शब्दांनो

पाह्यलंय तुम्हाला
जिज्ञासेचा तळठाव घेताना.
अज्ञाताच्या कडेलोट दरीतून उसळताना.
स्वप्नवास्तवाच्या हिंदकळत्या सीमेवरून खुणावताना.
सत्याभासाच्या मृगजळातून ठिबकताना.
स्थूलसूक्ष्माच्या अथांग वर्णपटातून विखुरताना.
क्षुद्रतेत बुजबुजताना.
कोलाहलात गजबजताना.
एकांतात निनादताना.
जाणिवेत- नेणिवेत अथक धपापताना.

अनघड शब्दांनो
वेचून वेगळं करतोय
तुम्ही उष्टावलेलं - आजच्या आयुष्यासाठी.
तुम्ही कवेत घेतलेलं- कवितेसाठी.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)