ऐसीवर विचारजंती कंपूबाजीचं वातावरण आहे का?

मन यांचा हा प्रतिसाद वाचला.

'काँग्रेसराज्याची कुणी भीती घेतली तर तो बिन्डोक व अकलेने कमी.
भाजपराज्याची कुणी भीती घेतली तर तो मात्र परम आदरणीय , अतिसंतुलित, थोर विचारवंत.'

हे त्यातलं कळीचं वाक्य. भाजप/कॉंग्रेस हा केवळ एक मानदंड झाला. सश्रद्ध/अश्रद्ध, प्रतिगामी/पुरोगामी (दोन्ही शब्दांना तथाकथित हे विशेषण लावून), कॉंझर्व्हेटिव्ह/लिबरल, परंपरावादी/आधुनिकतावादी या सर्वच बाबतीत ऐसीची मनोवृत्ती पुरोगामी, उदारमतवादी, लिबरल, स्त्रीवादी वगैरे दिशेला झुकलेली दिसते. याला माझी हरकत नाही. बहुतेकांची नसावी असं वाटतं. टिळक आणि आगरकर या दोघांची विचारसरणी अशीच दोन वेगळ्या दिशांकडे तोंडं केलेली होती. दोन्ही आपापल्या पद्धतीने व्हॅलिड विचारसरणी होत्या.

मात्र अनेकांना असा सेक्युलर, लिबरल, पुरोगामीपणा हा विचारजंतीपणा वाटतो. सर्वप्रथम हा शब्द समजून घ्यायला हवा. विचारवंतपणाचा आव आणणारे ते विचारजंत असा साधारण अर्थ मी काढतो. पब्लिकच्या भावना न ओळखता केवळ शब्दांचाच कीस काढणारे अशीही एक छटा आहे. एक सोयीस्करपणा, एक खोटेपणाही त्यात आहे. सोयीस्कर अशासाठी की त्यात पाश्चिमात्यांचं कौतुक आणि आपल्या पारंपारिक विचारांवर, प्रथांवर हल्ला असतोच. त्याचबरोबर आपल्या धर्मातल्या चुका जेव्हा इतर धर्मांत दिसतात तेव्हा त्यांच्याविषयी विचारजंती लोक मूग गिळून गप्प बसतात अशीही तक्रार असते. 'प्रत्येक हिंदुद्वेष्टा हा विचारवंत नसतो, पण प्रत्येक विचारवंत मात्र हिंदुद्वेष्टा असतोच' असं वाक्य इतर संस्थळावर एका सदस्याच्या सहीत अनेक वर्षं होतं. विचारजंत हे आपल्या परंपरांचा विरोध करतात इतकंच नाही तर दुस्वास करतात असा काहीसा आरोप असतो. विभूतींवर हल्ला करणं, प्रतिमाभंजन करणं यातून त्यांना एक विकृत प्रकारचा आनंद मिळतो असा काहीसा दावा असतो. 'पाश्चात्यांचे अंधानुकरण करणारे' 'विचारसरणीचे किंवा विचारपद्धतीचे गुलाम असलेले' 'हस्तिदंती मनोऱ्यात बसणारे' वगैरे दूषणं त्यांना दिली जातात.

