हे सारे कसे बदलेल??

अंधश्रद्धा नावाचे अविवेकी वादळ आचारविचाराचे जणू एक वादळ आज समाजात घोंघावतच आहे. जादूटोणा ,देवदेवस्की ,भूत ,भानामती अशी उघड स्वरूपातील अंधश्रद्धा देखील विज्ञान वा शिक्षणाच्या प्रभावाने कमी होताना दिसत नाही .महाराज ,साधू,बाबा,स्वामी ह्यांचा धंदा तर भलताच तेजीत चालताना दिसतो आहे .आपल्या भक्ताचे भौतिक समृद्धि ,पारलौकिक कल्याण ,आध्यात्मिक उन्नती ह्यात भर दिवसेंदिवस पडतोच आहे . नागरी सुविधेवर ह्याचा प्रचंड ताण पडतो श्रद्धेचा भाग समजून सर्वसाधारण लोक ही बुवाबाबाला भक्तीचे एकमेव द्वार त्याच्या चरणावर असते असे समजून त्यांना शरण जातात .
या सार्याविरूद्ध संघर्ष करताना दोन सल्ले सतत निदर्शनास येतात .एक म्हणजे की जागतिकीकरण व खाजगीकरण यांतून प्रचंड अस्थिरता निर्माण झाली .शिक्षण मिळेल ते मिळाले तर नोकरी मिळेल पण ती टिकेल ह्यांची शाश्वती रहालेली नाही .
ह्या अशा परिस्थितीत परस्पर मानवी संबंधही अमानवी झालेत .
आज धर्माच्या नावाने राजकरण करणार्यांच्या शक्तिंचा प्रभाव समाजावर वाढत चालला आहे .लोकांच्या धर्मभावनेचा कच्चा माल वापरून त्याद्वारे मतपेटीतून सत्तेचा पक्का माल या राजकारणी लोकांना बाहेर काढावयाचा आहे . यासाठी लोकांचा ही भावना नैतिकतेऐवजी धर्मांधतेकडे आकर्षित होत आहे . यासाठी ही बाबा लोकांनी कुठे कसर सोडली नाही महाराजांचे वाढते प्राबल्य ,कर्मकांडे ,धर्मसोहळे यांचा उसळतो जल्लोष वेळ खावू परिस्थित ही तेवढाच अंगीकारला आहे .
पूजाअर्चा ,व्रतवैकल्ये यांद्वारे वंचितांना व बहहुसंख्यकांना या देशात कोणतीतरी दैवी शक्ती ,चमत्काराने आपले रक्षण होईल असे वाटते . समाजात क्रांतिकारी स्वरूपाचे राजकीय ,सामाजिक ,आर्थिक बदल होत नाही तेव्हा पर्यत ही परिस्थिति बदलणे शक्य नाही पण हा बदल स्व : विचारातून होणे गरजेचे आहे .
वर्तमानपत्रात येणारे राशिभविष्य हे लोकांना चक्क वेड लावत असते लोक काही नाही पण सर्वात आधी वर्तमानपत्र हातात आल्यावर राशीभविष्य बघतात. स्युडो सायन्सला तर आजकाल जणू काही पंखच फुटलेले आहे .दैवी वास्तुशास्त्र ,फेंग शुई ,गर्भातील संस्कार अशा अनेक बाबीनी त्या क्षेत्रात आपला विळखा घातला आहे . धर्मातील कालबाह्य वर्ते वा रुढि ह्यांची देशात मोठी परंपरा आहे .वटसावित्री सारखी वर्ते शिकली सवरली ही स्त्री नवर्यांच्या अखंड आयुष्यासाठी वटाची पुजा अर्चना करते हे कितीपत योग्य असते . मार्गशीर्ष महिन्यातील वैभव महालक्ष्मी चे व्रत महानगरांपासून ते पार खेड्यापर्यत पसरले.
पर्यावरणाची ऐसी की तैसीतर होतेच पण ह्या व्रताविरोधात कोणीही ब्र उच्चारत नाही .विज्ञानयुगात अशा खुळचट चालीरिती पार पाडणार्यांबद्दल खंत वाटते . देव-दैवीचे फोटो चमत्कार करतात ही चुकीची मनोधारणाही खुप खोलवर रूतून बसलेली आहे .
गणेशविसर्जनाच्या वेळी पाण्यात न विरघळणारे तसेच गंभीर विषारी रासयनिक रंगानी रंगवलेले हजारो टन प्लँस्टर अॉफ पँरिस पाण्यात मिसळल्या जातात.
वृत्तपत्रांत वा विविध चँनेल्सवर जे सतत दाखविले जाते ,त्याला नकळत अधिमान्यता प्राप्त झालेली असते .धार्मिक सोहळे ,प्रचंड गर्दीच्या जत्रा यात्रा ह्या खपाऊ गोष्टीसोबत लक्षावधी लोकांच्या भावना जोडलेल्या असतात. डोळसपणे कुणीही ह्यांचा विचार करीत नाही.
आधुनिक आध्यात्मिक बुवाबाजीने सर्वसामान्य जनतेला कसे लुबाडले हे शेवटी निदर्शनास आले ही आधी भक्त बनविने मग पर्मात्मा समजून आपल्या शरणावर भक्तांना जागा देणे .प्रचंड पैशाची लुट प्रचारासाठी स्वतः ची पुस्तके छापने आणिजनातही पाखडाला तेवढी बळी पडते आणि आसाराम ,रामरहिम अशा कितीतरी बलात्कारी बाबांना खतपाणी घालत देव नामाचा त्यांचा सानिध्य्यात राहून जयजयकार करतात. वैज्ञानिक दृष्टिकोण ,शोधक बुद्धि ,सामाजिक सुधारणा मानवतावादी विचार ह्या गोष्टी गेल्या मग खड्यात .
हे सारे कसे बदलेल .कृतीतून की विकृतीतून ??

