Skip to main content

मनातील छोटे मोठे प्रश्न -भाग ४५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा
------

अमेरीका ऊठ्सूठ हव्या त्या देशावर सँक्शन्स कसे लावू शकते? म्हणजे ते देश मूळात अमेरीकेचे मिंधे असतात म्हणून की अमेरीका फार पॉवरफुल आहे म्हणून?
उदा- उदा इराणच्या न्युक्लीयर डील वरच्या परीषदेनंतर, इराणवरचं "जागतिक बाजारपेठेत तेल विकू न देण्याचं" सँक्शन अमेरीकेने उठवलं. पण अमेरीकेने ते घातलच कसं in the first place???? :(

अनु राव Wed, 29/04/2015 - 14:10

उदा- उदा इराणच्या न्युक्लीयर डील वरच्या परीषदेनंतर, इराणवरचं "जागतिक बाजारपेठेत तेल विकू न देण्याचं" सँक्शन अमेरीकेने उठवलं. पण अमेरीकेने ते घातलच कसं in the first place???? >>>>>>>>

अमेरिका कोणाला फोर्स करत नाही इराण शी व्यवहार करू नये म्हणुन. ते त्यांच्या पुरता निर्णय घेतात. जागतीक व्यापराचा २५% भाग अमेरीका असल्या मुळे अमेरीकेचा निर्णय बाकीचे बरेच देश गुपचुप मानतात.

आणि काही देश गुपचुप मानत असल्याचे दाखवुन लपुन छपुन ( कींवा कायद्याचा आडमार्ग वापरुन ) सँक्शन असलेल्या देशांशी संबंध ठेवतात. जर्मनी हा त्यातला प्रमुख देश.

भारतातले भ्रष्टाचारी राजकारणी आणि क्रोनी भांडवलदार ह्या सँक्शन चा फायदा उठवून प्रचंड माया गोळा करतात.
इराक वर तेल विकायचे बंधन असण्याच्या वेळी, एका भारतीय माणसाने इराक मधुन स्वस्तात तेल विकत घेउन ( बार्ज मधुन आणुन ) ते भर समुद्रात उभ्या केलेल्या टँकर मधे उतरवून, दुसर्‍या देशातुन ते तेल आले आहे असे दाखवुन कायदेशीर रीत्या भारतीय सरकारी ऑइल कंपन्यांना विकले.

रेड बुल Thu, 07/05/2015 - 16:09

In reply to by अनु राव

तुमी इथे छापणारी माहिती कुठुन आणता हो ? धडाधड धडाधड... धबधबा सुरु... आर यु रनिंग अ प्रोफेशनल न्युज गॅदरिंग सर्वीस ओर समथिंग ? ही ते तेलाची खबर कुठुन काढलीत ?

अनु राव Mon, 11/05/2015 - 13:49

In reply to by रेड बुल

मी तुम्हाला त्या कंपनीचे नाव पण सांगू शकते, त्या कंपनीची कमी काळात कशी भरभराट झाली ते तुम्ही बघु शकता. ही गोष्ट माझ्या ऑईल टँकर वर काम करणार्‍या ( त्या कंपनीच्या नव्हे ) स्नेह्याकडुन कळली होती फार पुर्वी.

तुमी इथे छापणारी माहिती कुठुन आणता हो ?

डोळे आणि कान उघडे ठेवले आणि मेंदु बंद ठेवला नाही तर अगदी नको नको असलेली माहीती पण जमत जाते.

गब्बर सिंग Wed, 29/04/2015 - 14:50

सँक्शन अमेरिकेने घातलं कसं म्हंजे काय ? इराण लिबिया सँक्शन्स अ‍ॅक्ट आहे. खरंतर अमेरिकेत बनवलेले काही सॉफ्टवेअर सुद्धा इराण ला निर्यात करण्यास बंदी आहे/होती.

They do not make bones about the fact that they are powerful. इक्वॅलिटी वगैरे गेलं उडत. And international (political) system is a proper anarchy. Might is right there.

पिवळा डांबिस Thu, 30/04/2015 - 00:15

In reply to by गब्बर सिंग

सँक्शन अमेरिकेने घातलं कसं म्हंजे काय ?

मग काय! नाहीतर मग आम्ही इथे लोकशिक्षण कसं करणार?
सँक्शन घातलं म्हणून तर बहुसंख्य अमेरिकनांना आय-रॅन कुठे आहे ते कळलं, म्हायतै!!!

They do not make bones about the fact that they are powerful. इक्वॅलिटी वगैरे गेलं उडत.

बाकी हे आम्हाला खूप आवडतं! हीऽऽऽ हॉऽऽऽ!!!
:)

पिवळा डांबिस Fri, 01/05/2015 - 10:24

In reply to by नगरीनिरंजन

टेक्सासमध्ये वास्तव्य नसल्याने एकदाच!!!!
:)
ननिसाहेब, आधीच मराठी आंजावर एकमेव रिपब्लिकन म्हणुन बदनाम आम्ही!!!!

नगरीनिरंजन Fri, 01/05/2015 - 20:49

In reply to by पिवळा डांबिस

च्यायला.... चुकून श्रेणी दिली गेली. सवयीचा परिणाम! माफ करा पिडांसाहेब, लगेच गर्दभश्रोणित घालू नका. किती वेळा ते (म्हणजे गर्दभ) तरी हीऽऽऽ हॉऽऽऽ करणार? :-D
बाकी खवचट ही पॉझिटिव्ह श्रेणी आहे त्यामुळे ती द्यायला पॅसिव्ह ॲग्रेसिव्हपणा लागत नाही. "हीऽऽऽ हॉऽऽऽ" टेक्सन्स वरच्या कॉमेंटबद्दल ती बहाल केली होती.

गवि Wed, 29/04/2015 - 15:16

ज्या धाग्यांवर आजवर एकही प्रतिक्रिया आली नाही अश्या शून्यप्रतिक्रिया धाग्यांचे टाईपवार पर्सेंटेज खालीलप्रमाणे. एकूण शून्यप्रतिसादी धागे १७८.

यात चालू महिना (एप्रिल २०१५ यातील सर्व धागे वगळले आहेत, कारण त्यावर अजूनही प्रतिक्रिया येण्याची अंशतः शक्यता आहे.

कवितांमधे प्रतिक्रिया देण्याइतका रस एकूण कमी असतो का? कवितांचे धागेच ५० टक्के आहेत यात.

Type--Count--%
कविता 89 50%
ललित 25 14%
चर्चाविषय 18 10%
समीक्षा 12 7%
माहिती 8 4%
मौजमजा 8 4%
विकीपानांसाठी 5 3%
बातमी 4 2%
कलादालन 2 1%
छोट्यांसाठी 2 1%
भटकंती 2 1%
पाककृती 1 1%
वाविप्र 1 1%
संस्थळाची माहिती 1 1%
Grand Total 178 100%

आदूबाळ Wed, 29/04/2015 - 15:38

In reply to by गवि

चर्चाविषय 18 10%

हे निरीक्षण सर्वात आश्चर्यकारक, रोचक, इ. आहे.

या प्रतिसादशून्य धाग्यांची टाईम सीरीज क्ष अक्षावर ठेवल्यास जास्त रोचक निरीक्षण मिळेल.

शुचि. Wed, 29/04/2015 - 15:45

In reply to by आदूबाळ

हे निरीक्षण सर्वात आश्चर्यकारक, रोचक, इ. आहे.

अगदी हेच्च.
____
कविता खरच चार्मिंग असेल तरच मजा येते. नाहीतर वेळेचा अपव्यय वाटतो.

ऋषिकेश Wed, 29/04/2015 - 17:05

In reply to by गवि

कविता आणि ललित वाचले हमखास जाते, पण प्रत्येकवेळी छान, ठिक वगैरे ठराविक अल्पाक्षरी प्रतिसाद द्यायला नको वाटते. काही तपशीलवार म्हणायचे नसेल तर काहीवेळा चांदणी देतो फक्त

त्यात कविता सुमार वाटली तरी तशी टिका करताना ही कविता आपल्याला झेपलीच नसेल अशी शक्यताही मनाट डोकावते.
मग कशाला उगाच स्वत:ची शोभा करून घ्या असेही कधीकधी वाटते.

सिद्धि Fri, 01/05/2015 - 07:47

In reply to by ऋषिकेश

अगदी मी पण असेच करते . तेच ते प्रतिसाद देत बसण्यापेक्षा चांदणी देते. आणि बर्याच कविता ( आणि त्यांवरचे प्रतिसाद ) डोक्यावरून जातात .

पिवळा डांबिस Thu, 30/04/2015 - 00:26

In reply to by गवि

कवितांमधे प्रतिक्रिया देण्याइतका रस एकूण कमी असतो का? कवितांचे धागेच ५० टक्के आहेत यात.

कवींची (कवींची म्हणतोय, गविंची नव्हे! नायतर उगाच चिडाल!!) वीण मोठी असल्याने कविता भसाभसा येतात.
कुठे प्रत्येकीच्या बारश्याला जात बसणार?
:)

मिसळपाव Thu, 30/04/2015 - 18:30

In reply to by गवि

कवितांमधे प्रतिक्रिया देण्याइतका रस एकूण कमी असतो का?

तू फारशा वाचलेल्या दिसत नाहित त्या!!

नंदन Fri, 01/05/2015 - 12:59

In reply to by गवि

नेमकं निरीक्षण.
याचं उलट टोक म्हणजे 'ही बातमी समजली का?' म्हणता येईल.
(या मालिकेचे शंभर भाग उलटून गेले की काय करणार?, असा मन-esque प्रश्न मला कधी कधी पडतो ;))

गवि Wed, 29/04/2015 - 16:00


प्रकार 2011 2012 2013 2014 2015 मार्चपर्यंत Grand Total
कविता 16 32 23 15 3 89
ललित 3 4 5 12 1 25
चर्चाविषय 3 2 1 11 1 18
समीक्षा   4 6 1 1 12
माहिती 1 4   1 2 8
मौजमजा   1 1 5 1 8
विकीपानांसाठी       5   5
बातमी   2 1 1   4
कलादालन   1   1   2
छोट्यांसाठी     2     2
भटकंती     1 1   2
पाककृती   1       1
वाविप्र 1         1
संस्थळाची
माहिती
    1     1
Grand Total 24 51 41 53 9 178

गवि Wed, 29/04/2015 - 16:04

In reply to by गवि

यामधे त्या त्या प्रकारचे त्या त्या वर्षी किती धागे एकूण आले, आणि त्यातले किती अप्रतिसादित राहिले हेही महत्वाचं आहेच, पण ती माहिती मिळवणं कठीण आहे.

शिवाय यातल्या काही धाग्यांची जुळी भावंडे असतील आणि त्यांनी काही प्रतिसाद घेतले असतील तर तेही पहायला हवे. जनरली डबलप्रकाशित धागे अप्र होतात अशी प्रोसेस असेल तर मात्र जुळे धागे फारसे नसावेत.

आदूबाळ Wed, 29/04/2015 - 16:09

In reply to by गवि

गेटिंग अतीच रोचक. शून्यप्रतिसादी चर्चाविषयांना २०१४ मध्ये जोरदार स्पाईक आला आहे.

बादवे - एक जुनाच प्रश्न - आख्ख्या नोडची टेक्स्ट फाईल एका क्लिकात करता येते का? तसं असेल तर दोन चर्चाविषयांची तुलनाही करता येईल. (वापरलेल्या शब्दांची वारंवारिता, वगैरे)

गवि Wed, 29/04/2015 - 16:12

चर्चाप्रकार या विषयावर एकही प्रतिसाद न होता ते सुटले कसे? असा प्रश्न पडत असल्यास आणि इतिहास बदलावयाचा असल्यास ;) खाली त्या रोचक एटीन्सची यादी आहे:



प्रकार Title
चर्चाविषय शिक्षण
खात्यासारखीच
अन्य
खात्यांचीही
झाडाझडती
व्हायला हवी
चर्चाविषय विचार
आणि संस्कार
यातून माणूस
घडतो.
चर्चाविषय आई,
असं का ग
केलंस?
चर्चाविषय माहितीचा
अधिकार :
तोंडओळख
चर्चाविषय आमची
हद्दपारी
दिल्ली
-चंदिगडला
चर्चाविषय अरुणजोशीचे
दुर्दैव की
बैलाचे
दुर्दैव?
चर्चाविषय कानातली
कापुस
काण्डी
चर्चाविषय हे
सखे- शशी- वदने...
चर्चाविषय अबकी
बार शरद पवार?
चर्चाविषय चौबे
जी छब्बे
बनने चले....
चर्चाविषय एन
डी ए सरकारे
आणि
लोकसभेचे
(मराठी)
सभापती
चर्चाविषय आरक्षण
- आणखी किती?
चर्चाविषय उद्धटपणावर
इलाज
चर्चाविषय साईबाबा
होते तरी कोण?
चर्चाविषय निंदक
असती घरा |
आत्मविश्वासाचा
होई कचरा ||
चर्चाविषय बेडूक
आणि सर्प
चर्चाविषय बद्धकोष्ठ
/ मलावरोध
चर्चाविषय ही
बातमी समजली
का? - ५६

गवि Wed, 29/04/2015 - 16:31

या चर्चाविषयांची वाचने पाहिली असता ती तर्कापेक्षा बरीच जास्त दिसतात.

मुख्य मुद्दा असा की कवितांचे प्रतिसादशून्य धागे खरोखरच कंटेंट असलेले आहेत, पण बहुतांश चर्चाविषय (४-५ अपवाद वगळून) अन्यत्र हलवले गेलेले असल्याने तसे झालेले आहेत.

याचा अर्थ चर्चाविषय हा इटसेल्फ प्रतिसादशून्य ठरणारा विभाग नसावा.

पण तरीही इतकी वाचने कशी झाली हा प्रश्न पडलाच.



प्रकार Title वाचने
चर्चाविषय शिक्षण
खात्यासारखीच
अन्य
खात्यांचीही
झाडाझडती
व्हायला हवी
318
चर्चाविषय विचार
आणि संस्कार
यातून माणूस
घडतो.
344
चर्चाविषय आई,
असं का ग
केलंस?
577
चर्चाविषय माहितीचा
अधिकार :
तोंडओळख
549
चर्चाविषय आमची
हद्दपारी
दिल्ली
-चंदिगडला
303
चर्चाविषय अरुणजोशीचे
दुर्दैव की
बैलाचे
दुर्दैव?
513
चर्चाविषय कानातली
कापुस
काण्डी
434
चर्चाविषय हे
सखे- शशी- वदने...
339
चर्चाविषय अबकी
बार शरद पवार?
290
चर्चाविषय चौबे
जी छब्बे
बनने चले....
209
चर्चाविषय एन
डी ए सरकारे
आणि
लोकसभेचे
(मराठी)
सभापती
268
चर्चाविषय आरक्षण
- आणखी किती?
260
चर्चाविषय उद्धटपणावर
इलाज
160
चर्चाविषय साईबाबा
होते तरी कोण?
448
चर्चाविषय निंदक
असती घरा |
आत्मविश्वासाचा
होई कचरा ||
176
चर्चाविषय बेडूक
आणि सर्प
120
चर्चाविषय बद्धकोष्ठ
/ मलावरोध
415
चर्चाविषय ही
बातमी समजली
का? - ५६
274

गवि Wed, 29/04/2015 - 17:07

In reply to by घाटावरचे भट

कॉमेंट अन्यत्र हलवल्याने. वाचने मात्र तरीही भरपूर आहेत. कवितांबाबतच खरोखर रस नसल्यामुळे प्रतिक्रिया न देण्याचा प्रकार होत असावा. चर्चाविषयांमधे जवळजवळ सर्व ठिकाणी चर्चाविषय अन्यत्र हलवल्याने खुडला गेला आहे.

मयुरा Wed, 29/04/2015 - 23:42

मला काही पडलेले प्रश्न आहेतः
१) बोर्‍या वाजणे म्हणजे नक्की कोणत्या वाद्यावरुन शब्द प्रयोग आलाय का?
२) तालवाद्य, चर्मवाद्य आणि तंतुवाद्य ह्या मध्ये काय फरक आहे? म्हणजे मला असं वाटत होतं कि तालवाद्य मध्ये सगळ्या प्रकारची वाद्यं येतात.

-मयुरा.

चार्वी Thu, 30/04/2015 - 00:36

In reply to by मयुरा

१) फक्त वाद्यच वाजतात असं काही नाही. बाकीपण गोष्टी वाजू शकतात ;-)
मोल्सवर्थ-कँडींच्या मते बोर्‍या हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आलाय, आणि त्याचे अर्थ:
* A mat or matting made of the spikes of the Borassus, Wild date, Cocoanut, &c.
* a poor and mean enclosure.
* Poor, forlorn, destitute
वगैरे आहेत.
२) तालवाद्य, तंतुवाद्य आणि सुषिरवाद्य असे वाद्यांचे तीन मुख्य प्रकार. तालवाद्य म्हणजे तबला, ढोलकी, मृदुंग, डफ वगैरे थाप मारून वाजवायची, ताल देणारी वाद्यं. तंतुवाद्य म्हणजे सतार, वीणा, एकतारी अशी तंतू (तार) झंकारून वाजवायची वाद्यं. आणि सनई, बासरी तसंच पेटी (हार्मोनियम) ही वार्‍याचा खेळ करून (फुंकून किंवा भाता मारून) वाजवायची वाद्यं.
* चर्मवाद्य म्हणजे चामड्यापासून बनवलेली वाद्य.

राही Sun, 03/05/2015 - 15:04

In reply to by चार्वी

हिंदीत 'बोर्‍या-बिस्तर बांधना' म्हणजे चंबूगवाळे आवरणे. एखाद्या ठिकाणचे दाणापाणी संपल्यावर तिथून मुक्काम हलवण्याची तयारी करणे. सर्वस्वनाश झाल्यावर पलायन करावे लागते तेव्हा अंथरूण आवरून ठेवणे. बोर्‍या म्हणजे चटई किंवा बिस्तर. बोर्‍या वाजणे हा 'दिवाळे वाजणे' प्रकारातला वाक्प्रचार असावा. पूर्वी एखाद्याचे दिवाळे निघाल्याची बातमी दवंडी पिटल्यासारखी ढोल वाजवून जाहीर करीत. यामुळे सर्वांना त्याची नादारीची स्थिती कळून येऊन त्याच्याशी पुढचे व्यवहार थांबवणे लोकांना शक्य होई.
'बोरू' ही लेखणी एका गवतापासून बने. कदाचित याच गवतापासून बोर्‍या ही चटई बनत होती असेल.

राही Mon, 04/05/2015 - 14:19

In reply to by बॅटमॅन

बोरिया म्हणजे हिंदी आणि बंगालीत पोते असा अर्थ असेलही, किंवा असावाच. पण तसा अर्थ असेल तरच बोरिया-बिस्तर बाँधना याचा अर्थ आकळतो असे नाही. बोरी म्हणजे चटई, तट्ट्या या अर्थानेही उपरोल्लेखित म्हणीचा अर्थ उकलू शकतो. अंथरूण-पांघरूण मिळून बिस्तर बनत असेल तर अंगाखालची एक साधी चटई (पटकूर) आणि एक पांघरूण एव्हढ्याचे बिस्तर बनू शकते.'बिस्तर' शब्द एकलही म्हणजे बोरियाविरहित असाही वापरात आहे. उदा. 'चलो मुसाफिर बिस्तर बाँधो'वगैरे.

बॅटमॅन Mon, 04/05/2015 - 14:33

In reply to by राही

बिस्तर हा शब्द एकलही वापरात आहे हे मान्यच, पण तुम्ही म्हणता तसे वाटत नाही. कारण बिस्तर या शब्दात चटई वगैरे सर्व अंथरूणपांघरूण अनुस्यूत आहे. बाकीच्या सामानाकरिता बोरिया आहे. (आमच्या वैयक्तिक मते)

राही Mon, 04/05/2015 - 22:34

In reply to by बॅटमॅन

पोते या शब्दाच्या अर्थाचा एक वेगळा आस्पेक्ट लक्षात आला. हिंदीत झाडू-पोता करना म्हणतात. आपण पोतेरे करणे असे म्हणत असू. झाडू-पोता म्हणजे अर्थातच आधी केर काढणे व नंतर ज्यूटसम गवताच्या विणलेल्या कापडाच्या तुकड्याने जमीन पुसणे. मराठीतले पोतेरे थोडे वेगळे असे. गवताची एक जुडी/गड्डी/भारी(छोटा भारा)घेऊन त्याची हातात मावेल अशी जुडी बनवायची. मग मातीच्या जमिनीवर अथवा एखाद्या घमेल्यात शेण थोड्या पाण्यात कालवून ते या पोतेर्‍याने जमिनीवर सर्वत्र सारखे पसरायचे. हे सारवणे नव्हे. सारवणे हाताने करीत व त्यात शेणाचा लेप थोडा जाडसर असे. जमिनीचे पोपडे निघू लागले की असे जाडसर सारवावेच लागे. पोतेरे मात्र केव्हाही करीत आणि ते बहुधा शुद्धतेसाठी असे. म्हणजे शुभ कार्यासाठी, जेवल्यानंतर खरकटे सांडले असल्यास शुद्धीसाठी, देवघरातल्या रोजच्या पूजेआधी वगैरे. ज्यूट किंवा तत्सम गवत विणून त्याचे कापड बनू लागण्याआधीपासूनची ही प्रक्रिया असावी.
आणि पोती किंवा गनीबॅग्ज़ ह्यासुद्धा एक प्रकारच्या गवताच्याच असत. आजकाल मात्र त्या प्लॅस्टिकच्या असतात.