हे सगळं ठीक आहे. जगात कुठेतरी असे भोंदू विचारवंत असतीलही. कदाचित ऐसीवरही असतील. मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की 'ऐसीवर अशा विचारजंतांची कंपूबाजी आहे', 'श्रेणी देताना अशी कंपूबाजी दिसून येते ' 'उजव्या बाजूचे विचार मांडले तर सगळे जण सरसावून तुटून पडतात' 'परंपरा-धर्म विरोधी विचार मांडले तर तुमचं कौतुक होतं, बाजूचे विचार मांडले तर तुमची चेष्टा होते' या जातकुळीच्या तक्रारी हळूहळू, आडून आडून येताना दिसतात. त्याही मायनॉरिटीकडून. आणि अशा तक्रारी मला तरी एक व्यवस्थापक म्हणून गंभीरपणे घ्याव्याशा वाटतात. वैचारिक दुफळी असणारच, आणि असावीच. कारण जितक्या अधिक बाजूने एखाद्या विषयावर मतं मांडली जातील तितके अधिक पैलू दिसतील. एकसारखा विचार करणाची फक्त चार टाळकी एकमेकांशी बोलत राहिली आणि बाकीच्यांचा आवाजच नसला तर संस्थळाच्या प्रगतीसाठी ते उपयुक्त नाही. कोणाचंच मत चुकीचं नाही, सगळ्यांचंच बरोबर - बाबासाहेबांचंही बरोबर आणि तात्यासाहेबांचंही बरोबर - अशी मुळमुळीत, सर्वव्यापक गुडीगुडी भूमिका मला घ्यायची नाही. माझं म्हणणं बरोबर आहे असं एकमेकांना ठासून सांगताना किंचित हाणामाऱ्याही व्हायच्याच. जोपर्यंत बोचकारणं, रक्तपात, हाडं मोडणं वगैरे होत नाही तोपर्यंत कुस्त्यांचे डाव रंगायला हरकत नाही. मात्र त्याला गॅंगवॉरचं स्वरूप येणं इष्ट नाही.

ऐसीवर विचारजंती कंपूबाजीचं वातावरण आहे का?
ऐसीवर उजव्या/पारंपारिक/सश्रद्ध/कॉंझर्व्हेटिव्ह विचारसरणींचा आवाज दाबला जातो का?
ऐसीवर अशा गॅंगवॉरना सुरूवात होताना दिसते आहे का?
तसं असल्यास, वातावरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून नक्की काय करावं?

याबद्दल तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.375
Your rating: None Average: 3.4 (8 votes)

निरर्थक प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

प्रतिसाद देतो.मी ऐअ चा सदस्य आहे.पण इथले नावे अंगावर आल्यासारखी वाटतात. राघ,मेभु,वि_अ, इ.
थोड हफु व्हा. आणी प्रत्येक धाग्यातील फुकाच्या विदासहित वाढणारे प्रतिसाद शीण आणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर विचारजंती कंपूबाजीचं वातावरण आहे का?

होय. पण कंपूबाजी जगात सर्वच ठिकाणी पहायला मिळते,कंपू/कळपातली समता ही काय लेखन मुल्ये झालीत? खरी मुल्ये ही निर्मिती! चिकीत्सा!

वरवर पाहाता कंपुबाजीत फार काही गैर वाटत नसेलही पण एक कंपू दुसर्या नवीन कंपूला जन्म मात्र देतो.
मग त्यात तुतु-मैमै होते, लोकं हमरी-तुमरीवर उतरतात, कंपूचं रुपांतर झुडांत व्हायची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे निर्मितीच्या/चिकीत्सेच्या मुल्याकडे दुर्लक्ष होते.

ऐसीवर फार दर्जेदार चिकित्सा होउ शकते पण कधीकधी टिकेचा सुर कधी कधी फार टोकाचा असतो, अंगावर धावल्या सारखा वाटतो, त्यामूळे चिकित्सा खुंटते. टिकेच्या भाषेची समिक्षा व्हावी.

मेघानाची टीका बरेचदा उत्तम असते, तिचं वाक्य हे ब्रम्हवाक्य नसतं तीला मुद्दा चुकीचा वाटला तर ती माघार पण घेते, नवीन मतही मांडले.
अंगावर धावणार्यात सभासद असतील तर फारसा फरक पडत नाही पण जर का कंपू/झुंडात संपादक/दीका पण असतील तर मग संस्थळाचं नाव जातं किंवा संस्थळाला कुठलंतरी लेबल लागतं परत जाताजाता खवचट प्रश्न टाकण्यात पण तसं काही थोर नसतं(वैयक्तीक मत). संपादकांची जवाबदारी इतरांपेक्षा जास्त असते(ते जवाबदारी पार पाडत नाही असं मत नाही)

ऐसीवर उजव्या/पारंपारिक/सश्रद्ध/कॉंझर्व्हेटिव्ह विचारसरणींचा आवाज दाबला जातो का?
नाही.