.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मिपावरचे हे कोणी वाचले का? लेखक कोमलतैंच्या विदर्भातला आहे.

"ये कलरफुल ऐक ना"

आबा - ह्या लेखकावर नजर ठेवा, कुठलाही विषेशांक हिट करायाचा असेल तर ह्यांची एक कथा पाहिजेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'काळजाला फातिमा फासणारी' लव्ह स्टोरी ना? वाचली!

त्या लेखकाला हृदयाच्या आत काळीज आहे. अशा डब्बल शरीररचनेमुळे ते उपास काढण्याइतके ष्ट्रॉन्ग झाले असावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

'काळीज' म्हणजे नक्की काय? हार्ट, की लिव्हर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिव्हर /यकृत ... कल्पनाविस्ताराला बराच वाव आहे ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापटण्णा, ऐसीवर "कलरफुल" असे संबोधता येइल असे कोण आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुताई , तुम्हाला कोण वाटतं ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी आधी प्रश्न विचारला ना बापटण्णा. उत्तर द्यायचे सोडुन मलाच विचारताय Sad

मला बाहेरुन ब्लॅक अँड व्हाइट आणि आतुन कलर्फुल माणुस माहितीय.
आणि
एक कलर्स बदलणारा पण माहितीय..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो अनुताई , मला प्रश्न पडलाच नाहीये .प्रश्न तुम्हाला पडलाय आणि तुम्हाला तर उत्तरं पण माहिती आहेत ..
सांगून टाका राव , ( अनु राव ) आता आमची पण उत्कंठा वाढून राहिली .. ते वरून काळे आणि आतून रंगीत आणि रंग बदलणारे कोण ते ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग ती कट्यार का काय घुसलेली ती यकृतात होती??????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय करणार , अर्थ तर तसाच होतो बाबा ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग ती कट्यार का काय घुसलेली ती यकृतात होती??????

व्हाय नॉट?

अफझलखान ट्रीटमेंट?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यकृत असो की प्लीहा, डजंट म्याटर, शेवटी बत्तीस दातांचा बोकड अर्पण झाला हे महत्त्वाचे. पण ते यकृत होते हे माहिती नव्हते, हृदयच वाटायचे नेहमी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यकृत असो की प्लीहा, डजंट म्याटर, शेवटी बत्तीस दातांचा बोकड अर्पण झाला हे महत्त्वाचे.

ते तर झालेच, परंतु येथे तो मुद्दा नाही. मुद्दा तूर्तास इतकाच आहे, की ती विशिष्ट सर्जिकल प्रोसीजर (बोले तो, कट्यार काळजात यानी कि यकृतात घुस(वि)णे) व्हॅलिड असू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जनार्दन तुकाराम मोल्सवर्थ यांनी

काळीज; the heart (literally, the liver).

असा अर्थ देऊन दोन्ही अवयवांवर पाय ठेवला आहे.

तुळपुळे आणि फेल्डहाऊस यांनीही "1) काळीज (p. 94) kāḷīja n ( H) Properly the liver, but commonly understood of the heart."

हे झालंच कसं? याच्यामागे काहीतरी भन्नाट भाषाशास्त्रीय कथा आहे का?

_________
अवांतर: दारुड्याच्या लिव्हरची तुलना सशाच्या काळजाशी करावी का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

Properly the liver, but commonly understood of the heart."

हे परफेक्ट वाटतंय. हे का झालं ते पाहिलं पाहिजे. कॉमनली बोलताना काळीज = हृदय असेच समजले जाते. त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असेल हे फक्त कलेजी नामक पदार्थात यकृत मिळते तेव्हाच लक्षात येते.

एक अतिअवांतर उदाहरण देतो. मुघलकालीन कागदपत्रांत घोड्यांचे उल्लेख असतात त्यात "निळा घोडा" अशी एक संज्ञा वारंवार येते. आता निळ्या रंगाचा घोडा काही नैसर्गिकरीत्या नव्हता, आताही नाही. त्याचा अर्थ मुळात पांढरा घोडा असा आहे! पांढऱ्यासाठी निळा का वापरला देव जाणे. किंवा होमरच्या काव्यात "वाईन-डार्क सी" असे समुद्राच्या रंगाचे वर्णन येते. भूमध्य समुद्र आणि एजिअन समुद्र हे दोन्ही निळेशार असतानाही निळा हा शब्द न वापरता वाईनचा रंग वापरला म्हणजे जरा चमत्कारिकच प्रकार आहे. तसेच काहीसे इथेही झाले असावे.........

