आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ४

दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.
या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -
आधीच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा केला आहे.
---

काही वेळा मुख्य प्रवाहातला एखादा रंजनप्रधान चित्रपट वेगळ्या शैलीमुळे चर्चेत येतो. तसाच एक चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी पुणेकरांना आहे. 'अंगमली डायरीज' हा लिजो जोसे पेलिसरी दिग्दर्शित मल्याळी चित्रपट केवळ एका खेळापुरता पुण्यात आहे.
स्थळ : सिनेपोलिस वेस्टएंड माॅल औंध
वेळ : गुरुवार ६ जुलै रात्री ८:१५

चित्रपटात तब्बल ८६ नवे चेहरे आहेत आणि कथनशैलीही गंमतीशीर आहे. अंगमली नावाच्या गावातल्या काही तरुणांची ही धांदलधम्माल गोष्ट आहे आणि त्यासाठी अंगमलीमधलेच न-नट वापरले आहेत. तारांतिनोपासून के.जी. जाॅर्जपर्यंत विविध शैलीतले दिग्दर्शक पेलिसरीला आवडतात. अत्यंत स्थानविशिष्ट तपशील वापरूनदेखील प्रांताबाहेरही आवडेल असा चित्रपट करायला पेलिसरीला जमलं असावं, कारण मोहनलालपासून अनुराग कश्यपपर्यंत अनेकांनी त्याची स्तुती केली आहे. ट्रेलर -

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

आज‌च्या म‌टाम‌धून माहिती मिळाली. पुणेक‌रांची म‌ज्जाय..!

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ९ जुलै ते १८ ऑगस्ट दरम्यान सलग ४२ दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रम विनामूल्य असून गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ते होतील.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गणेश मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांना ९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. रोज सकाळी विविध याग होणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे प्रमोद गायकवाड व भीमण्णा जाधव यांच्या सनई -सुंद्री जुगलबंदीने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. देवकी पंडित, शौनक अभिषेकी, रवींद्र साठे, माधुरी करमरकर, महेश काळे, पं. नीलाद्री कुमार, सत्यजित तळवलकर, मधुरा दातार, ॠषिकेश रानडे, विभावरी आपटे, शिल्पा पुणतांबेकर, सावनी दातार, रूपकुमार राठोड, सुनील राठोड, पं. हरिप्रसाद चौरसिया, अभिजित पोहनकर, तौफिक कुरेशी, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, पं. विजय घाटे, श्रीधर फडके, पं. रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे, मंजूषा कुलकर्णी, नंदेश उमप, अनुराधा पौडवाल, एन. राजन व संगीता रागिणी, नंदिनी शंकर, पं. संजीव अभ्यंकर, पं. अमान अली व अयान अली बंगश, सावनी शेंडे, जयतीर्थ मेवुंडी, आशा खाडीलकर, राहुल देशपांडे, सुरेखा पुणेकर, राधा मंगेशकर, प्रशांत नासेरी, विभावरी आपटे, पं. शिवकुमार शर्मा, इक्बाल दरबार, श्रीरंग गोडबोले, आरती अंकलीकर-टिकेकर, साधना सरगम, पं. राशीद खान, पं. सुरेश तळवलकर, पं.हृदयनाथ मंगेशकर, बेला शेंडे, पं. राजन साजन मिश्रा, सुरेश वाडकर आदी दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम रोज सायंकाळी ७ वाजता होणार आहेत.
याच दरम्यान बाबामहाराज सातारकर, सुधांशूजी महाराज, दादा जे. पी. वासवानी, विजेंदरसिंगजी महाराज, प्रीती सुधाजी, डॉ. बाबासाहेब तराणेकर, डॉ. सुनील काळे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, आचार्य गोविंदगिरी, भक्तिप्रिय स्वामीजी, गाणपत्य स्वानंदजी पुंड शास्त्री यांचे प्रवचन होणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आय अॅम ज‌ळींग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_______________________________________________
What's the matter with the calamity anyway?

