 - 21:32

वर्धापनदिन : युनेस्को (१९४५)

वर्धापनदिनानिमित्त युनेस्कोशी संबंधित सगळ्यांना, विशेषतः युनेस्कोत नोकरीला असलेल्या ऐसीकरांना शुभेच्छा. या निमित्ताने युनेस्कोत नोकरीला असलेल्या ऐसीकरांनी त्या संस्थेविषयी आणि त्या संस्थेच्या कामकाजाविषयी एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एकदम महत्वाचे पाऊल ठरेल याविषयी अजिबात शंका नाही.

 

सच्चिदानंद हत्ती Sun, 16/11/2025 - 22:58

मी एक सच्चिदानंद हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

सच्चिदानंद हत्ती Mon, 17/11/2025 - 13:21

अभिनेत्री शोभना समर्थ (१९१६),
लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी (१९३८),
'पंजाब केसरी' लाला लजपतराय (१९२८)

विनम्र अभिवादन

सच्चिदानंद हत्ती Mon, 17/11/2025 - 22:43

आज शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरेंचा १३ वा स्मृतीदिन. बाळ ठाकरे हे नाव उच्चारले तरी सगळ्यांच्या मनात नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते.

बाळ ठाकरे आणि हत्ती यांची तुलना करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही वैशिष्ट्ये लक्षात येतात. हत्ती हा सामर्थ्य, स्थिरता आणि शांत ताकदीचे प्रतीक मानला जातो. बाळ ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्वही काही अंशी असेच होते—दृढ भूमिका, ठाम विचार आणि नेतृत्वाची भक्कम शैली. हत्ती जसा आपल्या कळपाचे रक्षण करतो, तसा ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांबद्दल दृढ निष्ठा आणि संरक्षणाची भावना ठेवत. हत्तीचे अस्तित्व जंगलात कणखर आणि प्रभावी असते; त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ठाकरे यांची उपस्थिती प्रभावी आणि ठळक होती. हत्तीचा स्वभाव शांत असला तरी गरज पडल्यास तो धीराने पण ठामपणे उभा राहतो—हे गुण ठाकरे यांच्या वक्तृत्वात आणि निर्णयक्षमतेत दिसत. दोघांच्या प्रतिमेत सामर्थ्य आणि नेतृत्वाची एकसमान छटा आढळते, जी लोकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे.

सच्चिदानंद हत्ती Sun, 23/11/2025 - 14:01

मी एक सच्चिदानंद हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

सच्चिदानंद हत्ती Sun, 23/11/2025 - 14:02

यापुढे आयुष्यभर कधीही कोणालाही पायदळी तुडविणारा हा उल्लेख वाचायला मिळाला तर हत्ती परीवाराची आठवण होणार ही खात्री आहे.

सई केसकर Thu, 27/11/2025 - 21:35

हत्तीखाना वाचलं की मला
(ट्रिगर वॉर्निंग: चांगल्या घरच्या हत्तींने बघू नये. त्यांच्या मनावर वाईट परिणाम.होऊ शकतात)
https://youtu.be/FzQCWPRlWqs?si=3B2m5As3O76-ycfj
हे गाणं आठवतं. आमच्या तरुणपणी आलं होतं. यातला हिरो विनोद खन्नाचा नॉनअक्षय मुलगा. आणि हिरविण लिसा रे.