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे नुसता शाब्दिक उल्लेखच नाही तर लघुचित्रात चक्क निळ्या रंगाचे घोडे दाखवले पण आहेत.
g
मुख्य म्हनजे त्या घोड्यांवर जशा प्रकारचे स्पॉटस आहेत तशा प्रकारचे स्पॉटस नॉर्मली सध्यकालीन घोड्यावर दिसत नाहीत. जरा जरा जिराफ स्टैल आहेत.
g1

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐला हे माहिती नव्हते. मेहेंदळेकृत शिवचरित्रात दिलेला उल्लेख फक्त उद्धृत केला इतकेच. सरांना सांगायला लागतंय आता....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्रे कोट कलर्स बद्दल विक्या मारताना असं कळलं की वरील घोडा हळू हळू पूर्ण पांढरा होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे वा, एका अमेरिकन राजकीय पक्षाला त्याचे बोधचिन्ह अधिक वास्तववादी करण्याची सोय झाली तर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लहानपणापासून डोक्यात ' अबलख वारू' हा शब्द शिरून- मुरून राहिला होता. पुढे कळले की अबलख म्हणजे अभ्रकी रंगाचा, चंदेरी किंवा पांढरसर राखाडी. नंतर वस्त्रेतिहास चाळताना भरतकामाच्या माहितीत ' आबला वर्क' सुद्धा सापडले. आरश्याच्या चौकोनी ,गोल टिकल्या कापडावर भरणे म्हणजे आबला काम. अभ्रक हे पांढरे शुभ्र दिसत नाही. त्यात थोडी ॲश ग्रे रंगाची अगदी फिकट निळसर झाक दिसते. शिवाय अभ्रकी रंग चित्रात जसाच्या तसा उमटवता येत नाही. पाण्याचाही रंग हुबेहूब रंगवता येत नाही. त्यासाठी फिकट निळी चंदेरी झाक रंगवावी लागते. अर्थात पाण्यात आकाशाचे प्रतिबिंब पडल्यामुळे ते डोळ्यांना निळे दिसते म्हणून त्याचा रंग निळा मानला गेला आहे आणि आकाशही निळ्या प्रकाशलहरींच्या अधिक विकीरणामुळे निळे भासते ही वेगळी गोष्ट.
शब्दकोशात अबरख म्हणजे अभ्रक. अबलक/ अबलख (अरबी) म्हणजे पांढऱ्या व काळ्या दोन रंगांचा, बांडा, कबरा. अबलक (नुक्तावाला क ) ही एक इस्लामी आर्किटेक्चरची पद्धत आहे. त्यात सफेद लाइम स्टोन आणि काळा बसाल्ट यांच्या लाद्या एका आड एक वापरून (किंवा नंतर नंतर कुठलाही गडद आणि फिकट रंग एका आड वापरून) पृष्ठभाग सजवला जातो.
पण अर्थात लोकगीतांतूनसुद्धा निळ्या घोड्याचा उल्लेख बरेचदा येतो. हणमंताची निळी घोडी येता जाता कमळे तोडत असते किंवा खंडेरायाचा घोडासुद्धा निळा असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त माहिती..
किराणा मालाच्या दुकानात मेनकापडाची/प्लॅस्टिकच्या पिशवीत सामान देतात तिला अभ्रकची पिशवी का म्हणतात काय माहित? मला किती तरी दिवस प्लॅस्टिक अभ्रक खनिजापासून तयार करतात असे वाटायचे, पण मग अभ्रक इतके दुर्मिळ खनीज आहे हे कळल्यावर काही तरी गडबड आहे असे वाटलेले. अभ्रक चा अर्भकशी गोंधळ व्हायचाच.
१. खरतर मेन कापड तरी का म्हणायचं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मेणकापड एकेकाळी खरेच असायचे. ज्यूटच्या किंवा तत्सम दुसऱ्या कापडाला एका बाजूने मेणाचा थर देऊन ते जलनिरोधक बनवीत. अशा मेणकापडाच्या गोणींतले सामान भिजण्याची शक्यता कमी होई. पुढे पुढे रबराच्या ताग्यालाही मेणकापड म्हणू लागले. कृत्रिम धाग्यामुळे सगळे चित्रच बदलले पण मेणकापड हा शब्द मात्र टिकून राहिला.
पण मेणकापड या संज्ञेचा अभ्रकाशी काय संबंध ते कळत नाही. कदाचित कृत्रिम कॅन्वास च्या त्या मोठाल्या मालवाहू पिशव्या अभ्रकी रंगाच्या दिसत होत्या असतील म्हणून असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेणकापडाचा अभ्रकाशी नसेलही कदाचित, परंतु अर्भकाशी मात्र अतिनिकटचा संबंध आहे.

