स्वामी त्रिकाळदर्शी उवाच: पुरोगामीस्य किम् लक्षणं?

आश्रमात स्वामीजी ध्यानमग्न बसलेले होते, अचानक त्यांनी डोळे उघडले, क्षणाचा ही बिलंब न करता मी प्रश्न विचारला, स्वामीजी मनात एक शंका आहे. स्वामी त्रिकाळदर्शी: काय शंका आहे बच्चा? मी: स्वामीजी पुरोगामी कोण असतो, त्याची लक्षणे काय? स्वामी त्रिकाळदर्शींच्या चेहऱ्या एक हास्याची लहर पसरली, ते म्हणाले बच्चा, समोर वडाचे झाड बघ, झाडाच्या डाव्या अंगाला एक वाळकी फांदी दिसते आहे न. मी म्हणालो होय, स्वामीजी. स्वामी त्रिकाळदर्शी: त्या फांदीला पुरोगामी फांदी असे म्हणतात. मी त्या वाळक्या फांदी कडे बघितले,मला काहीच कळले नाही. मी पुन्हा प्रश्न केला, स्वामीजी मी अज्ञ बालक आहे, आपल्या गूढ वाक्याच्या अर्थ स्पष्ट करावा. स्वामी त्रिकाळदर्शी म्हणाले, बच्चा, ती वडाची वाळकी फांदी स्वत:ला वडाच्या झाडाचा अंग मानीत नाही. ती वडाच्या झाडाचा तीव्र द्वेष करते. म्हणून तिने फांदीवर लागणार्या पानांना झटकून दिले. मी मध्येच टोकले, का स्वामीजी? स्वामी त्रिकाळदर्शी म्हणाले, हिरवी पानें झाडासाठी प्राणवायू तैयार करतात, प्राणवायू झाडाला न मिळावी हाच तिचा हेतू. ही गोष्ट वेगळी कि झाडापासून मिळणारे सर्व पोषक तत्व ही फांदी शोसते. मी म्हणालो, बाबा हे तर विचित्र आहे. मनात एक प्रश्न आला, म्हणून विचारतो, ही फांदी सर्व झाडांचा द्वेष करते का? स्वामीजींच्या चेहऱ्यावर पुन्हा मंद मुस्कान पसरली, ते म्हणाले, बच्चा, ही फांदी फक्त ती ज्या वडाच्या झाडावर आहे, तिचा द्वेष करते, पण शेजारच्या घराच्या कुंपणावर लागलेल्या बाभळीच्या झाडाची ती सदैव प्रशंसा करते. पुरोगामी आहे म्हणून, मागच्या जन्मी काही पाप केले असेल म्हणून वडाची फांदी झाले असे तिला नाही वाटत. पण आपण एखाद्या दुर्घटनेमुळे वडाची फांदी झालो असे तिला वाटते. मी पुन्हा स्वामीजींना पुन्हा प्रश्न विचारला, स्वामीजी, झाडावर एखादे संकट आले, पुरात झाड बुडाले वैगरेह? स्वामीजी म्हणाले, अशा वेळी झाडाची मुळे मातीला घट्ट पकडून झाडाला पडण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न करतात, झाडाचे इतर अंग ही उदा. फांद्या ही मुळांना भरपूर प्राणवायू पोहचवून त्यांची ताकद वाढवितात. पण पुरोगामी फांदी असे काहीच करत नाही, ती केवळ विचार करते, पूर का आला, हे झाड का वाचले, पडले का नाही इत्यादी. एखादा NGO सेमिनार साठी पेपर तैयार करतो तसेच. पण स्वामीजी, जरं, वडाचे झाड पडले तर, झाडा बरोबर फांदीचे अस्तित्व ही नष्ट होईल, हे तिला कळत कसें नाही. स्वामीजी पुन्हा जोरात हसले व म्हणाले, बच्चा तिला जर हे कळले असते तर ती पुरोगामी कशी झाली असती? क्षणभर आ! वासून मी स्वामीजींना बघत राहिलो, स्वामीजींना पुढचा प्रश्न विचारणार, पण स्वामीजी डोळे मिटून पुन्हा ध्यानमग्न झाले होते.

(स्वामीजींच्या बोलण्याचा मला काहीच बोध झाला नाही, पण वाचक सुज्ञ आहेत)

field_vote: 
3.77778
Your rating: None Average: 3.8 (9 votes)

प्रतिक्रिया

मी धार्मिक आणि श्रद्धावान व्यक्ती आहे पण अंधश्रद्ध नाही.

१. धार्मिक आहात म्हणजे नक्की काय करता?
२. श्रद्धावान आहात म्हणजे नक्की कशावर किती आणि कशासाठी श्रद्धा आहे?
३. अंधश्रद्ध म्हणजे नक्की कशावर किती आणि कशासाठी श्रद्धा असणे आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं की पुरोगामी हा शब्द आजकाल धर्मावर, परंपरेवर किंचितही टीका सहन न होणारांनी हायजॅक केलेला आहे. तो शब्द सर्रासपणे त्या टीका करणारांना हीन लेखण्यासाठी वापरला जातो. त्रिकालानंदांच्या व्याख्येत फुले, रॉय बसत नाहीत यावरूनच त्या शब्दाचा अर्थ अशा वापराने उलटापालटा झालेला दिसतो आहे.

अंध श्रद्धा इत्यादी दूर करण्यामध्ये या संस्थांचे कार्य अनिस पेक्षा फार जास्त आहे.