ऋषिकेश Tue, 05/05/2015 - 08:56

In reply to by बॅटमॅन

झाडू-पोता मुंबईततरी सर्रास वापरले जाते. उत्तरभारतीय लोकांकडून ते आले असावे.
उलट झाडू-पोछा हे पुण्यात आल्यावर ऐकले.

'न'वी बाजू Sun, 10/05/2015 - 03:16

In reply to by ऋषिकेश

एखाद्या मुंबईकराने/-करणीने चुकून क्वचित कधी चांगली हिंदी बोलल्यास त्यास/तीस चालत्या लोकलमधून ढकलून देण्यात यावे, असा काही अलिखित नियम असावा बहुतेक.

अर्थात, पुणेकरांचे हिंदी उत्कृष्ट असते, असा दावा नाही, परंतु पुण्यात मुदलात पुणेकरांस उपयुक्त म्हणता येण्याजोगी लोकलच नसल्याकारणाने, एखाद्या पुणेकराने चुकून कधी चांगली हिंदी बोलल्यास त्यास किमानपक्षी हे भय नसावे. सबब, पुण्यात आपण म्हणता तसा प्रत्यय येण्याची शक्यता तुलनेने अधिक.

शहराजाद Sat, 09/05/2015 - 23:18

In reply to by राही

मीही झाडू पोछा असेच ऐकले जास्त आहे. झाडू पोता ऐकले आहे ते हिंदी भाषिक नोकरांशी बोलताना मराठी लोकांच्या तोंडी.
पोता हे पोत्यासारख्या कापडाने पुसण्यावरून आलेले नसावे कारण हिंदी भाषिक पोत्याला पोता म्हणत नाहीत. लिपा- पोता मधला पोता'- लिंपणे/ सारवणे - यावरून आला असावा असे वाटते.

नितिन थत्ते Sun, 10/05/2015 - 08:06

In reply to by शहराजाद

म्हणजे हा झाडणे - सारवणे अशा अर्थी वापरला जाणारा शब्द असावा. दोन्ही शब्द बरोबरच आहेत. अरेरे. आता लोकलमधून ढकलून देणार तर.

घाटावरचे भट Thu, 30/04/2015 - 10:20

In reply to by मयुरा

चर्मवाद्य - चामड्यापासून बनलेली, सहसा आघात करुन वाजवायची वाद्य. यात जनरली सगळी तालवाद्य (ज्या वाद्यांचा वापर ताल देण्यासाठी होतो). पर्कशनसाठी मराठीत योग्य शब्द माहित नाही. पण खरं तर पर्कशनमध्ये ताल देण्यासाठी चर्मवाद्यांखेरीज इतरही भरपूर गोष्टी वापरतात.

तंतुवाद्य - तारा असलेली वाद्य. जसे सतार, गिटार, सरोद, वीणा वगैरे

शिवाय आणिक एक सुशीरवाद्य म्हणूनही प्रकार असतो. म्हणजे हवा फुंकून वाजवायची वाद्ये. अर्थात बासरी, सनई वगैरे.

घाटावरचे भट Thu, 30/04/2015 - 10:46

In reply to by अनुप ढेरे

असतं ना. पण वाजवायचं काम धातूच्या तारांवर असतं. आणि तसं पाहिलं तर सारंगीमधेही ज्यावर गज घासतात ती 'तांत' असते, तार नाही. ही तांत चामड्याची असते. रेझोनेटिंग तारा फक्त धातूच्या असतात. म्हणजे सारंगी हे चर्मतंतुवाद्य म्हणावयास हवे.

अंतराआनंद Thu, 30/04/2015 - 10:48

In reply to by अनुप ढेरे

सरोद मध्ये चामडं असतं? समजा असेल तरिही नाद उत्पन करण्यासाठी मुख्यत्वे ताणलेल्या तारा वापरतात. वाद्य लावतेवेळी याच तारांवरील ताण कमी जास्त करुन वाद्य जुळवले जाते म्हणून ते तंतूवाद्यच.
तबला लावताना ताणलेल्या चामड्यावरला ताण (थोड्या प्रमाणातच शक्य असते) कमीजास्त केला जातो.

ऋषिकेश Mon, 04/05/2015 - 10:44

In reply to by घाटावरचे भट

तंतुवाद्यात काही अधिक प्रकार असतात का?
म्हणजे सतार, गिटार, वीणा वगैरे तारांचा "झंकार" करणारी वाद्य?
तर व्हायोलिन वगैरेसारखी तारांन घासून आवाज उत्पन्न करणारी वाद्य?
--
बॅगपायपरसारखे वाद्य हे निव्वळ वार्‍यावर कंट्रोल्ड असते का?
===
हल्लीच्या इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या आगमनानंतर शास्त्रीय संगीताने काही कात टाकली आहे का? नवनव्या इलेक्ट्रॉनिक वाद्यांना व विविध स्वर निर्माण करणे काहिसे यांत्रिक (परंतु तुलनेने सुलभ) झाल्यानंतर तयार झालेल्या बदलांना भारतीय शास्त्रीय संगीतात काही बदल झाले आहेत का? का नाविन्यामुळे या वाद्यांना अजूनही कुत्सितपणे अव्हेरले जाते?

--

प्रश्न अज्ञानातून आहेत याची कल्पना आहे.

घाटावरचे भट Mon, 04/05/2015 - 13:21

In reply to by ऋषिकेश

>>हल्लीच्या इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या आगमनानंतर शास्त्रीय संगीताने काही कात टाकली आहे का?
मुख्य क्रांती - इलेक्ट्रॉनिक तानपुरा. हा डबा आजकाल बहुतांश गायक आणि वादक वापरतात. परदेश दौर्‍यावर वगैरे जाताना मोठे मोठे तानपुरे घेऊन जावे लागत नाहीत हा एक फायदा. दुसरा महत्वाचा फायदा हा की ट्यूनिंगची भानगड नाही. सगळेच गायक/वादक काही तानपुरा लावण्यात वाकबगार नसतात, त्यांना तर हे उत्तमच. आणि तिसरे म्हणजे एसी/पंखा/वारा यामुळे स्वर चढण्या-उतरण्याची भानगड नाही.

बाकी जे काही इलेक्ट्रॉनिक आहे (व्हायोलिन, सतार वगैरे) ते सगळं खूप प्रायोगिक तत्वावर आहे आणि जुन्या वाद्यांच्याच तत्वावर आधारित आहे. संपूर्णपणे नवीन आणि लोकप्रिय झालेलं असं काही मी तरी पाहिलेलं नाही.

>>नवनव्या इलेक्ट्रॉनिक वाद्यांना व विविध स्वर निर्माण करणे काहिसे यांत्रिक (परंतु तुलनेने सुलभ) झाल्यानंतर तयार झालेल्या बदलांना भारतीय शास्त्रीय संगीतात काही बदल झाले आहेत का? का नाविन्यामुळे या वाद्यांना अजूनही कुत्सितपणे अव्हेरले जाते?

फार फार तर वाजवण्याच्या पद्धतीत, वाद्यांत बदल होतील. मूळ संगीतात बदल होणे अवघड वाटते.

ऋषिकेश Mon, 04/05/2015 - 13:46

In reply to by घाटावरचे भट

आभार.

==
दोन गोष्टी माझ्या डोळ्यासमोर होत्या.

माझ्या डोळ्यासमोर ते कॅसिओवगैरे सारखे भरपूर कळा/पट्ट्या वगैरे असणार्या वाद्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिकली विविध फ्रिक्वेन्सीज निर्माण करून विविध वाद्यांचा आभास एकाच यंत्रातून उत्पन्न करु शकणार्या यंत्रांबाबत होते. अशा यंत्रांचा वापर कोणी शास्त्रीय संगीतासोबत करून घेतात का?

दुसरे असे की पारंपारिक वाद्यांमध्ये मानवी क्षमतेमुळे काही स्वर किंवा दोन विवक्षित स्वरांमधील प्रवास (उदा एखाद्या स्वरानंतर दुसरा एखादा स्वर पारंपारिक एखाद्या वाद्यात वाजवणे प्रचंड अवघड - मेकॅनिकल लिमिटेशन्स किंवा हात इतक्या वेगात या टोकाहून त्या टोकाला जाणे शक्य न होणे इत्यादी) अशक्य होता नी आता एकुणच नव्या कॅसियोसारख्या यंत्र्यांच्या रचनेमुळे ते आता शक्य होऊ लागले नी काही नवे प्रयोग झाले

--

हे सगळेच रँडम थॉट्स. कदाचित माझे अज्ञान अधिकच प्रकट व ऑब्व्हिअस करत असतील. पण अज्ञानाला असे प्रश्न विचारल्याशिवाय इलाज नाही.

घाटावरचे भट Mon, 04/05/2015 - 16:06

In reply to by ऋषिकेश

>>माझ्या डोळ्यासमोर ते कॅसिओवगैरे सारखे भरपूर कळा/पट्ट्या वगैरे असणार्या वाद्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिकली विविध फ्रिक्वेन्सीज निर्माण करून विविध वाद्यांचा आभास एकाच यंत्रातून उत्पन्न करु शकणार्या यंत्रांबाबत होते. अशा यंत्रांचा वापर कोणी शास्त्रीय संगीतासोबत करून घेतात का?

त्याला तर फ्यूजन म्हणतात. :-)

>>दुसरे असे की पारंपारिक वाद्यांमध्ये मानवी क्षमतेमुळे काही स्वर किंवा दोन विवक्षित स्वरांमधील प्रवास (उदा एखाद्या स्वरानंतर दुसरा एखादा स्वर पारंपारिक एखाद्या वाद्यात वाजवणे प्रचंड अवघड - मेकॅनिकल लिमिटेशन्स किंवा हात इतक्या वेगात या टोकाहून त्या टोकाला जाणे शक्य न होणे इत्यादी) अशक्य होता नी आता एकुणच नव्या कॅसियोसारख्या यंत्र्यांच्या रचनेमुळे ते आता शक्य होऊ लागले नी काही नवे प्रयोग झाले

यावर प्रतिक्रिया देण्यास माझे ज्ञान अपुरे आहे.

अंतराआनंद Tue, 05/05/2015 - 07:47

In reply to by ऋषिकेश

अलीकडे की-बोर्ड या तांत्रिक आणि अभारतीय वाद्यावर रागदारी वाजवली जाते पण त्याचं वादन पूर्ण स्वतंत्ररित्या केलेलं मी ऐकलेलं नाही. ते फ्युजन प्रकारात एक वाद्य म्हणून असतं. नाविन्यामुळे त्याला अव्हेरलं गेलंय असं न होता उलट ते नविन आहे त्यामुळे वादनाचा सांगीतिक दर्जा फारसा चांगला नसतानाही भरभरुन स्तुती झालेली ऐकलीय.