ऐसीवर अशा गॅंगवॉरना सुरूवात होताना दिसते आहे का?
होय.

तसं असल्यास, वातावरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून नक्की काय करावं?
टिकेच्या भाषेची समिक्षा व्हावी, टिका करणे म्ह्णजे अंगावर धावणे नव्हे.
श्रेणी हा एक चांगला प्रकार आहे, अजुन त्यात काही सुधारणा शक्य असु शकतात जसे वर्तमान पत्राच्या प्रतिक्रियांवर सहमत/असहमत +१/-१ असते तसं काहीसं शक्य आहे, ते सर्व सभासदांसाठी असु शकते.
जर लोकांना निरर्थक अपमानास्पद शब्द वाटत असल्यास त्यापेक्षा कमी अपमानास्पद शब्द वापरण्यात येउ शकतो. मलातरी निरर्थक शब्द अपमानास्पद वाटत नाही.

गुर्जीचं कंपूबाजी बद्दलचं वैयक्तीक मत जाणुन घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

टिकेच्या भाषेची समिक्षा व्हावी, टिका करणे म्ह्णजे अंगावर धावणे नव्हे.

हा मौलिक सल्ला आहे. सर्वांनीच तो मनावर घ्यायला हवा. विचार आणि विचार मांडणारा तसंच टीका आणि टीका करणारा यांत थोडं अंतर निर्माण करता आलं, तर सर्वांसाठीच चांगलं होईल.

गुर्जीचं कंपूबाजी बद्दलचं वैयक्तीक मत जाणुन घ्यायला आवडेल.

थोडक्यात सांगायचं तर कंपू चांगले कंपूबाजी वाईट. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे कंपू सर्वत्र असतात. बर्ड्स ऑफ द फेदर... या न्यायाने समविचारी लोक एकमेकांशी संवाद साधतात, त्यांच्यात मैत्री होते, आणि एक जवळीक तयार होते. यात काहीच गैर नाही. तेव्हा चांगल्या अर्थाने कंपू असणं ठीक. किंबहुना समविचारी लोकांना एकत्र येण्याची संधी मिळावी हा ऐसीच्या ध्येयधोरणातलाच भाग आहे. पण जेव्हा हे पोलरायझेशन टोकाला जाऊन 'आपण विरुद्ध ते' असा प्रकार होतो तेव्हा कंपू'बाजी' सुरू होते. मग आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्टं असा भेदभाव सुरू होतो. काय म्हटलंय यापेक्षा ते कोणी म्हटलंय हे महत्त्वाचं ठरायला लागतं. विरोधी मतप्रवाहातलं सगळंच वाईट आणि आपल्या मतांतलं सगळंच चांगलं असे समज होतात.

कंपूबाजीला किंवा तिच्या परसेप्शनला एक दुसरी बाजूही आहे. विशेषतः संस्थळांवर नवीन येणारांना ती लागू होते. बऱ्याच संस्थळांवर वावरणाऱ्या जुन्या लोकांना त्या संस्थळाआधीपासूनचा इतिहास असतो. त्यांच्या आपापसात मैत्र्या असतात, एकत्र कट्टे केलेले असतात, गॉसिपं केलेली असतात, आधीच्या मारामाऱ्या केलेल्या किंवा किमान पाहिलेल्या असतात. त्यामुळे ते एकमेकांचे लेख आवर्जून पाहतात - त्यांना माहीत असतं कोण कसं, काय लिहितो हे. त्यावर प्रतिसादही आधीच्या संदर्भांसह येतात. अशा ग्रुप्समध्ये सामावून घेतलं जाणं सुरूवातीला तरी कठीण जातं. कारण 'हा कोण नवीन गडी?' याची ओळख पूर्णपणे पटलेली नसते. त्यामुळे नवीन सदस्यांच्या सुरूवातीच्या काही दर्जेदार लेखनाकडेही दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. कल्पना करा, तुम्ही एका कॅफेमध्ये गेलात. एका टेबलावर तुमचे चार जुने मित्रमैत्रीण बसलेले आहेत, आणि दुसऱ्या टेबलावर कोणीतरी नवीन दोनतीन लोकं आहेत. तुम्ही कुठच्या टेबलावर जाल? पण तुम्हाला जर सतत त्या नवीन टेबलावरून हसण्याखिदळण्याचे आवाज येत राहिले तर तुम्हाला कानोसा घेण्याची इच्छा होईल. गप्पा वाढतील, आणि पुढच्या वेळी तुमच्या टेबलावर त्यांना बोलवाल. किंवा तुमचे मित्रमैत्रीण नसताना त्यांच्या टेबलावर जाल. अशीच ओळख वाढते आणि मैत्री होते. याला वेळ लागतो. जर हे झालं नाही तर त्या टेबलावरच्या लोकांना सतत वाटत राहणारच 'हे कूल सीनियर लोकं आपापसातच बडबडत असतात, आणि आपल्याला त्यांच्यात घेत नाहीत.' कंपूबाजी तीव्र स्वरूपात नसतानाही तिचं परसेप्शन निर्माण होतं.

दुसरा भाग, जो जालीय वावराला जास्त लागू आहे तो म्हणजे भाषेचा. आपण बोलताना आवाजाचा स्वर, चेहऱ्यावरचे भाव, देहबोली यातून जे समोरच्यापर्यंत पोचवतो ते केवळ त्या शब्दांमधून पोचत नाही. 'काय वाट्टेल ते बोलू नकोस.' हे जर मस्करीच्या स्वरात म्हटलं आणि रागावलेल्या जजमेंटल स्वरात बोललं तर त्या वाक्याचे परिणाम वेगळे होतात. एकाने मैत्रीपूर्ण डिवचणं किंवा कोपरखळी होते, तर दुसऱ्यातून अंगावर आल्यासारखं वाटतं. पण त्यातला कुठला स्वर अभिप्रेत आहे हे लिहिताना स्पष्ट होत नाही. त्यामुळे वाचणाराचे गैरसमज होऊ शकतात. यात कोणाची चूक नाही, केवळ माध्यमाची मर्यादा आहे. यातून आपण विरुद्ध कोणीतरी असल्याची भावना होते, आणि ती कंपूबाजीच्या परसेप्शनला खतपाणी घालते. आणि एकदा परसेप्शन निर्माण झालं की हळूहळू सगळ्याच गोष्टींचा अर्थ त्या दिशेने काढला जातो.

याचा अर्थ कंपूबाजी होतच नाही असा नाही. अनेक लोकांनी मिळून एखाद्या आयडीला ठरवून पिडायचं असं झालेलं पाहिलं आहे. किंवा एकाच व्यक्तीने अनेक आयडी काढून दोन्ही बाजू भडकवण्याचा प्रयत्न केलेलाही दिसून आलेला आहे. 'आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट' हे प्रच्छन्नपणे झालेलंही पाहिलं आहे. दुसऱ्याला केवळ हीन ठरवणारे प्रतिसाद देणारे आयडीही पाहिलेले आहेत. या सगळ्या प्रकारांतून अनेक सदस्यांना जालीय वावर करणं नको वाटतं. हे आपल्याला सामान्य समाजातदेखील दिसतं. जातीभेद ही एक प्रकारची कंपूबाजीच आहे. गुण्यागोविंदाने राहणारे दोन समाज असं स्वरूप न राहता एकमेकांचे दुष्मन होतात तेव्हा धर्माधिष्ठित कंपूबाजीच चालू झालेली असते. जालावरही अशा कंपूबाजीतून एका गटाने दुसऱ्याची हकालपट्टी केलेली पाहिलेली आहे.