बापरे, बऱ्याच शब्दांचे अर्थ पार उलटेपालटे झालेले दिसतात इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख विशेष आवडला नाही. राघांचा प्रतिवाद (प्रतिसाद) अतिशय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अबब!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॅहॅ, इथे म्हणजे काही लोकांचा ढेकर सुद्धा मार्मिक असतो. Wink (हलकेच घ्या).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॅहॅ, फारच बुवा सभ्य तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रेणी देऊन समाधान होईना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाळकी फांदी झाडाकडून काही घेत नाही, अन देतही नाही. तेव्हा रूपक गंडलेले आहेच. वरतून प्रतिसादांतून पुढचा प्रकार केलेला दिसतोच आहे.
ओव्हरॉल, आजकालचे टीपिकल संघिष्ट हिंदुत्ववादी पुरोगामी विचारांना बदनाम करण्याकरता जसल्या कुजबुजी करतात तस्ला गरळओकू प्रकार वाटला.
असो,
(हातात अंगठ्या इ. मुक्ताफळं वाचल्यानंतर)
पटाईतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हा प्रतिसाद किती प्रकारे गंडलेला आहे आणि त्यात किती गरळ (अरेच्या गरळ तर साधी लाळ म्हणावी लागेल, सायनाईड म्हणू) भरली आहे देव जाणो. टिप्प्प्पिकल राष्ट्र सेवा दलाचा कँडीडेड दिसतो. कंसेप्शन दिनाच्या शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लेख (?) वाचून एकच गोष्ट कळली, ती म्हणजे असल्या बाबा-बुवांनी जैवशास्त्रीय रुपकांचा वापर अजिबात करू नये. म्हणजे किमान थापा मारणं जरा सोपं होईल अन आंधळे समर्थक जास्त लवकर गोळा करता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बाबा-बुवा जीवशास्त्रापासून फटकून राहिले तरीही काम होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बॅटमॅन हे वारंवार "तुम्ही साले पुरोगामी" असे म्हणत इथे पब्लिकला झोडताना दिसतात.
बॅटमॅन हे पुरोगामी नाहित काय ?
बॅटमॅन हे प्रतिगामी आहेत काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या लेखाचं एक छान आणि समर्पक विडंबन येथे सापडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कोन हाये त्यो, हिकडं पण टाका की म्हणावं, धुमशान तर इकडे सुरू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

+१.
मार्मिक आहे ते विडंबन!
माबोवरचे मार्क.ट्वेन पण तेच असतील बहुतेक. www.maayboli.com/node/49629?page=11 इथे जबरा प्रतिसाद आहे त्यांचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्कटांनो ते पान इथून उघडत नाहिये.
मला व्यनि कराल का ते प्लीझ?
वाचून झाल्यावर लागलिच डिलिट करेन म्हणतो तो मिपावरचा लेख.
च्यामारी.
" मराठी सायटींच्या लिंका न उघडणे " ह्या कारणासाठी आता मी स्विच मारावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

केला,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरोगामित्वाची चर्चा मजेदार आहे. पुरोगामित्वाचे अर्थ गेल्या शंभर एक वर्षात इतके बदलले आहेत कि त्याचा इतिहास लिहिणे फारच मनोरंजक आणि उद्बोधक ठरेल.

(भारतीय) परंपरा आणि (पाश्चिमात्य) आधुनिकता ह्यांच्या वसाहतीय काळातल्या झगड्यात पुरोगामी नावाची जमात जन्माला आली. आंधळ्या पुरोगामी दृष्टीकोनात मुख्यतः - १) उत्क्रांतीवादी इतिहास - म्हणजे युरोपीय इतिहासा सारखे सुवर्ण काळ (ग्रीक तत्वज्ञान), अंधार युग (डार्क एज) आणि प्रकाश युग (प्रबोधनकाळ) असे टप्पे कल्पून इतिहास हा पुरोगामी म्हणजे प्रगतीशील आहे असे मानणे. आता ह्या चौकटीची भारतीय संदर्भात आयात केली म्हणजे आपोआपच पूर्वीचे प्राचीन भारतीय सुवर्ण युग, मधला मोगली अंधार आणि मग युरोपीय प्रकाश असा भारतीय इतिहास तयार होतो. पुरोगामी - ह्याचा साधारण अर्थ (फॉर ऑल प्रक्टिकल पर्पजेस) हिंदुत्ववादी एट आल. लोकांना विरोध करणारा, प्रो-दलित, मुस्लिम, स्त्री, कामगार इत्यादी असणारा आणि कमी अधिक फरकाने अंग्लाळलेला असणारा असा होत गेलाय. (श्याम मनोहरांच्या दर्शन नावाच्या नाटकात ठोकळेबाज पुरोगामी आणि प्रतिगामी लोक भांडताना दिसतात. त्यांच्या इतर कादंबर्यांमध्ये सुद्धा ही क्यारेक्टर्स ज्याम मज्या आणतात.); २) प्रत्याक्ष्यार्थवादी समाजशास्त्र (positivist sociology) - समाजशास्त्र नावाची इंडस्ट्री फ्रांस मध्ये सुरु झाली. विज्ञानाच्या त्या नेत्रदीपक काळात, ऑगस्ट कोम्प्तला प्रश्न पडला कि ज्या प्रकारे विज्ञान वस्तूंचा (objects) वैज्ञानिक अभ्यास करत, तसे समाजाचा वैज्ञानिक अभ्यास कसा करता येईल. सगळा घोळ इथून सुरु झाला. आता माणसाचा वैज्ञानिक अभ्यास करायचा तर तो सतत बदलताना दिसतो, शिवाय काळ, अवकाश, संस्कृती सापेक्ष असतो. मग हि सापेक्षता नाकारण्याच पाप सामाजशास्त्राने सुरु केलं. समाज्शात्रात विसाव्या शतकाच्या मध्यावर ही चूक सुधारणे सुरु झाले आणि आजची सोशल थिअरी तर पूर्णपणे वेगळी आणि प्रत्याक्ष्यार्थवादाच्या विरोधी आहे.

पण सोशल वर्क, डेवेलपमेंट स्टडीज इत्यादी उद्योगांनी हे पातक सुरूच ठेवलंय. (विज्ञानाची उपयोजित शास्त्र जशी इंजिनीरिंग वैगेरे, तशी समाज शास्त्राची उपयोजित टेक्नोलोजी सोशल वर्क, डेवेलपमेंट स्टडीज). ह्यातून पुन्हा युरोपीय संकल्पना आणि इतिहास चौकटीची ढोबळ आणि आंधळी आयात सुरु राहते. हे एक चमत्कारिक आणि काही प्रमाणात विकृत मॉडेल तयार झालय. म्हणजे, चिम्पान्झी ते होमो सेपियन अशी एक उतरंड जशी उत्क्रांतीवादि चौकट पुरवते, तशीच आफ्रिकन, भारतीय, मग युरोपीय अशी उतरंड ह्या समाज शास्त्रात तयार झाली. म्हणजे आता सुधारणा ह्याचा प्रत्यक्ष अर्थ अधिकाधिक युरोपीय होत जाणे असा होत गेला. एकोणिसाव्या शतकात बिस्कीट खाऊन बाटणारा हिंदू माणूस विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, आदिवासी, भटके, देवदासी, अशी लोकांची विभागणी मान्य करून त्यांचा विकास कसा करावा वैगेरे सांगू लागला. आता विकास म्हणजे काय तर अधिकाधिक प्रमाणात ह्या (इतर) लोकांना आपल्यासारखे करणे. (ही बाब बरीच सटल प्रकारे चालते, इथे केवळ ती प्रक्रिया नोंदवण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्यक्षात हे बरंच गुंतागुंतीच्या प्रक्रियेने ऑपरेट होत.श्याम मनोहरांच्याच कळ कादंबरीत हा गमतीदार डिलेमा फार छान पणे आलाय - एक तरुण मुलगा रस्त्याने जात असतो. त्याला एक तरुण भिकारी मुलगी दिसते. त्याला तिच्या बद्दल काम वासना होते. ह्याची शरम वाटून तो स्वतःशी म्हणतो - "अरे रे! एका भिकारणी बद्दल आपल्याला वासना व्हावी ना! छी! छी!". आणखी काही काळ चालत असताना, आपल्या आधीच्या विचार बद्दल त्याला वाईट वाटू लागतं आणि तो म्हणतो, "भिकारणी बद्दल वासना झाली ह्याच मला दुक्ख होतंय म्हणजे मी भिकारणीला माझ्या पेक्ष्या कमी लेखतो. छी! हे फार चूक आहे." )