गाणपत्य स्वानंदजी पुंड शास्त्री

या शास्त्र्यांच्या प्र‌व‌च‌नाला पुंडावा किंवा पुंडाई म्ह‌णावे काय‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

भक्तिप्रिय स्वामीजी

हे त्यांचे नाव आहे का? ! Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे शेड्यूल अजून डिटेल‌ म‌धे आहे का? माणूस - कार्य‌क्र‌म - तारीख - वेळ असं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

जे पुण्यात टिळ‌क र‌स्त्याने जात असतील त्यांनी तिक‌डून जाता जाता चौक‌शी क‌रावी. तिथे होर्डिंग ल‌व‌लेले असेल, नाहीत‌र र‌विवार‌च्या स‌काळ‌म‌धे स‌विस्त‌र येईल‌च.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

र‌विवार‌च्या स‌काळ‌म‌धे स‌विस्त‌र येईल‌च.

एक ग‌म्म‌त म्ह‌णून. इत‌कंच पुरेसं न‌व्ह‌तं का? त्या दुस‌ऱ्या सेट‌म‌ध‌ले लोक फार अस‌तात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

त‌सं न‌व्हे हो, धीर न‌स‌तो लोकांना अन स‌काळ‌म‌धे याय‌ची ग्यार‌ंटी मी क‌शी घेऊ?
प‌ण मी पुण्यात अस‌ताना तिथून‌च कामाला जातो-येतो, प‌ण आत्ता बाहेर‌गावी आहे.
आलो की ज‌मेल त‌से कार्य‌क्र‌मांना थेट तिक‌डे जाय‌ला लागेन. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

oke.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

हे घ्या अजो.

a

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
वाक्या वाळे अंदु, कृष्णा, नवनीत चोरी...

अनेक ध‌न्स्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

ध‌न्य‌वाद आबा!
व‌त्स‌पाव‌र हे फिराय‌लंय, प‌ण इथे कसं टाकाय‌चं ही स‌म‌स्या होती.
आठ नौ दिव‌स जाय‌लाच् ह‌वे असे आहेत. ब‌घू क‌से ज‌म‌ते ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>व‌त्स‌पाव‌र हे फिराय‌लंय, प‌ण इथे कसं टाकाय‌चं ही स‌म‌स्या होती.<<

अशी प्रतिमा इथे देण्याचा सहज सोपा मार्ग : आपल्या एखाद्या क्लाउड खात्यातून (उदा. गूगल ड्राइव्ह, गूगल फोटोज, फ्लिकर, मायक्रोसाॅफ्ट वन ड्राइव्ह वगैरे) ती सेव्ह करून सार्वजनिक करायची. मग तिची एम्बेड यूआरएल घेऊन ती इथल्या 'Insert/Edit Image' सुविधेतून शेअर करायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