समझने वाले को, इ.इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुत बहुत साधुवाद..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

दूर झाली, ते "एक आणा अबलक घोडा" ची

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

प्रतिसाद नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण. अरेबिकमध्ये निळा म्हणजे अझ्रक أَزْرَق (स्पॅनिशमधल्या zarco या नीलछटादर्शक शब्दाचा स्रोत) - याचा या शब्दाशी काही संबंध असू शकेल का?

अबलकबद्दल दोन रोचक दुवे सापडले:
१. http://www.sonic.net/~tallen/palmtree/pisa.dor.htm

२. https://ar.wikipedia.org/wiki/%D8%AD%D8%AC%D8%B1_%D8%A3%D8%A8%D9%84%D9%82 --> हे अरेबिक विकीपेज गूगल (क्रोम/ट्रान्स्लेटर) द्वारे अनुवादून वाचता येईल. अबलकचा उगम येमेनमधला आहे, असं दिसतं.

(बाकी होमरच्या 'वाईन-डार्क सी'साठी रंगांधळेपणापासून निळ्या रंगाच्या वाईनपर्यंत स्पष्टीकरणे वाचली आहेत - पण अर्थात, हे सारे आडाखेच आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेही रोचक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शीर्षकाला टाळी. खूप काही जागवले गेले.
होमरच्या वाइन रेड सागराचा उल्लेख बॅटमन यांनीही केला आहे. मी होमर पूर्ण वाचलेला नाही.
एक बालिश शंका - हे जे वाइन रेड समुद्राचे वर्णन आहे ते दिवसाच्या कोणत्या काळातले आहे? म्हणजे संध्याकाळचे आणि अस्तवेळीचे असेल तर त्यावेळी समुद्र क्रमाने भगवा, लालभडक, वाइन रेड आणि गडद काळसर लाल होत जातो.
सकाळी समुद्रात सुरू झालेले युद्ध संध्याकाळपर्यंत चालले तर त्यावेळी समुद्राचा रंग वाइन रेड असेल. सैन्य सकाळी कूच करून संध्याकाळपर्यंत समुद्रप्रदेशात पोचले असेल तर तेव्हा समुद्र वाइन रेड दिसेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक करेक्शन- वाईन-डार्क समुद्र असा उल्लेख आहे. त्यात कुठला एक कलर असे लिहिलेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अज्नान दूर झाले. खूप आभारी .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लाडघरच्या तामस्तीर्थाला वाईन रेड समुद्र म्हणता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी होमरच्या 'वाईन-डार्क सी'साठी रंगांधळेपणापासून निळ्या रंगाच्या वाईनपर्यंत स्पष्टीकरणे वाचली आहेत - पण अर्थात, हे सारे आडाखेच आहेत.

हे बहुधा इथे वाचलं आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बिंगो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिरोचक, अनेक धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारताबाहेर खुप पूर्वी यकृत किंवा पचनसंस्थेला खुप महत्व होते, म्हणजे हृदयापेक्षा जास्त महत्व ( किंवा हृदयाचे महत्व कळले नव्हते ). भावना आणि खासकरुन धैर्या चा लिव्हर शी संबंध आहे अशी समजुन होती. गट्स, गट्सी, गट फीलिंग् असे शब्द इंग्लिश मधे म्हणुनच आहेत.
कलेजा ( खासकरुन मराठीतले काळिज ) म्हणजे यकृत पण भारतात ( महाराष्ट्रात जिथे हा शब्द बाहेरुन आला ) हृदयाचे महत्व माहिती असल्यामुळे चुकुन ह्या वरच्या समजुतीमुळे ( धैर्य इ.इ. ) त्याचा अर्थ हृदय असा लावला गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जनार्दन त्रिंबक.

(जनार्दन त्रिंबक मोरेश्वरभट असे पूर्ण नाव आहे.)

बाकी चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो मी वाचले आहे ."पवन तिकटे "ह्यांनी हा लेख लिहिला होता "ये कलरफूल ऐक ना" पुण्यनगरी वर्तमानपत्रात प्रकाशित झाला होता तो लेख .
पण काय झाले ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...द्याल ते छापतील. मराठी पेपरांत हल्ली दम राहिलेला नाही.

(इंग्रजी पेपरांची अवस्थाही फारशी वेगळी नाही म्हणा. एकंदरीत जागतिक पत्रकारिता खालावलेली आहे. चालायचेच!)

आत्ताच वाचला मी तो लेख. भयंकर आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोमलतै, एक अरुण जोशी म्हणुन आहेत इथे, ते तुमच्या लेखाचा प्रतिवाद करु शकतील. तुम्ही त्यांना विनंती केलीत तर ऐक्तील ते.

माझे वैयक्तीक मत तुम्हाला हवे असेल तर ते असे. अंनिस चा दहशतवाद आणि त्यांनी हातात घेतलेल्या "व्यक्तीस्वातंत्र्यांच्या संकोचाचे" मिशनचा निषेध करावा इतका थोडा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक अरुण जोशी म्हणुन आहेत इथे, ते तुमच्या लेखाचा प्रतिवाद करु शकतील. तुम्ही त्यांना विनंती केलीत तर ऐक्तील ते.

