आजचे दिनवैशिष्ट्य - ७

दिनवैशिष्ट्य दाखवतय: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जन्म २१ जून १८६१...माझ्या मते ती तारीख आहे २९ जून १८७१..https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/khand4-suchi?id=7562:2011-12-24-09-01-18&catid=4:2010-10-21-05-11-34

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

माहिती बरोबर आहे. धन्यवाद. दुरुस्ती करतो आहे.
(धागा योग्य ठिकाणी हलवतोही आहे.)

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मृत्युदिवस : कादंबरीकार नाथमाधव (१९२८)

माझ्या लहानपणी मी नाथमाधवांच्या पुस्तकांचा लय मोठा फ्यान होतो. (वीरधवल, स्वराज्याची घटना वगैरे काही पुस्तकं मला जायदाद स्वरूपात मिळाली होती. त्या पुस्तकांच्या नव्या - सध्या मिळणार्‍या आवृत्या अनेक वर्षांनंतर छापल्या गेल्या.) ती पुस्तकं आजीसमोर वाचायला लागलो, की आजी नाक मुरडत असे. कारण विचारल्यावर तिने सांगितलेली एक आठवण.

नाथमाधव उर्फ द्वारकानाथ पितळे शनिवार पेठेत ज्या गल्लीत** राहात तिथे माझ्या आजीचं बालपण गेलं. ती गल्ली तशी सुनसानच असे. ही सगळी पोरं गल्लीतच खेळत असत. त्या गल्लीतल्या घरांची जोती थोडी उंच होती. त्या जोत्यांवर चढून आत घरात काय चालू आहे ते ही पोरं खिडकीतून बघत. घरांतले लोक अर्थातच वैतागून पोरांच्या अंगावर धावून येत, त्यांना हाकलून द्यायचा प्रयत्न करत. पण नाथमाधव तसं करू शकत नसत - कारण ते पायांनी अधू होते. पण त्यांनी कधी या पोरांशी विशेष प्रेमाने वागल्याचं तिला आठवत नव्हतं. उलट थोडेफार वसकतच असत.

**त्याच गल्लीत नाट्यछटाकार दिवाकरही राहात. त्यांचंच नाव त्या गल्लीला दिलं आहे. त्या बोळकांडीचा अजून एक 'क्लेम टु फेम' म्हणजे रा स्व संघाचं पुण्यातलं कार्यालय - मोतीबाग - या गल्लीच्या तोंडाशी आहे.

*********
आलं का आलं आलं?

आज २२ जूनला (१९८७) महान आणि प्रचन्ड लोकप्रिय नर्तक फ्रेड अस्टेअर यान्चा म्रुत्यु झाला....

Woody Allen: "You could argue that the Fred Astaire film is performing a greater service than the (Ingmar) Bergman film, because Bergman is dealing with a problem that you're never going to solve. Whereas Fred Astaire, you walk in off the street, and for an hour and half they're popping champagne corks and making light banter and you get refreshed, like a lemonade."

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

अ‍ॅपल विरुद्ध ऑरेंजेस तुलना वाटली मला. मला कोणाची कला श्रेष्ठ वाटते हे व्यक्तीसापेक्ष आहे.

आल्फ्रेड किन्सी फार जबरदस्त व्यक्तिमत्व होत...परवा "र. धों. कर्वे आणि 'वंडर वूमन'" लेखात त्यान्चा उल्लेख आहेच...

"...(अल्फ्रेड) किन्सीने आपल्या खास नेमक्या आणि फटकळ शैलीत म्हटल्याप्रमाणे : "ऑरगॅझम मिळवण्याच्या दृष्टीने, हस्तमैथुनाचं आणि आंजार-गोंजारण्याचं (petting) तंत्र हे अगदी संभोगाच्या तंत्रापेक्षाही अधिक विकसित झालेलं आहे."..."