बर आता हे पुनर्रुजीवनवादी लोक वेगळे मानावेत का; तर तसही दिसत नाही. त्यांची सगळी विचारप्रक्रिया तितकीच युरोपीय आहे जितकी ह्या पुरोगाम्यांची आहे. ते ही तितकेच प्रत्याक्षार्थवादी आहेत (वाईट म्हणजे त्यांना ते कळतही नाही.) पुराणातल्या वांग्यांमध्ये त्यांना अणुबॉम्ब सापडतो; ताजमहाल आणि मक्का त्यांना शिव मंदिरे वाटतात; पुष्पक विमानात बसून ते कालिदासाच्या ढगाच्या सफरीचे फोटो काढतात. इतकी विनोदी जमात शोधून सापडणार नाही. कशाचे पुनर्रुजीवन करायचं आणि कशासाठी ह्याची कसलीही नीट भूमिका नाही. आणिक एक म्हणजे ही सगळी जाणीवच मुळात युरोपीय विचार प्रक्रियेतून घडते ह्याचं भानही नाही. मजा म्हणजे गणपतीवर श्रद्धा ठेवणे योग्य आणि येल्लामा आणि काळूबाई अंधश्रद्धा हे कसं काय? म्हणजे संस्कृतीकरणाच्या प्रक्रिये बद्दल संपूर्ण अनभिज्ञता. पोइन्ट बीइंग, हे दोनही लोक एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

इथल्या लेखात परंपरेच्या वटवृक्षाची प्रतिमा आलीये. नेमाडेंची देशीवादाची संकल्पना वृक्षाच्या दृष्टान्तानेच व्यक्त झालीये. (तेही वडाचेच झाड!) ह्यात निसर्गवादी भूमिकेतून आधुनिकतेच्या लिनिअर मॉडेलला विरोध करताना नेमाडे एक पाऊल मागे जाऊन आधुनिकतेला नाकारताना दिसतात. (वेगळ्या अर्थाने फुले आणि आणखी वेगळ्या अर्थाने गांधी सुद्धा आधुनिकतेला नाकारतात. हा नकार बराच विधायक आहे; नेमाडेंचा सुद्धा!) पण हे नाकारणे आधुनिकतेच्या चौकटीतच विकसित झालंय. (कोलटकरांची एक धमाल कविता आहे परंपरा नावाची. अप्रतिम आहे - जरूर वाचा. बहुतेक अरुण कोलटकरांच्या पाच कविता नावाच्या संग्रहात सापडेल. खर तर ते गाणंच आहे - पं पं पं परंपरा… प्रम प्रम पप्रम पर पं परं प्र परा … )

आधुनिकता ही आपली खरी समस्या आहे. तिच्या अत्यंत गुंतागुंन्तीच्या प्रक्रिया ह्या आपल्या देशाच्या जगड्व्याळ इतिहासातून उकलून काढाव्या लागतील, त्यांची मूळे, पाने, फूले सगळंच आपलं आहे तरीही तपासून पारखून टाकाऊ/टिकाऊ काय ते ठरवावं लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

>>आदिवासी, भटके, देवदासी, अशी लोकांची विभागणी मान्य करून त्यांचा विकास कसा करावा वैगेरे सांगू लागला. आता विकास म्हणजे काय तर अधिकाधिक प्रमाणात ह्या (इतर) लोकांना आपल्यासारखे करणे.

हे एकदम मार्मिक आहे. स्वत:ला पुरोगामी ही शिवी चिकटू नये अशी इच्छा असणारे लोक देखील आदिवासींचा विकास करायचा प्रयत्न करू पाहतात. पुन्हा विकास म्हणजे काय तर अधिकाधिक ह्या (इतर) लोकांना आपल्यासारखे करणे. पक्षी- त्यांना/ त्यांच्यामुलांना अथर्वशीर्ष आणि भगवद्गीता शिकवणे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आता विकास म्हणजे काय तर अधिकाधिक प्रमाणात ह्या (इतर) लोकांना आपल्यासारखे करणे.

+१
छप्परतोड मार्मिक आहे! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संपूर्ण प्रतिसादानं विचार करायला लावला. लागलिच प्रतिक्रियाही देणं उचित नाही.
जरा मुरु देतोय त्याचा भावार्थ.
तूर्तास प्रचंड आवडलेलं वाक्य :-
मजा म्हणजे गणपतीवर श्रद्धा ठेवणे योग्य आणि येल्लामा आणि काळूबाई अंधश्रद्धा हे कसं काय?
हे अगदि माझ्या मनातलच आहे. पण भारतात रहायचे आहे. त्यामुळे मनातलं बोलायची चोरी आहे.
कानाखाली जाळ निघायच्या धाकाने मी गप्प बसलेला असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रतिसाद बहुतांशी पटला. मात्र

आता विकास म्हणजे काय तर अधिकाधिक प्रमाणात ह्या (इतर) लोकांना आपल्यासारखे करणे.

हे वाक्य खटकलं. पाश्चिमात्य, पौर्वात्य किंवा इतरही कुठच्या आत्यापलिकडे काही मूलभूत मानवी मूल्यांमध्ये विकासाची कल्पना पायाभूत करता येते.

