Skip to main content

श्रद्धा

yemen evacuation 11 INDIANS rescued BY PAKISTANI naval ship

Taxonomy upgrade extras

yemen-evacuation-11-indians-rescued-by-pakistani-naval-ship-2185449.html
.
.
Islamabad: Eleven Indians along with 172 others have been evacuated by a Pakistani ship from strife-torn Yemen's southeastern city of Mokallah, which is now almost entirely under control of Al Qaeda militants.

A relative receives one of the Indian nationals evacuated from Yemen, upon their arrival at the International Airport in Mumbai on early Saturday morning. PTI

विविध प्रतले

Taxonomy upgrade extras

मनात काही प्रश्न उद्भवले, मोठे अन चर्चात्मक शक्यता (पोटेन्शिअल) असल्याने वेगळ्या धाग्यात देत आहे. व्यक्तीस ऑब्जेक्टीफाय(वस्तूकरण) कसे करता येत नाही याबद्दल हे विचार मनात आलेले आहेत.
___
एखादा स्वेटर, पेंटींग, पुस्तक, भाषण, स्तोत्र अन व्यक्ती यांच्यात दर्जात्मक फरक काय असतो? ही सारी चिन्हेच नाहीत का? चिन्हे का म्हणते आहे ते विषद करते. या सर्व एनटिटीज कशाकडे तरी निर्देश करतात अन तसा निर्देश जोवर होत नाही तोवर त्या अर्थहीन असतात. पण निर्देश करताच त्यांना अर्थ प्राप्त होतो.
____

लोकनिंदा करु नका - अति आदर्शवाद? की आचरणयोग्य मूल्य?

Taxonomy upgrade extras

मलादेखील एक छान गोष्ट आठवते आहे-

एक सत्शील, मेहमान-नवाज, कनवाळू गाव असतं. गावात एकदा, एक अतिशय सत्शील दंपती काही धार्मिक कार्य घालतात. सर्वांना बोलावतात, तीर्थप्रसाद व खीर-पुरीचे जेवण असा थाट असतो. पण होतं काय खीरीच्या भांड्यात पाल पडून २ ब्राह्मणांचा मृत्यु ओढवतो. सर्वच जण हळहळतात. पण त्या दंपतीविरुद्ध कोणी ब्र काढत नाही की तसे कोणाच्या मनात येत नाही.

स्वर्गात चित्रगुप्त जमाखर्च लिहीत असतो. त्याला संभ्रम पडतो की हे ब्रह्महत्येचे पातक कोणाच्या माथी लिहायचे? तो जातो देवांकडे. देव सांगतात - गावात गुप्तपणे फिर अन मला येऊन सांग या घटनेबद्दल कोण काय बोलते ते.

द सिक्रेट- नवीन अंधश्रद्धा ?

Taxonomy upgrade extras

अंधश्रद्धा या सर्व समाजांमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळतात . म्हणजे भारत हा साप -हत्ती चा आणि मागासलेला देश आहे असे मानणाऱ्या युरोपिअन देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये पण अंधश्रद्धा भरभरून आढळतात . भारतात भानामती आणि अंगात येणे वैगेरे प्रकार होत असतील तर गोऱ्या लोकांमध्ये उडत्या तबकड्या , परग्रहवासी आणि dooms day वैगेरे विज्ञानाचा मुलांमा दिलेल्या अंधश्रद्धा जोरात आहेत . याचा एक दणकून पुरावा म्हणजे २१ नोव्हे . २०१२ च्या निमित्ताने उडालेला धुरळा . जग आता नष्ट होणार म्हणून अनेक लोकांची पळापळ सुरु झाली होती . शेवटी नासा ला मध्ये पडून हे धादांत खोटे आहे असे निवेदन द्यावे लागले होते .

पुरोगामी महाराष्ट्र. एक भ्रम..

Taxonomy upgrade extras

महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महिन्यावर निवडणुका येवून ठेपल्यात. सारे पक्ष आपापल्या उमेदवार याद्या जाहीर करण्यासाठी पितृपक्ष संपण्याची वाट पाहत आहेत पितृपक्षाचा पंधरवडा संपताच या उमेदवारांची यादी जाहीर होणार.
असे का ?
पितृपक्ष इतका अशुभ असतो?

महाराष्ट्रात एखादी अंधश्रद्धेची घटना घडली कि वृत्तपत्रात छापून येते कि पुरोगामी महाराष्ट्रात अशी घटना घडली हा कलंक आहे वैगरे वैगरे. परंतु पुरोगामी हा शब्द आता फक्त वृत्तपत्रात राहिला आहे. राज्यातील राजकीय पक्ष हेच स्वत पितृपक्ष वैगरे सारख्या अंधश्रद्धेने बरबटलेले आहेत कि त्यांनी पुढे भाषणात पुरोगामी हा शब्द काढणे हे चुकीचे ठरेल.

साईबाबा होते तरी कोण?

Taxonomy upgrade extras

बाबा देव नव्हते, संत नव्हतेच, पण गुरूही नव्हते, असा निकाल
स्वयंघोषित धर्मसंसदेने दिला आहे. (निदान साईबाबा म्हणून कोणीतरी या
भूमीत होऊन गेले, हे त्यांनी नाकारले नाही, ही मोठीच सहिष्णुता
म्हणायची.) खरं सांगायचं तर बाबांनीही आपल्या उभ्या हयातीत मी देव आहे,
संत आहे किंवा गुरू आहे, असं कधीच सांगितलं नाही. जो तसा नसतो त्यालाच
उच्चरवानं तसा दावा करावा लागतो आणि असा दावा करणाऱ्या अनेक स्वयंघोषित
संत, अवतारी आणि गुरूंचा बाजार तेजीत असताना धर्मसंसदेला त्यांच्याबाबत
चकार शब्दही उच्चारावासा वाटत नाही. ही धर्माची हानी आहे, असं वाटत नाही.

८ हजार बिशप आणि कार्डिनल वर मुलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप: पोप

Taxonomy upgrade extras

कॅथलिक चर्चमधील २ टक्के पाद्रींवर लैंगिक शोषणाचे आरोप असल्याची खळबळजनक बाब समोर आली असून ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. लैंगिक अत्याचाराची ही विकृती रोखण्यासाठी पाद्रींना लग्न करण्याची मंजूरी देण्याचा विचारही या निमित्ताने पुढे आला आहे.

डॉ दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट चा वापर केला म्हणुन अंनिसने गुन्हा दाखल करणे योग्य कि अयोग्य?

Taxonomy upgrade extras

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात "प्लॅंचेट‘चे माध्यम वापरल्याची चौकशी व्हावी व असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. हा पहा संदर्भ

गंगा शुद्धीकरण -एक शिवधनुष्य

Taxonomy upgrade extras

पन्तप्रधान नरेंद्रजी मोदी यानी निवडणूक प्रचारादरम्याने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्यक्षात काम करण्यास सुरुवात करुन गंगा शुद्धीकरणाचे शिवधनुष्य उचलले आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनन्दन!

प्रधानमंत्री पदाच्या दुसर्या आठवड्यातच याबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली असून त्यानुसार सुमारे २०० इज्रायली कम्पन्यानी या प्रकल्पात रस दाखवला आहे .

या महाकाय प्रकल्पातील मोठी आव्हाने-

१, गंगा किनार्यावर असणार्या प्रदूषणकारी प्रकल्पांचे विस्थापन

२, साबरमती प्रकल्पाच्या धर्तीवर गंगेचे दोन्ही काठ कॅनॉल प्रमाणे बांधून दोन्ही तीरावर मोठी गटारे बांधणे