शिवाय हे एक खट्याळ पीटर अर्नो चे मिश्किल चित्र पहा...बाई विचारतायत त्याची बायको आहे का....

Peter Arno The New Yorker 1 May 1948
सौजन्यः The New Yorker, 1 May 1948

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

"मृत्युदिन - रासायनिक खत उद्योगाचे शिल्पकार गोविंद पांडुरंग काणे (१९९१)'

महामहोपाध्याय आणि भारतरत्न, History of Dharmashastra ह्या पाच खंडातील बृहद्ग्रन्थाचे निर्माते डॉ.पांडुरंग वामन काणे ह्यांचे गोविंद पांडुरंग काणे हे थोरले पुत्र. हयांनी लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधून इंधन वायूंच्या ज्वलनाचा अभ्यास ह्या विषयामध्ये पीएच.डी. पदवी मिळवली होती.

आर डी बर्मन अर्थात पंचमचा वाढदिवस सोमवारी आहे. पंचमचे संगीत कोणाला आवडत नाही? माझा शाळकरी मित्र महेश केतकर याने आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी १५-१६ वर्षांपूर्वी पुण्यात पंचमबरोबर काम केलेल्या कलाकारांना बोलवून ते कार्यक्रम करायला सुरुवात केली. जून २७ला आणि त्याच्या पुण्यतिथीनिमित्त(जाने ४) देखील तो कार्यक्रम असतो, पुण्यात, टिळक स्मारक येथे. मी काही कार्यक्रमांना गेलो होतो, त्याबद्दल येथे लिहिले होते.

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

अभिनेता जॉन कुसॅक

ह्म्म्म आवडतो मला. There is something gentle as well as gentleman like about him. कर्क-सूर्य आहे नो वंडर.
टॉम हॅन्क्स बद्दलही सेम टू सेम. There is something gentle as well as gentleman like .... तोसुद्धा बहुतेक कर्क-सूर्य आहे.
.
पण ओह माय गॉड!!! सर्वात हॉट रिचर्ड जेरे. कन्या-सूर्य. या कन्या राशीच्या लोकांचं आणि माझं काय आहे कळत नाही. आतापर्यंत जे कोणी खरच फार आवडलय मग स्त्री अथवा पुरुषात त्यांची चंद्र किंवा सूर्य रास कन्या आहेच , including Keanu Reeves
.कन्येच्या लोकांतही काहीतरी नम्र, impeccable mannerisms हळूवार , आणि shy/reserved/held back Biggrin असतं & that drives me MAD!!!. पण फार judgemental असतात ब्वॉ SadSad नो वंडर बुध (विवेक, तारतम्याचा कारक) त्या राशीचा अधिपती आहे.
आणि कन्येच्या विरुद्ध १८० डिग्री , मीन रास अज्जिबात judgemental नाही. सर्वसमावेशक, सहानुभूती असलेली, करुणा, प्रेम, स्पिरिच्युअल रास.
.

https://s-media-cache-ak0.pinimg.com/736x/63/98/8d/63988d0becae7d2a55802aeb6bed51a3.jpg

.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कसला वै वै दु दु??? Smile

"दुर्बिण वापरून चंद्राचे पहिले छायाचित्र काढणारा थॉमस हेरियट (१६२१)" असा 'आजचा मृत्युदिन' सदरातील उल्लेख जरा खटकला. थॉमस हेरियटच्या काळात छायाचित्रणाचे शास्त्र अवगत झाले नव्हते. १६०९ पासून त्याने दुर्बिणीतून चन्द्राकडे पाहीन चन्द्राची पेन्सिल-शाईची चित्र काढण्यास सुरुवात केली. येथे पहा.

'१९७२ : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व बेनझीर भुत्तो यांनी ऐतिहासिक सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.'

बेनझीर? नाही झुल्फिकार अली.