१. आरोग्य - आपलं आणि आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं असावं, त्यांचं आयुष्य प्रदीर्घ आणि वेदनाहीन असावं ही कल्पना सर्वच समाजांमध्ये आहे. जर सर्वसाधारण समाजाचं आरोग्य सुधारलं, आयुर्मान वाढलं, बालमृत्यूंचं प्रमाण कमी झालं, वैद्यकीय सुविधा सर्वांना मिळायला लागल्या तर विकास झाला असं म्हणता येतं.
२. समृद्धी - निव्वळ पैसा याच अर्थाने नाही, तर भौतिक सुखं मिळवण्यासाठी जी संसाधनं लागतात त्यांची मुबलकता ही सर्वच समाजांना हवीहवीशी वाटलेली आहे. वेगवेगळ्या समाजांत प्रचलित स्वर्गांची वर्णनं वाचली तर त्यात अन्न-धान्य-पाणी-ऐशोआराम यांची मुबलकता दिसून येते. तेव्हा ही सर्वसाधारण समृद्धी वाढली तर विकास झाला असं म्हणता येतं.
३. शिक्षण - आपला समाज काय आहे, हे जग काय आहे, इथे कुठच्या नियमांनी गोष्टी घडतात, याविषयीचं ज्ञानही सर्वच समाजांना हवंहवंसं असतं. ज्ञानाचा मक्ता फक्त मोजक्या लोकांकडे असला तर त्यातून इतरांना पायदळी तुडवण्याचे प्रकार झालेले आपल्याला ठाऊक असतात. या मक्तेदारीविरुद्ध सर्वच समाजांनी लढा दिलेला आहे. त्यामुळे ज्ञानाचा आणि शिक्षणाचा प्रसार वाढला तर विकास झाला असं म्हणता येतं.
४. न्याय/समानता - हेही पाश्चिमात्य तत्वज्ञान नाही. असमानतेपोटी पेटून उठणं हेही सर्वच समाजात, पूर्वापारपासून दिसून येतं. त्यामुळे न्यायव्यवस्था बळकट होणं, आणि तिच्या दृष्टिकोनातून सर्वांना समान वागणुक मिळण्याचं प्रमाण वाढणं हेही विकासाचं निदर्शक ठरतं.

इतरही काही मुद्दे मांडता येतील, पण हे चार प्रमुख आहेत. गेल्या चाळीस वर्षांत पहिल्या तीन निकषांनुसार जगाच्या तत्कालीन स्थितीची मोजमाप चालू आहे. काही दोन पाच अपवाद वगळता झाडून सगळ्या देशांमध्ये या निकषांवर आगेकूच चालू आहे. याला जगाचं पाश्चिमात्यीकरण का म्हणावं? सरळ समाजांचा विकासच म्हणावं की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या विकासाच्या व्याख्या किंचित वेगळ्या आहेत असे जाणवले. तुर्तास मुख्यतः २,३ बद्दल तपशीलातील (मांडलेल्या वाक्यातून सुचित होणार्‍या अर्थाशी) असहमती नोंदवून रजा घेतो. २,३ या क्षेत्रात विकास होऊ नये असे म्हणणे नाही. त्यात प्रगती म्हणजे काय यावर बहुदा आपले दुमत असेल असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दुर्दैवाने कुठल्याही "अत्या" शिवाय विकासाच काय पण कुठ्लीही संकल्पना समूर्त होत नाही. प्रत्येक सामाजिक/सामुहिक संकल्पना ही त्या त्या समाजाच्या काळ-अवकाशात शिल्पित होते. म्हणजे अशोक कालीन किंवा बुद्ध कालीन विकास संकल्पना हि आजच्या विकास संकल्पनेपेक्षा फार निराळी असणार. शिवाय अफगाणिस्तानच्या तालीबानान्यांची आणि कोका कोला कंपनीची विकास संकल्पना एकाच काळातली असूनही फार निराळी आहे. एडवर्ड सैद नावाच्या विचारवंताने ओरीएन्टालिझम नावाच्या पुस्तकात एक सिद्धांत मांडलाय कि पूर्व स्वतःचा विचारच आता पाश्चिमात्य चौकटीतून करते. फुको यांची डीस्कोर्स संकल्पना वापरून सैद असं दाखवून देतात की, पूर्वचे डोळे पश्चिमेच्या चष्म्यातून स्वतःला आरशात पाहतात. अर्थात ह्या विचाराची अनेक बाजूंनी मार्मिक टीका झालीये आणि पूर्व/पश्चिम असं संरचनात्मक द्वंद्व खूपच ढोबळ आहे, तरीही वसाहतवादी काळात पूर्वेच सांस्कृतिक प्रतिमान पश्चिमेने साकारले ह्यात काही शंका नाही.भारतीय संदर्भात आशिष नंदी म्हणतात तसं, आता पूर्व पश्चिम असं विभाजन उरलंच नाही. आपण सगळेच पश्चिमी झालोत. (द इन्टीमेट एनिमी. हे एक अद्भुत पुस्तक आहे. खंदी शिफारस. आवर्जून वाचावे.)

विकासाची दृश्य मापके महत्वाची आहेतच (तुमची उदाहरणे आरोग्य, शिक्षण अत्यंत योग्यच आहेत.) पण ती ज्या परिभाषेत व्यक्त होतात; ती परिस्थिती काळजी करण्या सारखी आहे. म्हणजे आता आरोग्यचा विचार करायचा तर, जीव वैद्यकशास्त्र हे शरीर विषयक ज्ञानाची सुप्रीम आणि एकमेव पद्धत बनून गेलिये. शरीराविषयक, आरोग्य विषयक, आजारांबद्दल इतर समरेषीय संकल्पना आहेत, असू शकतात किंवा आपल्या ज्ञान शात्रीय चौकटीत त्यांची दखल ह्यावी असा कुठलाही विचार ह्या ज्ञान शाखेत होत नाही. (अतिशय रोचक उदाहरण राणी बंग ह्यांच्या कानोसा ह्या पुस्तकात सापडेल. तिथे आदिवासी स्त्रियांच्या आरोग्य विषयक जाणीवा ह्या जीव वैद्यक चौकटीपेक्षा किती अमुलाग्र निराळ्या आहेत हे दिसते. नुकत्याच जन्मलेल्या बाळाची नाळ सजीव मानणे आणि ती जपून ठेवणे इत्यादी. राणी बंग ह्यांच्या आईने सुद्धा तिच्या सर्व मुलांची नाळ जपून ठेवली होती असं त्या सांगतात.) जीव वैद्यक शाखेच्या बाहेर होणार शरीर विषयक विचार हा केवळ सांस्कृतिकच असू शकतो, पर्यायाने त्या ज्ञानाचा ज्ञानशास्त्रीय (एपिस्टेमोलोजिकल) दर्जा हा दुय्यम/तिय्यमच असू शकतो. त्याचा फार फार तर एखादा अन्थ्रोपोलोजीस्ट अभ्यास करेल पण ते काही शरीर विषयक ज्ञान नाही.

