लहरों की शहनाई

.

कश्ती का खामोश सफर है, शामभी है तनहाई भी
दूर किनारे पे बजती है लहरोंकी शेहेनाई भी|

.
अहाहा लाटांच्या सनईचे सूर आणि त्या सुरांवरती आंदुळणारी एक नाव, आंदुळणारी दोन हृदये.
.
साहिर लुधियानवी यांनी लिहिलेले सुधा मलहोत्रा व किशोर कुमार यांच्या आवाजातील, हे गाणे. या गाण्यावर मला वाटतं मतकरींनी एका फार सुंदर लेख लिहिलेला आहे.

हे गाणे ऐकताना, कितीदा ऐकले तरी मन भरतच नाही. फार हुरहूर लावुन जाते हे गाणे. गेल्या जन्मीचे, काहीतरी हरवलेलं आठवते न आठवते तोच निसटते आहे असे काहीसे वाटते. खरं तर दोन प्रेमिकांचा हा खाजगी संवाद. एका उत्कट क्षण जेव्हा एकमेकांच्या मनातील भावनांना कदाचित आज शब्दरूप मिळेलही, नाहीसुद्धा मिळणार.

'लेकिन ये शर्मीली निगाहें मुझको इजाज़त दें तो कहूँ
ये मेरी बेताब उमंगें थोड़ी फ़ुर्सत दें तो कहूँ'

हे hesitation , हि अनिश्चितता, .... कॉलेजच्या पावसाळी misty दिवसांची आठवण घेऊन येते. बोलायचे तर असते पण धीर कोणात असतो? अस्फुट भावना ....

जो कुछ तुमको कहना है, वो मेरे ही दिल की बात न हो
जो मेरे ख़्वाबों की मंज़िल उस मंज़िल की बात न हो

सुधा मल्होत्रांच्या आवाजातील, हे आर्जव, उत्सुकता, तिच्या हृदयातील धडधड किती सुंदर रीतीने व्यक्त करते.

किशोर - कहते हुए डर सा लगता है, कहकर बात न खो बैठूँ
ये जो ज़रा सा साथ मिला है, ये भी साथ न खो बैठूँ
.
सुधा - कबसे तुम्हारे रस्ते पे मैं, फूल बिछाये बैठी हूँ
कह भी चुको जो कहना है मैं आस लगाये बैठी हूँ

तिची ही उत्सुकताच त्याला सारं काही सांगुन जाते. आणि मग गाण्याचा क्लायमॅक्स येतो. तो म्हणतो, अगं वेडे तुझ्या या अधीरतेनेच्, या हृदयाच्या धडधडीनेच मला सर्व काही सांगून टाकले. जेव्हा हृदयाने हृदयाला, उत्कटतेने प्रतिसाद दिला,तेव्हा आता शब्दांचे काय घेऊन बसलीस.
.
आणि मग ती विचारत राहाते "अरे बोला ना. सांगा ना. शब्दबद्ध तर कर तुझ्या भावना." कोण जाणे किती वर्षांनी या भावना शब्दबद्ध होतील, कदाचित अगदी आयुष्याच्या शेवटी हात हातात घेउन ति तिला या भावना सांगेल, खरं तर सांगू पाहील, प्रयत्न करेल आणि तरीही त्या समर्पकतेने व्यक्त होणारच नाहीत.
.

सुधा : कह भी चुको, कह भी चुको जो कहना है
किशोर : छोड़ो अब क्या कहना

कोणत्याही भावुक व्यक्तीला भुरळ घालणारे हे अतिशय serene , गाणे जणू काही दोन प्रेमिकांच्या मधील सुमधुर प्रार्थनाच. कुठेतरी वाचलेले होते कि 'मिश्र भूपाळी' रागातील हे गाणे आहे.

https://i.ytimg.com/vi/FG9aWvSxtMU/hqdefault.jpg

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रसग्रहण आलं!!!
--
पण पी पी पी वाजणाऱ्या शहनाईला माझा पास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्रट्जी तुमचं अतिशय आवडतं , अगदी खासम खास एखादं गाणं सांगा ना. खरं तर सर्वांनीच आपापल्या गाण्याबद्दल एकेक उतारा इथे टाका पाहू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0