अनु बरोबर सहमत. जोरदार सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंधश्रद्धा तर भारतीय समाजात मुरलेली आहे. तिला वादळ कसे म्हणता येईल ? त्याविरुद्धचा लढा हा एकेकाळी वादळ होता, असे फारतर म्हणता येईल. पण तो लढाही इतका जुना झालाय की त्याला फक्त रिपरिप म्हणता येईल.
नोटाबंदी, जीएसटी ही खरी वादळं आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

जिगर म्हणजे हृदय नसून लिव्हर हा साक्षातकारदेखील अलिकडेच झाला मला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गजल में बंदिश-ओ-अल्फाज ही नही काफी
जिगर का खून भी चाहीये कुछ असर के लिए

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिगर का खून

भरपूर दारू पिण्याचा (दुष्)परिणाम?

नाही म्हणजे, या लोकांच्यात (मुसलमान असूनसुद्धा) दारूचे महत्त्व अंमळ अनन्यसाधारण होते, नाही? (चूभूद्याघ्या.)
..........
'या लोकांच्यात' बोले तो, त्या गझलाबिझला नि शेरबीर पाडणाऱ्या कंपूत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेवटी जे फॉर्बिडन त्याचीच आस जास्त, नै का?

तदुपरि- हरामखोर या शब्दाची व्युत्पत्ती मस्त आहे. (क्षयझ)खोर म्हणजे क्षयझ ची आसक्ती असणारा. जे हराम अर्थात फॉर्बिडन आहे त्याची आसक्ती ज्याला आहे असा तो हरामखोर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शेवटी जे फॉर्बिडन त्याचीच आस जास्त, नै का?

हो, ती तर असायचीच. तदुपरि, ती चालून गेली - दे कुड गेट अवे विथ इट - हे महत्त्वाचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>शेवटी जे फॉर्बिडन त्याचीच आस जास्त, नै का?<<

'दारू इस्लामहून जुनी आहे आणि दारुशिवाय आमचं जगणं दिवसेंदिवस अधिकाधिक अशक्य होत गेलं आहे'
- एका मध्यपूर्वेतल्या मित्राचे विचारमौक्तिक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बा शराब दीवाना बाश बा मोहम्मद होशियार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

... इस्लामहून जे जे जुने, ते ते सर्व 'जाहिलियत' या सदरात मोडत नाही काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(मुसलमान असूनसुद्धा) दारूचे महत्त्व अंमळ अनन्यसाधारण होते, नाही?

यावरून आठवलं: मध्य तुर्कस्थानात 'कोन्या' नावाचा प्रांत (आणि त्याच नावाचे शहरही) आहे. इतर प्रांतांच्या मानाने, हा भाग धार्मिकदृष्ट्या अधिक कट्टर मानला जात असला तरी तिथे दारुसेवनाचे (विशेषत: राष्ट्रीय पेय - ॲनिस फ्लेवर्ड 'राकी'चे) प्रमाण लक्षणीय आहे. कुराणातल्या 'सुरा'(!) तुम्हांला दारू पिण्यास मज्जाव करत नाहीत, तर त्या तर्राट होण्याविरूद्ध आहेत; असे या विरोधाभासामागचे स्पष्टीकरण सांगण्यात आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'कोन्या' आणि 'राकी'...
हम्म , म्हणजे जगातील हा प्रांत उच्च्चभ्रू आणि रोचक डिकलेअर करायला हरकत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नंदन शेठ ,
किमान दोन चोरलेली गाणी असणाऱ्या "घरकुल "चित्रपटातील फैयाज नी गायलेलं जोगिया उर्फ "कोन्यात झोपली सतार " हे पण इथेच वगैरे ..
असो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>> किमान दोन चोरलेली गाणी असणाऱ्या
--- ही कुठली हो गाणी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पप्पा सांगा कुणाचे ( हे अगदीच अरे अरे आहे , म्हणजे मूळ गाण्यात पप्पा जिथे हसतात , अगदी तिथ्थेच इकडचे पप्पा अरुण सरनाईक तस्सेच हसतात . गरीब) आणि नंबर 54 मन्ना दे म्हणजे अगदी असो .

दुर्दैव असं आहे की सी रामचंद्र च संगीत . थोर संगीतकार . असा थोर संगीतकार की ज्यावेळी अमेरिकेत रॉक अँड रोल पूर्ण इव्हॉल्व होत होते , तेव्हाच रॉक अँड रोल चे मर्म जाणून त्यांनी ओरिजिनल इररेझिस्टीबल रॉक अँड रोल केली
या पार्श्वभूमीवर हे जास्त करुण वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"पप्पा सांगा कुणाचे" हे ऐकूनच मानसिक डायबेटीस होतो साला. त्या गाण्याच्या गीतकाराला, मुजिक डिरेक्टरला अशा सर्वांना भूत जलोकियाच्या सॉसमध्ये आंघोळ करावयास लावली पाहिजे तेव्हाच या पापाचे क्षालन होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अतिसहमत्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या मानसिकडायबेटिसकर्त्या गाण्यावर एक पुरातन काकाजोकही आहे.

"पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कोणाची? मम्मी दुसऱ्या काकांची. ह्य: ह्य: ह्य:"

नीडलेस टु से, चट्टेरीपट्टेरीपैजाम्याच्या नाडीला टांगून वगैरे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

ह्या ह्या ह्या ह्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आता ऐकाच हे ओरिजिनल
पापा लव्हज मामा बाय डोनाल्ड पिअर्स... १९६०.
https://www.youtube.com/watch?v=58R8-olKYXo

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घरकुल मधील उचलेगिरी पहिल्यांदा ऐकली तेंव्हा मोठा मानसिक धक्का बसला. आणि सी. रामचंद्राला 'अण्णा' म्हणायच्या ऐवजी आर. चितळकर म्हणावसं वाटलं! (जसे मार्मिकमधे शुद्धनिषाद व्ही. शांतारामला एस. वणकुद्रे म्हणायचे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

हे बरोबर आहे तिरसिंगराव ,
पण हि त्यांची म्हातारपणातील चूक असावी ( हि आणि अश्या )
आर डी वगैरे नंतर आले*... पण मूळ पाश्चात्य (तेव्हाच्या ) कॅन्टेम्पररी संगीताची खरोखर 'जाण 'आणि त्यातील मर्म जाणून तशी ( म्हणजे न चोरता सुद्धा ) कंपोझिशन्स फार उच्च दिली यांनी. अर्थात यांच्या काळात तसे दादा अरेंजर्स आणि म्युझिशियन्स पण असणार आसपास ..
यांना रॉक अँड रोल 'कळाले '( जसे शंकर जयकिशन याना 'नाही 'कळाले . ) शंकर जयकिशन यांना तर रॉक अँड रोल मधला फॉलिंग ओव्हर बीट तर चक्क ब्यांडवाल्याना आवडेल असा खेमटा करून ( धिं ता ता धिं ता ) टाकला .
आपल्याला ( उत्तरायुष्यातला गंभीर चुकांसकट हि ) सी रामचंद्र अर्थात आर चितळकर यांची सांगीतिक रेंज आवडते .

* आर डी चा एकेकाळी मी भयंकर पंखा होतो . अजूनही आहे पण भयंकर वगैरे नाही .( पण त्याचे तथाकथित पाश्चिमात्य संगीत ओव्हर रेटेड वाटते )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गंभीर चुका पोटात घालूनही 'अण्णा' थोरच होते.
फक्त म्हातारपणी त्यांनी, " हवे तुझे दरिशन मजला', इतकं पडायला नको होतं. (त्यातलं 'प्रभु' ऐकताना डोळ्यांसमोर 'प्रभुकुंजच' यायचं!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

होय होय !! एकदम सहमत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(त्यातलं 'प्रभु' ऐकताना डोळ्यांसमोर 'प्रभुकुंजच' यायचं!)

तिमा : कोमलतैंच्या धाग्यावर अण्णांच्या ( बापटण्णा नव्हे ) कोमल भावनांची अशी खिल्ली उडवणे बरोबर नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉरी कोमलतै.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

कोन्या हे शहर जगप्रसिद्ध इस्लामी (सूफी) संत जलालुद्दीन मुहम्मद ' रूमी' यांचे स्मृतिस्थळ आहे. इथे एके काळी द्राक्षबागा होत्या. (आताही असतील) या द्राक्षबागांतून हिंडत असता मेवलाना रूमी यांच्या परम शिष्याने त्यांना काव्य लिहिण्यास सुचवले. ही लिखिते पुढे मस्नवी अथवा मथ्नवी या नावाने जगप्रसिद्ध झालीं. यात अनेक ठिकाणी पिऊन धुंदीत मस्त असण्याच्या अवस्थेचे वर्णन आहे. मुळात जलालुद्दीन 'रूमी' यांची परंपरा हनाफी इस्लामची म्हणजे थोडीशी उदारमतवादी. त्यातून सूफी प्रभाव. भक्तीत मस्त होऊन ' समा नृत्य' करण्याच्या परंपरेचे ते प्रणेते मानले जातात. तर ज्या प्रदेशात जलालुद्दीन मुहम्मद यांचा जबरदस्त प्रभाव आहे तिथे वाइन पिणे हे तितकेसे धर्मविरोधी मानले जात नसावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"मेवलाना" ऐकून त्याच नावाचे तुर्की हाटेल डोळियांसमोर उभे राहिले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काही मूलभूत नियम -
०. प्रमाणलेखन किंवा जी बोलीभाषा वापरत आहात, तिचं प्रमाणलेखन आलंच पाहिजे असं नाही. पण

१. मराठीत, काही मोजके अपवाद वगळता, विरामचिन्हं आधीच्या शब्दाला चिकटून येतात. स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, इ. शब्द, विरामचिन्ह आणि मोकळी जागा, अशी पद्धत. विरामचिन्हानंतर मोकळी जागा सोडतात. अपवाद -
अ. कोलन (:) किंवा हायफन (-) यांच्या आधी मोकळी जागा सोडतात, विशेषतः कोलनाच्या आधी. कारण तो विसर्ग वाटू शकतो.
आ. अवतरणचिन्ह सुरू होताना आधी मोकळी जागा सोडतात.

