विज्ञान/तंत्रज्ञान

अजि म्या ब्रह्म पाहिले

शीर्षकाचा श्रेयाव्हेर - (असे लेखाच्या सुरुवातीसच करण्याची पद्धत नसली तरी श्री. श्रावण मोडक यांच्या अन्य संस्थळावर वाचलेल्या एका प्रतिसादावरून हे शीर्षक सुचले आहे हे मान्य करतो.)
प्रथम काही विस्कळीत विचार आणि मग चर्चा प्रस्ताव -
१.

’अङ्कानां वामतो गति:’ इत्यादि.

अंक सांकेतिक पद्धतीने दाखविण्याच्या भारतीय परंपरेतील काही पद्धती येथे संक्षिप्त स्वरूपात देत आहे. हे लिखाण 'History of Hindu Mathematics, Vols. I and II, by Bibhutibhushan Datta and Avadhesh Narayan Singh' ह्या जुन्या आणि मान्यताप्राप्त ग्रंथावर आधारित आहे. मात्र लिखाण मर्यादेत ठेवण्याच्या दृष्टीने फार खोलातील तपशील वगळलेले आहेत.

पाणिनीने स्वत: अक्षरांच्या साहाय्याने अंक दर्शविण्याची काही पद्धति वापरली होती असे दिसते. अष्टाध्यायीतील एखादे सूत्र त्याच्यापुढील किती सूत्रांना लागू पडेल हे त्या सूत्रावर अ =१, इ = २, उ = ३... अशा अक्षरांनी दर्शविले जात असे. पाणिनीय व्याकरणाचे अभ्यासक ह्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील असे वाटते.

अशा प्रकारची पहिली स्पष्टपणे समजणारी पद्धति आर्यभटाने (पाचवे शतक) वापरली. क ते ङ = १ ते ५, च ते ञ = ६ ते १०, ट ते ण = ११ ते १५, त ते न = १६ ते २०, प ते न = २१ ते २५, य = ३०, र = ४०, ल = ५०, व = ६०, श = ७०, ष - ८०, स = ९०, ह = १००, अ = १, इ = १००, उ = १०,‍०००, ऋ = १०,००,०००, ऌ = १०,००,००,०००, ए = १०,००,००,००,०००, ओ = १०,००,००,००,००,०००, औ = १०,००,००,००,००,००,००० असे संकेत वापरून आर्यभट खूप मोठया संख्या अगदी संक्षेपाने दाखवू शकतो. उदाहरणार्थ १.३.१ आर्यभटीय येथे महायुगामधील (४३,२०,००० वर्षांमध्ये) सूर्य, चन्द्र ह्यांचे भगण आणि पृथ्वीचे भूभ्रम पुढील शब्दात दिले आहेत (अन्य ग्रंथांत नक्षत्रभगण दिलेले असतात्, येथे पृथ्वीचे दिलेले आहे, तारे स्थिर असून पृथ्वी स्वत:च्या अक्षाभोवती फिरते असे आर्यभटाचे म्हणने आहे असे दिसते):

१.३.१ युगरविभगणाः ख्युघृ शशि चयगियिङुशुछ्ऋलृ कु ङिशिबुणॢख्षृ प्राक्।

रवि भगण = ख्युघृ = ख उ, य उ = २*१०,००० = २०,०००, ३०*१०,००० = ३,००,०००, घ ऋ = ४*१०,००,००० = ४०,००,०००, एकूण ४३२००००. (’अङ्कानां वामतो गति’ ह्या मार्गाने. स्पष्टीकरण पुढे पहा. तसेच ’जोडाक्षराचा स्वर दोन्ही व्यंजनांबरोबर घ्यावा’, भटप्रकाशिकाकाराची टीका)
चन्द्र भगण = चयगियिङुशुछ्ऋलृ = च ६, य ३०, ग इ ३*१०० = ३००, य इ ३०*१०० =३०००, ङ उ ५*१०,००० = ५०,०००, श उ ७०*१०००० = ७,००,०००, छ् ऋ = ७*१०,००,००० = ७०,००,०००, ल ऋ = ५०*१०,००,००० = ५,००,००,०००, एकूण ५,७७,५३,३३६.
कुभ्रम (पृथ्वीभ्रम) = ङिशिबुणॢख्षृ = ङ इ ५*१०० = ५००, श इ = ७०*१०० = ७,०००, ब उ = २३*१०,००० = २,३०,०००, ण ऌ = १५*१०,००,००,००० =१,५०,००,००,०००, ख ऋ ष ऋ = २*१०,००,००० = २०,००,०००, ८०*१०,००,००० = ८,००,००,०००. एकूण =१,५८,२२,३७,५००.

