गंमत
नवकवितेच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक,
"गण-मात्रांचे कृत्रिम बंधन सत्वर तोडुनी टाक !"
यतिभंगाचे भूत लेखणीस कायम भिववित होते
त्या भीतीने तरल काहिसे हातून निसटत होते
गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको अता मळलेली
वाट पुन्हा ती छंद-बद्ध कवितांची कोंदटलेली
वृत्त-छंद-मात्रांचे अवजड ओझे लेवुनी बसली..
..होती माझी कविता, विमुक्त होता निर्मळ हसली
त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही,
"मुक्तक लिही, पण ध्यानी ठेव..यमकाविण "गंमत" नाही !"
प्रतिक्रिया
आवडली
'यात्री टच' नाही जाणवला, पण वृत्तात आहे असं वाटतंय. कोणतं बरं?
शेवटची ओळ अगदी अचूक.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
अगदी अगदी. यमकाने गंमत येते
अगदी अगदी. यमकाने गंमत येते पण मुक्तकातुन कविता जास्त उलगडते.
धन्यवाद
१४टॅन, ..शुचि आपल्या प्रतिसादाबद्दल.
"मुक्तक लिही, पण ध्यानी ठेव.
"मुक्तक लिही, पण ध्यानी ठेव..यमकाविण "गंमत" नाही !"
हे माहिती नव्हतं
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
माहिती असण्याचा
प्रश्नच कुठे येतो? गंमत फार गांभीर्याने नका घेऊ.
केशवसुतांची कविता वाचून न
केशवसुतांची कविता वाचून न आवरता आलेली काव्यपिपाणी ??
गर्दीतला दर्दी
केशवसुतांची/च्या कोणत्या कविता
वाचून ? जरा बादरायण संबंध विस्कटून सांगा की
खूप छान
खूप च छान
मतवाला,
धन्यवाद.