दुसरे असं कि तुम्ही ह्या विकासाच्या दृश मापकांच्या प्रसाराला विकास म्हणत आहात. अधिक शिक्षण, अधिक भौतिक समृद्धी इत्यादी. क्वालिटेटीटिव्ह मोजमापे आपल्याला फार निराळी विकास संकल्पना देऊ शकतील. शिवाय विकास म्हणजे केवळ दृश्य मापके नाहीत तर सांस्कृतिक आणि वैचारिक, अदृश्य पण स्पष्टपणे जाणवणारी मापके देखील आहेत. उदाहरणार्थ, इंग्रजी जाणणे म्हणजे विकास असं आपल्याकडे कित्येकांना वाटत हे आपण पाहतोच. नेमाडेंचा प्रश्न - आपला शेक्स्पिअर शोधत बसण्यापेक्षा आपण पश्चिमेला का विचारत नाही कि तुमचा कालिदास कोणता किंवा तुमचं महाभारत कुठलं? - ह्या अर्थाने योग्यच होता कि सांस्कृतिक सृजनाचे तुमचे मापदंड आम्ही स्वीकारले तर केवळ तुमच्या सारखं बनत जाणे हा ऐतिहासिक विकासक्रम मानून आम्ही आमचाच विच्छेदच करत राहू. पण हा प्रश्न दलित चळवळीने दुहेरी केला. त्यांनी स्पृश्य वर्गाला हाच प्रश्न विचारला. त्यामुळे केवळ पश्चिमेला नकार किंवा उलटपक्षी ब्राह्मणीकरणाला नकार अशी जी पुरोगामी/प्रतीगाम्यांची रूढ प्रतिक्रिया राहिलीये ती माझ्या मते ह्या एकाच विचार प्रक्रियेतून जन्माला येते. शिवाय, आपल्याकडचे पुरोगामी काय किंवा प्रतिगामी काय दोन्ही ही लोक ढोबळ आणि फारसा विचार वैगेरे करण्याला निरर्थक मानणारे असल्याने सुद्धा दोघांत फारसा फरक काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

पाय पाय! (पाणी पाणी च्या चालिवर आर्त स्वर कल्पावे)
बरं झालंत तुम्हीच तपशीलवार प्रतिसाद टंकलात ते. हेच म्हणायचं होतं पण इतकं नेमकं म्हणता आलंच नसतं!

शिवाय, आपल्याकडचे पुरोगामी काय किंवा प्रतिगामी काय दोन्ही ही लोक ढोबळ आणि फारसा विचार वैगेरे करण्याला निरर्थक मानणारे असल्याने सुद्धा दोघांत फारसा फरक काही नाही.

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिशय मार्मिक प्रतिसाद. एडवर्ड सैदबद्दल ऐकून होतो पण आता वाचावेच लागणारसे दिसतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारतीय संदर्भात आशिष नंदी म्हणतात तसं, आता पूर्व पश्चिम असं विभाजन उरलंच नाही. आपण सगळेच पश्चिमी झालोत. (द इन्टीमेट एनिमी. हे एक अद्भुत पुस्तक आहे. खंदी शिफारस. आवर्जून वाचावे.)

शिवाय, आपल्याकडचे पुरोगामी काय किंवा प्रतिगामी काय दोन्ही ही लोक ढोबळ आणि फारसा विचार वैगेरे करण्याला निरर्थक मानणारे असल्याने सुद्धा दोघांत फारसा फरक काही नाही.

शेवटचं सरसकटीकरण टाळायचा मोह न आवरणं तुमच्या त्याच विधानातल्या 'पुरोगामीत्त्वाची' साक्षं देणारं ठरावं काय?

शिवाय, आपल्याकडचे पुरोगामी काय किंवा प्रतिगामी काय दोन्ही ही लोक ढोबळ आणि फारसा विचार वैगेरे करण्याला निरर्थक मानणारे असल्याने सुद्धा दोघांत फारसा फरक काही नाही.

हे इथल्या पुरोगाम्यांना मार्मिक वाटते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा! शक्य आहे. तसाही मी स्वत:ला पुरोगामीच समजत आलोय. इतर पर्याय इतके खत्री वाइट आहेत कि बाय डिफोल्ट आपण पुरोगामी आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

प्रतिसाद आवडला !

शरीराविषयक, आरोग्य विषयक, आजारांबद्दल इतर समरेषीय संकल्पना आहेत, असू शकतात किंवा आपल्या ज्ञान शात्रीय चौकटीत त्यांची दखल ह्यावी असा कुठलाही विचार ह्या ज्ञान शाखेत होत नाही.

हे विधान रोचक आहे. आजच्या भाषेत काही संकल्पना सांगता येत नाहीत म्हणून त्या थोतांड आहेत असाही प्रचार चालतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जे खरोखरिच थोतांड आहे तेही "आजच्या भाषेत सांगता येत नाही हो. पण आमच्यातही तथ्य आहे बरं." अशा थापा मारतात.
उदा :-
नको उदाहरण नको. उगा माणसं दुखावायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

म्हणजे आता आरोग्यचा विचार करायचा तर, जीव वैद्यकशास्त्र हे शरीर विषयक ज्ञानाची सुप्रीम आणि एकमेव पद्धत बनून गेलिये.

यात मला काहीच आक्षेपार्ह वाटत नाही. जेव्हा प्रकृती सुधारायची असते तेव्हा मॉडर्न मेडिसिनच हवं. नाळेला जिवंत मानण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून आरोग्याचा विकास कसा होईल कळत नाही. अर्थात या प्रथांचा अभ्यास होणं हे महत्त्वाचं आहे, आणि अशा अभ्यासांतून सांस्कृतिक विकास होईल हाही मुद्दा मान्य.

दुसरे असं कि तुम्ही ह्या विकासाच्या दृश मापकांच्या प्रसाराला विकास म्हणत आहात.

