राजकीय
भारताची "अग्नि"परिक्षा (भाग-१)
Taxonomy upgrade extras
भारताची "अग्नि"परिक्षा (भाग-१)
मूळ लेखक: रॉबर्ट काप्लान
स्वैर अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)
१९ एप्रिल रोजी भारताने लांब पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी करून सध्याच्या सुरक्षा परिषदेतील इतर सभासदांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या "पंक्ती"ला बसायचा सन्मान मिळविला! अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनविण्याची क्षमता फक्त पाचच राष्ट्रात आजपर्यंत होती: अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, आणि चीन. आता आपण सहावे असे राष्ट्र झालेलो आहोत. (शिवाय नेहमीप्रमाणे "इस्रायल" हे नांव कंसात असतेच, खरे-खोटे देव जाणे!)
परवा यशस्वी चांचणी केलेले प्रक्षेपणास्त्राला अग्नि-५ या नावाने ओळखले जाते! या आधी आग्नि-१ ते अग्नि-४ अशा संज्ञांच्या चार प्रक्षेपणास्त्रांची चांचणी करण्यात आलेली आहे. या सर्व प्रकारच्या प्रक्षेपणास्त्रांची थोडक्यात माहिती या लेखाच्या दुसर्या भागात तक्ता-१ मध्ये दिलेली असून विस्तृत माहितीसाठीचे दुवे तक्ता-२ खाली दिलेले आहेत.
- Read more about भारताची "अग्नि"परिक्षा (भाग-१)
- 9 comments
- Log in or register to post comments
- 4695 views
सत्यान्वेषक, व्हिसलब्लोअर्स, तेहेलका मचानेवाले आणि तत्सम
Taxonomy upgrade extras
आंतरजालाचा विस्तार जसजसा होत जातो आहे तसतसा ज्यांचं वर्णन "व्यवस्थेतील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार्या" असं करता येईल, अशा घटकांनी त्याचा वापर कसकसा केलेला आहे हे समजून घेण्याकरता या चर्चेचा प्रस्ताव मांडतो आहे.
हा विषय राजकीय दृष्ट्या बर्यापैकी निसरडा आहे याची मला जाणीव आहे. अमेरिकेसारख्या ठिकाणी, जिथे पोलिटिकल थिंकटँक्स, लॉबिंग वर करोडो डॉलर्स खर्च होतात, मोठमोठ्या उद्योजक, राजकारणी , आणि विविध स्वरूपाच्या संस्था यांची स्वताची प्रसिद्धी यंत्रणा असते त्या सर्वांचाच दावा आम्ही "सद् रक्षणाय, खल निग्रहणाय" आहे असा दावा असणार. जो न्याय अमेरिकेला लागू तोच सर्वत्र लागू आहे.
- Read more about सत्यान्वेषक, व्हिसलब्लोअर्स, तेहेलका मचानेवाले आणि तत्सम
- 10 comments
- Log in or register to post comments
- 3368 views
सॅम पित्रोडा नवे राष्ट्रपती?
Taxonomy upgrade extras
फोन ही हल्ली अन्न, वस्त्र, निवारा आणि विज यानंतरची पाचवी मुलभुत गरज बनली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुरध्वनी जर कुठे उपलब्ध असेल, तर तो भारतात असं म्हणतात. अवघ्या काही वर्षांपुर्वी मात्र हे असं मुळीच नव्हतं. आपल्यापैकी अनेकांना ट्रंक कॉल लावून तासनतास वाट बघत बसण्याचे दिवस चांगलेच आठवत असतील. ट्रींग ट्रींग करणारा काळा फोनही अनेकांच्या अगदी स्पष्ट स्मरणात असेल. तारेपासुन ते ब्रॉडबॅण्डपर्यंत दुरसंचार क्षेत्रात अगदी तासातासागणीक होणा-या या प्रगतीला सत्यनारायण गंगाराम पांचाल नावाचा एक माणुस जबाबदार आहे, असं सांगीतलं तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही.
- Read more about सॅम पित्रोडा नवे राष्ट्रपती?
- 13 comments
- Log in or register to post comments
- 2925 views
खिशाला चाट, भ्रष्टाचाराला वाट
Taxonomy upgrade extras
- Read more about खिशाला चाट, भ्रष्टाचाराला वाट
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3448 views
धर्मो रक्षति रक्षितः ?
Taxonomy upgrade extras
बिलासपूर एसपी राहुल शर्मा, आय पी एस यांनी १२ मार्च रोजी पोलीस मेस मध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीमध्ये राहुल शर्मा यांनी असे लिहिले होते -
I am just sick and tired of this life, such an interfering boss and arrogant judge of high court. They both have ruined my peace of mind. I choose death over disgrace and humiliation.
