श्रद्धा
पिंडाला कावळा शिवणे, काकस्पर्ष
Taxonomy upgrade extras
आज एक सिनेमा पाहिला इन्विजिबल या नावाचा. आत्मा मरणासन्न अवस्थेतलं शरीर शोधतो अशी साधारण कथा असलेला चित्रपट. आयएमडीबीवर रीव्हिव्यू वाचताना ट्रिवियामध्ये एक गोष्ट वाचली.
"The shirt that Nick is wearing at the end of the movie bears a crow on the chest. In some Native American legends (and the graphic novel by James O'Barr bearing the name) the crow could carry a person's soul back from the land of the dead."
(http://www.imdb.com/title/tt0435670/trivia?ref_=tt_trv_trv)
- Read more about पिंडाला कावळा शिवणे, काकस्पर्ष
- 8 comments
- Log in or register to post comments
- 11032 views
अंधश्रद्धा पण आधुनिक
Taxonomy upgrade extras
काही लोक खरोखरीचे पुरोगामी असतात. काही नसतात. काही दिशा भरकटलेले असतात. म्हणजे त्यांची इच्छा शुद्ध पुरोगामी असायची असते पण त्यांना पुरोगामीत्वाची दुसरी बाजू माहितच नसते. त्यांचे मते 'पारंपारिकतेला बदडणे' हीच काय ती पुरोगामीता. भारताच्या दृष्टीकोनातून पाहता अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या पारंपारिक नाहीत, पण प्रतिगामी आहेत. मी इथे त्यांची यादी बनवायचा प्रयत्न करत आहे. सखोल विश्लेषण अर्थातच मी दिलेले नाही.
- Read more about अंधश्रद्धा पण आधुनिक
- 47 comments
- Log in or register to post comments
- 24647 views
आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ?( दुसरा व अंतिम भाग )
Taxonomy upgrade extras
६- आचरणे व सोहळे (Rituals & Events) यांचा एक कायमस्वरुपी मजबुत कार्यक्रम.
अशा CULT मध्ये शिष्यांना कायम दोन पातळींवर एक कार्यक्रम दीलेला असतो आणि तो काटेकोरपणे अमलात आणणे यातच कशी अवघ्या जीवनाची सार्थकता आहे हे सतत हॅमरींग केले जाते.
यात वैयक्तीक पातळीवर आचरणाची असंख्य नियम व कामे (Rituals) नेमुन दीली जातात.यातील बहुसंख्य ही सोपी परंतु निर्बुद्ध आणि प्रचंड repetitive अशी असतात. यात काय खावे काय नाही, कुठल्या दीवशी ,कपडे इ. संबधी चे असंख्य नियम, अमुक इतके तास दररोज अमुक एक क्रिया करणे. इ, याची अनेक उदाहरणे आहेत पण जागा पुरणार नाही,
- Read more about आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ?( दुसरा व अंतिम भाग )
- 24 comments
- Log in or register to post comments
- 6792 views
आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ?
Taxonomy upgrade extras
मित्रांनो!
एक विनंती
आपण अशा कोणत्या संघटने चे सभासद बनला आहात का की जी प्रत्यक्षात एक cult आहे? आपण ज्या ही संघटनेत (धार्मीक वा तत्सम) असाल त्या संघटने च्या कार्यप्रणाली चे संचालकांचे एकदा तरी कठोर परीक्षण करुन बघा जर त्यात खालील प्रकारच्या गोष्टी आढळत असतील तर वेळीच सावध व्हा आणि आपला अमुल्य वेळ,पैसा आणि क्षमता वाया जाण्या पासुन स्वतःला वाचवा ही कळकळीची नम्र विनंती !
CULT म्हणजे नेमके काय ? तिची वैशिष्ट्ये कोणती ?
- Read more about आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ?
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5561 views
सन्जोपरावांची यनावाला संदर्भातील पोस्ट
Taxonomy upgrade extras
सन्जोपरावांची यनावाला संदर्भातील पोस्ट वाचली. "वैज्ञानिकांनी आस्तिक असू नये."
सुरवातीला, खरं तर खूप इमोशनल प्रतिक्रिया झाली. आस्तिकांना वाळीत टाकणारे/कमी लेखणारे वैज्ञानिक कोण टिक्कोजीराव लागून गेलेत प्रकारची.
मग त्यावर प्रतिवाद हा सुचला की तसं असेल तर वैज्ञानिकांनी धूम्रपान करु नये, त्यांना अपेयपान, जुगार निषीद्ध असावा वगैरे तत्सम आचारसंहीता का लागू का करु नये की आस्तिकवाद या सवयींपेक्षाही खालचा आहे? वगैरे.