२०१३पासून सुरू असलेल्या प्रा. राम बापट स्मृती व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान येत्या शनिवारी पुण्यात आहे.
वक्ता : गायक आणि मॅगसेसे पुरस्कारप्राप्त टी. एम. कृष्णा
विषय : 'मी मुक्त आहे काय? एका संगीतकाराचा शोध' (इंग्रजीत)
स्थळ : एस. एम. जोशी सभागृह
वेळ : शनिवार १५ जुलै संध्याकाळी ६ वाजता.
कार्यक्रमाचे स्वरूप : आधी एक चित्रफीत दाखवली जाईल, मग कृष्णा यांचे व्याख्यान होईल व मग सदानंद मेनन त्यांच्याशी संवाद साधतील.
कार्यक्रम सर्वांना खुला आणि विनामूल्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'वडार देव्हाऱ्यावरील चित्रपरंपरा'
सुदर्शन कला दालन , पुणे प्रस्तुत चित्रसंवाद : भाग ४९
'वडार देव्हाऱ्यावरील चित्रपरंपरा'
वक्ते : डॉ . विक्रम कुलकर्णी
विक्रम यांनी सदर विषयावर गेली चार वर्षे संशोधन केले असून त्यातील वैविध्य आणि चित्रकलाविषयक संशोधनाचा आवाका, सध्या व पूर्वी होत असणाऱ्या संशोधनाचे स्वरूप, व्याप्ती, मर्यादा, निष्कर्ष, पुढील संशोधन अशा मुद्द्यांवर विक्रम स्लाईडशोद्वारे चर्चा करतील.
वेळ : सकाळी ११:०० ते १२:३०
दिनांक : रविवार २३ जुलै २०१७
सुदर्शन रंगमंच ,शनिवार पेठ , पुणे
आयोजक : डॉ . नितीन हडप आणि प्रमोद काळे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इंट‌रेस्टिंग्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel_ipad.aspx?ed=Pune%2cMa...
.
.
ह्या पानाव‌र‌ स‌र्वात खाल‌च्या ओळीत दडावीक‌डून प‌हिली जाहिरात‌. "धार‌दार‌ तेज‌स्वी देख‌णी" असं लिहिलेली.
मी जाइन ब‌हुतेक्. नेम‌की जाहिरात‌ ब‌घाय‌ची त‌र‌ ही --
http://epaper.esakal.com/FlashClient/Show_Story_IPad.aspx?storySrc=http:...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विज्ञानाच्या गळचेपीविरूध ९ ऑगस्टच्या नियोजित मोर्चात समाजविज्ञान,भाषाविज्ञान , संस्कृतिविज्ञान या प्रांतातील
शिक्षक, विद्यार्थी ,प्राध्यापक ,लेखक, विचारवंत व वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगणारे यांना देखील सामील करून घेतले जावे : डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे आवाहन

______________________________

विज्ञानाच्या गळचेपीविरूद्ध वैज्ञानिक वातावरण निर्मितीसाठी ९ ऑगस्टला मुंबईत दु. ३.३० वा. आझाद मैदानावरून वैज्ञानिकांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून देशातील ढासळती वैज्ञानिक विचारसरणी, अवैज्ञानिक गोष्टींचा प्रचार, ऑनर किलींग, विज्ञान संस्थांच्या निधीत कपात, धार्मिक असहिष्णुता, निधी उपलब्ध करून न देणे, या साऱ्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

या आंदोलनात वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी यांना एकत्र येण्याचे आवाहन ब्रेक थ्रू फाउंडेशनने केले आहे. शिक्षणात विज्ञाननिष्ठ संकल्पनांनाच स्थान द्यावे,विज्ञान तंत्रज्ञान संशोधनासाठी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तीन टक्के तरतूद व शिक्षणासाठी दहा टक्के तरतूद करावी अश्या मागण्याही आहेत. समाजविज्ञान, भाषाविज्ञान, संस्कृतीविज्ञान या देखील वैज्ञानिक विचार व कार्यपद्धत रूजवून मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या महत्वाच्या ज्ञानशाखा आहेत. भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक संस्था व लेखक, कलावंत,प्राध्यापक, शिक्षक, समाजविज्ञान संस्था इ.नी देखील त्यांच्या देखील असलेल्या या मागण्यांसाठी त्यामुळे या मोर्चात सहभागी होणे गरजेचे आहे.

मोर्चा आयोजकांनी त्यासाठी त्यांचे आवाहन व्यापक करून त्यांनाही हे आवाहन करावे व तसे त्यांनी केल्यास त्यास व्यापक प्रतिसाद दिला जावा असे आवाहन महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे.