****
- Read more about धर्मो रक्षति रक्षितः ?
- 38 comments
- Log in or register to post comments
- 13675 views
माहितीचा अधिकार : तोंडओळख
Taxonomy upgrade extras
काही महिन्यांपूर्वी "स्टेट्समन्"च्या संपादकीयामधील एक लेख वाचला. पश्चिम बंगालच्या सरकारबद्दल भारताच्या "प्रमुख माहिती अधिकार्याने" काही गंभीर स्वरूपाची विधाने केली आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, या राज्यातील बाबूलोक लोकांना सहजासहजी माहिती देत नाहीत, शेकडो लोकांचे अर्ज महिनोन् महिने पडून आहेत , आणि हे सर्व बेकायदा आहे.
वाचा : http://www.thestatesman.net/page.news.php?clid=3&theme=&usrsess=1&id=200...
ही बातमी वाचताना जाणवले : "प्रमुख माहिती अधिकारी " म्हणजे कोण ? नक्की कशाबद्दलची विधाने आहेत ही ? तर , हा सगळा मामला आहे , "माहितीच्या अधिकारा"संदर्भात. (Right To Information Act)
- Read more about माहितीचा अधिकार : तोंडओळख
- Log in or register to post comments
- 2657 views
राजकीय कोलांटउड्या
Taxonomy upgrade extras
राजकीय कोलांटउड्या हा विषय आपल्या सर्वांना काही नवा नाही. योगायोगाची गोष्ट म्हणजे सुमारे पाचेक मिनिटाच्या अंतरावर दोन बातम्या वाचल्या ज्यामधे या पुनःपुन्हा आढळणार्या घटनांचं प्रत्यंतर यावं :
पहिली घटना आहे, अमेरिकेच्या रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारांपैकी रिक सँटोरम यांच्या बद्दलची. दुवा : http://www.huffingtonpost.com/2012/02/27/rick-santorum-church-state_n_1…
- Read more about राजकीय कोलांटउड्या
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5992 views
इंटरनेटवरच्या चर्चा करून आपण काय साधतो?
Taxonomy upgrade extras
खासगी आयुष्यात सरकारी हस्तक्षेप ? (http://www.aisiakshare.com/node/553) या धाग्यात प्रस्तुत विषयावर वेगळी चर्चा सुरु झाली ; त्याचा वेगळा धागा बनवण्यात येत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी इंटरनेटवरच्या अनेक चर्चा बघतो आणि मला प्रश्न पडतो की ज्याचा आपल्या आयुष्याशी यत्किंचितही संबंध नाही अशा विषयावर चर्चा करून आपण काय साधतो?
संजय
- Read more about इंटरनेटवरच्या चर्चा करून आपण काय साधतो?
- 41 comments
- Log in or register to post comments
- 15586 views
खासगी आयुष्यात सरकारी हस्तक्षेप?
Taxonomy upgrade extras
महाराष्ट्र टाईम्समधली ही बातमी वाचनात आली.
बातमीनुसार, ‘ गे सेक्स ’ ( पुरुषांमधील समलिंगी संबंध) वैध ठरविण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला केंद्रीय गृह मंत्रालयाने आज लेखी विरोध करण्यात आला. (हे मटाचं मराठी आहे. त्याबद्दल हवं तर वेगळी चर्चा करू.)
समलिंगी संबंध अनधिकृत असतात असं सरकारचं म्हणणं आहे. त्याशिवाय जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतातील नैतिक आणि सामाजिक मूल्ये वेगवेगळी आहेत, असंही गृहमंत्रालयाचं म्हणणं आहे. यासंदर्भात मला काही प्रश्न आहेत.
- Read more about खासगी आयुष्यात सरकारी हस्तक्षेप?
- 53 comments
- Log in or register to post comments
- 28357 views
अमेरिकन सैनिकांचे वाढते लैंगिक गुन्हे
Taxonomy upgrade extras
अमेरिकन सैनिकांनी केलेल्या लैंगिक गुन्ह्यांच्या संदर्भातली एक बातमी http://in.news.yahoo.com/violent-sex-crimes-u-army-soldiers-rise-report… नुकतीच वाचनात आली. युद्धामधील प्रत्यक्ष सहभागामुळे बसलेला मानसिक धक्का, सैन्यामधील वाढती बेशिस्त, ताणतणाव आणि युद्धामुळे चढलेला उन्माद यामुळे हे सैनिक असे गुन्हे करण्यास उद्युक्त होतात असे या बातमीत म्हटले आहे.
- Read more about अमेरिकन सैनिकांचे वाढते लैंगिक गुन्हे
- 13 comments
- Log in or register to post comments
- 4721 views