ह्या आर्यभटीय पद्धतीशिवाय ’कटपयादि’ नावाचीहि एक पद्धति पाचव्या शतकापासून तरी वापरात होती. क, ट, प, य = १, ख, ठ, फ, र = २, ग, ड, ब, ल = ३, घ, ढ, भ, व = ४, ङ, ण, म, ष = ५, च, त, श = ६, छ, थ, स = ७, ज, द, ह = ८, झ, ध = ९, ञ, न आणि कोणताहि स्वर स्वतन्त्रपणे = ० असे ह्या कटपयादि पद्धतीचे संकेत होते. उदाहरणार्थ ’राघवाय’ म्हणजे १४४२. (रा = २, घ = ४, वा = ४ आणि य = १ आणि अङ्कानां वामतो गतिः ह्या नियमाने १४४२.)

आणखी एक खूप जागी भेटणारी पद्धति म्हणजे अंकांच्या जागी त्या त्या अंकाशी संबंधित असलेल्या आणि कथा-पुराणे-वाङ्मयातील सर्वपरिचित अशा सजीव-निर्जीवांच्या नामांचा उपयोग. उदाहरणार्थ ’१’ म्हणजे शशि, विधु, मृगांक असे ’चंद्र’ अर्थाचे शब्द, ’२’ म्हणजे नेत्र, अक्षि, चक्षु, बाहु अशी जोडीने आठवणारी नामे, ’३’ म्हणजे गुण, भुवन, काल, अग्नि, राम इ. प्रत्येक अंकाला वर्णनासाठी असे कित्येक पर्याय सुचू शकतात. बहुतेक ग्रंथरचना पद्यात होत असल्याने ह्या उपायाने श्लोकरचनेला मिळणारा लवचिकपणा हा ह्या पद्धतीचा मोठा गुण.

द्वितीय भास्कराचार्याचा लीलावतीमधील हा श्लोक पहा:

व्यासे भनन्दाग्निहते विभक्ते
खबाणसूर्यै: परिधिः सुसूक्ष्मः।
द्वाविंशतिघ्ने विहृतेऽथ शैलै:
स्थूलोऽथवा स्याद्व्यवहारयोग्य:॥

भ (२७), नन्द (९) अग्नि (३) (३९२७) ने व्यासाला गुणून ख (०), बाण (५), सूर्य (१२) (१२५०) ने भागल्यास परिघाचे सूक्ष्म मान मिळते. अथवा व्यासाला २२ ने गुणून पर्वतांनी (७, ७ कुलपर्वत मानले जातात त्यावरून) भागले तर सर्वसाधारण व्यवहारास पुरेसे मान मिळते. (Π = ३९२७/१२५० = ३.१४१६ अथवा २२/७ हे आपणास अंदाजाने माहीत आहेच.)

ह्या तीन पद्धतींपैकी आर्यभटाची विशेष वापरली गेल्याचे दिसत नाही पण बाकी दोन्ही, विशेषत: तिसरी, गणिताशी संबंधित लेखनामध्ये, शिलालेख, ताम्रपट अशा ठिकाणी वर्षगणनेसाठी मोठया प्रमाणात वापरलेली दिसते.

ह्या तिघींशिवाय अन्य काही थोडयाफार वेगळ्या पद्धति देशाच्या वेगवेगळ्या भागांतून प्रचलित होत्या पण त्यांचे स्वरूप प्रादेशिकच राहिले.

