वैद्यकीय इच्छापत्र
२२ ऑगस्ट २०१५ रोजी कोथरुड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माझ्या सुखांताचा माझा विचार या विषयावर परिसंवाद झाला होता.खाली नमूद केली वैद्यकीय इच्छापत्र हे नमुन्या दाखल आहे. यात प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार बदल करु शकते. ऎड असीम सरोदे यांनी स्थापन केलेल्या सहयोग ट्रस्ट तर्फे इच्छामरण या विषयावर समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. डॉ शिरीष व डॉ आरती प्रयाग ( वैद्यकीय क्षेत्र) असीम व रमा सरोदे ( कायदा क्षेत्र) मंगला आठलेकर, डॉ रोहिणी पटवर्धन ( वृद्धकल्याणशास्त्र) शुभदा जोशी, विद्या बाळ व रविंद्र गोरे असा एक गट या विषयावर काम करतो आहे. वैद्यकीय इच्छापत्रा आधारे इच्छामरणाला कायदेशीर आधार मिळवण्यासाठी सहयोग ट्रस्ट काम करत आहे. आपण जर हे वैद्यकीय इच्छापत्र संमती व शक्य असल्यास त्यांचे कडे पाठवले तर जनहित याचिकेला जोडता येईल.
सहयोग ट्रस्ट
१, प्रथमेश सहकारी गृहरचना सोसा, प्रभात रोड गल्ली नं ५, पुणे ४११००४
फोन नं- ०२० २५४५९७७७
sahayogtrust.in
माझे कुटुंबीय,माझ्या आरोग्याबाबत आस्था बाळगणारी मंडळी आणि माझे डॉक्टर यांच्यासाठी मी हे वैद्यकीय इच्छापत्र लिहून ठेवत आहे.
मी------------------------------------------------------------------------------------------------------------------
जन्मतारीख-.--------------------------------------------------- वय------------------------------------------------
माझा पत्ता-----------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१) मी मृत्युशय्येवर असेन, लवकरच मरण्याची शक्यता दिसत असेल, आणि मी बोलण्याच्या परिस्थितीत नसेन अशा अवस्थेत माझ्यावर केल्या जाणार्याच उपचारांसंदर्भात मी हे वैद्यकीय इच्छापत्र करुन माझी इच्छा स्पष्टपणे नोंदवून ठेवत आहे
२) आपल्या राज्यघटनेत नमूद केलेल्या, जगण्याचा अधिकार या संकल्पनेची, तसेच अविष्कार स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची मला पूर्ण माहिती आहे. सन्मानाने जगणे व सन्मानाने मरणे या भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
३) माझ्या आजारपणात मला जगवण्यासाठी जे उपचार केले जातील त्यासंबंधी स्पष्ट सूचना मी माझ्या संबंधीतांसाठी पुढीलप्रमाणे लिहून ठेवत आहे.
अ) मी मरणाच्या दारात असेन ,किंवा गाढ बेशुद्धीत असेन, तर माझा मृत्यू लांबवण्याकरिता काहीही उपचार करु नयेत, शरीराला सुया टोचून औषधोपचार करण्याचा किंवा कृत्रिम साधनांच्या मदतीने मला जगवण्याचा प्रयत्न कृपया करु नये.कारण अशा अवस्थेत आपल्या परावलंबनाचे ओझे इतरांवर टाकणे आणि जगत राहणे हे मला कीव करण्यासारखे आणि म्हणुनच घृणास्पद वाटते.
ब) अशा प्रकारे केवळ जगवण्यासाठी जर उपचार सुरु झाले असतील आणि तेही मला सन्मानाचे जिणे जगण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार नसतील तर मला असे निरर्थक जीवन जगण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणुन हे उपचार ताबडतोब थांबवावे अशी माझी आग्रहाची विनंती आहे.
