इश्क मजाजी से इश्क हकिकी तक

"अज्ज आपणे दिल दरिया दे विच्च
मैं आपणे फूल प्रवाहे..."
...... साहिर गेला आणि अमृताने ही अशी आदरांजली वाहीली. पंजाबी मध्ये एक टप्पा आहे,
"कच्ची कंद उते काणा ए...
मिलणा तू रब नु तेरा प्यारा त़ा बहाणा "
...ज्याचा अर्थ आयुष्य एखाद्या मातीच्या कच्च्या भिंतीसारखं आहे ... भेटायचं तर त्याला ( देव/ ईश्वर/ जगद्नियंता, आकाशीचा बाप यापैकी कोणीही, काहीही) आहे तुझं प्रेम हे फक्त एक निमित्त आहे त्यासाठीचं....

अमृता इमरोज़च्या पत्रव्यवहारात अमृताने एक उल्लेख केला आहे. ती नेपाळला गेली असता एका शायरने एक फारसी शेर पेश केला. अमृता म्हणते, " जीती ," (अमृता इमरोज़ला जीती म्हणत असे) " जीती, तो शायर शेर म्हणत होता आणि माझ्या नजरेसमोर मीच येत होते. तो शेर आता मला तंतोतंत आठवत नाही. पण त्याचा अर्थ आठवतो आहे. वाळवंटात आपल्याला मृगजळ दिसतं. जे लोकं आपली तहान भागवण्यासाठी आपण त्या चमकणाऱ्या वाळूलाच पाणी समजून त्याच्या पाठी धावत रहातो. तळमळत,तडफडत राहतो. लोक असं म्हणतात" ," रेत रेत होती है पानी नही बन सकती, और कुछ सयाने लोग उस रेत को पानी समझने की गलती नही करते... वे लोग सयाने होंगे, लेकीन मै कहता हूं,
जो रेत को पानी समझनेकी गलती नही करते, उनकी प्यास में ही कोई कमी होगी, उनके होंठों पर वह शिद्दत नहीं होगी...सच मेरे जीती! मुझे वो सयानापन नही चाहीए...मुझे अपनी प्यास मुबारक है, चाहे सारी उम्र मुझे रेगिस्तान में भटकना पडे... मेरे छलावे .मेरे सयाने पन में कोई कसर हो सकती है ,पर प्यास में नहीं...."
हे साहिरवरचं प्रेम बोलत होतं... जे प्रेम तिच्याच भाषेत 'रबसे मिलने का बहाना' होतं... हे प्रेम तिला दिवसेंदिवस आध्यात्माकडं घेउन जात होतं....उर्दूमध्ये यासाठी फार छान शब्द आहे... अमृताचं हे साहिरप्रेम...प्रेमाचा शोध, त्यातून स्व चा शोध घेत असताना तिचा रस्ता, 'इश्क मजाजी'(भौतिक प्रेम) कडून 'इश्क हकीकी' (आध्यात्मिक प्रेम) कडे घेऊन गेला...आणि अमृताच्या कविता, कथा वाचल्यावर हे लक्षात येईल... 'एक थी अनिता', लाल मिर्च', 'दिल्ली की गलियाँ' यांसारख्या गोष्टी लिहीणारी ती नंतर ' शक्ति कणोंकी लीला', 'इश्क सहस्त्रनाम', 'इश्क अल्लाह् हक़ अल्लाह्' यांसारख्या गोष्टी, कथा लिहू लागली...

याचंच एक छोटसं उदाहरण.... साहिर नसताना त्याच्या आठवणीत अमृताने पुष्कळ कविता लिहील्या...

"लिख जा मेरी तकदीर मेरे लिए
मैं जी रही हूँ तेरे बिना तेरे लिए
हर्फ मेरे तड़प उठते इसी तरह
सुलगते हैं यह सितारे रात भर जिस तरह ..."
आणि मग जसजसा काळ पुढे गेला.... पक्व होत गेलेलं तिचं प्रेम हे असं बोलू लागलं...

"साईं !तू अपनी चिलम से
थोड़ी सी आग दे दे
मैं तेरी अगरबत्ती हूँ
और तेरी दरगाह पर मैंने
एक घडी जलना है ..."

अमृता नुसतीच लेखक/कवी आहे असं म्हणता येणार नाही...पक्व, प्रगल्भ प्रेम कसं असतं याची एक मिसाल आहे ती....एवढंच!