तेव्हा ही टाळण्यासाठी काय करावं? थोडक्यात सांगायचं झालं तर विचार आणि तो मांडणारी व्यक्ती यांच्यात अंतर आहे हे समजून घ्यावं. म्हणजे 'अमुक विचार चुकीचा आहे' असं म्हणावं, 'अमुक विचार करणारे लोक मूर्ख आहेत' असं म्हणू नये. तसंच लेखनावर हेत्वारोप कमीतकमी करावे. यातही पुन्हा लिखाण आणि लेखक यांच्यात अंतर ठेवण्याचाच मुद्दा आहे. कारण लिखित शब्दाला मर्यादा असतात, ते वापरण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात.... तेव्हा बेनेफिट ऑफ डाउट भरपूर द्या. यामुळे एकतर तुम्हाला कंपूबाजीचा त्रास कमी होईल. कारण विचार तुमच्या अंगावर येत नाहीत, माणसं येतात. त्यांनाच दूर ठेवलं तर अंगावर येण्याने होणारा त्रास कमी होईल. आणि प्रत्येकानेच इतरांचा आदर केला तर भांडणंही कमी तीव्र स्वरूपाची होतील.

दुसरी गोष्ट म्हणजे आपण सकारात्मक, चांगलं लेखन करत रहावं. जिथे ज्याने चांगलं लिहिलं आहे तिथे कौतुक करावं. जिथे चूक वाटते तिथे शक्य तितक्या संयतपणे चूक दाखवून द्यावी. धनंजयचा वावर या बाबतीत आदर्श आहे. कोणालाही न दुखावता आपली ठाम मतं मांडूनही कंपूंच्या पलिकडे कसं रहावं याचा आदर्श परिपाठ आहे. अर्थात आपणा मर्त्य मानवांना इतकी उच्च साधना साधेलच असं नाही.

असो, लिहायचं म्हटलं तर या विषयावर एक पुस्तक लिहिता येईल... पण इथेच थांबवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या या प्रतिसादातील काही मजकूराशी प्रचंड असहमत आहे.

कंपूबाजी मधे काहीही चूक नाही.

कंपूबाजी अवश्य करावी.

--

जर हे झालं नाही तर त्या टेबलावरच्या लोकांना सतत वाटत राहणारच 'हे कूल सीनियर लोकं आपापसातच बडबडत असतात, आणि आपल्याला त्यांच्यात घेत नाहीत.' कंपूबाजी तीव्र स्वरूपात नसतानाही तिचं परसेप्शन निर्माण होतं.

मग जे ज्युनियर आहेत त्यांनी आपला वेगळा कंपू काढावा.

परसेप्शन ही रियॅलिटी आहे असे मानले तरी ... दुसरा कंपू निर्माण करायला जोपर्यंत बंदी नाही तोपर्यंत दुसरा, तिसरा, चौथा असे कंपू निर्माण होतच राहतील.

---

दुसरा भाग, जो जालीय वावराला जास्त लागू आहे तो म्हणजे भाषेचा. आपण बोलताना आवाजाचा स्वर, चेहऱ्यावरचे भाव, देहबोली यातून जे समोरच्यापर्यंत पोचवतो ते केवळ त्या शब्दांमधून पोचत नाही. .................................'

एकदम सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंपूबाजी मधे काहीही चूक नाही.

कंपूबाजी अवश्य करावी.

गब्बरशेट, तुम्ही कंपूबाजीचं समर्थन करता आहात याचं आश्चर्य वाटतं. अहो, सरकार म्हणजे बहुसंख्य गरीबांनी मूठभर श्रीमंतांचा छळ करण्यासाठी केलेली कंपूबाजीच झाली नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बरशेट, तुम्ही कंपूबाजीचं समर्थन करता आहात याचं आश्चर्य वाटतं. अहो, सरकार म्हणजे बहुसंख्य गरीबांनी मूठभर श्रीमंतांचा छळ करण्यासाठी केलेली कंपूबाजीच झाली नाही का?

कोएलिशन सरकार हे कंपूबाजीचे परफेक्ट उदाहरण आहे. खासकरून निवडणूकी पूर्वी आघाडी न करता निवडणूकीनंतर आघाडी बनवणे. कोल्युजन हा सुयोग्य शब्द आहे गटबाजी साठी. काँपीटीशन कमिशन च्या नियमा नुसार कोल्युजन (स्पर्धकांमधील) बेकायदेशीर आहे.

माझा काँपीटीशन कमिशन ला असलेला विरोध ह्याच कारणासाठी आहे - की जो गुन्हा सरकार स्वतः करते (म्हंजे राजकीय पक्ष करतात) त्याच गुन्ह्याविरुद्ध च्या प्रशासकीय यंत्रणेचे सत्ताधीश हे राजकीय पक्ष बनतात. (केवळ या कारणासाठी की - राजकीय नेत्यांनी चलाखीने राजकीय पक्षांना काँपीटीशन कमिशन च्या अखत्यारी बाहेर ठेवलेले आहे.) Law breakers should not be allowed to make laws - हे तत्व कन्सिस्टंटली वापरायचा यत्न करतोय.

----

अहो, सरकार म्हणजे बहुसंख्य गरीबांनी मूठभर श्रीमंतांचा छळ करण्यासाठी केलेली कंपूबाजीच झाली नाही का?

त्यांनी केली तर ते चालते ... मग आपण का करू नये ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>अहो, सरकार म्हणजे बहुसंख्य गरीबांनी मूठभर श्रीमंतांचा छळ करण्यासाठी केलेली कंपूबाजीच झाली नाही का?

तसं नाही. सरकार म्हणजे मूठभर श्रीमंतांना सर्व सोयी स्वस्तात उपलब्ध करून द्यायला गरीबांच्या हिताचा बुरखा पांघरणारा कंपू........

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मत मांडल्याबद्दल धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरीचशी चर्चा होऊन गेली आहे. पण दोन गोष्टी नमूद कराव्याश्या वाटतात (कदाचित अवांतरही वाटू शकतील)

१. ऐसीवर वावरणारे बहुतांश लोक त्यांच्या लेखनावरून बॅलन्स्ड वाटतात. आपल्या विरोधी सूर लागला तरी तो समजावून घेऊन/स्वीकारून पुढे चालतात. एका अर्थी जालीय मॅच्युरिटी जास्त असलेले असंही म्हणू शकतो.
२. व्यक्ती आणि आयडी यांचं एक डिसोसिअशन करणं ऐसीवरच्या बहुतांश अ‍ॅक्टिव्ह मेंब्रांना साध्य झालेलं आहे असं वाटतं. एक निरीक्षण असं आहे की साधारणतः इतर संस्थळांवर / ऐसीवर नवीन आलेले सदस्य यांना हे जमत नाही आणि मग श्रेणी वाईट मिळाल्या किंवा विरोधी प्रतिसाद आला की असे लोक नाराज होतात.

आपण असं म्हणू शकतो का की हा शेवटी जालीय मॅच्युरिटी लेव्हलचा प्रश्न आहे आणि पर्यायाने ऐसी हे जालीयदृष्ट्या जास्त मॅच्युअर लोकांचं संस्थळ आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण असं म्हणू शकतो का की हा शेवटी जालीय मॅच्युरिटी लेव्हलचा प्रश्न आहे आणि पर्यायाने ऐसी हे जालीयदृष्ट्या जास्त मॅच्युअर लोकांचं संस्थळ आहे?

संपादकांच्या कंपूतले का हो तुम्ही? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पाने