नास्तिकतेच्या पलीकडे
आस्तिकता-नास्तिकता या नेहमीच्या विचारव्यूहापलीकडे जाऊन स्वतः उन्नत होत समाजपरिवर्तनाच्या मूल्यांशी कसे जोडून घ्यावे याबद्दल केलेले मुक्तचिंतन.
- Read more about नास्तिकतेच्या पलीकडे
- Log in or register to post comments
- 18 views
"मुखवट्यांच्या मागे हरवलेली माणसं"
जगात जगण्यासाठी आपल्याला मुखवटा घालावाच लागतो. हा मुखवटा म्हणजे फसवणूक नाही, तर एक सामाजिक गरज आहे. मुखवटा आत्मसंरक्षणाची कवच-कुंडले आहेत. रंगमंचावर आणि सिनेमात काम करणारे कलाकार तर रोजच वेगवेगळे मुखवटे घालतात—कधी राजा, कधी भिकारी, कधी खलनायक, कधी देवता. पण हे मुखवटे केवळ अभिनयापुरते मर्यादित नाहीत. खऱ्या आयुष्यातही प्रत्येकजण मुखवटे घालून अभिनय करत असतो.
- Read more about "मुखवट्यांच्या मागे हरवलेली माणसं"
- Log in or register to post comments
- 22 views
जनकवी पी. सावळाराम : मराठी मनाच्या घराघरांत पोहोचलेला गीतकार
मराठी भावगीतांच्या विश्वात काही नावे अशी आहेत की ती केवळ साहित्याच्या इतिहासात नाही, तर लोकांच्या मनात, स्मृतीत आणि दैनंदिन भावविश्वात कायमची वसलेली आहेत. पी. सावळाराम हे असेच एक तेजस्वी नाव. त्यांचे मूळ नाव निवृत्तीनाथ रावजी पाटील. ते गीतकार, भावकवी, समाजशील व्यक्तिमत्त्व आणि ठाण्याच्या सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचे नाव होते. मराठी माणसाच्या आनंदात, विरहात, संसारात, आई-मुलीच्या नात्यात, भक्तीत आणि जीवनातील कोमल भावनांत त्यांच्या गीतांनी एक वेगळाच स्पर्श दिला. कुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ म्हणून गौरविले, ही गोष्ट त्यांच्या कवितेच्या लोकमान्यतेची मोठी साक्ष आहे.
- Read more about जनकवी पी. सावळाराम : मराठी मनाच्या घराघरांत पोहोचलेला गीतकार
- Log in or register to post comments
- 24 views
दिवाळी अंक आवाहन
दिवाळी अंकासाठी आवाहन - उजव्यांच्या उजवेपणाचे आयाम
- Read more about दिवाळी अंक आवाहन
- 91 views
नसरापूरच्या निमित्ताने...
नसरापूरच्या निमित्ताने...
-राजीव उपाध्ये
माझ्या लायब्ररीमध्ये तारा कौशल यांचे *Why Men Rape: An Indian Undercover Investigation* हे पुस्तक बरेच दिवस अर्धवट वाचून पडले होते. ते नुकत्याच घडलेल्या अक्षम्य घटनेच्या निमित्ताने परत उघडावेसे वाटले.
- Read more about नसरापूरच्या निमित्ताने...
- 2 comments
- Log in or register to post comments
- 130 views
इदम् न मम
"विशेषणे ना वापरता
कविता येईल का लिहिता?"
मी त्याला हे विचारता
"प्रयत्न करतो," तो वदला!
"छंद, वृत्त , लय, गेयता
फाट्यावर मारून; कविता
येईल का तुजला लिहिता?"
मी त्याला हे विचारता
"प्रयत्न करतो", तो वदला!
"हद्दपार कवी कायमचा
करून मग कोणा कविता
येईल का सांगा लिहिता?"
मी त्याला हे विचारता
जरा थांबला, घुटमळला
"कवितेतच उत्तर देतो
मीच विचारून प्रश्न मला"..
..AI AIसे पुटपुटला
...नवे काव्य आऊटपुटला !
- Read more about इदम् न मम
- Log in or register to post comments
- 37 views
हास्याचे व्रतस्थ साधक : वि. आ. बुवा जन्मशताब्दीनिमित्त
मराठी साहित्यात विनोदाला एक खास परंपरा आहे. हा विनोद केवळ हसवणारा नसतो; तो माणसाच्या स्वभावातील विसंगती दाखवतो, समाजातील ढोंगावर हलकेच बोट ठेवतो आणि जगण्यातील ताण हलका करतो. अशा या मराठी विनोदी साहित्यपरंपरेत वि. आ. बुवा हे नाव आदराने घेतले जाते. विनायक आदिनाथ बुवा या पूर्ण नावाने जन्मलेले हे लेखक “वि. आ. बुवा” म्हणून वाचकांच्या मनात कायमचे घर करून राहिले. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या साहित्याची, विनोददृष्टीची आणि मराठी वाचकांना दिलेल्या आनंदाची आठवण करणे म्हणजे एका निखळ, निर्मळ आणि कल्पक लेखकाला अभिवादन करणे होय.
- Read more about हास्याचे व्रतस्थ साधक : वि. आ. बुवा जन्मशताब्दीनिमित्त
- 2 comments
- Log in or register to post comments
- 76 views
वेश्याव्यवसाय - पुस्तक परिचय
वेश्याव्यवसाय
मध्यंतरी अमृता फडणवीस यांनी एक सनसनाटी विधान केले. माध्यमांनी त्याला चटपटीत प्रसिद्धी ही दिली होती.
- Read more about वेश्याव्यवसाय - पुस्तक परिचय
- 16 comments
- Log in or register to post comments
- 360 views
ऐतिहासिक कादंबरीकार कॅ. वासुदेव श्री. बेलवलकर
मराठी साहित्यात ऐतिहासिक कादंबरी हा प्रकार विशेष आदराने पाहिला जातो. कारण अशा कादंबरीत केवळ घटना सांगणे पुरेसे नसते; त्या घटनांच्या मागचे राजकारण, समाजजीवन, माणसांचे स्वभाव, युद्धांची धग, पराभवातील वेदना आणि विजयातील उन्मेष हे सारे जिवंत करावे लागते. या कठीण साहित्यप्रकारात आपली स्वतंत्र मुद्रा उमटवणाऱ्या लेखकांमध्ये कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे नाव आदराने घ्यावे लागते. इतिहासाकडे केवळ तारखा, लढाया आणि वंशावळी म्हणून न पाहता, तो रक्तमांसाच्या माणसांनी घडवलेला जिवंत प्रवाह आहे, अशी जाणीव त्यांच्या लेखनातून ठळकपणे जाणवते.
- Read more about ऐतिहासिक कादंबरीकार कॅ. वासुदेव श्री. बेलवलकर
- Log in or register to post comments
- 40 views
सरसकटीकरणाचे अभंग
अलिप्त, स्वमग्न | ऐसी ज्यांची ख्याती
पडीक असती | ऐ x वर ||१||
कुटुंबवत्सल | मनाने मोकळे
म म व लोटले | मा x वरी ||२||
उर्वरित गुण- | -दोषांनी भरले
तयांनी गाठले | मिx त्वरे ||३||
नेमका पर्याय | पा/सी/बो मधून
घाला निवडून | फुल्ली साठी ||४||
आता तुम्ही सांगा | संस्थळ कोणते
तुम्हा आवडते ? | लाजू नका ! ||५||
- Read more about सरसकटीकरणाचे अभंग
- 1 comment
- Log in or register to post comments
- 96 views