क) मी असाध्य रोगाने आजारी आहे, एकूणच जगण्याच्या शक्यता मंदावल्या आहेत, किंवा बेशुद्धीतून मी बाहेर येण्याची ही आशा नाही, अशा अवस्थेत मला कृत्रिमरित्या अन्नपाणी देउन जगवण्याचा खटाटोप करु नये. मला आग्रहपूर्वक सांगायचे आहे की,मला अशा परिस्थितीत कृत्रिम रित्या जिवंत ठेवण्याचे सारे उपचार मी नाकारु इच्छितो/ इच्छिते.
ड) मला माहित आहे की,मी काहीही इच्छा नोंदवून ठेवली असली तरी वैद्यकीय तज्ञांशी सल्लामसलत, विचारविनिमय केला जाईल; पण मला ठामपणे म्हणायचे आहे की, याबाबत कायदा असे स्पष्टपणे सांगतो की, अशा परिस्थितीत माणुस स्वत: बोलू शकत नसेल तर त्याच्या इच्छापत्राचे ऐकावे.म्हणुनच माझ्या बाबतीत या संदर्भातील निर्णयाची जबाबदारी घेणार्या सर्वांना माझी पुन:पुन्हा विनंती आहे की, माझ्या वैद्यकीय इच्छापत्राचा मान राखला जावा.
४) माझ्यावर प्रेम करणार्यान, माझ्याविषयी आस्था बाळगणार्या सार्यांसाठी या इच्छापत्रातून सांगू पहात आहे की, ज्यावेळी कृत्रिम जीवनाधारांच्या मदतीनंतरही मी पुन्हा पहिल्यासारखा स्वावलंबी सहज जीवन जगू शकणार नाही, त्यावेळी तशा अवस्थेत जिवंत राहण्याची माझी इच्छा नाही. त्यावेळी मी सुदृढ मनाने निर्णय घेण्याच्या अवस्थेत मी नसेन, म्हणुनच इथे विचारात घेतलेल्या शक्यतांच्या पलिकडे तुम्हाला काही विचार करुन निर्णय घेण्याची वेळ आलीच तर सन्मानाने जगणे आणि तसेच सन्मानाने मरणे या माझ्या ध्यासाची तुम्ही आठवण ठेवा. हे वैद्यकीय इच्छापत्र मी कुणाच्या दबावाखाली नव्हे तर स्वत:च राजीखुषीने करत आहे.
माहितीमधल्या टर्म्स
कायदा
सध्या असे पत्र तयार केले आणि त्यावर संबंधितांनी अंमल केल्यास खालील कायद्याचे उल्लंघन होते.
Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007
"maintenance" includes provision for food, clothing, residence and medical attendance and treatment
शिवाय
An application for maintenance under section 4, may be made -
by a senior citizen or a parent, as the case may be; or
if he is incapable, by any other person or organisation authorised by him; or
the Tribunal may take cognizance sua motu
याचे काय होईल?
इथे या कायद्याचा मसुदा पहायला मिळेल
हा मुद्दा कुणाच्या लक्षात आला
हा मुद्दा कुणाच्या लक्षात आला नव्हता. कायदा नसला तरी विशिष्ठ परिस्थितीत हे प्रॅक्टीस मधे आहे.
डॉ प्रयागांनी एक किस्सा सांगितला. एका प्रतिथयश वयोवृद्ध व्यक्ती बाबत मल्टिपल फेल्युअर ची केस होती. मुलगा व पत्नी यांनी दयामरणाबाबत अनुकुलता दाखवली. त्याबाबत त्यांनी तसे लिहून दिले. शेवटी आता लाईफ सपोर्ट सिस्टिम काढायचे ठरवले. तेवढ्यात फिल्मि स्टाईल एक मुलगी हॉस्पिटल मधे आली व तिने कुणाच्या आदेशाने हे करता? मी तुमच्यावर कोर्टात केस करीन वगैरे भाषा केली. ती रुग्णाची मुलगी होती. तिला आई व भावाने विश्वासात घेतले नव्हते. मग हा कार्यक्रम रद्द झाला. त्यानंतर काही दिवसानी ती शांत झाली व परिस्थिती पाहून तिनेही अनुकुलता दर्शवली.