इथे तुमची माझा प्रतिसाद समजण्यात गल्लत झालेली आहे. 'विकास म्हणजे पाश्चिमात्यीकरण - कोणाचं तरी अनुकरण' या विधानाला आक्षेप घेणारी ती उदाहरणं होती. म्हणजे 'फक्त हे निकष म्हणजे विकास' असं म्हणणं नसून 'हे पहा संस्कृतीनिरपेक्ष, अत्यंत महत्त्वाचे निकष' असं सांगायचं होतं. विकास हा बहुपरिमाणिय असतो. आणि मास्लोच्या पिरॅमिडच्या वरच्या वरच्या टोकांना जाऊ तसतशी त्याची व्याख्या अधिक वैयक्तिक आणि अधिक वैविध्यपूर्ण होते याबद्दल वादच नाही. पण विकासाची अनेक महत्त्वाची परिमाणं ही संस्कृतीच्या पलिकडे, मूलभूत मानवी गरजांमध्ये रोवलेली आहेत हे सांगायचं होतं. या धाग्यावर जो विकासाचा आलेख दिलेला आहे त्यानुसार 'जगभर या निकषांवर विकास होतो आहे' हे मान्य आहे का? उत्तर हो असल्यास वादच मिटतो.

तुमच्या मांडणीत सोशल रिलेटिव्हिस्टिक दृष्टिकोनाच्या काही छटा दिसल्या म्हणून त्या उत्तराचा प्रपंच होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला मुख्यतः असं म्हणायचंय कि संस्कृती निरपेक्ष अशी मूल्ये असत नाहीत. सामाजिक सांस्कृतिक मुल्ये ही विशिष्ठ स्थळ काळात समूर्त होतात. तुमच्या प्रतिसादातला महत्वाचा मुद्दा म्हणजे, विकासाच्या संस्कृती निरपेक्ष संकप्लना असतात. मला असं वाटत नाही. मानवी हक्काची संकल्पना हे एक उत्तम उदाहरण ठरेल. मानवी हक्क हे संस्कृती निरपेक्ष आणि सार्वकालिक असतात असं आपण मानतो. समुएल मोय्न (Samuel Moyn) त्यांच्या द लास्ट युटोपिया ह्या पुस्तकात दाखवून देतात कि मानवी हक्कांची संकल्पना ही १९६८ नंतरच्या काळात युरोपातील एका राजकीय पोकळीत विकसित झाली. मानवी संस्कृतीत संस्कृती निरपेक्ष 'युनिव्हर्सल' असं काही असत का ह्या बद्दल मी साशंक आहे. विकासाची अनैतिहासिक जाणीव मला फार काळजीचा मुद्दा वाटतो.

अर्थात विकास म्हणजे केवळ पाश्यात्तीकरण असं मला अजिबातच सुचवायचं नाहीये. पण मला शास्त्रीय पद्धतीची मोनोपोली अतिरेकी वाटते. सांड्रा हार्डीन्ग्स म्हणतात त्या प्रमाणे, ज्ञानशास्त्रीय संघर्ष हा राजकीय, नैतिक, आणि सामाजिक, आर्थिक सुद्धा अस्तो. शास्त्रीय चौकट स्वतःची मापके, पुराव्यांचे निकष निश्चित करून इतर पद्धतींना ज्ञानाचा दर्जाच नाकारते हे मला चिंताजनक वाटत. अर्थात इथे आणखी एक प्रतिक्रिया आलीये कि बरीचशी थोतांडे स्वतःला शास्त्रीय म्हणवण्यासाठी उत्सुक आहेत जे तितकेच किंबहुना जास्तच धोकादायक आहे. कठीण आहे एकूण!

पुरोगामी आणि प्रतिगामी हे एकमेकांपासून फारसे भिन्न नसून वसाहतीक काळात निर्माण झालेल्या एकाच प्रकारच्या विचार विमार्शाचे (डीस्कोर्स) फलित आहेत इतकंच खरं तर मला म्हणायचं आहे. आपण कुठल्या गोष्टींना होकार देतो किंवा नकार देतो केवळ ह्यावर आपलं पुरोगामित्व किंवा प्रतिगामित्व निश्तित होत नाही तर आपल्या वैचारिक जाणीवा कुठल्या प्रक्रियेतून घडतात आणि आपण त्यांबद्दल किती सजग आहोत हे ही फार महत्वाचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

बाय द वे, ह्या आपल्या चर्चेमुळे मला फुको चोम्सी ह्यांच्यातल्या संस्कृती निरपेक्ष मानवी स्वभाव असतो का ह्या विषयावरच्या प्रख्यात चर्चेची आठवण झाली. फार इंटरेस्टिंग आणि मजेदार चर्चा होती ती. लिंक - http://www.youtube.com/watch?v=3wfNl2L0Gf8

सुरवातीच्या दोन एक मिनिटांनंतर इंग्रजी संवाद सुरु होतो. तोपर्यंत समजण्यासाठी व्हिडीओ च्या खालच्या बार वर सी सी चे बटन दाबून खाली इंग्रजी सब टायटल्स दिसतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

>> समुएल मोय्न (Samuel Moyn) त्यांच्या द लास्ट युटोपिया ह्या पुस्तकात दाखवून देतात कि मानवी हक्कांची संकल्पना ही १९६८ नंतरच्या काळात युरोपातील एका राजकीय पोकळीत विकसित झाली. <<

मे १९६८च्या विद्यार्थी चळवळीनंतर जे सांस्कृतिक बदल झाले त्यांचा मानवी हक्कांच्या संकल्पनेवर दूरगामी परिणाम झाला हे बरोबर आहे, पण वर दिलेल्या त्याआधीच्या घटना पाहता तुमचं (किंबहुना तुम्ही उल्लेख केलेल्या पुस्तकातलं) हे विधान कसं ग्राह्य मानता येईल ते कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माफ करा. मी स्पष्टीकरण द्यायला हवं होत. अर्थातच, मानवी हक्कांची संकल्पना १८ व्या शतकात अस्तित्वात आली; पण मोय्न यांचा मुद्दा असा कि, सद्यकालिन मानवी हक्कांच्या संकल्पनेचं जे स्वरूप व्यक्त होते ते मुख्यःत १९६८ नन्तरच्या परिस्थितीत घडलं. म्हणजे, ही (किंवा कुठलीही) संकल्पना सतत बदलत अस्ते, आणि तिचे आकलन विशिष्ठ सामाजिक, राजकीय पर्यावरणा अंतर्गत समजून घ्यावं लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

संस्कृती निरपेक्ष अशी मूल्ये असत नाहीत.

या विधानाशी पूर्णपणे असहमत आहे. पण ही चर्चा नंतर कधीतरी करू. कारण माझा मुद्दा होता तो विकास हा मूल्याधिष्ठित नसून गरजाधिष्ठित असतो. आणि बहुतेक गरजा या मूल्य, हक्क, समाज व संस्कृती यांच्या आधी येतात. या गरजा भागण्याचं प्रमाण वाढणं याला मी विकास म्हणतो. या गरजा संस्कृतीनिरपेक्ष असल्यामुळे 'विकास म्हणजे विशिष्ट संस्कृतीचं अनुकरण' ही मांडणी मी नाकारतो.