२. नव्या परिच्छेदाआधी मोकळी ओळ सोडली की वाचताना डोळ्यांवर आणि पर्यायानं मेंदूवर कमी ताण येतो.

बाकी लेखन फारच आवेशात केलेलं आहे. लेखनात फार सत्व असल्याचं मला तरी दिसत नाही. सत्व असेलही कदाचित, पण मला ‌व्यक्तिशः त्याची गरज नाही. मुळात अंगावर चिकार चरबी असताना आणखी वेफर्स खाण्याची गरज नसते, तसंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गरज म्हणून कोण वेफर्स खातं तै?
वेफर्स खातात कारण त्यांना वेफर्स खायला आवडतात आणि वेफर्स उलटून काही बोलू शकत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुठल्यातरी हादग्याच्या गाण्यात -- ***ची निळी घोडी --- अशी ओळ आहे.
सैन्यातले सगळे अरबी पांढय्रा घोड्यांवर ,चिलखत जिरेटोप घालून असल्यावर सेनापती किंवा प्रमुख व्यक्ती ओळखणार कसे म्हणून घोड्याला निळे १ रंगवत असावेत. थोड्या जागा सोडल्यास त्याचे पांढरे ठिपके होत असतील.

*१ नीळ भारतातून विकली जात असे. तसेच हा निळा रंग श्रीमंतांच्या वस्त्रांचा होता. गरीबलोक तर उघडेही असत वस्त्रे दूरच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुठल्यातरी हादग्याच्या गाण्यात -- ***ची निळी घोडी --- अशी ओळ आहे.

ही घ्या त्या गाण्याची लिंक. दुवा

कशाचा कशाला पत्ता नाही.

बाकी, भोंडल्याची गाणी असायची कैच्याकै. माझे सर्वात फेवरिट बोले तो ज्यात तिकडून येऊन वेडा डोकावून पाहतो आणि स्वतःच्या निवांत झोपलेल्या बायकोला मेली म्हणून जाळून टाकतो. (नाहीतर आमचे कवि अनिल! स्वतःच्या खरोखरच मरून पडलेल्या बायकोकडे पाहून निवांतपणे 'अजुनी रुसूनि आहे' म्हणून कविता लिहितात, मग ती लिफाफ्यात घालून ष्टांप लावून पोष्टाच्या पेटीत टाकून परत घरी येतात नि आल्यावर शांतपणे चहा‍चे आधण टाकतात.)

तसाही आम्हाला त्या गाण्यांपेक्षा भोंडल्याच्या खिरापतीत (ओळखण्यात नव्हे.खाण्यात.) जास्त रस असायचा म्हणा!

एक 'अस्सं सासर द्वाड बाई'वाले पण गाणे असल्याचे अंधुकसे आठवते. शिवाय, करेक्ट मी इफ आय अॅम राँग, परंतु, 'दोन चाबूक अधिक मारा, माझं उष्टं तुम्हीच काढा' असेही काहीसे एक (क्वाइट डिस्गस्टिंग, आणि व्हायोलन्स अगेन्ष्ट वीमेन - आणि त्यातसुद्वा व्हायोलन्स अगेन्ष्ट वीमेन बाय वीमेन - प्रमोट करणारे) गाणे होते, नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेलेल्या बायकोबद्दलच्या पॅऱॅ ला +११११११११

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या गाण्यातशेवटच्या ओळीत धक्कातंत्र वापरलं आहे. फक्त धक्का देताना तो अलिकडच्या कथेशी सुसंगत हवा हे लक्षात आलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

काय म्हणता कवी अनील फारच करतात॥

१) राजहंस माझा निजला,
२) माsलsssवून टाssक दीप
यांच्या काय स्टोय्रा ?
भोंडल्याची अथवा इतर गाणी मानबाच्या काळात किती समर्पक असा काहीतरी धागाच काढावा तिथे हे सर्व स्थलांतरित करू.लेखाचा विषय गढूळ करायला नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मालवून टाक दीप' मी फॉर सम रीझन सुरेश भटांची समजत होतो. पण कदाचित तुमचे बरोबर असेल. पाहायला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला कोणाची माहित नाही, पण मेलेल्या नवय्राला उद्देशून आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

>>कुठल्यातरी हादग्याच्या गाण्यात -- ***ची निळी घोडी --- अशी ओळ आहे.<<

खंडोबाचा घोडादेखील निळा असतो. उदा. ह्या गाण्यात ऐकता येईल -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थोडे अवांतर होते आहे परंतू -

साहित्यातले काळीज - ह्रुदय. ते दु:ख भीती प्रेम तसेच काही रोगांत धडधडून भावनांना दुजोरा देते किंवा प्रतिसाद देते.