Living Will आणि Power of Attorney
मनुष्य अत्यवस्थ अवस्थेत गेला तर वापरायचे ते Living Will. कॅनडामध्ये त्या त्या प्रान्ताच्या कायद्यानुसार केलेले त्याचे कच्चे मसुदे काही स्वयंसेवी संस्था उपलब्ध करून देतात, तरीहि त्यांचा सल्ला असतो की प्रत्यक्ष असे Living Will योग्य वकिलाकडूनच करवून घ्यावे.
अशा Living Will सोबतच आर्थिक आणि अन्य निर्णयांसाठीहि Power of Attorney करवून घेतात आणि कोणा एका व्यक्तीला अत्यवस्थ वा मानसिक दृष्ट्या दुर्बल (डिमेन्शिया, अल्झाइमर इ.) व्यक्तीच्या वतीने आर्थिक निर्णय घेण्याचा वा त्या व्यक्तीच्या नावे आर्थिक व्यवहार बघण्याचा अधिकार दिला जातो.
Living Will आणि Power of Attorney हे दोन्हीहि सारखेच महत्त्वाचे आहेत आणि ते वेळच्यावेळी तयार करून घेणे हिताचे.
या विषयावर "जगायचीही सक्ती
या विषयावर "जगायचीही सक्ती आहे" हे मंगला आठलेकर यांचे पुस्तक या विषयावरच आहे. अत्यंत उत्तम पुस्तक आहे.
http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=537076155293328...
जे लोक अशा प्रसंगाला सामोरे
जे लोक अशा प्रसंगाला सामोरे गेले असतील त्यांना या इच्छापत्रातली निरर्थकता पूर्णपणे जाणवेल.
माझ्या आजारपणात मला जगवण्यासाठी जे उपचार केले जातील त्यासंबंधी स्पष्ट सूचना मी माझ्या संबंधीतांसाठी पुढीलप्रमाणे लिहून ठेवत आहे.
कोणतीच स्पष्टता नसलेल्या मजकुराबाबत असं म्हणण्यात अर्थ नाही. त्यात स्पष्टता आणणं शक्यही नाहीये. यात इच्छापत्र करणार्याच्या उद्देशाविषयी किंवा प्रामाणिकपणाविषयी काहीच शंका घेऊ नये.
बॉटमलाईन अशी की बर्याच केसेसमधे वरच्या इच्छापत्रातली कंडिशनल इच्छा कम आज्ञा कम विनंती अंमलात आणणं अशक्य होऊ शकतं.
आता पुन्हा काही भाग अधोरेखित करुन पाहू.
अ) (जर) मी मरणाच्या दारात असेन ,किंवा गाढ बेशुद्धीत असेन, तर माझा मृत्यू लांबवण्याकरिता काहीही उपचार करु नयेत, शरीराला सुया टोचून औषधोपचार करण्याचा किंवा कृत्रिम साधनांच्या मदतीने मला जगवण्याचा प्रयत्न कृपया करु नये.कारण अशा अवस्थेत आपल्या परावलंबनाचे ओझे इतरांवर टाकणे आणि जगत राहणे हे मला कीव करण्यासारखे आणि म्हणुनच घृणास्पद वाटते.
ब) अशा प्रकारे केवळ जगवण्यासाठी जर उपचार सुरु झाले असतील आणि तेही मला सन्मानाचे जिणे जगण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार नसतील तर मला असे निरर्थक जीवन जगण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणुन हे उपचार ताबडतोब थांबवावे अशी माझी आग्रहाची विनंती आहे.
वरवर असं वाटेल की नातेवाईकांचं निर्णयाचं काम सोपं झालंय.. पण उपरोक्त वाक्यांतील "जर, तर"कडे सूक्ष्म लक्ष दिल्यास असं लक्षात येईल की एरवीसुद्धा अशी परिस्थिती आल्यावर नातेवाईकांवर निर्णय घेण्याची जी अवघड जबाबदारी येते त्यात या खास लेखी नोंदवलेल्या कंडिशनल वाक्यांनी आणखी अवघडपणा आणला आहे. आजारी व्यक्तीचं वय अगदी नव्वदीपार असेल तर तर्काने कदाचित काही ठाम अंदाज बांधता येतीलही, पण त्याहून कमी वयाच्या व्यक्तीबाबत उपचार केल्यानंतरचा आउटकम अनेक केसेसमधे नक्की सांगणं डॉक्टर्सना शक्य नसावं. अनेक आजारांमधे दीर्घकालीन लाईफ सपोर्ट, "वन डे अॅट अ टाईम" तत्वावर केवळ जगविण्यासाठी दिली जाणारी इंजेक्शन्स वगैरे महिनोन महिने देऊन व्यक्ती परत माणसांत येऊ शकते. त्यानंतर त्या व्यक्तीची क्वालिटी ऑफ लाईफ कशी असेल याविषयी ठामपणे विधान करणं कोणालाच शक्य नसतं.
मान्य आहे की कदाचित ८०% केसेसमधे डॉक्टर हे अनुभवाने निश्चित सांगू शकत असतील की या उपचारांनी आजार बरा होणार नाहीये आणि स्थिती अजिबात सुधारणार नाहीये. अशा निश्चित केसेसमधे वरील इच्छापत्र कदाचित लागू पडेल. पण इतर बर्यास केसेसमधे हे ठरवणं शेवटी नातेवाईक आणि डॉक्टर्स यांच्या स्वतःच्या तारतम्यावरच अवलंबून असेल.
क) मी असाध्य रोगाने आजारी आहे, एकूणच जगण्याच्या शक्यता मंदावल्या आहेत, किंवा बेशुद्धीतून मी बाहेर येण्याची ही आशा नाही, अशा अवस्थेत मला कृत्रिमरित्या अन्नपाणी देउन जगवण्याचा खटाटोप करु नये. मला आग्रहपूर्वक सांगायचे आहे की,मला अशा परिस्थितीत कृत्रिम रित्या जिवंत ठेवण्याचे सारे उपचार मी नाकारु इच्छितो/ इच्छिते.
पुन्हा एकदा.. ब्रेनडेड किंवा तत्सम केसेसखेरीज अशी व्यक्ती जगण्याची कितपत शक्यता आहे हे १+१=२ असं गणितासारखं सांगणं वैद्यकशास्त्रात शक्य असतं असं वाटत नाही. म्हणजे शेवटी नातेवाईकांवर आणि डॉक्टरवर ती अवघड निर्णयप्रक्रिया पडणारच आहे. माझ्यासमोर "नळ्या काढून टाकूया, त्यांना शांतपणे मरु दे" म्हणून आग्रह झालेल्या केसेस पुढे रिकव्हर होऊन दीर्घकाळ जगल्या आहेत आणि दुसर्या बाजूला प्रत्यक्ष नळ्या लावून बरेच दिवस त्या अवस्थेत पडल्यावरही जीवनेच्छा प्रबळ उरलेली काही माणसंही पाहिलेली आहेत. जीवनेच्छा ही आधीच डिक्लेअर करुन ठेवण्यासारखी गोष्ट आहे यावर विश्वास उरलेला नाही. असो.
यातून मला इतकंच म्हणायचं आहे की अशी इच्छापत्रं करुन त्यांना "स्पष्ट सूचना" म्हणण्यापेक्षा "अशा परिस्थितीत माझी विश्वासू अमुक एक 'क्षयझ' व्यक्ती आणि माझे उपचार करणारे डॉक्टर हे जो एकत्रित निर्णय घेतील (उपचार अथवा पॅसिव्ह मरण) तो मला मान्य असेल" अशा प्रकारे इच्छापत्र करावं.