तंतुवाद्यांत गाण्याबरोबर वाजवला जाणारा स्वरमंडल हा प्रकार फारसा माहितीतला नाही. त्याचं वादन स्वतंत्र केलं जात नाही तर तंबोर्^याप्रमाणेच गाण्याला साथ म्हणून असतं. यावर जो राग गायचा असेल त्याचे स्वर जुळवले जातात आणि तंबोर्^याप्रमाणेच बोटांनी छेडून वाजवले जाते.

adam Tue, 05/05/2015 - 08:21

In reply to by अंतराआनंद

पुढील दुव्यावर वृम्दावनी सारंग आहे. मस्त वाटतो ऐकायला.
बहुतेक कीबोर्डवरच वाजवलेला आहे. बाकी काही असे. मस्त वाटतो ऐकायला.
.
.
https://www.youtube.com/watch?v=eRMa0r1NeLI

अनु राव Tue, 05/05/2015 - 13:45

In reply to by ऋषिकेश

हल्लीच्या इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या आगमनानंतर शास्त्रीय संगीताने काही कात टाकली आहे का? नवनव्या इलेक्ट्रॉनिक वाद्यांना व विविध स्वर निर्माण करणे काहिसे यांत्रिक (परंतु तुलनेने सुलभ) झाल्यानंतर तयार झालेल्या बदलांना भारतीय शास्त्रीय संगीतात काही बदल झाले आहेत का? का नाविन्यामुळे या वाद्यांना अजूनही कुत्सितपणे अव्हेरले जाते?

भारतीय शास्त्रीय संगीताच्या ज्या काही मुळ कल्पना आहेत त्या ह्या नविन इलेक्ट्रोनिक किंवा इलेक्ट्रीकल वाद्यांनी साकार करता येत नाहीत. त्यामुळे ह्या वाद्यांनी भारतीय संगीत वाजवणे हे १००% शक्य नाही.

सर्वात मूळ कल्पना जी भारतीय संगीत मांडते ती म्हणजे स्वरांचे स्थान प्रत्येक रागात सारखे नसणे. ही गोष्ट कुठल्याही तांत्रीक क्लुप्त्यांनी जमू शकत नाही. दुसर्‍या महत्वाच्या कल्पना म्हणजे एका स्वराला दुसर्‍या स्वराचा लगाव असणे, हे सुद्धा रागा नुसार बदलत असल्यामुळे एकच एक असा नियम ठरवून वाद्य निर्माण करता येत नाहीत.

भारतीय शास्त्रीय संगीतात काही बदल झाले आहेत का?

संगीतात बदल नाही झाले पण रीयाझ करणे सोप्पे झाले आहेत कारण इलेक्ट्रोनिक तबला आणि तानपुरा.

घाटावरचे भट Tue, 05/05/2015 - 14:00

In reply to by अनु राव

सर्वात मूळ कल्पना जी भारतीय संगीत मांडते ती म्हणजे स्वरांचे स्थान प्रत्येक रागात सारखे नसणे. ही गोष्ट कुठल्याही तांत्रीक क्लुप्त्यांनी जमू शकत नाही. दुसर्‍या महत्वाच्या कल्पना म्हणजे एका स्वराला दुसर्‍या स्वराचा लगाव असणे, हे सुद्धा रागा नुसार बदलत असल्यामुळे एकच एक असा नियम ठरवून वाद्य निर्माण करता येत नाहीत.

असे एक नवीन वाद्य आहे. त्याला काँटिन्युअम फिंगरबोर्ड असे म्हणतात. रेहमानच्या दिल्ली६ मधले 'रहना तू' ह्या गाण्यात त्याने हे वाद्य वापरले आहे. या वाद्यात आपले संगीत उत्तम वाजू शकेल असे रेहमान म्हणतो (म्हणतो कसला, त्याने त्या गाण्यात काय बडवलंन ते वाद्य. लै भारी!!)

अनु राव Tue, 05/05/2015 - 14:06

In reply to by घाटावरचे भट

जर की काढुन एकच कंटीन्युअस बोर्ड दिला तर तो वाजवणे सध्याच्या कीबोर्ड प्रमाणे सोप्पे रहाणार नाही. ते मग व्हॉयलीन /सारंगी किंवा सरोद सारखे होइल.
निष्कर्ष च जर काढायचा तर भारतीय शास्त्रीय संगीता साठी कुठलीही फ्रीक्वेंसी वाजवू शकेल अश्या प्रकारचे वाद्य तयार करायला पाहीजे.

घाटावरचे भट Tue, 05/05/2015 - 14:11

In reply to by अनु राव

>>ते मग व्हॉयलीन /सारंगी किंवा सरोद सारखे होइल.
हे वाद्य तसेच आहे. वाजवायला चक्क एक सपाट सर्फेस असतो.

>>निष्कर्ष च जर काढायचा तर भारतीय शास्त्रीय संगीता साठी कुठलीही फ्रीक्वेंसी वाजवू शकेल अश्या प्रकारचे वाद्य तयार करायला पाहीजे.
या वाद्यात शक्य आहे. शिवाय जरी अकूस्टीक वाद्याइतक्या सगळ्या फ्री॑वेन्सी नाही निघाल्या तरी कानाला फरक जाणवणार नाही इतपत फ्रीक्वेन्सीचं क्वांटायझेशन सहज खपून जावं. आणि त्यात परत इलेक्ट्रॉनिक असल्याने साऊंड प्रोसेसिङ्ग शक्य आहे, ज्याने वाद्याच्या वापराबाबत अनेक नवीन शक्यता निर्माण होऊ शकतात. अर्थात जर तुम्ही प्युरिस्ट असाल तर मग विषयच संपला.

अनु राव Tue, 05/05/2015 - 17:09

In reply to by घाटावरचे भट

>>ते मग व्हॉयलीन /सारंगी किंवा सरोद सारखे होइल.
हे वाद्य तसेच आहे. वाजवायला चक्क एक सपाट सर्फेस असतो.

हे वाद्य नक्की वापरता येइल शास्त्रीय संगीता साठी.
फक्त वरती सुरवात होताना, इलेक्ट्रोनिक वाद्यांमुळे शास्त्रीय संगीत वाजवणे सोपे होईल का असा प्रश्न होता, म्हणुन लिहीले की हे नविन वाद्य सारंगी , सरोद सारखे अवघड होइल.

एकुणच ह्या बाबतित प्युरीस्ट आहे मी, तसेही इलेक्ट्रॉनिक वाद्ये फुंकरीच्या जोराचा, हवेच्या दाबाचा, सारंगीच्या गजाच्या हालचालींचा इफेक्ट करू शकतील असे वाटत नाही. ( एलेक्ट्रॉनिकली लता मंगेशकर करता येइल, पण आशा भोसले करता येइल की नाही ते माहीती नाही, अख्तरी बाई वगैरे तर शक्यच वाटत नाही. )

अंतराआनंद Thu, 30/04/2015 - 10:37

In reply to by मयुरा

तालवाद्य म्हणजे ताल देण्यासाठी ( श्क्यतोवर ज्यात आघाताने आवाज उत्पन्न होतो अशी) वापरली जाणारी वाद्य. चर्मवाद्य हा तालवाद्यातील उपप्रकार आहे असं म्हणता येईल. चर्मवाद्य म्हणजे चामडे ताणून बसवलेली वाद्य.
उदा. तबला, ढोलकी, घटम ही तीनही तालवाद्य आहेत पण पहिली दोन चर्मवाद्य आहेत तर घट्म नाही.

(घटम म्हणजे मडक्यावर आघात करुन वाजवले जाणारे कर्नाट्की संगीतातले वाद्य.)

तंतुवाद्य म्हणजे ज्या वाद्यांमध्ये ताणलेल्या तारांनी नाद उत्पन्न केला जातो ती वाद्य. उदा सतार व्हायोलीन वैगेरे.
याशिवाय सुशीर वाद्ये ही असतात. ज्यात फुंकून, ह्वेच्या कंपनांनी नाद उत्पन्न केला जातो. उदा बासरी, सनई.

गब्बर सिंग Thu, 30/04/2015 - 06:47

चित्रपटात फन्नी सीन बघताना जोरदार हसणे हे शिष्टसंमत मानले जाते. ओके मानले जाते. पण सॅड सीन बघून रडणे ओके का मानले जात नाही ??

ऋषिकेश Thu, 30/04/2015 - 07:14

In reply to by गब्बर सिंग

कोण ओके नाही मानत?? न असेल तर न मानो! एखाद्या सीनमध्ये रडु आले तर रडायचे बिंदास! - मी रडतो.. अगदी डोळे-नाक पुशीत पुशीत, पण स्क्रीनवरची नजर ढळू न देता चित्रपट पाहतो.

हा जर तुमची रडायची स्टाईल भोकाड पसरायची असेल तर मात्र इतरांना डिस्टर्ब होईल, ते अशिष्ट ठरावे.

अन्यथा डोळे आपले, अश्रु आपले, भावना आपल्या.. वाहुद्या बिंदास! :P

नितिन थत्ते Thu, 30/04/2015 - 10:27

In reply to by गब्बर सिंग

म्हैलांनी रडणे शिष्टसंमत आहे त्यामुळे म्हैला बिन्दास रडतात पिक्चर पाहताना.
पुर्षांनी (खर्‍या दु:खातही) रडणं शिष्टसंमत नाही म्हणून चित्रपट पाहताना (काल्पनिक दु:खात) रडणं कुठून शिष्टसंमत असणार?

ऋषिकेश Thu, 30/04/2015 - 10:34

In reply to by नितिन थत्ते

असली शीष्टाशीष्टता पाळणारे गेले कुठे जायचे तिथे!
आमाला रडु आले की आमी रडणार! पुरूषमुक्तीचा... ;)

नंदन Thu, 30/04/2015 - 10:53

In reply to by ऋषिकेश

आमाला रडु आले की आमी रडणार! पुरूषमुक्तीचा... (डोळा मारत)

+१
स्वयंघोषित म्याचो लोकांच्या रिपब्लिकन पक्षाचे हाऊस स्पीकर जॉन बेनर तर इतक्यांदा रडतात, की त्यांच्यापुढे अलकाकाकू कुबलाई खान वाटाव्यात ;)

शुचि. Thu, 30/04/2015 - 17:27

अमेरीकेत, ज्या भागात शिकार्/मासेमारी मुबलक प्रमाणात चालते, तिथे सहसा प्रत्येक प्राण्याच्या/माशाच्या शिकारीची एक मर्यादा असते. म्हणजे एका मौसमात ५ हरीणे मारायला व ३ अस्वले, ४ कोल्हे मारायला परवानगी. वॉलाय मासा फक्त नेटीव्व्ह इंडीयन पकडू शकतात अन्य लोकांच्या गळास लागल्यास तो परत पाण्यात सोडून द्यायचा वगैरे.
.
हा निर्बंध तपासला कसा जातो उदा- मी एक कोल्हा मारला तर मी रजिस्टर करायचे असते काय? किंवा त्या जंगलातून बाहेर पडण्याच्या मार्गावर नाका असतो काय जिथे हजेरी लावावी लागते?