’अङ्कानां वामतो गति:’ (’अंक डावीकडे जातात’) ही उक्ति एव्हांना स्पष्ट झाली असेलच. मोठा अंक शब्दांत लिहितांना त्याचा सर्वात छोटा भाग, म्हणजे एकं स्थानावरचा अंक प्रथम दिला जातो. लिखाण डावीकडून उजवीकडे जाते त्यामुळे त्यानंतर दहं, शतं असे अंक उजवीकडे जात राहतात. तोच अंक अंकस्वरूपात लिहितांना साहजिकच एकं स्थानावरला अंक प्रथम ध्यानात येईल. तो लिहिल्यावर पुढला दहं स्थानावरचा अंक त्याच्या उजवीकडे न लिहिता डावीकडे लिहायचा आणि हेच पुढच्या सर्व अंकांसाठी करीत जायचे म्हणजे ’अंक डावीकडे जातात’! अंकगणिताची सर्व मूलभूत कृत्ये अशा पद्धतीने अंक लिहिल्यावरच करता येत असल्याने हे विशेषेकरून स्पष्ट करण्य़ची आवश्यकता भासली असावी. अंक लिहिण्याच्या आपल्या आधुनिक पद्धतीमध्ये आपण सर्वात मोठा अंक प्रथम लिहून खालच्याखालच्या स्थानांकडे उजवीकडे सरकत असल्याने आपल्याला ही उक्ति बुचकळ्यात टाकणारी वाटते हे नैसर्गिकच आहे.

अन्यत्र विसूनानांनी ’अबजद’ पद्धतीचीहि चौकशी केली आहे. येथे असलेल्या माहितीवरून असे दिसते की अंक अक्षररूपात दर्शविण्याची ही अरेबिक पद्धति आहे आणि ’अलेफ् बे ते’ ह्या अरब वर्णमालेवरून ते नाव पडले आहे. - जसे इंग्रजी alphabets हा शब्द A α, B β, Γ γ ह्या ग्रीक वर्णमालेवरून तयार झाला. अधिक माहितीसाठी तेथे पहावे. ह्यामुळे मलाहि प्रथमच शोध लागला की इस्लाममध्ये ’७८६’ हा आकडा शुभ का मानला जातो. असे दिसते की ’बिस्मिल्ला हिर् रेहमान् ए रहीम...’ ह्याचे ते अंकांतील स्वरूप आहे. मुघल इतिहासाच्या वाचनात बादशाहाच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयी काही विशिष्ट अर्थ सुचविणारा आकडा (chronogram) करून त्याच्या कबरस्थानी लिहून ठेवत असत असे वाचल्याची येथे आठवण झाली.

आयसोसेफी (Isopsephy) विषयी मला प्रत्यक्ष माहिती काही नाही पण ह्या विकिपीडिया लेखावरून काही कल्पना येऊ शकते.

प्रसिद्धीचे गौड्बंगाल - एका प्रयोगाची गोष्ट

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा संगणक-संगीत या विषयात प्रा. एच व्ही सहस्रबुद्धे (एचव्हीएस) यांच्या बरोबर संशोधन करत होतो. एचव्हीएसनी मला या प्रकल्पाच्या आरेखनात बराच मोकळा हात दिला होता. मी मला सुचणार्‍या वेड्यावाकड्या कल्पना सरांना सांगत असे. कधी कधी एचव्हीएस त्यातली हवा काढत तर एखाद्या कल्पनेत तथ्य वाटले तर अधिक तपास करण्यास ते उत्तेजन देत असत. या प्रकारात आमच्यात बराच युक्तीवाद होत असे, आणि त्यातून मला बरेच काही शिकायला मिळाले.

आर्यभट आणि पृथ्वीचे भ्रमण

आपल्या पाणिनिविषयक धाग्यात संजय सोनवणींनी त्यांच्या खालील विचारांवर माझ्याकडून टिप्पणीची अपेक्षा केली आहे. हा विषय पाणिनीशी बिलकुल संबंधित नसल्याने विचारांच्या दोन धाग्यांमध्ये गल्लत होऊ नये म्हणून मी माझ्या टिप्पणीसाठी आणि अन्य सदस्यांच्या पुढील प्रतिसादासाठी सोनवणींचे विचार येथे त्यांच्याच शब्दांत देत आहे.

<
अनुलोमगतिर्निस्थौ पश्च्यत्यचलं विलोमगं यद्वत
अचलानि भानि तद्वत समपिश्च्मगानि लङ्कायां ॥९॥
उदयास्तमयनिमित्तं नित्यं प्रवव्हेण वायुना क्षिप्तः ।
लङ्कासमपिश्चमगो भपञ्जरः समहो भ्रमति ॥१०॥ ( आर्यभटीय-गोलाध्याय)
(दहाव्या श्लोकाचा अर्थ खालील पद्धतीने लावला तर ९व्या श्लोकाची सुटका होवु शकते. (श्लोक आहे तसाचा तसा स्वीकारला तर...)
" उदय-अस्तासाठी ग्रहांसहीत सर्व नक्षत्रे लंकेच्या बरोबर पश्चिमेला प्रहव वायुमुळे वाहुन नेली जातात असा भ्रम (निरीक्षकासाठी) निर्माण होतो. "
"पश्चिमेला फिरतो" असा भ्रमतिचा अर्थ घेतला तर ते तसेही असु शकत नही. श्लोकार्थात आपटे यांनी "वाहुन नेला जातो" हा शब्द गाळला आहे.
आता श्री आपटे यांचा श्लोकाच्या प्रत्येक ओळीचा (त्यांनी दिलेला) शब्दार्थ घेवून अर्थ लावून पाहू.
१. उदय अस्तासाठी प्रहव वायुमुळे नित्य वाहून नेला जातो.
२. लंकेच्या बरोबर पश्चिमेला ग्रहांसहित नक्षत्रांचा पिंजरा फिरतो आहे.
यातील दोष (मला वाटतो तो असा...)
उदय आणि अस्तासाठी नक्षत्राचा पिंजरा (ग्रह-गोलांसहित) फिरत असेल तर तो फक्त पश्चिमेकडे फिरतो असे ठाम विधान कसे केले?
पहिल्या ओळीत नित्य काय वाहून नेले जाते हे खालील ओळीच्या अर्थाने घ्यावे लागते.
दुस-या ओळीत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे असे असायला हवे होते पण ते विधान ठाम म्हणते कि "बरोबर पश्चिमेकडे" फिरतो.
पहिली ओळ स्पष्ट आहे. "उदय आणि अस्तासाठी" हा शब्दप्रयोग यथार्थ आहे.
दुसर्या ओळीत मात्र "फक्त पश्चिम" दिसते. येथे मग "भ्रमति" चा अर्थ जर आपण "फिरतो" असा घेतला तर अर्थदोष निर्माण होतो व आर्यभट स्वत:चेच नवव्या श्लोकातील विधान खोडुन काढतो आहे असे दिसते जे मला संभवनीय वाटत नाही. त्यामुळे "भ्रमति" हा शब्द "भ्रम होतो" या अर्थानेच घेतला जायला हवा असे मला वाटते.
त्यामुळे माझ्या अल्प ज्ञानानुसार खालील अर्थ योग्य आहे आणि तो ९व्या श्लोकाशी सुसंगत आहे, तो असा:
" उदय-अस्तासाठी ग्रहांसहीत सर्व नक्षत्रे लंकेच्या बरोबर पश्चिमेला प्रहव वायुमुळे वाहुन नेली जातात असा भ्रम (निरीक्षकासाठी) निर्माण होतो. "
यामुळे नववा श्लोक व दहाव्या श्लोकात सुसंगती येईल व आर्यभट सुर्यकेंद्रित सिद्धांतच मांडत आहे हे स्पष्ट होईल.
>

आता माझी टिप्पणी.

ह्या विषयावर मी अधिकारवाणीने बोलावे असा माझा काही वेगळा अभ्यास नाही. पहिल्या आर्यभटाने सूर्यकेन्द्रित (म्हणजे ज्यामध्ये सूर्य स्थिर आणि पृथ्वीसह सर्व ग्रह त्या सूर्याभोवती फिरतात) अशा खगोलाची प्रस्तावना केली होती किंवा नाही हा विषय पुष्कळ जाणत्या विद्वानांनी पुस्तकातून आणि जालावरून चर्चिलेला आहे. शं.बा.दीक्षितांच्या ’भारतीय ज्योतिषाचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास’ ह्या १८९६ साली छापलेल्या अप्रतिम ग्रंथात ह्या विषयावर काही चर्चा आहे आणि मला ती सर्व पटते. येथे मी दीक्षितांचेच विवेचन संक्षिप्त शब्दांत मांडतो.

सोनवणींना काय म्हणायचे आहे ते मला नीट समजलेले नाही. दीक्षितांचे, माझ्या दृष्टीने पुरेसे असलेले, विवरण मी देत आहेच. तेथील इष्ट वाटेल ते सोनवणींनी घ्यावे आणि आवश्यकता दिसल्यास आपल्या विचारांत तदनुषंगिक बदल करावा असे मी त्यांना सुचवितो. अन्य सदस्यांच्या प्रतिसादांचीहि अपेक्षा आहेच.

प्रथम चर्चेस आवश्यक असलेले आर्यभटीयामधील श्लोक शुद्ध संस्कृतमध्ये संदर्भांसहित उतरवून घेतो.

दशगीतिका -आर्यभटीयाचा पहिला भाग ज्यात कमी अधिक १३ गीति वृत्तातील श्लोक आहेत. ह्या भागात महायुगात होणारे सर्व ग्रहांचे भगण सांकेतिक अक्षरांनी दिले आहेत.

१.३.१ युगरविभगणा ख्युघृ शशि चयगियिङुशुछ्लृ कु ङिशिबुणॢख्षृ प्राक्।
(वरच्या विकिसोर्सच्या पाठात आणि दीक्षितांच्या पाठात थोडा फरक आहे. विकिसोर्स - ङिशिबुणॢष्खृ, दीक्षित - ङिशिबुणॢख्षृ.)

अर्थ: महायुगात पृथ्वी (कु) हिचे भगण होतात:
ङि = ५००
शि = ७,०००
बु = २,३०,०००
णॢ = १,५०,००,००,०००
ख्षृ= ८,२०,००,०००
एकूण १,५८,२२,३७,५००

१.६.२ प्राणेनैति कलां भू:...
अर्थ: एका प्राणात (श्वासाच्या अवधीत) भूः (पृथ्वी) एक कला जाते (फिरते.)

गोलपाद - आर्यभटीयाचा चौथा भाग
४.९.१ अनुलोमगतिर्नौस्थ: पश्यत्यचलं विलोमगं यद्वत्।
४.९.२ अचलानि भानि तदवत्समपश्चिमगानि लङ्कायाम्॥

४.१०.१ उदयास्तमयनिमित्तं नित्यं प्रवहेण वायुना क्षिप्त:।
४.१०.२ लङ्कासमपश्चिमगो भपञ्जर: सग्रहो भ्रमति॥

अर्थ: ज्याप्रमाणे अनुलोमगतीने जाणारा आणि नावेत बसलेला मनुष्य अचल असा किनारा विलोम जातांना पाहतो (किनारा विलोम गतीने जात आहे असे त्यास दिसते), त्याप्रमाणे लंकेमध्ये (विषुववृत्तावर) अचल असे तारे पश्चिम दिशेस जातांना दिसतात.

प्रवह वायूकडून सतत ढकलला जाणारा सग्रह (ग्रहांसहित असा) भपंजर (तार्‍यांचे जाळे अथवा पिंजरा) (पूर्वेकडून) पश्चिमेकडे फिरतो.

ह्याच्या स्पष्टीकरणात दीक्षितांना कोठेहि सूर्यकेन्द्रित खगोल आर्यभटाला सुचवायचा होता असे भासलेले नाही आणि अशा कोठल्याच विचाराचे ख्ंडन-मंडन अथवा नुसता उल्लेखहि त्यांनी केलेला नाही. त्यावरून मला वाटते की सूर्यकेन्द्रित अर्थ ह्यामधून काढता येईल अशी १८९६ पर्यंत तरी कोणासच कल्पना सुचलेली नव्हती. (मला अशी दाट शक्यता वाटते की भारतीयांना सर्वच काही पहिल्यापासून माहीत होते असे सिद्ध करण्याची ’राष्ट्रीय’ अहमहमिका जेव्हा सुरू झाली तेव्हाची ह्या सूर्यकेन्द्रित कल्पनेचा जन्म झाला असावा.)