किंबहुना मूल्यं प्रस्थापित झालेला समाज, हक्कांना सामााजिक अधिष्ठान याही वरच्या पातळीच्या गरजा आहेत अशी मांडणी कोणी केली असली तर वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घुसखोरी बद्दल माफी. पण पुरोगामित्व आणि विकास याचा संबंध आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा प्रतिसाद ऑफ द यिअर आहे. खूप आवडला. अभ्यासपूर्ण आणि संतुलित विवेचन आहे. क्षणभर प्रतिसाद बुकमार्क करायची सुविधा असायला हवी होती असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सबब प्रतिसाद खवचट मानला जायची संभावना आहे. असे नाही हे सांगण्यासाठी हा अजून एक प्रतिसाद. यालाही "ऐसीवरील समाजविघातक तत्त्वे" खवचट श्रेणी देऊ शकतात. त्याकडे दुर्लक्ष करावे हे अगोदरच सांगतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"ऐसीवरील समाजविघातक तत्वे" हे काय प्रकरण आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

मी तुम्हाला खूप प्रभावित होऊन माझा मूळ प्रतिसाद दिला होता. मग तो "खवचट" या श्रेणीत मोडावा इतक्या लोकांना तो खवचट वाटला आहे. तेव्हा जिथे मतांतराचा आदर म्हणून असे वर्तन सोडून देता येत नाही ती समाजविघातक तत्त्वे म्हणावीत असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमच्या ह्या ही प्रतिसादाला मिळालेली श्रेणी पाहल्या मुळे आवर्जून लिहितोय. मी तुमचा प्रतिसाद प्रामाणिकच मानून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

१) उत्क्रांतीवादी इतिहास - म्हणजे युरोपीय इतिहासा सारखे सुवर्ण काळ (ग्रीक तत्वज्ञान), अंधार युग (डार्क एज) आणि प्रकाश युग (प्रबोधनकाळ) असे टप्पे कल्पून इतिहास हा पुरोगामी म्हणजे प्रगतीशील आहे असे मानणे.

कालच, नालंदा विश्वविद्यालयाच्या पुनरुज्जीवनाच्या निमित्ताने झालेली, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे इतिहासाचे प्राध्यापक रिझवान कैसर यांची भारून टाकणारी मुलाखत आकाशवाणीवर ऐकत होतो. हाच मुद्दा ते श्रोत्यांना समजून सांगत होते. 'इस्लामिक आक्रमणांचा अल्पकाळ*' वजा जाता भारताच्या इतिहासात ४-५००० वर्षांपासून कधीही अंधःकारयुग नव्हते असे ते म्हणत होते.

* आक्रमणांच्या एकूण काळापैकी काही काळ (भाषेचे दौर्बल्य नको म्हणून स्पष्टीकरण)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पुरोगामी असण्याच्या -

१) नेसेसरी कंडिशन्स कोणत्या
२) सफिशियंट कंडिशन्स कोणत्या

१) नेसेसरी कंडीशन्स - (माझ्या मते) समानता राबवण्याच्या धोरणाचा आग्रह. व त्यासाठी बलप्रयोग करायला लागला तरीही चालेल असे मानून चालणे. (In general all progressives are more or less equalitarians.)

२) सफिशियंट कंडिशन्स - जे बलवान्/प्रगत्/पुढारलेले/विकसित/resourceful आहेत त्यांच्या वर जबाबदारी टाकलीच पाहिजे व ती त्यांनी स्वीकारलीच पाहिजे. खरंतर त्यांना - ही जबाबदारी स्वीकारायची आहे की नाही - असे विचारण्याचे सुद्धा कारण नाही. कारण एकतर "ते विकसित झाले तेच मुळी इतरांच्यावर अन्याय करून झाले" नाहीतर "काय बिघडलं त्यांनी थोडीशी एक्स्ट्रा जबाबदारी घेतली तर??" अन्यथा त्यांचे पुढारलेपण्/विकास्/साधनसंपत्ती ही सरप्लसच आहे.

-----------------------------

गृहितक : progressive = पुरोगामी

-----------------------------

थोडा वेगळा व्ह्यू -
.
Progressives tend to view things along the oppressor-oppressed axis, favoring policies that provide aid to the latter and punish the former.
.
Conservatives’ lens is that of civilization vs. barbarism, and they tend to favor policies that restore or promote the former at the expense of the latter.
.
Finally, libertarians often are most concerned with freedom and coercion, viewing markets as the best way to achieve the former and government as a force for the latter.
.
_______________ The Three Languages of Politics by Arnold Kling मधून साभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. साधनसमानता हे दूरगामी ध्येय (goal about equality of resources) असलेली धोरणे राबवणे.
(क) साफल्यसमानता हे दूरगामी ध्येय नाही.
(ख) साधनसमानतेचीसुद्धा दिशा आहे, परंतु (वरील वक्तव्यात) समानता-स्थिती राबवणे असा गैरसमज होऊ शकतो.

२. ज्या ठिकाणी साधन-असमानता आहे, तिच्या इतिहासात अन्याय असलाच पाहिजे अशी तात्त्विक आवश्यकता नाही. परंतु जर अन्याय असला, तर त्याचे निराकरण सुसंदर्भ आहे, ही जाणीव.
"काय बिघडले एक्स्ट्रा जबाबदारी घेतली तर" असे नव्हे. परंतु निव्वळ अराजकामुळे जे नुकसान होऊ शकते, तो आजकालचा समाज बारीकसारीक फरकांनी टिकल्यामुळे opportunity gain वेगवेगळ्या लोकांना कमी-अधिक होतो. म्हणजे जर अराजक झाले, तर सध्या श्रीमंत अशा बहुतेक लोकांचे नुकसान अधिक होईल, आणि सध्या दरिद्री अशा बहुतेक लोकांचे नुकसान थोडेच होईल. (*बहुतेक* कारण कल्पित अराजकात कोणी सध्या श्रीमंत गुंडसम्राट अधिक श्रीमंत होणार. परंतु सध्याच्या बहुतेक श्रीमंत लोकांचे नुकसान होणार.) हे नुकसान टाळण्याच्या व्यवस्थेची किंमत फायदा मिळतो त्या प्रमाणात दिली पाहिजे, म्हणून सध्या श्रीमंत लोकांनी व्यवस्थेवर अधिक खर्च करणे म्हणजे निव्वळ बाजारभावाने व्यवहार आहे. ("काय बिघडले" मध्ये "विकत घेतले त्याचे मूल्य किती" पेक्षा वेगळा भाव येतो.)