शरिरशास्त्रातले काळीज यकृत.
सर्जरी करणारे विशारदही याला हात लावायला घाबरतात. दुसरा भाग मेंदू. एखाद्याला चाकूने/कट्यारीने ठार करायचे असेल एकाच प्रयत्नात अचूक तर काळजावर घाव घालतात. मेंदू,ह्रुदय हाडांत बंदिस्त असते. वार पोहोचेलच असं नाही. काळजाचे लक्ष्य मोठे असते आणि उजव्या बरगडीखाली लगेच असते. शरिरातले सगळे रक्त यातून तीन मिनिटांत फिरते आणि जखम होताच काम फत्ते.
मारणारा उजव्या हातात चाकू धरून शत्रुच्या उजव्या पोटात खुपसून जरा आत चाकू फिरवतो. जपानी हाराकिरी पोटातच चाकू मारला जातो. एकच वारात काम करायचे असते कारण इतर ठिकाणी अनेक वार करण्यात नंतर शक्ती कुठून राहाणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते दु:ख भीती प्रेम तसेच काही रोगांत धडधडून भावनांना दुजोरा देते किंवा प्रतिसाद देते.

लिव्हर धडधडू लागली तर काय बहार येईल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कडू होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे हे काय चाललंय?, कोमलताईंनी अन्धश्रद्धा अणि बुवाबजीविरुद्ध घणाघती लेख लिहून आपणा सर्वांचे बौद्धिक घेतले आणि तुम्ही लोक काळीज म्हणजे यकृत की हृदय की प्लीहा की आणखी काही, घोडा निळा असू शकतो का नाही असले फाटे फोडून वेळ घालवता आहात. महाराष्ट्राचे, मराठी भाषेचे आणि भारताचेहि कसे होणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे हे काय चाललंय?, कोमलताईंनी अन्धश्रद्धा अणि बुवाबजीविरुद्ध घणाघती लेख लिहून आपणा सर्वांचे बौद्धिक घेतले आणि तुम्ही लोक काळीज म्हणजे यकृत की हृदय की प्लीहा की आणखी काही, घोडा निळा असू शकतो का नाही असले फाटे फोडून वेळ घालवता आहात. महाराष्ट्राचे, मराठी भाषेचे आणि भारताचेहि कसे होणार?

हे ही दिवस जातील.... (आणि याहूनही खराब दिवस येतील.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महाराष्ट्राचे आणि भारताचे माहीत नाही, परंतु मराठी भाषेचे कसे होणार, हा प्रश्न मला मूळ लेख पाहिल्यावरच पडला होता. हे सवांतर-अवांतर प्रतिसाद सगळे तर बऱ्याच नंतर आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सारेच बदलेल.

मराठी भाषेचे कसे होणार,?
बदल होत आहे परंतू भाषेत नव्हे तर शिकणाय्रा विद्यार्थ्यांत.
ती उप्रचे लोक जिवंत ठेवणार. काळजी नसावी. ( पनवेलच्या नगरपालिका शाळेत प्रदर्शन लावण्यानिमित्ताने विद्यार्थ्यांची नावे यादव,रामशरण वगैरे कळली. सधन मराठी मुले बाठिया /इतर हाइस्कुलात. पेपरवाले दूधवाले यांची मुले मोफत नपा शाळेत. खिचडी दूध वर फुकट)
अवांतर होतय हे अगोदरच लिहिलय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाला धरून :-
१) गेल्या पाच वर्षांत सर्व राज्यांतून शिरडीला थेट गाड्या सुरू केल्या रेल्वेने ( कराव्या लागल्या.) विमानतळही आला.
२) गर्भाच्या कुंडल्या, संस्कार, जन्म करवायचा मुहुर्त यांचे प्रस्थ वाढले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेल्या पाच वर्षांत सर्व राज्यांतून शिरडीला थेट गाड्या सुरू केल्या रेल्वेने ( कराव्या लागल्या.) विमानतळही आला.

शिरडीवरून परवाचा एक प्रसंग आठवला. विज्ञानलेखकांच्या एका कार्यशाळेला काही कारणानं हजेरी लावावी लागली. सुरुवातीला नारळीकरांचं भाषण, समारोप माधव गाडगीळांच्या भाषणानं वगैरे, आणि कार्यशाळेत सतत 'वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याकडे कसा वाढीला लागायला हवा, आणि तुम्हा लेखकांवर ही मोठीच जबाबदारी आहे' वगैरे सांगितलं जात होतं. समारोपानंतर लोक निघू लागले तेव्हा कुठल्यातरी कॉलेजमधले एक विज्ञानाचे प्राध्यापक येऊन विचारू लागले की आता पुण्यापर्यंत आलोच आहे तर शिरडीला जाऊन मग उद्या घराकडे जायला निघावं म्हणतो, तर हे शिरडी कुणीकडे आलं जरा सांगाल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मयखान्याची स्तुतिस्तोत्रे गाणारे मुमिन तुम्हांला चालतात तर स्वत:च्या दमड्या खर्चून शिरडीला जाणाऱ्या विज्ञानशिक्षकांनी असे काय घोडे मारले आहे?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वत:च्या दमड्या खर्चून शिरडीला जाणाऱ्या विज्ञानशिक्षकांनी असे काय घोडे मारले आहे?

कुणाचं घोडं मारलं गेल्याची तक्रार मी केली नाही. त्यामुळे टरफल उचलणार नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पाने