महायुगातील भगण जेव्हा जुन्या ग्रंथात दिले जातात् तेव्हा नक्षत्रभ्रम आणि अन्य ग्रहांचे भ्रम दिले जातात. भूभ्रम दिले जात नाहीत. कारण उघड आहे: जेव्हा पृथ्वी स्थिर असते आणि सर्व नभोमंडळ तिच्याभोवती फिरत असते तेव्हा नक्षत्र म्हणजे तारांगणच पृथ्वीभोवती फिरणार. आर्यभटीयात ह्याच्या नेमके उलटे केले आहे. भूभ्रम मोजले आहेत आणि नक्षत्रभ्रम मोजलेले नाहीत. का की, तारांगण स्थिर आहे आणि पृथ्वी स्वत:च्या उत्तर-दक्षिण अक्षाभोवती फिरत आहे.

येथे हे लक्षात ठेवायला हवे की भूभ्रम हा शब्द दोन अर्थांनी आपण आज वापरू शकतो - एकतर पृथ्वीचे स्वत:भोवतीचे दैनंदिन फिरणे - diurnal motion - आणि वार्षिक सूर्याभोवती फिरणे - annual motion. आर्यभट किंवा अन्य कोणासच annual motion सुचलेलीच नव्हती. आर्यभट आणि ब्रह्मगुप्तासारखे त्याला दूषणे देणारे हे सर्व diurnal motion बाबतच बोलत होते.

आता १.६.२ प्राणेनैति कलां भू:...ह्याचा अर्थ काय? ’एति’ कोठे - स्वत:भोवती की सूर्याभोवती? ’सूर्याभोवती’ असा अर्थ घेतला तर सूर्यकेन्द्रित पक्षाला बल मिळते पण मग आर्यभटाने नक्षत्रभ्रम न मोजता भूभ्रम का आणि कसे मोजले ह्याला काहीच उत्तर राहात नाही. ह्याचाच अर्थ असा की आर्यभटाच्या मनातील पृथ्वीचे भ्रमण हे स्वत:भोवतीचे आहे, सूर्याभोवतीचे नाही.

आर्यभटाने जेव्हा ही कल्पना मांडली तेव्हा तिला बराच विरोध झाला असे दिसते. कारण पृथ्वीची कोणतीच गति - diurnal अथवा annual - आपल्याला जाणवत नाही. ह्यातून निरनिराळ्या विरोधकांनी वेगवेगले मार्ग काढले.

भटप्रकाशिकाटीकाकाराने श्लोक ४.९.१ आणि २ चा वेगळा अन्वय लावून अर्थ काढला तो असा: भानि कर्तृभूतानि अचलानि भूमिगतानि वस्तूनि कर्मभूतानि विलोमगानीव प्राचीं दिशं गच्छन्तीव पश्यन्ति. वाक्यातील कर्ता म्हणजे नक्षत्रे वाक्यातील कर्म म्हणजे भूमीवरील अचल वस्तु ह्यांना विलोमग असे पूर्व दिशेकडे जातांना पाहतात. म्हणजे तारे फिरतच आहेत आणि पृथ्वी स्थिरच आहे पण तार्‍यांवरून पाहिले तर पृथ्वी पूर्वेकडे फिरतांना दिसेल. भटप्रकाशिकाटीकाकाराने ’प्राणेनैति कलां भू:...’ च्या जागी ’प्राणेनैति कलां भं...’ असाहि पाठ स्वीकारून गति पृथ्वीच्या फिरण्याची नाही तर तार्‍यांच्याच फिरण्याची आहे असे दाखविले. ( असे त्याने का केले असावे ह्याबद्दल माझा तर्क असा आहे की एकतर त्याच्यापुढे तोच पाठ असावा. ग्रंथांच्या प्रती करणारे विद्वान् वाचक वेगळे पदरचे घालून मूळचा अर्थ सुधारता आला तर तसे करत असत. अन्यथा भटप्रकाशिकाटीकाकाराने स्वत:च तसे केले असेल.) हे करून जरी पृथ्वीची गति मान्य करण्याची अडचण त्याने टाळली असली तरी आर्यभटाने भूभ्रम का दिले आहेत आणि नक्षत्रभ्रम का नाहीत ह्याचे उत्तर मिळत नाहीच.

