मी भाषा असतो तर!

अनुस्वार होऊन, हवेत तरंगत,
ओठांभोवती तुझ्या घुटमळलो असतो...
दीर्घ वेलांटीसारखा जीभेवरती तुझ्या
एखादा क्षण जास्त रेंगाळलो असतो...

जोडाक्षरांसारखे घालून हातात हात,
दोघंच कुठेतरी बागडलो असतो...
स्वल्पविरामांवरून मारून उड्या,
अर्धविरामांवर विसावलो असतो...

नामंही मग लाजून बुजून,
विशेषणान्मागे लपली असती...
उदास उदास क्रियापदंही मग,
क्रियाविशेषणान्मागून हसली असती...

"कशी रे दिसते मी?",प्रश्न तुझा ऐकून,
अस्वस्थ होऊन हसलो असतो...
वांझ कुशीवर फिरवून हात,
नव्या शब्दासाठी अडलो असतो....

पूर्णविरामांचा तुरुंगही हा,
अस्फुटासारखा लांघेन मी...
नावालाच तुझ्या हाताशी धरून,
सौंदर्यालाही वर्णेन मी...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

झक्कासच, हृस्व दीर्घ चा खेळ. आवडलं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

"कशी रे दिसते मी?",प्रश्न तुझा ऐकून,
अस्वस्थ होऊन हसलो असतो...
वांझ कुशीवर फिरवून हात,
नव्या शब्दासाठी अडलो असतो....

मंजे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म‌ला लाग‌लेले अर्थ असे:
१. क‌वी ब‌रेच भिड‌स्त आहेत.
२. ते कुशीत पेन प‌क‌डून लिहीतात
बाकी काहीही असो, क‌वी मुंब‌ईत राह‌तात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

बाकी काहीही असो, क‌वी मुंब‌ईत राह‌तात.

हे नक्की कशावरून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काहीही. Sad
आणि मी पुण्यात राहतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे ती जेव्हा 'मी कशी दिसते' असं विचारते तेव्हा त्याला जाणवतं की तिचं वर्णन करण्यासाठी योग्य शब्दच आपल्याकडे नाहीये.
आणि तो सहजासहजी नवा शब्द बनवूही शकत नाही(कारण कवी हा 'भाषा' आहे!)
म्हणून तो स्वत:ला वांझ म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्की काय/कोण चावले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1