सामाजिक

सरवन भवनाची फिल्मी ष्टोरी

गेल्या 10 – 15 वर्षात चेन्नईला भेट दिलेल्यांना कधी ना कधी तरी सरवन भवनाबद्दल ऐकून माहिती असेल. कदाचित तेथील खाद्य पदार्थांची चवही घेतली असेल. चेन्नईसाठी सरवन भवन चेन हॉटेल्समधील शाकाहारी खाद्यपदार्थ म्हणजे जणू मेजवानीच. भारत भर 33 शाखा व परदेशात 47 शाखा चालवणार्‍या एवढ्या मोठ्या कारभारामागे 66 वर्षाच्या राजगोपाल या व्यक्तीची दूरदृष्टी, त्याचे श्रम व मिळालेल्या संधीचे सोने करण्याची जिद्द आहेत. चेन्नईच्या हॉटेल व्यवसायात याचा भार मोठा दबदबा आहे. शाकाहारी हॉटेल व्यवसायाला त्यानी गौरव प्राप्त करून दिले असेच अनेकांचे मत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

फलज्योतिषावर आधारलेल्या राजकीय भाकितांचे भवितव्य !

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी ४ एप्रिल २०१४ रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील 'मतसंग्रामा'ची बित्तंबातमीचे भाकीत वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते.

नंदकिशोर जकातदार यांनी देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणार्‍या भारतातील सुमारे चार हजार पत्रिकांचा अभ्यास करून वर्तविलेले भाकित व प्रत्यक्षनिवडणुकीचे निकाल व त्यावरून काढलेले निष्कर्ष खाली दिलेले आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

श्रद्धा - धार्मिकांचा प्लॅसिबो

श्रद्धेचा रिमोट वापरून प्रत्यक्षात एक बारिकसा खडासुद्धा आपोआप एक सेंटीमीटर मागे-पुढे सरकवता येत नाही हे माहित असूनसुद्धा श्रद्धा असल्यास डोंगर चालत चालत चढू शकतो अशी बढाई मारणारे भरपूर जण आहेत. श्रद्धेमुळे नाट्यपूर्ण घटना घडत असतात असे छातीठोकपणे सांगणारे अनेक लोक आपल्याला नेहमी भेटत असतात. गंगेचे पाणी पिल्यानंतर अनेक दुर्धर रोग बरे झाले आहेत असे सांगणारे लोक आपल्याला नक्कीच भेटले असतील. पार्वतीमाँने पोटावर हात फिरवल्यानंतर बाईची पाळी चुकली व पोट दिसण्याइतपत पुढे आले होते असे (शपथेवर!) सांगितलेल्या शेकडो बायका महाराष्ट्र - गुजरात येथे सापडतील. शेवटी पोटात मूल नव्हतेच, हा भाग वेगळा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - सामाजिक