फार सुदर प्रतिसाद. मलाही
फार सुदर प्रतिसाद. मलाही वाटतं की धडधाकट असताना "मला उगाच जगवत ठेवू नका." असं म्हणणं सोपं असतं पण त्या अवस्थेत गेल्यावर जगण्याची ईच्छा झाली आणि असं ईच्छापत्र आधी केलेलं असेल तर? मग ती मरण्याची सक्ती नाही का होणार? साध्यासाध्या गोष्टीत आपण नक्की काय करु हे सांगता येत नाही तर एवढ्या मोठ्या निर्णयात माणूस आधीच हे असं ठरवून ठेवणं?
आमच्या शेजारयांच्या ९४ वर्षांच्या आई व्हेंटीलेटरून परत येउन अजून एक वर्ष जगलेल्या पाहिल्या आहेत.
मुळात बरेचदा ईच्छामरणाची बाजूने बोलणार्^यांना आपण परस्वाधीन होणार याची भिती जास्त असते आणि त्यात आपल्या मनासारखं काही होणार नाही ही अध्याह्र्त भिती असते.
माझी आजी नेहमी म्हणायची "मला लोळवत ठेवू नका" पण शेवटी दहा वर्षं अंथरुणाला खिळून होती. काही बाबतीत तिने स्वतःच्या हट्टांना मुरड घातली तर काही बाबतीत इतरांनी. पण ती दहा वर्षं ती होती तिने दहा वर्ष आधी जायला हवं होतं असं नाही वाटलं आम्हाला. तिचं ते तसं असणंही आश्वासक होतं.शेवटी आठवडा तिने अन्न
पाणी टाकलं आणि शांतपणे गेली . हे असं इच्छापत्र वैगेरे गोष्टी म्हणजे ...
'स्वावलंबी आणि सहज जीवन' याच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असणार ना.
एक दृष्य विनाकारण डोळ्यासमोर तळून गेलं. एक म्हातारा अथरुणाला खिळलाय पण जगायचंय त्याला. त्याला मध्ये मध्ये ऐऊ येणारे पोरांचे आवाज त्याला उभारी देतात, उश्याशी लावलेल्या गाण्यांचे आवाज त्याच्या सुहद स्मृतींना उजाळा देतात म्हणून बर वाटतं त्याला. अरे पण ईच्छामरण कायदे संमत झालयं त्या शेजारच्या अमूक-ढमूकने उपचार न घेता ईच्छामरण स्वीकारलं. आपला मुलगाही असाच विचार करत असेल का? आपला पैसा असला तरी तो मुलाला तसाच न देआ आपल्यावर विनाकारण खर्च होतोय का या विचारांचा भुंगा त्याचं डोकं पोखरतो. मग अश्या वेळेस त्याने ईच्छामरण स्वीकारलं तर ती मरण्याची सक्ती नाही होणार का? (पीअर प्रेशर हा शब्द शाळेपासून नोकरीपर्यंतच ऐकू येतो तो म्हातारपणी पण ऐकू येणार .)
>>पण त्या अवस्थेत गेल्यावर
>>पण त्या अवस्थेत गेल्यावर जगण्याची ईच्छा झाली आणि असं ईच्छापत्र आधी केलेलं असेल तर? मग ती मरण्याची सक्ती नाही का होणार? साध्यासाध्या गोष्टीत आपण नक्की काय करु हे सांगता येत नाही तर एवढ्या मोठ्या निर्णयात माणूस आधीच हे असं ठरवून ठेवणं?
इच्छापत्र वेळोवेळी परिस्थिती नुरुप बदलता येते.शेवटी हा निर्णय डॉक्टर व पेशंटचे नातेवाईक हितचिंतक यांनी मिळून घ्यायचा असतो. त्यामुळे तुम्ही इच्छापत्र काहीही केलत तरी ते काही लगेच अंमलात येणार नसते.