~ अवंती

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

इथे ऑडिओ (mp3) फाईल कशी डकवतात? हे वाचून महागुरू एक चार वाक्य बोलून फारसी भाषेतला त्या शेराची कहाणी सांगितलेत ते इथं द्यायचंय
(मी महागुरूची अज्जिबातच फॅन नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी)

आम्ही अस्सेच आहोत

माणूस सातत्याने वेदनामय स्थितीत राहू शकत नाही. कदाचित अमृताने इतकं तीव्र प्रेम केलं असेल, की साहीर यांच्या मृत्यु पश्चात, ती स्वतः एक मूर्तिमंत वेदना झाली असेल. मनाचेही काही डिफेन्सिव्ह मेकॅनिझम असावेत. जसे अध्यात्मात solace सापडणे. त्या मार्गाने तिचा प्रवास झाला असेल.
______
यातून मला तिच्या heightened, अलौकिक अनुभव, भावना आणि वृत्ती अजिबात trivialize करायची नाही. एवढेच म्हणायचे आहे की अतिदु:खानेंतर, अतिवेदनेनंतर एक टप्पा येतो जेव्हा वेदनेचे मूळच, एखाद्या larger than life महत्त्वाकांक्षेमध्ये म्हणा घटनेमध्ये surrender केले जाते. अमृताकरता हा solace, शिरडीचे साई निघाले, जो की योगायोग नसावा. तिची समर्पणशील वृत्ती अधिक higher channel मध्ये प्रवाही राहीली.
_____
लेख परत एकदा अतिशय आवडला. योग्य तितक्याच शब्दात मांडला आहे. शब्दबंबाळही नाही. हर्फ = पत्रे. ह्म्म्म रात्रीच्या तारकां जशा ठिणगीसम जळत रहातात, तशी ही पत्रे, जी साहीर असतेवेळी जी अमृताने उत्कट प्रेमाने, अभिलाषेने वाचली असतील, ज्यांच्यावरती जीव तिने पाखडला असेल. ती आता साहीरच्या मृत्युपश्चात, चिरंतन विरहामध्ये, रात्रभर वेदनेने ठसठसत राहात.
___
एखाद्याने किती उत्कटपणे, भावुकतेने आणि समर्पित वृत्तीने प्रेम करावे याचे मूर्तिमंत उदाहरण दिसतात या कवियत्री. का नाही ईश्वर सापडणार अशांना!
________
समांतर अवांतर - अमृताची कुंडली नेटवर सापडली ज्यात कन्येचा शुक्र (प्रेम) आणि कर्केचा मंगळ (वासना, अभिलाषा) दोन्ही नीचीचे आहेत. अध्यात्माचा कारक कर्क (पुष्य नक्षत्रातील)-गुरु उच्चीचा आहे. लग्न मिथुन असल्याने, अशा लोकांच्या, reputation भागात मीन राशी येते जी scandalous, glamours किंवा अध्यात्मिक reputation दाखविते. खरं तर अमृताच्या स्वप्नां, दृष्टांतां संदर्भात, नेपच्यु-चंद्र व शुक्राचे योग पहायचे होते. पण अंशात्मक स्थिती सापडली नाही.

आभारी आहे.

आम्ही अस्सेच आहोत

साहिर अमृता न भेटले असते किंवा एकत्र आले असते तरकाय याहीबद्दल लिहीन...

आम्ही अस्सेच आहोत

ओके. वाट पहातेय. पण हे जर-तर नक्की कोणत्या बेसिस वरती लिहीणार?

अवंती, मिसळपाववरती, अरुंधतीने केलेला अमृता प्रीतम यांच्या "नौ सपने" या कवितेचा सशक्त अनुवाद तुम्ही वाचल आहेत का? नसेल तर - http://www.misalpav.com/node/15577

गुरु नानक यांच्याबद्दल, त्यांच्या आईने काय विचार केला असेल, ते अमृता प्रीतम लिहीतात-
.

मोहाच्या तारेत आकाश गुंडाळता येत नाही
सूर्य बांधता येत नाही
सत्यासारखी एक जी गोष्ट
त्याचं अंगडं-टोपडं ना बेतता येतं ना शिवता येतं... ''

.
.
.

कोणी मृत्युलोकीचा योगी
अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला
शेकत गर्भाची धुनी...

.

छान लिहितेयस अवंती . पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत