भरदुपार

माळावर तापल्या दुपारी
लपलपते मातीवर मृगजळ
खुट्ट वाळल्या बाभुळशेंगा
कुजबुजती वाऱ्याची खळखळ

जीर्ण ढगाला कवेत घेऊन
ऊनकाहिली करी नागडा
ओल्या नजरेने भिरभिरतो
शुष्क सालीचा पिवळा सरडा

मांडुन पत्रावळ पानांची
पळससावल्या दिशा चाटती
डिंक चिकटल्या भेगांमधला
हळू ओघळे मुंग्यांभवती

उरलासुरला चिगूर करपुन
थरथरतो चिंचेवर सुकल्या
सुन्न कापऱ्या क्षितीजावरती
घारींच्या राहिल्या सावल्या

माळावर तापल्या दुपारी
काट्यांमध्ये मारुन फतकल
रवंथ करते बाभुळपाला
बकरी सुस्तावली अजागळ

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

मातीचा गंध असलेली कविता. फार आवडली. चिगूर म्हणजे मोहोर का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिगूर म्हणजे चिंचेचा कोवळा पाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहीत नव्हते. नवा शब्द कळला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

डोळ्यांपुढे भगभगून गेली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मलाही कविता आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

धन्यवाद anant_yaatree, ..शुचि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0