- Read more about सन्जोपरावांची यनावाला संदर्भातील पोस्ट
- 50 comments
- Log in or register to post comments
- 20791 views
ट्रॉलीचिकित्सा
Taxonomy upgrade extras
ह्या धाग्याचा जीव तसा लहान आहे. फिलिपा फूट या तत्वज्ञानाच्या प्राध्यापिकेने १९६७ साली 'Trolley problem' या नावाने एक Gedankenexperiment (मनातल्या मनात करायचा प्रयोग) शोधून काढला. अलिकडे अनेक कारणांनी तो पुन्हा प्रसिद्धीत आलेला आहे, आणि नीतीशास्त्रामध्ये त्याबद्दल सततचा काथ्याकूट चालू असतो. ज्यांच्यासाठी तो नवा आहे, त्यांची प्रतिक्रिया काय होते हे समजून घेण्यासाठी हा खटाटोप. (अशा वाचकांनी गूगलगिरी करण्याचा मोह टाळून पुढे वाचावं ही विनंती.)
- Read more about ट्रॉलीचिकित्सा
- 57 comments
- Log in or register to post comments
- 16225 views
पाच महासती : सतीत्वाचा निकष तरी काय?
Taxonomy upgrade extras
भारतीय धर्म परंपरेत सात चिरंजीव आणि पाच महासती सांगितल्या जातात. महासतींना पंचकन्या असे म्हटले जाते.
या ५ महासती पुढील प्रमाणे आहेत :
१.अहिल्या
२.द्रोपदी
३.कुंती
४.तारा
५.मंदोदरी
या पौराणिक महिलांविषयी एक संस्कृत श्लोक प्रसिद्ध आहे.
अहल्या द्रौपदी कुंती तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्यादस्मरेन्नित्यं महदपातक नाशनम् ।।
अर्थ : अहिल्या, द्रौपदी, कुंती, तारा आणि मंदोदरी या पंचकन्यांचे नित्य स्मरण केल्याने महापापांचा नाश होतो.
- Read more about पाच महासती : सतीत्वाचा निकष तरी काय?
- 16 comments
- Log in or register to post comments
- 7281 views
गणपती : वारकर्यांनी त्याज्य ठरविलेली एक उपदेवता !
Taxonomy upgrade extras
आपल्या धर्मात अनेक अंतर्विरोध आहेत. गणेशोत्सव सुरू झाला आहे. या पाश्र्वभूमीवर अंतर्विरोधाचे उदाहरण म्हणून गणपतीविषयी लिहितो. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, असे अंतर्विरोध अनेक देवी-देवतांच्या बाबतीत आहेत.
गणपती ही आज महाराष्ट्राची प्रमुख पूजनीय देवता असली तरी वारकरी धर्मात गणपतीला कोणतेही स्थान नाही! वारकरी धर्माच्या दृष्टीने गणपती ही एक त्याज्य देवता आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन संतांची वचने पाहिली तरी गणपतीचे वारकरी धर्मातील स्थान कोणते हे स्पष्ट होईल.
- Read more about गणपती : वारकर्यांनी त्याज्य ठरविलेली एक उपदेवता !
- 75 comments
- Log in or register to post comments
- 39568 views
स्वत:च्या मातेसोबतही एकांतात बसू नये!
Taxonomy upgrade extras
वादग्रस्त साधू आसाराम बापू यांना एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून अटक झाली. आसाराम हे त्या मुलीला घेऊन दीड तास एकांतात होते, अशी माहिती तपासातून समोर आली. त्याचे समर्थन करताना, आसाराम यांनी म्हटले की, ‘‘आपल्या नातीच्या वयाच्या मुलीसोबत एकांतात बसण्यात वाईट ते काय?''
- Read more about स्वत:च्या मातेसोबतही एकांतात बसू नये!
- 68 comments
- Log in or register to post comments
- 14354 views
प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते
Taxonomy upgrade extras
महाराष्ट्रात सध्या अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यावरून जोरदार धुमशान सुरू आहे.पण श्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा कशाला म्हणायचे? या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत. मुळात प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. अंध झाल्याशिवाय श्रद्धाळू होताच येत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत ‘मामेकं शरणं’ असा स्पष्ट आदेशच दिला आहे. श्रीकृष्णाचा हा आदेश ‘फार बुद्धी चालवू नकोस' या पातळीवरचा आहे. श्रद्धेत बुद्धीवर भावनेचा कंट्रोल असतो. बुद्धी वापरली तर देवळातली मूतीं दगड ठरते. भावना वापरली तर मात्र हाच दगड ठेव ठरतो.
हे द्वंद्व तुकोबांनी फार सुंदर पद्धतीने मांडले आहे. तुकोबा म्हणतात :
- Read more about प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते
- 105 comments
- Log in or register to post comments
- 49211 views