पिवळा डांबिस Sun, 03/05/2015 - 10:11

In reply to by शुचि.

उदा- मी एक कोल्हा मारला तर

आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे!!!!
कोल्हा म्हणजे काय नवरा नाही शुचिबै की समोर आल्याबरोबर हाणला!!! :)
कोल्हा फार इल्यूझिव्ह असतो मारायला....

Nile Fri, 08/05/2015 - 05:03

In reply to by शुचि.

अमेरीकेत अनेक राज्यांत शिकारीला परवानगी आहे. शिकारीचे वेगवेगळे हंगाम असतात आणि वेगवेगळे प्राणी, पक्षी वेगवेगळ्या हंगामात मारले जातात. 'गेम अँड फिश' खात्यातून शिकारीचे परवाने दिले जातात आणि अनेक राज्यांत यातून भरपूर महसूल दरवर्षी मिळतो. महसूलाबरोबरच प्राण्यांच्या संख्येवर काबू ठेवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. माझ्या माहितीप्रमाणे किती प्राणी मारायचे याचा परवाना नसतो. दर मोसमात किती परवाने द्यायचे हे ठरलेलं असतं.

संपादनः शिकारी मित्रांकडे चौकशी केली असता कळले की किती प्राणी मारायचे यावर, प्रति परवाना, बंधन असते. ठराविक काडतूसंच तुम्हाला दिली जातात, पाळत वगैरे ठेवली जाते. अवैध शिकार केल्यास बराच दंड आहे असे कळले.

काही ठराविक प्राणी/पक्षी इत्यांदींच्या शिकारीवर सामान्यांना बंदी आहे, मुख्य कारण त्यांची संख्या मुळात फार नाही. पण पारंपारिक लोकांना ही बंदी लागू नाही. उदा. गरूडाचे अवयव (पंख) वगैरे व्यापारावर बंदी आहे पण नेटीव्ह अमेरीकन लोकांचा हा पारंपारिक व्यवसाय असल्याने फक्त त्या वंशाच्या लोकांनाच याचा अधिकृत परवाना मिळतो. त्याच प्रमाने बंदी असलेल्या माशाची शिकार करताना तुम्हाला पकडले तर दंड होतो. पण याचा अर्थ असा नाही की ते प्रत्येक गळ तपासून पाहतात.

मयुरा Thu, 30/04/2015 - 21:03

छान माहिती दिलीत.

मग हार्मोनियम्/पेटी, पियानो, कॅसियो, हे कुठले वाद्य प्रकारामध्ये येतात?
हार्मोनियम- पंप ओर्गन म्हणजे कुठलं तरी वेगळचं वाद्य विकि वर दाखवतायत.
मग आपल्या पेटीला काय म्हणतात?

ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर गाणी ऐकत ऐकता असे प्रश्न पडतात..

तुम्ही कधी 'कुरियस जॉर्ज' ही अ‍ॅनिमेटेड सिरियल बघितली आहे का? त्यामध्ये जॉर्ज हे माकड असल्यामुळे काहीच बोलत नाही, सर्व अभिनय हालचाली आणि हावभाव व पाठी मागे फक्त पियानोचे सुर (म्हणजे असं मला वाटतं कि तो पियानो च असावा)एवढ्या वरच बेतलेला आहे.

आपली हिंदी आणि मराठी गाण्यामध्ये तर मुक्त हस्ताने व्हॉयलिनचा, पियानो, गिटार सारख्या विदेशी वाद्यांचा बेमालुम वापर करतात हे ऐकुन तर खुपच कुतुहल चाळवलं होतं. अर्थात ज्या त्या गाण्याच्या जातकुळी वरुन वाद्य ठरवत असावेत.

--मयुरा.

-

हार्मिनियम/ऑर्गन एकप्रकारची सुषिरवाद्यच. फक्त कंपनं निर्माण करण्यासाठी लागणारी हवा न फुंकता हातापायाने हापसायची एवढाच काय तो फरक.

नितिन थत्ते Fri, 01/05/2015 - 08:33

In reply to by आदूबाळ

+१
शिवाय त्या वाद्यांच्या रचनेमुळे त्यात कॉम्प्रेस्ड हवा काही प्रमाणात साठवली जाते आणि त्यामुळे सतत पंप न मारताही कंटिन्युअस आवाज येऊ शकतो. ते फुंकण्याच्या वाद्यात अवघड असते. बॅगपाईपमध्ये आणि टारपे यांत असते.
(मैफिलीत नायट्रोजन सिलिंडर नेला आणि त्याला रेग्युलेटर लावून तो ग्यास वापरला तर सनई, ट्रंपेट इत्यादी वाद्ये सुद्धा कण्टिन्युअस आवाजात वाजवता येतील).

घाटावरचे भट Mon, 04/05/2015 - 10:29

In reply to by मयुरा

>>मग हार्मोनियम्/पेटी, पियानो, कॅसियो, हे कुठले वाद्य प्रकारामध्ये येतात?

पियानो हे तंतुवाद्य आहे. संतूरसारखं तारांवर आघात करून वाजवायचं.

अजो१२३ Fri, 01/05/2015 - 17:01

In reply to by आदूबाळ

कर्ता करविता तो हो. मी काय केलंय? =)) =))
=================================================================
(सोर्स कोड पाहून टेबल जिथून सुरु होतो ते जिथे संपतो तिथपर्यंत पेस्ट केलं. मग नको असलेल्या ओळी डिलिट केल्या.)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/05/2015 - 21:53

In reply to by अनुप ढेरे

काहीतरी राहिलंय. अजोंच्या प्रतिसादात श्रेणीचा खोका प्रतिसादाच्या खालीच आहे. या प्रतिसादात बाजूला दिसतोय.

अतिशहाणा Tue, 05/05/2015 - 21:09

'अॅवेंजर - एज ऑफ अल्ट्रॉन' थेटरात स्वतःच्या दमड्या खर्च करुन पाहण्याजोगा आहे काय?

बॅटमॅन Wed, 06/05/2015 - 12:47

In reply to by अतिशहाणा

हो आहे. अगोदरपेक्षा अंमळ वेगळा आहे पण मला आवडला. काही धागेदोरे लगेच लागत नाहीत, पण वर्थ आहे. अ‍ॅक्षन सीन्स पहावेत तर थेट्रातच.

धर्मराजमुटके Wed, 06/05/2015 - 00:33

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या दूव्यावरील संघप्रार्थनेचे गायक कोण आहेत ? आवाज अतिशय आवडला. कोणत्याही प्रकारचे पार्श्वसंगीत नसले तरी कानांना गोड वाटतेय ऐकायला.

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 12:02

मोदीचे सरकार कुचकामी आहे हे सिद्ध झाले आहेच. आता अजून कोणीही केजरीवालाच्या सरकारबद्दल काहीही बोलताना दिसत नाही. त्यांची ७० वचनीय कहाणी कुठे आली आहे ते पाहण्यात कोणाला रस दिसत नाही. त्यांना ४ च महिने झालेत हे पाहून मला केवळ अजून ८ महिने वाट पाहायचा सोपस्कार उरला आहे (मग कुचकामी म्हणायचे) अशी भिती वाटू लागली आहे.

ऋषिकेश Thu, 07/05/2015 - 12:09

In reply to by अजो१२३

खरंय, इथे केजरीवालच काय कोणत्याही राज्यसरकारबद्दल तितकीशी चर्चा होताना दिसत नाही.
त्यातल्यात्यात (मराठी संस्थळ असल्याने?) महाराष्ट्रातील सरकारबद्द्ल थोडी चर्चा होते.

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 12:53

In reply to by गब्बर सिंग

https://www.google.co.in/search?num=50&site=&source=hp&q=modi+governmen…

https://www.google.co.in/search?num=50&q=modi+fails+church+attacked&oq=…

https://www.google.co.in/search?num=50&site=&source=hp&q=modi+governmen…

टोटल लिंका खूप आहेत. शौरी, विपक्ष नेते, त्यांचे स्वतःचे भाऊ, विचारवंत, आर एस एस, गोल्ड मॅन सॅक्स... चर्चवरचे अटॅक, स्लगिश इकॉनॉमी, लँड बिल, विजिंटिंग पी एम, राज्य सरकारांच्या टिका(आमच्या दिल्ली सरकारचं तर म्हणे सगळंच केंद्रामुळे खोळंबलंय - केजरीवालची पत्रे वाचा),...नेताजीच्या फायली, दाउद परत आणणे, काळा पैसा... जाऊ देत. किती लिंका पाडायच्या?

गब्बर सिंग Thu, 07/05/2015 - 13:21

In reply to by अजो१२३

अजो,

अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा
भयेन च प्रव्यथितं मनो मे ।
तदेव मे दर्शय देव रूपं
प्रसीद देवेश जगन्निवास ।।45।।

तुमचे विश्वरूप दर्शन बघून मी भयभीत झालेलो आहे. तेव्हा मूळ रूपात वापस या.

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 13:54

In reply to by गब्बर सिंग

=)) =)) =))
==================================================================================
मोदी सरकार फेल आहे कि नाही यावर माझं स्वतःचं मत काहीच. मूळात इतक्या व्यापक विषयावर भाष्य करण्याची माझी पात्रताच नाही. पण हे सिद्ध करायचा अनेकांनी चंग बांधला आहे आणि तशी यशस्वी वातावरण निर्मिती देखिल केली आहे. ती देखिल सत्याधारित. अशा प्रयत्नांना आपण दाद नको का द्यायला?

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 23:07

In reply to by ऋषिकेश

हेच वाक्य श्रेणी ऐवजी श्रोणी शब्द वापरून आणि वाक्याचा टोन थोडा लाभलोभात्मक करून वाचलं तर ऋषिंदांची काय मस्त प्रतिमा डोळ्यासमोर तरळते. (कृ. ह. घेणे.)

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 15:30

In reply to by गब्बर सिंग

विकासाच्या नावावर निवडून येऊन मोदी सरकारने दुसरेच उद्योग आरंभले आहेत. हिंदुराष्ट्र स्थापायची पहिली पायरी काय? प्रि-अ‍ॅंबलमधून (प्रिअँबल मंजे घटना कि नाही यावर कोर्ट नेहमी कोलांट्या उड्या मारत असतं, म्हणून प्रिअँबल) सेक्यूलर शब्द उडवणे. तर तो उडवून कशी थातूरमातूर उत्तरे देत आहेत पहा. देश सेक्यूलरच नाही उरला तर तो सरकारचा फेल्यूअर नाही का?
http://indianexpress.com/article/india/india-others/ad-shows-constituti…

नितिन थत्ते Thu, 07/05/2015 - 15:40

In reply to by अनुप ढेरे

स्पष्टीकरण.

विकासाच्या नावामुळे त्यांना भाजपच्या* कोअर मतांपेक्षा पुढची मतं मिळाली असतील.
*भाजपची कोअर मतं म्हणजे "तुम्हाला रसातळाला नेणार" असं सांगितलं असतं तरी मिळाली असती अशी मतं. ही सामान्यतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मिळतात. या मतांमध्ये त्यांच्या "माचो" इमेजमुळे काहीशी वाढ झाली असेल (किंवा नवमतदारांची मतं आकर्षित झाली असतील).

अनुप ढेरे Thu, 07/05/2015 - 15:54

In reply to by नितिन थत्ते

भाजपाला १० कोटी मतं जास्तं मिळाली गेल्या (२००९) च्या निवडणुकांपेक्षा. ७ कोटी वि १७ कोटी. हे ७ कोटी कोअर मतदार धरले (जे २००९ या भाजपासाठीच्या वर्स्ट निवडणुकांमध्येही त्यांच्याबाजुने उभे राहिले) तरी नवे मतदार त्यांच्यापेक्षा बरेच जास्तं आहेत. आणि या नव्या लोकांचा उद्देश 'त्यांना' संपवणं हा नाही असं मला वाटतं. ( असता तर ते गेल्यावेळेलाही भाजपामागे उभे राहिले असते.)
आणि हे खासदारांनाही माहिती आहे की आपल्याला स्वतःच्या/ भाजपाच्या नाववर मतं मिळाली नसून मोदींच्या नावावर मिळाली आहेत. म्हणून मोदींविरोधात ओपनली कुरकुर कोणी करत नसावं.

नितिन थत्ते Thu, 07/05/2015 - 18:06

In reply to by अनुप ढेरे

>>खासदारांनाही माहिती आहे की आपल्याला स्वतःच्या/ भाजपाच्या नाववर मतं मिळाली नसून मोदींच्या नावावर मिळाली आहेत.

हे तर उघडच आहे. पन ही मतं विकास होणार आहे म्हणून मिळालेली नाहीत. ती (तरुण मतदारांना सहज आकर्षित करणार्‍या) माचो* इमेजमुळे मिळाली आहेत.

ही माचो इमेज "त्यांच्यावर" वचक रहावा, पाकिस्तानने कुरापती काढू नयेत, चीनने आपल्याला घाबरावे अशा अनेक आशांनी बनली आहे.

बॅटमॅन Thu, 07/05/2015 - 18:11

In reply to by नितिन थत्ते

पण 'त्यांच्या'पैकीही अनेक तरुणांनी मोदीला मते दिलेली आहेतच की. त्यांचं काय?

बेसिकली- वाढीव मतसंख्येचा स्प्लिट कसा आहे याबद्दल काही विदा, विशेषतः धर्माच्या अँगलने मिळाल्यास पाहिजे आहे.

अनुप ढेरे Thu, 07/05/2015 - 18:15

In reply to by नितिन थत्ते

पन ही मतं विकास होणार आहे म्हणून मिळालेली नाहीत.

हे कसकाय कॉन्फिडंटली म्हणता? की सगळ्या नव्या मतदारांनी माचो इमेजला मतं दिली? जर असं असतं तर त्यांनी स्वत:ला विकासपुरुष म्हणून का प्रोजेक्ट केलं? गुजरात विकासाची जाहिरात का केली?

नितिन थत्ते Thu, 07/05/2015 - 19:31

In reply to by अनुप ढेरे

सगळी मतं नव्हे. नवमतदारांमधली बरीच मतं.

केवळ माचो इमेजचा प्रचार केला असता तर खूपशा (मनातून माचोपणा हवा आहे पण उघडपणे तसं म्हणवत नाही अशा) सुशिक्षित लोकांची मोदींना उघडपणे पाठिंबा देताना कुचंबणा झाली असती. तसेच उद्योगपतींना सुद्धा उघडपणे मोदींची बाजू घेणे जमले नसते (जसे शिवसेनेला उघडपणे पाठिंबा देताना ते कचरतात). विकासाच्या फसाडमुळे या लोकांना मोदींची भलामण करणे शक्य झाले आणि त्याच्या पाठिंब्यामुळे कुंपणावरच्या काही लोकांची मतं सुद्धा वळली.

(उदाहरण म्हणून मी संस्थळावरचे काही आयडी दाखवू शकतो. त्यांना दोन कॅटेगरींमध्ये विभागता येईल. एक उघड हिंदुत्ववादी-कोअर मतदार आणि हिंदुत्ववादी असलेले पण उघडपणे मात्र विकास-विकास करणारे).

अनुप ढेरे Fri, 08/05/2015 - 11:07

In reply to by नितिन थत्ते

कुंपणावरचे 'काही' लोक हे १० कोटी होते का? असतील तर त्यांनी विकासाच्या 'फसाड'ला भुलुनच मतं दिली ना?

अजो१२३ Fri, 08/05/2015 - 11:39

In reply to by नितिन थत्ते

हे तर उघडच आहे. पन ही मतं विकास होणार आहे म्हणून मिळालेली नाहीत. ती (तरुण मतदारांना सहज आकर्षित करणार्‍या) माचो* इमेजमुळे मिळाली आहेत.
ही माचो इमेज "त्यांच्यावर" वचक रहावा, पाकिस्तानने कुरापती काढू नयेत, चीनने आपल्याला घाबरावे अशा अनेक आशांनी बनली आहे.

भाजपचा खरा आणि एकमेव माचो मॅन एल के अडवाणी होते. ते कधीच पंतप्रधान बनू नयेत याची जबरदस्त काळजी पक्षातल्या, विरोधकांतल्या, देशातल्या, देशाबाहेरच्या व्हेस्टेड इंटेरेस्टनी घेतली. (ते मोदीरुपाने बूमरँग होईल याची कल्पना तेव्हा नसावी.)
तेव्हा आणि २००४ ते २०१४ मधे माचो नेते आवडणारे तरुण पैदा करणार्‍या फॅक्टर्‍या बंद झाल्या होत्या का?
------------------------------------------------------------------------------------------------------
मोदी कधीच माचो नव्हते. त्यांनी फक्त २००२ च्या दंग्यासाठी माफी मागीतली नाही, टोपी घातली नाही हे प्रकार केले. आणि हो, मोदींनी २०१४ पूर्वी देशपातळीवर जिंकायचे असल्यास "त्यांची" (रीड मुस्लिम) मते मिळवण्यासाठी काय काय करत होते याच्या बातम्या विसरलात का? सद्भावना?

पाकिस्तानने कुरापती काढू नयेत ----------सुयोग्य मुद्दा. यासाठी मोदीभक्त झालेले लोक असू शकतात.

चीनने आपल्याला घाबरावे -----------------चीनने ? भारताला? भारतात सरकार बदलले म्हणून?
------------------------------------------------------------------------------------------------------------------
नितिनजी, जे ऑब्विअस आहे त्याला रिफ्यूट करू नये. आर्ग्यूमेंटस नको तिथे जातात. अपवाद म्हणून मोदींचे २०१४ च्या निवडणूकीतले कोणतेही एक भाषण तुमच्यातला काँग्रेसी स्विच ऑफ करून सश्रद्धपणे ऐका. भाषण संपल्यावर पुन्हा स्विच ऑन करा. विकास न झाल्याने पिढ्यान पिढ्या बर्बाद होत आहेत, तरुण पिढीला त्याची मोठी किंमत द्यावी लागते हेच ते सांगत होते.
मोदींवरचे प्रेम फेसबूक आणि वॉस्सॅपवर कैच्या कै फॉर्‍वर्ड पाठवून लोकांनी त्यांना प्रसिद्ध केले मंजे तिच त्याची टोटल इमेज नव्हे. विकास जरा काँप्लेक्स मुद्दा आहे. त्यावर कंटेंट फॉरवड करणं अवघड असतं. माचोगिरी सोप्पी असते कळायला. म्हणून त्याचे जास्त फॉर्वार्ड येतात.
दॅट शुड नॉट बी द बेसिस ऑफ जजमेंट.

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 19:55

In reply to by नितिन थत्ते

भाजपची कोअर मतं म्हणजे "तुम्हाला रसातळाला नेणार" असं सांगितलं असतं तरी मिळाली असती अशी मतं. ही सामान्यतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मिळतात.

१९८४ मधे म्हणे काय झालं होतं? कोअर हिंदुत्ववादी अचानक एका निवडणूकीसाठी सोवळं फेडून का टाकतील?
http://en.wikipedia.org/wiki/Indian_general_election,_1984
१९८४ - ७% मते.
http://www.firstpost.com/politics/bjps-31-percent-vote-share-heres-who-…
२०१४ -३१%

थत्तेंना ७% आणि ३१% मधे फरक दिसत नाही का?

नितिन थत्ते Thu, 07/05/2015 - 23:16

In reply to by अजो१२३

१९८४ मध्ये भाजपने गांधीयन समाजवादाची कास धरलेली होती. मिलिटंट हिंदुत्ववाद हे अडवाणी अध्यक्ष झाल्यावरचे धोरण होते. ज्यामुळे बाबरी मशीद पाडण्याचा मुद्दा घेऊन अडवाणींनी रथयात्रा काढली. १९८९ मध्ये लगेचच त्याचा दृष्य परिणाम दिसला. [मी राजकारण १९७७ पासून फॉलो करत आहे].

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 23:30

In reply to by नितिन थत्ते

१९८४ मध्ये भाजपने गांधीयन समाजवादाची कास धरलेली होती.

अडवाणी तेव्हा नव्हते?
तुमचा राममंदिराला विरोध आहे म्हणजे भाजपा १९९१ ला मिलिटंट झाली असे होत नाही. त्यांचे एकच शाश्वत तत्त्बज्ञान आहे. आणि १९९१ ला भाजप मिलिटंट झाली तर २०१५ एक्ट्रामिलिटंट झाली? काय दाखले आहेत?

----------------
१९८४ मधे गांधीयन समाजवाद अचानक स्वीकारला मंजे काय केलं? (अडवाणींनी जीनांची तारीफ केली तशी काही घटना)? आणि केलं असतं तर काँग्रेसचे जे सुज्ञ शहाणे पुरोगामी सेक्यूलर इ इ कोअर मतदार आहेत ते काँगी कारभाराला कंटाळून भाजपला मत का देत नव्हते? कि तत्त्वज्ञान सोडले कि मतदान सोडले हा प्रकार फक्त भाजपचे कोर मतदार करतात? काँगी कोर तत्त्वज्ञानाचे चिकार लोक असणारच ना. मते स्वॅप नको क व्हायला?