आभार. दोन्ही दुरुस्त्या केल्या आहेत.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इंदिरा गांधी आणि झुल्फिकार भुट्टो यांच्याच झालेल्या सिमला करारावर तारीख २ जुलैची असली तरी प्रत्यक्षात सह्या होइपर्यंत मध्यरात्र उलटून जाऊन ३ तारीख उजाडली होती!

'चुकीची' तारीख पडलेले ते कदाचित एकमेव आंतरराष्ट्रीय कागदपत्र असावे!

आजचे, जुलै ४ चे, सकाळी ८:३५ वाजता तरी, दिनवैशिष्ट्य दाखवतय जिना लोलोब्रिजिडा मृत्युदिवसाखाली...

ईश्वरकृपेने बाई जिवंत आहेत! आज ८९ वर्षाच्या झाल्या.

त्यांनी अतिशय मस्त सिनेमा- मी बघितलेले- केले आहेत आणि एखादा अतिशय टुकार शालिमार पण- तो ही मी बघितलेला- केला आहे.

gina lollobrigida

सौजन्य: त्यांच्यावरचे फेसबुक पेज

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

बदल केला आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शालिमार म्हणाजे कृष्णा शाह चा?

त्यात बहुधा सिल्व्हिया माइल्स होती.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

आज ह्या दोघांची पुण्यतिथी आहे. मी ह्या दोघांना फार मोठे लेखक मानतो. मी अर्नाळकर भरपूर वाचले आहेत आणि दिघ्यांचे फक्त 'पाणकळा' निम्मेशिम्मे वाचले आहे.

दोघेही मराठीत दुर्लक्षित राहिले.

अर्नाळकर हे फडके, खांडेकरांपेक्षा चांगले आणि त्यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय लेखक होते. संमेलनाध्यक्ष तर सोडाच, कसलेही मोठे साहित्य वा सरकारी सन्मान त्यांना प्रस्थापितांनी दिले नाहीत.

दिघ्यांची 'पाणकळा' तर एखाद्य्या दीर्घ कवितेसारखी आहे. एक दोन पाने वाचल्यावरच माझ्या लक्षात आले की हा भारी लेखक आहे.

आज सुदैवाने अर्नाळकरांच्या ३५ पुस्तकांचा संग्रह बाजारात मिळतो दिघ्यांच्या (आणि आपल्या) नशिबात ते पण नाही! किती वर्षे मी पाणकळा मिळवायचा प्रयत्न करतोय.

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

किती वर्षे मी पाणकळा मिळवायचा प्रयत्न करतोय.

रसिक साहित्य, साधना इथे विचारा. नच मिळाले तर नगर वाचनालय किंवा साहित्य परिषद गाठा. कुठे तरी नक्की मिळेल.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अन्यथा एशियाटिक लायब्ररी मुंबई येथे पहा.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

मला विकत पहिजे

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

झेरॉक्स काढणे हाही एक मार्ग आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अजुन झेरॉक्सचे पटकन डोक्यात येत नाही...आणि नकोही वाटते....पी एच डी करत असतो तर नक्की केले असते!

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

कुठेही नाही...मला विकत पहिजे....

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

"अर्नाळकर हे फडके, खांडेकरांपेक्षा चांगले आणि त्यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय कादंबरीकार होते"

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

र.वा.दिघे ह्यांची 'पाणकळा' मीहि शाळेत असतांना वाचली होती आणि विषयाच्या नवेपणामुळे ती मला फार आवडली होती असे आठवते.

'अर्नाळकर हे फडके, खांडेकरांपेक्षा चांगले आणि त्यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय लेखक होते.' याच्याशी सहमत.
पाणकळा भारी आहे.

४ जुलै १९१२ हा पं. निवृत्तीबुवा सरनाईकांचा जन्मदिवस आहे, पण त्याची नोंद मृत्यूदिवसात पडलीये.

