Skip to main content

नारळीकर स्मृतीदिन

नारळीकर गेल्याची बातमी समजली आणि एकदमच आपल्या जवळचं कोणीतरी गेले अशी भावना झाली. प्रत्यक्षात त्यांना मी कधीच भेटलो नाही. त्यांचं कोणतेही व्याख्यान मी ऐकले नाही. केवळ त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून, त्यांच्या मुलाखतीतून आणि त्यांनी आजवरच्या केलेल्या कामातून ते भेटत राहीले. सर्वसाधारणपणे शालेय जीवनात उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत पुस्तके वाचली पाहिजेत असा अघोषित नियम असतो. काही पाळतात काही पाळत नाहीत. नारळीकर भेटले पहिल्यांदा यक्षाची देणगी, वामन परतोनि न आला, प्रेषित आणि अंतराळीतील भस्मासूर वगैरे पुस्तकातून. नंतर आकाशाशी जडले नाते या पुस्तकामुळे तर विज्ञानाची गोडी अनेक पटीने वाढली.

आय.आय.टी. मद्रास : चार वर्षांचा प्रवास

मेसचं जेवण, परीक्षा आणि कॅम्पसमधली माकडं! एका पालकाच्या नजरेतून जाणून घ्या कसं असतं IIT Madrasमधलं आयुष्य.

'नीट'चा फज्जा - डॉ. हृषिकेश रांगणेकर

यंत्रणेचा गलथानपणा, पेपरफुटी आणि नियोजनाचा अभाव यामुळे वैद्यकीय प्रवेशाची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा झालेला खेळ.

अभिनंदन!

पंतप्रधान मोदींचे धाडसी निर्णयांबद्दल अभिनंदन!

आज मोदींनी सोन्याच्या खरेदीबद्दल केलेले आवाहन वाचल्यानंतर मला समाजमाध्यमांवर वेड्यात काढणार्‍या "मंदबुद्धी" लोकांची आठवण येते. खरं तर हा निर्णय या अगोदर घेतला असता, तर त्याचे अधिक फायदे या पूर्वीच मिळाले असते. पण उशीरा शहाणपण येण्याच्या आपल्या "सनातनी" परंपरेबद्दल बोलावे तितके थोडेच ठरेल...

आता मला आणखी वेड्यात काढण्यासाठी एक मुद्दा...

आंतरराष्ट्रीय सूर्य दिन : प्रकाश, ऊर्जा आणि शाश्वत भविष्याचा उत्सव

आंतरराष्ट्रीय सूर्य दिन : प्रकाश, ऊर्जा आणि शाश्वत भविष्याचा उत्सव

आकाशात रोज उगवणारा सूर्य आपल्याला इतका परिचित आहे की त्याचे महत्त्व अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. पहाटेचा पहिला प्रकाश, दुपारचे तेज, संध्याकाळची सोनेरी किनार आणि रात्रीच्या आधीचा शांत उतार — या सगळ्या दृश्यांमागे सूर्याचा अखंड स्पर्श आहे. पृथ्वीवरील जीवन, ऋतूचक्र, अन्ननिर्मिती, पाणीचक्र, हवामान, मानवी आरोग्य आणि आजच्या काळातील स्वच्छ ऊर्जा — या सर्वांचा केंद्रबिंदू सूर्य आहे. याच जाणीवेचा जागतिक स्तरावर सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सूर्य दिन साजरा केला जातो.

शालेय प्रयोग: एक्झिट पोल चुकतात का?

आजकाल पहाटे फिरायला गेल्यावर पार्कमध्ये आमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींची मैफिल जमते. बंगाल निवडणुकीच्या सर्वेक्षणावर चर्चा होत असताना सर्वांचे एकमत झाले — बहुतांश एक्जिट पोल चुकतात. आमच्यातले एकजण शाळेत शिक्षक होते. ते म्हणाले, "एक्जिट पोल का चुकतात, यावर मी एकदा वर्गात प्रयोग केला होता." हरियाणा निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलच्या अंदाजाविपरीत लागले होते, तेव्हा विद्यार्थ्यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. शिक्षकांनी प्रात्यक्षिक दाखवायचे ठरवले.

एक फसलेली टूलकिट

फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एखाद्या व्यक्तीच्या प्रचारासाठी किंवा एखाद्या प्रकल्पाच्या विरोधात 'टूलकिट'चा वापर केला जातो, हे सर्वश्रुत आहे. अनेक बनावट आयडींद्वारे त्या व्यक्तीचा प्रचार केला जातो आणि त्या पोस्ट कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. निश्चितच या पोस्ट प्रायोजित असतात, अन्यथा आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या पोस्ट आपल्या अनुयायांपर्यंतही नीट पोहोचत नाहीत, मग कोट्यवधींपर्यंत पोहोचणे तर दूरच...

पश्चिम बंगाल निवडणूक २०२६

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ९२ टक्क्यांहून अधिक झालेले मतदान हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. २०२१ च्या निवडणुकांमध्ये हाच आकडा ८२ टक्के होता. त्यामुळे यंदा झालेले मतदान हे ऐतिहासिक आणि बंपर मानले जात आहे.