नितिन थत्ते Fri, 08/05/2015 - 12:00

In reply to by अजो१२३

१९९१ कुठून आले?
तुम्ही वाक्य डिस्टॉर्ट करत आहात (किंवा बिट्समध्ये वाचता आहात). १९८४ मध्ये अचानक समाजवादाची कास धरली नव्हती. (You should give due credit to me for being around and sufficiently grown up during that time).

१९८० मध्ये जनता पक्षातून फुटून (माजी जनसंघीयांनी) भाजपची स्थापना केली. तेव्हापासून १९८४ च्या पराभवापर्यंत गांधीयन सोशालिझम स्वीकारला होता. पराभवानंतर अध्यक्ष असलेल्या बाजपेयींनी राजीनामा दिला आणि अडवाणी अध्यक्ष झाले. त्यांनी १९८७-८८ पासून मिलिटंट हिंदुत्वाचा पुरस्कार केला. जनसंघ हा हिंदुत्ववादीच होता. परंतु सत्ता मिळत नव्हती. १९७७ मध्ये जनता पक्षात सामील होऊन सत्ता मिळाल्यावर (भारतात समाजवादाला पर्याय नाही असे वाटून) कदाचित समाजवादाची कास धरून सत्ता मिळेल असे वाटले असेल.

१९८४ मध्ये मते कमी होण्याचे समाजवाद हे जसे कारण होते तसेच इंदिरा गांधींची हत्या-सहानुभूती + राजीव गांधी यांनी 'बदल घडवण्याचा मनोदय' व्यक्त केल्याने काही अधिकची मते मिळाली.

>>काँगी कारभाराला कंटाळून भाजपला मत का देत नव्हते? कि तत्त्वज्ञान सोडले कि मतदान सोडले हा प्रकार फक्त भाजपचे कोर मतदार करतात? काँगी कोर तत्त्वज्ञानाचे चिकार लोक असणारच ना. मते स्वॅप नको क व्हायला?

काँगी कारभाराला कंटाळलेले लोक भाजपला मत देत नाहीत. तिथे तत्त्वज्ञान आड येतेच. असे लोक काँग्रेसचे सब्स्टिट्यूट असलेल्या जनता दल, तेलगु देसम, दोन द्रमुक, आप यांना मते देतात.

१९८४ ते १९९८ या काळात भाजपला बर्‍याचशा ओबीसी समाजाला कडव्या हिंदुत्ववादात ओढण्यात यश मिळाले आहे. ही वाढ विकासासाठी मुळीच नव्हती. ही १९९८ पासूनची भाजपची कोअर मते आहेत. त्यांच्यात मार्जिनल वाढ/घट होऊ शकते पण मोठा फरक होत नाही. २००४ मध्ये, २००९ मध्ये सुद्धा ही मते भाजपलाच मिळाली असणार.
.
.
अपूर्ण

अजो१२३ Fri, 08/05/2015 - 10:51

In reply to by नितिन थत्ते

१९८४ मध्ये भाजपने गांधीयन समाजवादाची कास धरलेली होती.

टाईम नियतकालिकाच्या निमित्ताने मोदींनी खूप सौम्य, मवाळ, अहिंदू, सेक्यूलर, प्रो-मायनॉरिटी इ इ विधाने केली आहेत. मायनोरिटींना कोणी काही बोललं तरी आम्ही कार्वाई करू, इ इ . हे सगळं ते गांधीवादी समाजावादापेक्षा पुळचळ वाटणार कोअर लोकांना. म्हणून आता २०१९* ला पुन्हा भाजपला ७% मते मिळणार का?
============================================
* आमचा आशावाद.

अजो१२३ Thu, 07/05/2015 - 23:22

In reply to by अजो१२३

तर १९८४ मधे गाठलेला नीचांक, भाजपची कोर मते, मंजे कोणी ७% भारतीय. घासकडवींकी मानो तो धार्मिकता १९८४ पासून कमी झाली असल्याने आता २०१५ मधे ६.५% च असतील. बाकीची मते विकास अपेक्षीणारांची.

६.५% चे असे गट -
१. ३.४९% - देशभरातले मुस्लिमद्वेष्टे ब्राह्मण (३ १/२ % ब्राह्मणांपैकी उर्वरित ०.०१% उच्चशिक्षित, संतुलित, सेक्यूलर, सर्वसमाग्रही, पुरोगामी, इ इ. ज्यांची व्याख्याने ऐकायची, टीवीवर प्रोग्राम पाहायचे, पुस्तके वाचायची, इ इ )
२. ०.०१% - आपला राष्ट्रवाद सिद्ध करण्यासाठी धोकादायक विपरित टोकाला गेलेले मुस्लिम.
३. २.५% - वरचे ३.४९% लोक ज्यांना मूर्ख बनवू शकले ते अन्य सवर्ण हिंदू.
४. ०.५% - वरचे ३.४९% लोक ज्यांना मूर्ख बनवू शकले ते अन्य अवर्ण हिंदू ज्यांना अजूनही आपला काळा इतिहास नीट माहित नाही.
===================================================================================
कोण्या सिडोसिक्येलराच्या ब्रेनची अ‍ॅनॉटमी काढली तर हीच गणिते बाहेर पडणार याची खात्री.

नितिन थत्ते Thu, 07/05/2015 - 23:31

In reply to by अजो१२३

>>घासकडवींकी मानो तो धार्मिकता १९८४ पासून कमी झाली असल्याने

बेसिकच घोळ आहे. तुम्ही धार्मिकता = कम्युनालिझम समजताय.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/05/2015 - 01:56

In reply to by अजो१२३

सगळे (चर्चात किंवा देवळात जाणारे) धार्मिक लोक कम्युनल किंवा मूलतत्ववादी असं रिचर्ड डॉकिन्सही म्हणणार नाही. आणि मी त्याला कडवा, मूलतत्ववादी नास्तिक समजत होते.

अजो१२३ Sat, 09/05/2015 - 14:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बारोमीटर असा शब्द देखिल त्या वाक्यात प्रयोजिला आहे. कम्यूनल लोक धार्मिक लोकांचा एक सबसेट आहेत. मूळ सेट रोडावला आहे असे म्हणू जाता सबसेट देखिल रोडावला असेल असे म्हणावयास जागा आहे.
========================================================================
लोक घासकडवी प्रगतीमुळे धार्मिकता आणि अस्तिकता कमी होते आहे म्हणतात तेव्हा विश्वास ठेवतात. पण त्याच वेळी प्रगतीमुळे कम्यूनिलिझम कमी झाला आहे हे नाकारतात हे विरोधाभासी आहे.

नितिन थत्ते Sat, 09/05/2015 - 18:12

In reply to by अजो१२३

>>कम्यूनल लोक धार्मिक लोकांचा एक सबसेट आहेत.

हेही गंडलेलं लॉजिक आहे. महंमद अली जिन्ना (आणि .....) वॉज हार्डली रिलिजस

'न'वी बाजू Sat, 09/05/2015 - 20:09

In reply to by अनुप ढेरे

दोघांमध्ये काय फरक आहे? दोघांनीही एकच "टू नेशन थियरी" (कदाचित प्रताधिकारभंग टाळण्याकरिता?) जरा वेगवेळ्या शब्दांत मांडली की! हं, जीनांनी ती जरा जास्तच स्पष्ट शब्दांत मांडली - 'साटल्य' वगैरे त्यांना कळत नसावे - इतकेच.

(अतिअवांतर: तसेही, वरील विधान थत्तेचाचांचे वरिजनल नसावे. जावेद अख़्तर यांनी इतरत्र ते जाहीरपणे केलेले आहे.)

(अतिअवांतर: 'आपण मुसलमान नाही, निरीश्वरवादी आहो', असेही प्रतिपादन श्री. जावेद अख़्तर यांनी अन्यत्र जाहीररीत्या केल्याचे कळते. असो.)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/05/2015 - 06:01

In reply to by 'न'वी बाजू

जावेद अख्तरच कशाला (आपले!) सदानंद मोरेसुद्धा 'लोकमान्य ते महात्मा'मध्ये वारंवार या साम्याबद्दल बोलतात.

प्रताधिकारभंग - हा हा हा

---

लोक घासकडवी प्रगतीमुळे धार्मिकता आणि अस्तिकता कमी होते आहे म्हणतात तेव्हा विश्वास ठेवतात. पण त्याच वेळी प्रगतीमुळे कम्यूनिलिझम कमी झाला आहे हे नाकारतात हे विरोधाभासी आहे.

घासकडवी प्रगती आणि कम्युनलीझम या दोन्हींचा संबंध जोडताना मलातरी दिसले नाहीयेत ब्वॉ!

घासकडवी पूर्ण देशाचे आकडे दाखवून प्रगती वगैरे म्हणतात. त्याच वेळी अमर्त्य सेन वगैरे लोक गरीब-श्रीमंतामधली दरी वाढते आहे असं म्हणतात. ("समाज नावाची गुंतागुंत" असे शब्द डोक्यात आले की श्रावण मोडकांची फार आठवण येते.)

'न'वी बाजू Sun, 10/05/2015 - 06:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रताधिकारभंग - हा हा हा

नाहीतर काय! बोलूनचालून दोघेही बालिष्टरच. Plagiarismचा आरोप टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायची ते चांगलेच ठाऊक असणार दोघांसही.

परी Thu, 07/05/2015 - 13:56

माणसाला नेहमीच काही न काही स्वप्न पडतात.काही चांगली काही न आवडणारी.काही पूर्वी कधीतरी आयुष्यात घडून गेलेल्या घटनांच्या संदर्भात तर कधीकधी भविष्यात घडणाऱ्या घटनांच्या संदर्भात, कधी सर्वाना सांगता येण्यासारखी तर कधी कुणाजवळ काहीही बोलता न येण्यासारखी. हा धागा काढून आपण अशीच स्वप्न शेअर करूयात किंवा जाणून घेऊयात.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१००+ प्रतिसाद झाल्यास नवीन धागा सुरु करण्यात येईल.

तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद मीलेल अशी अपेक्षा.

व्यवस्थापकः याला पुरेसा प्रतिसाद मिळाल्यास स्वतंत्र धागा काढला जाईल. तोवर असे अल्पाक्षरी विचार 'मनातील विचार व प्रश्न' या धाग्यांवर व्यक्त करावेत.