आभार. दुरुस्ती केली आहे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शुचीमामींचा आजचा आयडी हे अ‍ॅड करता येईल का रोजच्या दिनवैशिष्ट्यामध्ये?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

नुपजी ROFL असं लोकांना कोलीत द्याल तर तुमच्या खवत सुंदर नट्यांचे फोटु टाकणार नाही.

आजचे दिनवैशिष्ट्य दाखवतय : १९४७ : AK 47 चे उत्पादन सुरू
मला शंका आहे ह्या बद्दल.
विकिपीडिया 'Production history' खाली दाखवतय : Produced 1949–present, "In November 1947, the new prototypes (AK-47s) were completed."

शिवाय C. J. Chivers यांचे पुलित्झर पुरस्कार मिळालेले पुस्तक 'The Gun', २०१० म्हणतय:
"After many modifications over many years, from Sergeant Kalashnikov’s initial design would flow the family of assault rifles now universally known as the AK-47—an acronym for Avtomat Kalashnikova-47, the automatic by Kalashnikov designed in 1947...
...For the initial step in these processes, the Soviet army had to organize a base of domestic production, first to improve the AK-47’s design and then to equip its combat divisions. The avtomat was a standout compromise firearm, but like all compromises it was not perfect—not at all. The prototypes had flaws, and initial production proved problematic without extensive fine-tuning and a few major changes. "

१९४७ मध्ये ते डिसाइन केल गेल.

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

ह्या पानावर म्हटल्यानुसार दिनवैशिष्ट्य लिहिलं होतं. AK 47 च्या पानावर तुम्ही म्हटल्यानुसार निराळी माहिती आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काल, ७ जुलैच्या दिनवैशिष्ट्याबद्दल हे वाचलं - Nettie Stevens discovered XY sex chromosomes. She didn't get credit because she had two X’s.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

८ जुलै - केट कोलविट्झ चा आज जन्मदिन. हा चिंतांचा तिच्यावरचा सुंदर लेख
.
http://www.misalpav.com/node/13897

३ ऑगस्ट - मैथिलीशरण गुप्त या कविंचा जन्मदिन- खालील अप्रतिम साईटवरती त्यांच्या कविता मिळतील.
http://www.hindisamay.com/contentDetail.aspx?id=1071&pageno=1

माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४)

बंगाल काँग्रेसने धडाक्यात साजरा केला वाढदिवस.

a


आदरणीय राजीवजींमुळे आज आपण इंटरनेट वापरत आहोत. कृतज्ञता म्हणून त्यांच्या या कार्याबद्दल आज त्यांची आठवण काढली पाहिजे. आजचं सरकार त्यांना पूर्ण विसरलं आहे. इतकं की गेल्या एका वर्षात एकाही स्टेडिअमला वा पुलाला राजीवजींच नाव दिलं गेलेलं नाही.

आजचे सर्व धागे "भारतरत्न राजीव गांधी धागा" या टायटलखाली आले तर आवडेल. वर जे पेनाच्या नीबचं चित्र आहे तिथे राजीवजींचा फोटो टाकावा अशी सूचना मी व्यवस्थापनाला करतो आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

आजचं सरकार त्यांना पूर्ण विसरलं आहे.

"डिजिटल इंडिया" विसरलात काय ?

जेव्हा राजीव गांधींनी संगणक युगाचे समर्थन केले होते तेव्हा अडवाणींनी "राजीव गांधींचा काँप्युटर हा बेरोजगारीस निमंत्रण आहे" असा नारा दिला होता. (त्याच अडवाणींनी अणु करारास सुद्धा विरोध केला होता.).

मोदींनी डिजिटल इंडियाचा पुरस्कार करून राजीव गांधींच्या मुद्द्यांना पुष्टीच दिलेली आहे. हे भाजप च्या भूमिकेमधले "मोरल इन्व्हर्जन" आहे.

(याचा अर्थ - डिजिटल इंडिया ची संकल्पना फक्त मोदींची आहे असा नाही.)

सहमत आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

१६३२ : मुरार जगदेव याने मोगलांचा पराभव करून मध्ययुगातली प्रसिद्ध तोफ मुलुख-ए-मैदान विजापुरात आणली.

या तोफेचं नाव 'मल्लिका़-ए-मैदान' की कायससं होतं ना? 'मुलुखमैदान' हा त्याचा अपभ्रंश आहे असं ऐकलं आहे.

ब्याट्यादि इतिहास तज्ञांचं काय मत?

तेच ते. मालिक-ए-मैदान असं नाव होतं. मुरार जगदेव या आदिलशाही सरदारानं ही मूळची अहमदनगरच्या निजामशहाची तोफ विजापुरात आणली. मध्ये भीमा नदीत ती बुडली आणि परत वर काढली असेही वाचल्याचे आठवते....

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

१७८९ : दिल्लीचा बादशहा शाह आलम याने गोहत्या बंदीचे फर्मान काढले.

का बात है?!

*********
आलं का आलं आलं?

तेच ते, ते ज्याला लांगूलचालन, तुष्टीकरण वगैरे वगैरे म्हणतात ना आजकाल, त्यातलाच प्रकार. चालायचेच!

(थोडक्यात, हे गेला बाजार तेव्हापासून चालत आलेले आहे.)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

अहाहा !!!! वा वा ,, निवडुन ...झकास !!!

१७८९ साली दिल्लीचा बादशहा म्हणजे "ए शहनशाह ए आलम, अज दिल्ली ता पालम" अशी स्थिती होती. महादजी शिंद्यांनी त्याला आश्रय दिल्यामुळे तग धरून होता बिचारा. १७८८ ते १८०३ पर्यंत दिल्लीवर जरीपटका ऑफिशियली फडकलेला आहे तो त्याचमुळे. हे गोहत्याबंदी फर्मानही महादजी शिंद्यांनीच त्याच्याकडून मंजूर करून घेतलेले आहे. नॉट दॅट द सो कॉल्ड बादशहा हॅड एनी अदर ऑप्शन. तरी १७८९ म्हणजे खूपच लेट झाला- वे ब्याक इन १७१०-२०, कोणीही रांगड्याने हजारेक लोकांची फौज वगैरे घेऊन दिल्लीला वेढा घालावा, बादशहाकडून वाटेल ती फर्माने मंजूर करून घ्यावीत वगैरे सुरू झाले होते. प्रथम बाजीरावाचे पिताश्री, अर्थात बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीतील सय्यद बंधूंशी संधान बांधून मराठ्यांची अनेक माणसे दिल्लीहून सोडवून आणली. सोबत अन्य काही मागण्या होत्या. त्या मागण्या बादशहा मानेना म्हटल्यावर सय्यद हुसेन अली याने मराठ्यांच्या फौजेचा धाक दाखवून सरळ बादशहाचे डोळे काढले. त्यामुळे पॉप्युलिस्ट मेजर इ.इ. म्हणून बादशहाचे कौतुक नाही यात.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

दिनविषेश २-ऑक्टोबरलाच आडकला आहे.

आज गायक शैलेंद्रसिंग चा जन्मदिवस आहे.

>>आज गायक शैलेंद्रसिंग चा जन्मदिवस आहे

आज गायक शैलेंद्रसिंग चा जन्मदिवस आहे. Wink

मेरा नाम जोकर हा चित्रपट आपटल्यावर राज कपूरने बॉबी चित्रपट बनवला. त्यावेळी हीरोला द्यायला पैसे नव्हते म्हणून घरच्याच ऋषीकपूरला हीरो बनवले. बहुधा पार्श्वगायकांना* द्यायला पैसे नव्हते म्हणून शैलेंद्रसिंगची वर्णी लागली असावी. बॉबीच्या यशामुळे ऋषीकपूरचा आवाज म्हणून त्याला उगाच अनेक चित्रपट मिळाले.

