Skip to main content

स्मार्ट मिटर समस्या - एक उपाय

श्री० नरेन्द्र मोदी
पंतप्रधान
भारतीय संघराज्य

स०न०वि०वि०

देशात सध्या अनेक मुद्द्यांवरून देशवासीयांचा उद्रेक बघायला मिळत आहे. त्यातल्या स्मार्ट मिटर वरून होणार्‍या उद्रेकामुळे मी एक सामान्य नागरिक म्हणून मी चिंतित आहे.

स्मार्ट मिटरच्या संस्थापनाचा (इन्स्टॉलेशन) कार्यक्रम जर स्मार्टपणे राबवला गेला असता तर आज असा उद्रेक बघायला मिळाला नसता.

पण आज देशात राजकारण्यांना कल्पक लोकांना नामोहरम आणि नाउमेद करण्यात धन्यता वाटत असल्याने देशापुढचे प्रश्न हाताबाहेर गेले आहेत.

भ्रम, भरकटणे आणि मेंदूची लवचिकता

भ्रम, भरकटणे आणि मेंदूची लवचिकता
=========================

-राजीव उपाध्ये

बरेच दिवस माझ्या टेबलवर ब्यू लोट्टो या चेताशास्त्रज्ञाचे "डेव्हिएट" (Deviate- भरकटणे) हे पुस्तक पडले आहे. चेताविज्ञान, त्यातही सर्जनशीलतेचे चेताविज्ञान, मेंदूची लवचिकता हे माझ्या जिव्हाळ्याचे विषय असल्याने, तसेच आज सकाळचा चहा पिताना काहीतरी विचारांच्या नादात हे पुस्तक अत्यंत ॲबरप्टली उघडले तेव्हा पृ० १३३ वर पुढील मजकूर दिसला -

दास डोंगरीचा..

दास डोंगरीचा जनां
सांगून कधीचा गेला,
"दिसामाजी काही तरी
जन हो लिहीत चला,"

जन हो वाचत चला
प्रसंगी, नि अखंडित"
उपदेश मनोमनी
पटे, गेलो मी वाचत

काही बाही वाचलेले
अवचित सुचलेले
लिहिण्याच्या आळसाने
सालो-साल साचलेले

असा सगळा मामला
म्हटले लिहीन चला
सुदैवाने सो मि तेव्हा
आयुष्यात उगवला

कायप्पाच्या विद्यापीठी
एकनिष्ठ मी स्नातक
छद्मविज्ञानाचा भोक्ता
ध्येय माझे: फेकाफेक

फॉरवर्ड चा वक्र बाण
माझ्या भात्यामध्ये आला
मग स्वतः लिहिण्याच्या
बेत ढगांमध्ये गेला

समाजाप्रती कर्तव्य, वैयक्तिक क्षमता आणि भारतीय राज्यघटना : एक चिंतन

समाजाप्रती कर्तव्य, वैयक्तिक क्षमता आणि भारतीय राज्यघटना : एक चिंतन

=================================================

-राजीव उपाध्ये

टीप : सदर निबंध कमीत कमी ३ वेगवेगळ्या ए०आय० च्या मदतीने केलेल्या सखोल चिंतनाचे हाय एफर्ट संकलन आहे. हा केवळ प्रॉम्प्ट देऊन लिहून घेतलेला लेख नाही. त्यामुळे त्याचा लेखक/कर्ता म्हणून माझे नाव लावत आहे. त्यावर मुद्देसुद आक्षेप/उत्तरांची दखल नक्कीच घेतली जाईल. असंबद्ध आणि विस्कळीत भाषेतील प्रतिसादांचा अर्थ लावणे कष्टदायक असल्याने विचारता घेता येणार नाहीत.

सत्त्वपरीक्षा

सत्त्वपरीक्षा
========

-राजीव उपाध्ये (June 10, 2023)

(टीप - हे ३ वर्षांपूर्वीचे लिखाण आज फेसबुकने वर काढले. )

आयुष्यात सहनशीलतेची परीक्षा घेणारे प्रसंग तुम्ही कसे हाताळता? अशा प्रसंगात आपले कोण आणि परके कोण हे मात्र नक्की समजतात.

जनगणनेची विश्वासार्हता

जनगणनेची विश्वासार्हता
============
राजीव उपाध्ये

जनगणनेच्यासाठी माझ्याकडे एक बाई येऊन गेल्या. त्यांच्या कार्यपद्धतीने मला जनगणनेच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण झाली.

या अगोदर झालेल्या राज्यपातळीवरील एका जनगणनेच्या वेळी मला शंका उपस्थित झाली होती. तेव्हा त्या अधिकार्‍याने माझी कोर्‍या कागदावर माझी सही मागितली होती आणी त्याला मी नकार दिला होता. तसेच त्याने सिस्टीममध्ये काय माहिती भरली याची माझ्याकडे पोचपावती नसल्याने, त्याने माहिती भरताना चुका केल्या किंवा नाहीत हे कळायला काहीही मार्ग नाही.

‘जें शाश्वत त्याचा देंठ तुटे’ : 'द व्हॉइस ऑफ हिंद रजब’

ट्युनिशियन दिग्दर्शिका काओथर बेन हानिया यांचा ‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ सिनेमा काय असू शकतो याची नव्याने जाणीव करून देतो. हा चित्रपट नेहमीच्या मनोरंजक चित्रपटांसारखा नाही. तो तुम्हाला मन शांतवणारा विरंगुळा देत नाही, तुमचे दुःख विसरायला लावणारी समाधी मिळवून देत नाही आणि कोणतीही खोटी आशा दाखवत नाही.

खडा पावभाजी

"काय घेणार?

"इडली. तू?"

"मला भूक लागलीये. खडा पावभाजी घेतो."

"मला सांग भेंजो, बंड्यामामा भाजी कशी आणतात हाॅटेलसाठी?"

"म्हणजे?"

"अरे म्हणजे एरवी नाही. पण हल्ली मार्केटमधे भाजीवाल्यांना बसू देत नाहीयेत ना? पोलिसांचं का म्युन्सिपाल्टीचं कायतरी मॅटर झालं म्हणून?"

"ओह ओके. मामा थेट मंडईतनं टेंपो मागवतात. भाज्या फ्रीझरमधे टाकल्या की चार दिवस पुरतात."

"कळलं. पण मग जास्त भाज्या मागवून लोकांना का विकत नाहीत? पब्लिकलाही भाज्या मिळतील, आणि बंड्यामामांचाही प्राॅफिट वाढेल. वाटल्यास चारऐवजी दर दोन दिवसात टेंपो आणायचा."

ब्राह्मणीकरण!

ब्राह्मणीकरण!
=======

-राजीव उपाध्ये

आज माझ्या फेसबुक कालरेषेवर एक रोचक कहाणी अवतरली. तमाल नावाचा नावाचा एक गोरापान आणि पीळदार शरीरयष्टी लाभलेला एक युवक आपल्याला त्याची गोष्ट सांगतो.[१]

तो १६-१७ वर्षांपूर्वी इस्रायल मधून भारतात त्याच्या कुटुंबाबरोबर आला आणि एका वैदिक गुरुकुलामध्ये त्याच्या आईवडीलांनी त्याला ठेवले. त्याला ते वातावरण आवडले आणि त्याला त्याचे आईवडील तिथेच सोडतात.

मग तो तिथे वैदिक धर्माच्या कर्मकाण्डाचे शिक्षण घेतो - पूजापाठ होमहवन इ० (म्हणजे आपण ज्याला ’भिक्षुकी’ म्हणतो) ते सरव करतो.