पिंपळपान
चाळत असता वही शाळकरी
अवचित दिसले पिंपळपान
आठवणींच्या धबधब्यात मग
भवतालाचे कुठले भान
आठवणी काही धूसरश्या
काही जिव्हारी रुतलेल्या
अर्थ उमगण्या आधी काही
कापूर होऊनी उडलेल्या
पिंपळपानाच्या जाळीतून
काळ निसटला, तरी जेव्हा
वही चाळली शाळेमधली
मला भेटलो मीच नवा
- Read more about पिंपळपान
- Log in or register to post comments
- 67 views
५वे जनरेशन वॉर, बॉट नेटवर्क्स आणि नोएडा हिंसाचार
भारत जसजसा आर्थिक आणि सामरिक महाशक्ती बनत आहे, तसतसा प्रस्थापित महाशक्तींना हे सहन होणे कठीण होत आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी आता थेट युद्धाऐवजी 'फिफ्थ जनरेशन वॉरफेअर' (5GW), म्हणजेच डिजिटल, मनोवैज्ञानिक आणि सामाजिक युद्धाचा वापर सुरू झाला आहे. हे युद्ध रणभूमीवर नाही, तर मानवी मनाच्या स्क्रीनवर लढले जाते.
- Read more about ५वे जनरेशन वॉर, बॉट नेटवर्क्स आणि नोएडा हिंसाचार
- 19 comments
- Log in or register to post comments
- 600 views
कल्परिक्षा
"मॅडम, मधे बसलात तर वारा लागणार नाही. साईडला बसा."
"बरं, थॅंक्स."
(थोड्या वेळाने)
"रिक्षा जरा फास्ट चालवाल का दादा?"
"नाही हो; इतर रिक्षांपेक्षा आपली रिक्षा हळू जाते."
"काय हो? इंजिनात काही बिघाड?"
"नाही नाही. वजन जास्त आहे. म्हणजे, बलास्ट लावलेत, त्यामुळे."
"बलास्ट?"
"हो. जहाजात गुरूत्वमध्य फार उंचावर असला तर जहाज कलू शकतं, बुडू शकतं. तसं होऊ नये म्हणून जहाजाच्या खालच्या भागात पाणी भरतात. तसंच, जहाजाच्या होल्डच्या एका भागात कार्गो भरतात तेव्हा वजनाचा समतोल रहावा म्हणून दुसर्या भागातल्या बलास्ट टँकमध्ये पाणी भरतात."
- Read more about कल्परिक्षा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 128 views
फाउंटन
"फाउंटनला कोणती बस जाते?"
"बावीस नंबर. म्हणजे बसवर बावीस ही संख्या लिहिली असेल ती. आतापासून येणारी बावीसावी बस नव्हे. हु हु हु"
"हा हा हा. उत्तम विनोद होता."
"धन्यवाद. पण बसवर हुतात्मा चौक लिहिलं असेल - आता फ्लोरा फाउंटन म्हणत नाहीत त्या जागेला."
"अहो पण मी तिथे जातच नाहीये."
"तुम्हीच विचारलंत ना - फाउंटनला कोणती बस जाते?"
"हो, पण फ्लोरा फाउंटन नाही."
"मग?"
"फाॅना फाउंटन!"
"म्हणजे?"
"फ्लोरा म्हणजे वनस्पतीजगत. फाॅना म्हणजे प्राणीजगत. फाॅना फाउंटनजवळ विविध प्रजातींचे प्राणी आढळतात, म्हणून फाॅना फाउंटन."
"खरंच?"
- Read more about फाउंटन
- 12 comments
- Log in or register to post comments
- 480 views
स्टंट डबल
"काय भेंजो, काल होतास कुठे? फोनपण उचलत नव्हतास!"
"अरे शूटला गेलो होतो."
"म्हणजे जिम कॉर्बेटसारखं? कसली शिकार केलीस? नरभक्षक बिबळ्याची?"
"गप भेंजो. वेब सिरीजच्या शूटला. निकिताला कंपनी द्यायला म्हणून."
"निकिता वेब सिरीजमधे काम करतेय? म्हणजे, ती फोटोजेनिक वगैरे आहे, पण शाळेत गॅदरिंगच्या नाटकातही कधी नसायची."