*पार्श्वगायिका म्हणून मात्र लताबै बाय डिफॉल्ट होत्याच.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

गायक हे बिरूद मुकेतेशला जास्त लागू पडावे. परवा सलील चौधरींची गाणी ऐकत होतो. सतत मुकेतेशचा आवाज ऐकून मेजर वैताग आला.

*********
आलं का आलं आलं?

"ये तो मुझसे भी बेसुरा गाता है" असं मुकेश शैलेंद्रसिंगबद्दल बोलला होता म्हणे.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

आबा, तुम्ही माझ्या एका काळ्या यादीत आलेला आहात. आत्ता इतकेच.

>>सतत मुकेतेशचा आवाज ऐकून मेजर वैताग आला.

हा हा हा. मुकेशच्या बेसुरेपणाचे बरेच किस्से सिनेजगतात आहेत. त्याच्या आवाजाच्या मर्यादांमुळे त्याच्यासाठी बसवलेली गाणी गायला सोपी असत. त्यामुळे ती सामान्य माणसाला गुणगुणायलाही सोपी असत. हे कदाचित मुकेशच्या लोकप्रियतेचं गमक असू शकतं. (अर्तात, त्याला खूपच चांगली आणि आघाडीच्या नायकांची गाणीही मिळाली.)

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जागतिक मानसिक आरोग्य दिन.

.
माझे २ सेंटस-
(१) "बायपोलर"डिसॉर्डरकरता पुरेशी झोप अतोनात आवश्यक अगदी क्रुशिअल असते. I cannot insist the importance of good sleep enough. अन्य डिप्रेशन आदि व्याधींकरताही असावी असे मानण्यास जागा आहे.
.
(२) एखादी व्याधी असणे ही लज्जास्पद गोष्ट नाही की दुर्दैवीही गोष्ट नाही. पण सामाजिक टॅबुमुळे ती व्याधी डायग्नोस करण्यास टाळाटाळ करणं ही भयंकर दुर्दैवी घटना आहे.
.
(३) अनडायग्नोसड व्याधीचा स्वतःला तर त्रास होतोच पण आपल्या प्रियजनांनाही तो भोगावा लागतो.
.
(४) आयुष्यात "अशक्य वाईट" असे काहीच नसते. "सदा सर्वदा राम सन्नीध आहे, कृपाळुपणे अल्प धारीष्ट्य पाहे."
.
(५) व्याधी बरी होण्याच्या काळात, कौटुंबिक सपोर्ट हा भयंकर क्रुशिअल असतो. तेव्हा Don't take your Loved ones granted...Never!! Of all ppl I am preaching this. असो.

वसंत ऋतु अर्थात एका ऋतुमधुन दुसऱ्या ऋतुमध्ये संक्रमणाच‌ काळ. शरिर् नक्किच अॅडजस्ट होण्याच हर्क्युलिअन प्रयत्न करत असते पण मानसिक व्याधि असलेल्या लोकान्करता विशेष्हत: sad (seasonal affective disorder), बायपोलर डिसॉर्डर वाल्यान्करता अधिकच्.
(१) झोप कमि होते
(२) बोलणे, विचार अधिक वेगवान होतात्. ब्रेक्स लावणे कठिण होते
(३) कामेच्छा वाढते
(४) खुप ऊर्जा वाढते, रात्रि उTHUn व्यायाम्, कामे कराविशि वाटतात
(5) reckless/Risky behavior वाढते.

त्वरित डॉक्ट्रानचि मदत घ्या. खरं तर सोशल interaction काहि काळाकरता टाळा.(Look who is talking). झोप व्यवस्थितच्च घ्या.
Cool down before sleep,
listen to mellow, peaceful music
Browsing computer at night (झोप्मोड झालि कि) - A NO NO NO!!.कारण तो निळा प्रकाश झोपेकरता DETRIMENTAL असतो.