अमेय संजय Thu, 07/05/2015 - 15:08

In reply to by परी

लहान असताना मला सतत घरातल्या व्यक्तींची मयत झाल्याची स्वप्ने पडत. नक्की आठवत नाही पण १ली-२रीत असताना कधीतरी मी पहिल्यांदा मयत हा प्रकार पाहिला आणि मग त्या बायकांच रडणं वैगरे डोक्यात बसलं. आणि तिथून पुढे मग सारखी अंत्यविधीची स्वप्ने पडू लागली. माझ्या वडिलांचा अंत्यविधी मी खुपवेळा स्वप्नात पहिला.

limbutimbu Thu, 07/05/2015 - 15:26

In reply to by परी

स्वप्ने अनेक पडतात, काहींना पडतात, काहींना अजिबात पडत नाहीत. कित्येक स्वप्ने उठल्यावर लक्षातही रहात नाहीत, तर काही कित्येक वर्षे आठवणीत रहातात. काहींना स्वप्नांबरहुकुम भविष्यात घटना/दृष्ये दिसु शकतात.
माझ्याबाबतीत मी पाच मिनिटे डुलकी जरी काढली, अगदी लोकल ट्रेन/बसमधिल गोंगाटात, तरीही मला स्वप्न पडते, किंबहूना स्वप्नाशिवाय अशी झोप मी अनुभवतच नाही. (कुंडली/ज्योतिष शास्त्रानुसार याचे विशिष्ट ग्रहयोग असतात).
अशीच काही आठवणीतील भविष्यसूचक स्वप्ने व स्वप्नाप्रमाणे हुबेहुब घडलेले प्रसंग/दृष्ये इत्यादी:
१) स्वप्नात मी एक मोठा खूप फड्यांचा नाग पाहिला, बघताना मी सुरवातीस दचकलो होतो, पण नागाच्या फडेखालील पिंडी बघितल्यावर स्वप्नात देखिल शांत झालो होतो. साधारणतः सहाएक महिन्यांनी मी कुटुंबियांसमवेत स्कूटरने वेळणेश्वर व पुढे हेदवी येथे गेलो असताना वेळणेश्वर येथील शंकराचे मंदिरातीत प्रवेश केल्या केल्या स्वप्नात बघितलेला तोच नाग, तशाच स्वरुपात समोर दिसला, तितकाच दचकलो, स्वप्नाची आठवणही तत्क्षणी झाली, व पिंडी बघितल्यावर भिती नाहिशीही झाली.
२) असेच एकदा स्वप्नात मी समुद्र किनार्‍यावर फिरत असताना मला पुढे पाउल टाकताना एक संगमरवरी पिंडी दिसली, खरेतर स्वप्नातच त्या पिंडीवर पाय पडणार होता, तो मी मागे घेतला, पिंडी हातात उचलली, सोबत कोणतरी होते, विचारले घेऊन जायची का घरी, बरोबरची व्यक्ति नको म्हणाली, मी पिंडी खाली ठेवली, कुणाचा पाय लागू नये म्हणून थोडी पुरलीही... नंतर लगेच स्वप्नाच्याच पुढील भागात मी कासाविस होऊन जीवाच्या आकांताने तिच पिंडी शोधत होतो, सापडली नाही, अन स्वप्न भंगले.
त्यानंतर वर्षाच्या आतच मी व थोरला भाऊ मुम्बईला कामाला गेलेलो असताना हाताशी वेळ होता म्हणून दादर चौपाटीवर गेलो असताना स्वप्नात जे जे जसे घडले तसेच घडत गेले, व पिंडी पुरल्यानंतर उगाच पुरली असे वाटून केवळ दहा वीस पावले पुढे गेलेलो मी उलट्यापावली परत फिरुन पिंडीचा शोध घेऊ लागलो पण अजिबात सापडली नाही, अन तेव्हाच या स्वप्नाचीही आठवण झाली. आज (१९९३) नंतर इतक्या वर्षांनीही मी त्या संगमरवरी पिंडीकरता कासावीस होतो.
वरील दोनही स्वप्ने जेव्हा पडली, तेव्हा जागे झाल्यावर दुसरे दिवशी आई/भाऊ यांचे बरोबर त्यावर चर्चा केली होती.

अशी कित्येक स्वप्ने पडली की जी आगामी घडणार्‍या घटनांची "रंगित तालिम" असल्याप्रमाणे होती व तशीच्या तशी घटना भविष्यात घडलेली पाहिली. वेळ मिळेस त्याप्रमाणे इथे सांगेन.

त्याव्यतिरिक्त, स्थळकाळवर्तमान, पूर्वायुष्य, मनातील विचार, वाचन, टीव्ही/सिनेमा वगैरेतील दृष्ये, वगैरे वगैरे कशाचाही संबंध येत नसलेली असंख्य स्वप्ने रोजच्या रोज पडत असतात, काही लक्षात रहातात, काही तत्काळ विसरली जातात.

स्वप्ने का पडतात यावर माझा अभ्यास नसला तरी अनुभवाने व धार्मिक/सश्रद्ध विचारसरणीमुळे त्यामागची अंशतः कारणमिमांसा थोडीफार कळू लागली आहे असे जाणवते.

अमेय संजय Thu, 07/05/2015 - 16:34

In reply to by परी

एकदा मी स्वप्नात एका अनोळखी गावात एकटाच भटकत होतो. त्या गावातल्या गल्ल्या-बोळं, रस्ते अजुन बऱ्यापैकी लक्षात आहेत. गावात एक कालवा देखील होता आणि शंकर-पार्वती यांची सुरेख कोरिवकाम असलेली दोन दगडी मंदिरे शेजारीशेजारीच होती. गांवकऱ्यांच्या मते दोन्ही मंदिरे प्राचीन होती अणि कुठल्याश्या राजाचा शिलालेख सुद्धा त्यांनी मला दाखवला. वर उल्लेख केलेला कालवा मंदिराच्या मागील बाजूसच होता. आणि गांवाचे नाव 'कोंडापूर'
असे होते.
त्यानंतर मी गूगलवर कोंडापूरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर पुण्याजवळ नगर महामार्गावर कोंडापुरी नावाचे गाव दिसले. त्या गावाबद्दल विशेष काही सापडले नाही. नंतर खूप दिवसांनी ऐसीवर आंध्रप्रदेश मधील कोंडापूर वर एक लेख आलेला दिसला आणि पुन्हा माझी जिज्ञासा जागृत झाली. कोंडापूरचा उल्लेख उत्खननाच्या संदर्भाने आल्यामुळे तर मी आणखीनच पेटुन माहिती गोळा करू लागलो.पण नंतर योगायोग समजून नाद सोडून दिला. भविष्यात कधीतरी जाण्याची इच्छा आहे.

अस्वल Thu, 07/05/2015 - 22:19

In reply to by परी

काही वर्षांपूर्वी स्वप्नं लिहून त्यांची एक डायरी करत होतो.
जवळपास ५ महिने हा उद्योग केल्यावर काही गोष्टी जाणवल्या त्या अशा
एक म्हणजे मला फार कमी स्वप्न लक्षात रहातात. सकाळी उठलो की १५ मिनिटांपर्यंतच स्वप्नांचे तपशील ध्यानी असतात, नंतर विरून जातात. काही वेळा मी सकाळी उठल्यावर किंवा रात्री जाग आल्यावर स्वप्नं रेकॉर्ड केली तर ती चांगली लक्षात राहिली. बरेचदा ३ key words लिहून ठेवले आणि सकाळी उठल्यावर त्यांचा विस्तार केला.
.
सगळी स्वप्नं रंगीत होती. काही वेळा सिनेमातल्या कॅमेराप्रमाणे मला स्वप्नातल्या गोष्टी घडताना दिसल्या (प्रचंड वेगाने हवेतून सूर मारणं/ पाण्याखालून जाणं/ अवकाश यानातून दिसणारी पृथ्वी वगैरे.
.
काहीच तारतम्य नसलेली स्वप्नं सर्वात जास्त होती. माझ्या ओळखीचे लोक स्वप्नांत होते पण तर्कसंगत वागणूक नव्हती. उदा. एका स्वप्नात मी माझ्या भावंडांबरोबर टेनीस खेळत असताना मार्टिना नवरतिलोवा आम्हाला पोहे खायला बोलवत होती. मग तिने आमच्याशी चर्चा करून आम्हाला आमच्या चुका सांगितल्या. हे माझ्या काकांना कळल्यावर ते खूप चिडले. इ.इ.
ह्या सगळ्या स्वप्नांत अनोळखी व्यक्ती होत्या पण त्यांचे चेहेरे आठवत नाहीत.
.
स्वप्नातलं स्वप्न -अशाप्रकारची ३-४ स्वप्नं पडली होती. म्हणजे मी कुठेतरी आहे, काहीतरी करतोय. त्यातून धक्का बसून उठल्यावर जाणवतं की मी एका हॉटेलच्या खोलीत झोपलोय. तिथे काही गोष्टी घडतात. आणि नंतर जाग आल्यावर कळलं की तेही स्वप्नच, आपण घरातच आहोत.
.
स्वप्नातल्या हालचालींचा खर्‍याखुर्‍या हालचालींशी ताळमेळ असतो.
उदा. एका स्वप्नात मी जिन्यावरून खाली उतरत असताना डोळे उघडायचा खूप प्रयत्न करूनही मला डोळे उघडता येत नाहीत. त्यामुळे घाबरून जाऊन मी जेव्हा खाली पोचतो तेव्हा कळतं की मी खरोखरच जागं व्हायचा प्रयत्न करतोय आणि डोळे उघडणं शक्य होत नाहीये.
.
ह्या धाग्यामुळे माझी डायरी उघडून पाहिली तर बरीच चित्रविचित्र स्वप्न लिहिल्याचं आढळलं, ह्या धाग्याबद्दल धन्यवाद!

बॅटमॅन Fri, 08/05/2015 - 00:08

In reply to by अस्वल

नवरातिलोव्हासारखा एकदा माझ्या स्वप्नात टोनी ग्रेग आला होता. घराच्या मागच्या बाजूस बाग आहे तिथे एका झाडाच्या ओंडक्यावर बसून तो दै.पुढारी वाचत होता, मग आम्ही त्यातल्या एका क्रिकेटविषयक बातमीबद्दल थोडी चर्चा केली. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांत बोललो.

सकाळच्या तुलनेत या दैनिकाची प्रतिमा पुण्यामुंबैकडे चांगली नाहीये, पण आमच्या भागात (दक्षिण महाराष्ट्र) हा पेपर लय फेमस आहे आणि चांगलाही आहे. उगा बोलायचं काम नाय. साले संध्यानंदशी कंपेअर करतात लोक याला *****. यातल्या विश्वसंचार सदरामधल्या अनेक गोष्टी नंतर चेक केल्या तेव्हा खर्‍याच होत्या असे आढळले.

नितिन थत्ते Thu, 07/05/2015 - 15:32

In reply to by परी

व्यवस्थापकः याला पुरेसा प्रतिसाद मिळाल्यास स्वतंत्र धागा काढला जाईल. तोवर असे अल्पाक्षरी विचार 'मनातील विचार व प्रश्न' या धाग्यांवर व्यक्त करावेत.