वैज्ञानिक विचारसरणीच्या अभिव्यक्तीचे दहशतमुक्त स्वातंत्र्य, तसेच भाषेचे वैज्ञानिक ज्ञान व जाण उपलब्ध करून देणे, भाषा, साहित्य, संस्कृति याच्या रक्षण, जतन, संवर्धनासाठी तसेच संशोधनासाठी व अभिवृद्धीसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद दहा टक्के असणे, मराठी विद्यापीठ, अभिजात दर्जा या व अशा मागण्यांसाठी अशी सर्वांनी संयुक्त कृती करण्याची वेळ आलेली आहे हे ओळखून असे संयुक्त बळ उभारण्याचे मनावर घेतले जावे असे आवाहनही डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे.

----

मुंबईतील मोर्चा दुपारी १६:०० वाजता ऑगस्ट क्रांती मैदान येथून निघेल व बाबुलनाथ मार्गे गिरगाव चौपाटीपर्यंत जाईल. पुण्यामधील मोर्चा संध्याकाळी १७:०० वाजता पुणे रेल्व स्थानकासमोरील गांधी पुतळ्यापासून निघणार आहे. याखेरीज वर्धा व इतर शहरांतही याच दिवशी मोर्चांच्या आयोजनाचे ठरत आहे. या मोर्चांमध्ये सहभागी होऊन विज्ञानाचा आवाज बुलंद करावा ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाकी ठिक आहे, पण फक्त वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणाऱ्या लोकांनी ( मी ,मनोबा, ढेरेशास्त्री, आबा आणि अचरटबाबांसारखे ) जबरदस्तीने सो कॉल्ड सिक्युलर असलेच पाहिजे का?
वैज्ञानिक दृष्टीकोन आणि "धार्मिक सहिष्णुतेचा" संबंध काय? विज्ञानाच्या नावाखाली कोण दुसरा अजेंडा पुढे करतोय? अश्या नॉन-वैज्ञानिक गोष्टी घुसडुन "विज्ञानाचा आवाज बुलंद" कसा होणार?

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

विज्ञान संस्थांच्या निधीत कपात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विज्ञानाच्या दृष्टीनं सगळी माणसं समान पातळीवर असतात. धर्माच्या नावाखाली असहिष्णुता माजवणं अवैज्ञानिक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विज्ञानाच्या दृष्टीनं सगळी माणसं समान पातळीवर असतात.

डार्विनला थडग्यात करंट मारला आणि त्याची ममी कळवळली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

NFAI

On August 4

Songs of rice: 1:30pm

Eternity: 4:30pm

The Swimmers: 7pm

On August 5

Wandering: 10am

A Gift: 1pm

The Scar: 4pm

Snap: 6pm

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आस्तिक नास्तिक लोकांनी एकमेकांच्या परंपरेचा काचून नव्हे पण निदान वरवर आदर करणं महत्वाचं वाटतं. सिंगल लोकांनी कपलचा आदर करण्याचं सौजन्य निदान दाखवावं ह्यात वावगं काही नसतंय.

शिवाय थाई जेवण फुकट वरपता येईल. ( श्रावणात ओरपण्याजोगं असावं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आस्तिक नास्तिक लोकांनी एकमेकांच्या परंपरेचा काचून नव्हे पण निदान वरवर आदर करणं महत्वाचं वाटतं. सिंगल लोकांनी कपलचा आदर करण्याचं सौजन्य निदान दाखवावं ह्यात वावगं काही नसतंय.

रझा फाउंडेशन, महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि नादरूप (रोहिणी भाटे यांची कथक संस्था) यांच्यातर्फे पुण्यत दोन दिवसांचे व्याख्यान सत्र आयोजित करण्यात आले आहे. "वास्तवाची प्रतिमा आणि प्रतिमेचे वास्तव" हा सत्राचा विषय आहे. पं. सुरेश तळवलकर, कथक नृत्यांगना प्रेरणा श्रीमाली, कवी उदयन वाजपेयी, पं. सत्यशील देशपांडे आणि चित्रकार प्रभाकर कोलते यांची व्याख्यानं आहेत.
स्थळ : ज्योत्स्ना भोळे सभागृह
१८ आणि १९ आॅगस्ट
तपशीलवार कार्यक्रम इथे पाहता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||