याचा स्वतंत्र आणि जरा मोठा लेखच बनव की.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरे आहे खुप आहे निट लिहिण्यासारखे. आनि मला इच्छ आहे. निट विचर करुन लिहिते.
____
अनुभव + जालावरिल ऑथेन्टिक्/शास्त्रिय माहिति असे कॉम्बो करुन निट लिहेन्.

लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१)

आमचे थोर न्येते मा० प्लम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

"He had just about enough intelligence to open his mouth when he wanted to eat, but certainly no more."
― P.G. Wodehouse

"At the age of eleven or thereabouts women acquire a poise and an ability to handle difficult situations which a man, if he is lucky, manages to achieve somewhere in the later seventies."
― P.G. Wodehouse, Uneasy Money

"There are moments, Jeeves, when one asks oneself, 'Do trousers matter?'"
"The mood will pass, sir."
― P.G. Wodehouse, The Code of the Woosters

"He had the look of one who had drunk the cup of life and found a dead beetle at the bottom."
― P.G. Wodehouse

"I could see that, if not actually disgruntled, he was far from being gruntled."
― P.G. Wodehouse, The Code of the Woosters

"She looked as if she had been poured into her clothes and had forgotten to say "when". "
― P.G. Wodehouse

"I always advise people never to give advice."
― P.G. Wodehouse

"A melancholy-looking man, he had the appearance of one who has searched for the leak in life's gas-pipe with a lighted candle."
― P.G. Wodehouse, The Man Upstairs and Other Stories

"There is only one cure for grey hair. It was invented by a Frenchman. It is called the guillotine."

Vintage PGW !!

One more :

It was a confusion of ideas between him and one of the lions he was hunting in Kenya that had caused A. B. Spottsworth to make the obituary column. He thought the lion was dead, and the lion thought it wasn't.

Ring for Jeeves (1953)

"And she has got brains enough for two, which is exact quantity the girl who marries you will need".

*********
आलं का आलं आलं?

चित्रकार व्हरमीर यांचा आज जन्मदिन आहे हे वाचलं आणि त्यांच्या "द मिल्कमेड" चित्रावरती रॉबर्ट हास यांनी लिहीलेली एक अतिशय सुंदर कविता आठवुन गेली. ती कविता नेटवर मिळत नसल्याने, आता ग्रंथालयात जाऊन वाचणे आले.

आज लक्ष्मीकांत बेर्डेचा जन्मदिवस आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ToI Bldg

दिनवैशिष्ट्य ३ नोवेंबरः
१८३८ : 'द टाइम्स ऑफ इंडिया'ची 'द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स' या नावाने स्थापना.

चर्चगेट स्ट्रीटच्या वरच्या चित्रामध्ये टाइम्स ऑफ इंडियाचे तकालीन कार्यालय दिसत आहे. तळमजला + ३ अशा इमारतीच्या तळमजल्यावर नावाची पाटी दिसत आहे. रस्त्याच्या अखेरीस 'चर्चगेट'हि दिसत आहे.

आहा! आमच्या माला सिन्हाचा आज वाढदिवस Smile किती ग्रेसफुली एज झालीये. चिकणी दिसते.
.
http://photogallery.indiatimes.com/photo/18284833.cms
.

जॉन बनयान यांचा आज जन्मदिन आहे. त्यांचे अफाट गाजलेले "The Pilgrim's Progress" दोनदा तीनदा वाचायचा निष्फळ प्रयत्न केला होता. It is regarded as one of the most significant works of religious English literature, has been translated into more than 200 languages, and has never been out of print.बहुतेक ख्रिश्चन धर्माची (पंथ , चर्चेस) आदि
माहीती असणे आवश्यक आहे. त्यातील रुपके कळली नव्हती.
_________
२९ नोव्हेंबर-
http://aisiakshare.com/node/34
अ‍ॅलेक्स ग्रे या माझ्या आवडत्या चित्रकाराचाही आज जन्मदिन आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------
८ एप्रिल‌
जन्मदिवस : उज‌वा "स्टॅलिन", लिंकाफेकुमार‌खान‌, फ‌ड‌तुस‌द‌म‌न, होमिओपाथीचा पुर‌स्क‌र्ता, ह‌स्तिदंती म‌नोऱ्याचा र‌हिवासी, असा जो कोण असेल त्याचा.
-----------------------------------------------------------------------------------------------