ब्रह्मगुप्ताला हे एकूणातच मान्य नव्हते. एकंदरच त्याचा आर्यभटावर राग आहे. एका ठिकाणी तो म्हणतो: आर्यभटदूषणानां सङ्ख्यां वक्तुं न शक्यते - आर्यभटाच्या चुका मोजता येत नाहीत! प्राणेनैति कलां भू:...ह्याला विरोध करतांना तो विचारतो: प्राणेनैति कलां भूर्यदि तर्हि व्रजेत्कमध्वानम्। आवर्तनमुर्व्याश्चेन्न पतन्ति समुच्छ्रया: कस्मात्॥ जर पृथ्वी एका श्वासात एक कला जाते तर ती कोठे आणि कोठल्या मार्गाने जाते? जर पृथ्वीचे आवर्तन होत असेल तर उंचावरच्या गोष्टी खाली का पडत नाहीत? (हे लिहितांना मला असे सुचले की ब्रह्मगुप्ताच्या ह्या कुचेष्टाखोर प्रश्नात पृथ्वीची गति diurnal अथवा annual ह्या प्रश्नाचे उत्तर अभावितपणे दडलेले दिसते. ब्रह्मगुप्त ’आवर्तनमुर्व्या:’ असा प्रयोग करतो आणि ’आवर्तन’ हे स्वतःभोवतीच होऊ शकते. सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेला आवर्तन म्हणता येत नाही. आर्यभटाला दोष देतांना ब्रह्मगुप्ताच्या समजुतीत diurnal आवर्तनच होते.

दीक्षितांच्या विवेचनाचा सारांश संपला.

सोनवणींनी त्यांच्या अर्थ लावतांना ’भ्रमति’ म्हणजे ’भ्रम होतो’ असा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा भ्रम ’निरीक्षकांना’ होतो असे म्हटले आहे. आता हा निरीक्षक कोण? पृथ्वी-तार्‍यांच्या पलीकडे उभा राहून कोणी हे ’निरीक्षण’ करणार आहे काय? तसेच भ्रम होणे म्हणजे वेडयासारखे वाटणे ह्या छायेचा मराठी अर्थ संस्कृतमध्ये उपलब्ध नाही. जास्तीत जास्त गीतेतील अर्जुनासारखे ’भ्रमतीव च मे मनः’ - माझे मन कावरेबावरे झाले आहे - येथपर्यंत ’भ्रम्’ धातूचा अर्थ खेचता येईल पण मनुष्य वेडसर झाला किंवा नसलेले त्याला दिसू लागले असे त्यातून सुचविता येणार नाही - जे मराठीत करता येते. जसे की भ्रमिष्ट होणे.

(ब्रह्मगुप्ताने केलेला विरोध थोडासा कोलंबसाला झालेल्या विरोधासारखाच आहे. तेव्हाही लोकांना वाटत होते की कोलंबस फार पश्चिमेकडे गेला तर पृथ्वीच्या कडेवरून पडून नरकात जाईल!)

Publish and be damned

'नेचर' या नियतकालिकामधला अग्रलेख Publish and be damned यावर आधारित.

"पाय"ची प्रायोगिक किंमत : वेगळाच पैलू

नुकत्याच एका चर्चाविषयात "पाय"ची किंमत प्रत्यक्ष मोजमापांनी काढून अंदाजांची सरासरी करण्याबाबत चर्चा झाली. (दुवा)

येथे चर्चाविषयाचा मुद्दा वेगळाच आहे. या चर्चेपुरते असे मान्य केलेले आहे, की काळजीपूर्वक विचार करून अशा प्रकारचा प्रयोग करता येईल, जेणेकरून अंदाजांची सरासरी ठीक-ठाक येईल, आणि वर्तुळाचा परिघ/व्यास ही किंमत मिळेल.

पाने

Subscribe to RSS - विज्ञान/तंत्रज्ञान