अरील इंग्रजी व्याख्या लिबर्टेरियनाने लिहिल्या असाव्यात. परंतु त्यामुळे त्यांनी केलेला शाब्दिक फरक पुरेसा नाही.
फ्रीडम आणि कोअर्शन (most concerned with freedom and coercion) यांच्या देवाणघेवाणीचे बाजार-विश्लेषण केले तर (viewing markets as the best way) ऑप्रेशन आणि सिव्हिलायझेशन हे निष्कर्षात येतात. त्यामुळे वरील तीनही वाक्यांत सामांतर्य आहे. परंतु ही बाब वरील इंग्रजी व्याख्यांत स्पष्ट होत नाही. असामांतर्य दाखवत असल्याचा भास होतो.

शिवाय ऑप्रेशन<->बार्बरिझम ; लॅक-ऑफ-ऑप्रशन<->सिव्हिलायझेशन हे पहिल्या दोन वाक्यांतील सामांतर्य स्पष्ट होत नाही. उलट जणूकाही काटकोनी (orthogonal) अक्ष असल्यासारखा भास होतो. तसे नव्हे.

ज्या घटकांना कन्झर्व्हेटिव्ह लोक सिव्हिलायझेशन+लॅक ऑफ ऑप्रेशन असे म्हणतात (सुव्यवस्थित घराच्या उंबरठ्यामागे डिव्हिजन-ऑफ-लेबरमध्ये आनंदाने राहाणारी स्त्री) नेमक्या त्याच घटकाला प्रोग्रेसिव्ह लोक बार्बरस ऑप्रेशन असे म्हणतात (बाहेर जायचे असून कमीपरतावा मिळणार्‍या घरगुती कामात राहाण्यास भाग पाडली गेलेली स्त्री). समांतर अक्ष असल्याचे कळले तर तर हा तत्त्वकलह जसा कळून येतो, तसा काट्टकोनी अक्ष मानून कळून येत नाही.

त्यामुळे वरील व्याख्यांमुळे होणारे भास समजण्या-उमजण्याच्या आड येतात - त्यांच्यात योग्य वर्णनाचे बीज असले तरीसुद्धा ते अडथळे होतात. म्हणून प्रतिसादाचे शीर्षक +/- असे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परंतु निव्वळ अराजकामुळे जे नुकसान होऊ शकते, तो आजकालचा समाज बारीकसारीक फरकांनी टिकल्यामुळे opportunity gain वेगवेगळ्या लोकांना कमी-अधिक होतो. म्हणजे जर अराजक झाले, तर सध्या श्रीमंत अशा बहुतेक लोकांचे नुकसान अधिक होईल, आणि सध्या दरिद्री अशा बहुतेक लोकांचे नुकसान थोडेच होईल. (*बहुतेक* कारण कल्पित अराजकात कोणी सध्या श्रीमंत गुंडसम्राट अधिक श्रीमंत होणार. परंतु सध्याच्या बहुतेक श्रीमंत लोकांचे नुकसान होणार.) हे नुकसान टाळण्याच्या व्यवस्थेची किंमत फायदा मिळतो त्या प्रमाणात दिली पाहिजे...

हा युक्तिवाद मी बऱ्याच वेळा केलेला आहे, पण गब्बर त्याला उत्तर देत नाही असा अनुभव आहे. सुव्यवस्था हे सर्वांनाच हवं असलेलं प्रॉडक्ट आहे, आणि त्याचं उत्पादन करण्यासाठी सरकार या कंपनीची स्थापना जागोजागी, वेळोवेळी झालेली आहे. या अ-अराजकात सहभाग म्हणजे सर्वांनाच बंधनकारक असलेली इन्शुरन्स पॉलिसी आहे. किंवा सरकार जर केवळ सुरक्षा पुरवण्याची व्यवस्था करणार असेल तर अधिक धोका असणाऱ्यांना अधिक प्रीमियम भरावं लागणं हेही बाजाराच्या नियमाप्रमाणे होतं असंही सांगून झालेलं आहे. तरीही त्यांना ही बाजारव्यवस्थाच श्रीमंतांची लूट करणारी वाटते. गेली कित्येक दशकं स्थिर असणारे जिनी इंडेक्स हे गरीबांचा आणि श्रीमंतांचा समान फायदा होतो याचा पुरावा म्हणूनही त्यांना पटत नाहीत.

तुमच्या युक्तिवादाला अधिक यश येवो ही सदिच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ते विकसित झाले तेच मुळी इतरांच्यावर अन्याय करून झाले

ह्याबद्दल :-

"महात्मा गांधींच्या सिद्धान्ताप्रमाणे 'गरिबी ही अनैसर्गिक स्थिती आहे. कोणी तरी शोषण करीत असल्याखेरीज गरिबी उद्भवूच शकत नाही. गरिबाच्या छातीवरून उठले तर दारिद्रय़ आपोआप दूर होते. "

हे मला खालील ठिकाणी सापडलं :-

http://www.loksatta.com/sampadkiya-news/mathematics-of-the-economy-high-...
http://bhaliraja.blogspot.hk/2013_07_01_archive.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रतिक्रिया देणाऱ्या सर्व पुरोगामी आणि श्रद्धावान (कुणी असेल तर) सर्वांना धन्यवाद. ऐसी अक्षरे वर पहिल्यांदाच एवढी प्रतिक्रिया मिळाली. हा लेख आजच्या नकली पुरोगामी लोकांबाबत लिहिला होता. हे लोक फक्त सेमिनार इत्यादी साठी किंवा NGO उघडून सरकारी आणि विदेशी मदत घेतात पण घरी त्यांचे व्यक्तित्व निराळे असते.

"हाण तेज्यायला!" हा पहिला प्रतिसाद मला अत्यंत आवडला. च्यायला पुण्यात राहत नाही नाही तर घरा समोर मोर्चा ही आला असता किंवा पुरोगामी लोकांनी धुऊन तरी काढले असते. शिवाय हे गणित आहेच.(या समीकरण मीच मांडले आहे),
विवाद + अप्रसिद्धी (प्रसिद्धी) = नाव लौकिक नाव, विवाद आणि पैसा

काही म्हणा 'काडी टाकून आग लावण्याचा' आनंद ही काही औरच असतो.
मला वाटते स्वामीजींना पुन्हा एकदा भेटले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरोगामी! (एक किस्सा) ह्या शीर्षकाचा माझाच एक धागा आहे.
http://www.aisiakshare.com/node/1563

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझा पण इतरत्र धागा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पाने