ग‌ब्ब‌र‌ सिंग‌ व‌ल्द‌ ह‌रीसिंग‌?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

ताझिराते हिंद‌ के मुताबिक‌ ये अदाल‌त‌ ग‌ब्ब‌र‌ को साल‌गिरा मुबार‌क‌ फ‌र्माती है.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

ग‌ब्ब‌र‌ला प्र‌क‌ट‌दिनाच्या खूप शुभेच्छा. तुम‌ जिओ ह‌झारो साल‌, साल‌ के दिन‌ हो प‌चास‌ह‌झार Smile
.
.
http://images.all-free-download.com/images/graphiclarge/beautiful_birthday_bloom_blossom_bouquet_bunch_601100.jpg
.
♪ღ♪*•.¸¸¸.•*¨¨*•.¸¸¸.•*•♪ღ♪¸.•*¨¨*•.¸¸¸.•*•♪ღ♪•*
♪ღ♪░H░A░P░P░Y░ B░I░R░T░H░D░A░Y░░♪ღ♪
*•♪ღ♪*•.¸¸¸.•*¨¨*•.¸¸¸.•*•♪¸.•*¨¨*•.¸¸¸.•*•♪ღ♪•«

ताझिरात हे दंडविधान अस‌ते ना?

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

अरेच्च्या ग‌ब्सुचा वाढ‌दिव‌स‌ = बुद्धाचा जन्मदिवस - जपान!!!
.
ज‌पान‌यांनो कुठे नेऊन ठेव‌लायत आम‌चा ग‌ब्ब‌र‌ BiggrinBiggrin

साहित्य‌सूची या र‌सिक‌ साहित्य‌च्या (ऑन‌लैन‌) अंकात‌ वाढ‌दिव‌स‌ शुभेच्छा, व‌र्धाप‌न‌ शुभेच्छा, आणि स्मृती त‌याची अशी तीन‌ स‌द‌र‌ं येतात‌. त्यात‌ म‌राठी साहित्य‌विश्वात‌ल्या विविध‌ लोकांचे आणि स‌ंस्थांचे ब‌ड्डे आणि डेड्डे आहेत‌. ग‌ंम‌त‌ म्ह‌ण‌जे लोकांचे प‌त्ते आणि फोन‌ न‌ंब‌र‌ खुशाल‌ छाप‌ले आहेत‌!

यात‌ला विदा ऐसीच्या दिन‌वैशिष्ट्यात‌ भ‌र‌ता आला त‌र‌ ब‌र‌ं होईल‌. (उदा० १४ एप्रिल‌ला बाबासाहेबांच्या ब‌ड्डेब‌रोब‌र‌च‌ द‌ मा मिरास‌दारांचाही ब‌ड्डे होता.)

एप्रिल‌च्या अंकातून‌
वाढ‌दिव‌स‌ शुभेच्छा: http://sahityasuchi.erasik.com/articles/vadhiwas_shubechya_April17
व‌र्धाप‌न‌ शुभेच्छा: http://sahityasuchi.erasik.com/articles/vardhapandin_shubhechya_april17
स्मृती त‌याची: http://sahityasuchi.erasik.com/articles/smruti_tayanchi_April17

"राब‌ट, सोना क‌हां ह‌य‌?" असं (उंटाव‌रून‌) म्ह‌ण‌त‌ नाही. काही म‌द‌त‌ पाहिजे अस‌ल्यास‌ ज‌रूर‌ हाक‌ मार‌णे.

*********
आलं का आलं आलं?