"निकिता नाही रे. पॅराबोला काम करतोय."
"म्हणजे निकिताचा डाॅगी? त्याला ॲक्टींग येते?"
"ल्हासा ॲप्सो हवा होता त्यांना. ज्यां पाॅलनी मला फोन केला होता. मग पॅराबोला घरचाच आहे. म्हणजे, घरचाच होईल ना.."
- Read more about स्टंट डबल
- 6 comments
- Log in or register to post comments
- 234 views
ए०आय० आणि देशाचे भविष्य
ए०आय० आणि देशाचे भविष्य
===================
-राजीव उपाध्ये
काल माझ्या एका वृत्तपत्र संपादकांबरोबर फोनवर ए०आय० वर प्रदीर्घ गप्पा झाल्या. ए०आय० ने नोकर्यावर आणलेल्या संक्रातीमुळे ते पण हादरलेले वाटले. नोकर्यांच्या समस्येवर आणि त्या अनुषंगाने "मानवी श्रमप्रतिष्ठा" या वर आज थोडा (मार्केट बंद असल्यामुळे) विचार करायला वेळ मिळाला. या समस्या सोडवता येण्यासाठी अधिक खोलवर असलेले प्रश्न तपासून घेता आले पाहिजेत.
- Read more about ए०आय० आणि देशाचे भविष्य
- 11 comments
- Log in or register to post comments
- 318 views
डिजिटल मधुमेह - एक व्यवहार्य कल्पना?
डिजिटल मधुमेह - एक व्यवहार्य कल्पना?
-राजीव उपाध्ये
माझ्या मधुमेह आणि मेंदूच्या सडण्याच्या धाग्यावर समारोपाच्या प्रतिसादावर श्री० नवी बाजू यांचा प्रतिसाद फारच रोचक वाटला. त्यांना न्याय देणं ही अर्थातच माझी नैतिक जबाबदारी ठरते. यावर विचार करताना असे लक्षात आले की ए०आय०ला मधुमेह झाला तर त्याला "डिजिटल डायबिटीस" असे म्हणावे लागेल.
अलिकडेच स्टॅनफर्डमध्ये एक विलक्षण परिषद झाली. त्यात ए०आय० ने लिहीलेले ४५ पेपर्स ए०आय० परिक्षकांकडून परिषदेमध्ये ’राजरोस’ स्वीकारले गेले.
- Read more about डिजिटल मधुमेह - एक व्यवहार्य कल्पना?
- 4 comments
- Log in or register to post comments
- 85 views
परीस
दऱ्या खोऱ्यांनी धाडला
काल हिरवा सांगावा
आता गर्दीच्या पुरात
जीव कसा रमवावा
हिर्व्या सांगाव्याची भाषा
ओढे सुसाट बोलती
बिजलीच्या मशालीत
रानवाटा उजळती
ढग एकटा चुकार
बघ ओथंबून आला
धरणीला चुंबताना
त्याचा तोल पार गेला
बेड्या अभेद्य पायात
विसरण्या दोन दीस
जिंदगीच्या लोखंडाला
लावू हिरवा परीस
- Read more about परीस
- 1 comment
- Log in or register to post comments
- 32 views
तुमचा मेंदू सडत आहे का?
तुमचा मेंदू सडत आहे का?
=================
-राजीव उपाध्ये मे (२०२५)
सरन्यायाधीशांनी नुकत्याच केलेल्या काही टिप्पण्यामुळे विशिष्ट वर्ग दुखावला गेला आणि बरीच धूळ उडाली. त्यात सरन्यायाधीश पदावर बसलेली किती ताणात असते याबद्दल कुणीही संवेदनशीलता दाखवल्याचे दिसले नाही. ती क्वचित चुकू शकते याचे भान निर्माण व्हायला जीवशास्त्राचे बेसिक ज्ञान आणि वेगळीच परिपक्वता असावी लागते.
- Read more about तुमचा मेंदू सडत आहे का?
- 41 comments
- Log in or register to post comments
- 328 views
पेपरफुटीच्या निमित्ताने
पेपरफुटी ही प्रश्नपत्रिकेची चोरी नाही; ती समाजाच्या विवेकाची गळती आहे.
- Read more about पेपरफुटीच्या निमित्ताने
- 5 comments
- Log in or register to post comments
- 75 views