असा निर्णय केवळ स्वतःच्या
असा निर्णय केवळ स्वतःच्या इच्छेने बदलता येणं याला फार धैर्य लागेल हो. माझ्यासारखीला वाटायचं कसं सांगू ? पोरं (मनातल्या मनात का होईना) म्हणतील "म्हातारीचा जगण्याचा सोस सुटत नाहीय" . कसं सांगू , काय सांगू च्या घोळातच आम्ही टपकायचो. आणि ते सांगता येईल अशी अवस्था तर असली पाहिजे नाहीतर लोक आधीचंच इच्छापत्र प्रमाण मानून आमची सुटका करायचे.
हे विनोदी वाटलं तर रागवू नका पण फार सिरियसली लिहीतेय. कारण या बाबतीत ही खरोखर शंका आहे मला. आणि अश्या इच्छामरणाच्या मी तरी पूर्ण विरोधात आहे.
ज्याला जगायचं नाहीये ना,
ज्याला जगायचं नाहीये ना, त्याला छातीत दुखायला लागल्यावर घरच्यांना हाक न मारणे हा उपाय असतो तेवढा त्यांनी अवलंबला तर पुरे.....
अहो बर्याच वेळेला पेशंट बेड रीडन, पॅरलाइस्ड वगैरे असतो. त्याला मरायची इच्छा झाली आणि मरण्याचे सर्व उपाय पाठ असले तरी तो काही करु शकत नाही.
मधे एक प्रचंड भयानक गोष्ट ऐकली.
स्पेन मधला एक कोमामधला पेशंट २३ वर्षानी जागा झाला. नंतर त्यानी सांगीतले की "I was screaming, but nobody listened" काय भयंकर परीस्थिती असेल ना.
>>आणि ते सांगता येईल अशी
>>आणि ते सांगता येईल अशी अवस्था तर असली पाहिजे नाहीतर लोक आधीचंच इच्छापत्र प्रमाण मानून आमची सुटका करायचे.
हा मुद्दा वरच्या प्रतिसादात कव्हर केला आहे. पुनरावृत्ती करतो.."शेवटी हा निर्णय डॉक्टर व पेशंटचे नातेवाईक हितचिंतक यांनी मिळून घ्यायचा असतो. त्यामुळे तुम्ही इच्छापत्र काहीही केलत तरी ते काही लगेच अंमलात येणार नसते." पेशंटची त्यावेळेची स्थिती व इच्छा याच समावेश या निर्णय प्रक्रियेत असतोच. दयामरण म्हणजे इच्छेविरुद्ध माणस मारण्याचा परवाना नव्हे.शांत पणे वेदनाविरहीत मृत्यू ची मुभा असण म्हणजे तसच मरण्याची सक्ती नव्हे. जगण्याचीही सक्ती आहे या मंगला आठलेकरांच्या पुस्तकात याचा परामर्श घेतला आहे.
मला माहित आहे की,मी काहीही
मला माहित आहे की,मी काहीही इच्छा नोंदवून ठेवली असली तरी वैद्यकीय तज्ञांशी सल्लामसलत, विचारविनिमय केला जाईल
हे जरी लिखित स्वरुपात असले तरी परिसंवादात त्यांनी आपलाच खालील मुद्दा अधोरेखित केला आहे
"अशा परिस्थितीत माझी विश्वासू अमुक एक 'क्षयझ' व्यक्ती आणि माझे उपचार करणारे डॉक्टर हे जो एकत्रित निर्णय घेतील (उपचार अथवा पॅसिव्ह मरण) तो मला मान्य असेल"
मलाही हाच मुद्दा व्यवहार्य वाटतो. परिसंवादानंतर मी डॉ प्रयाग यांना भेटलो व या सर्व प्रकारात डॉक्टरांची सदसदविवेकबुद्धी हा फॅक्टरच महत्वाचा ठरतो. त्यांना हे अगदी शंभर टक्के मान्य होते.
परिसंवादात शेवटी श्रोत्यांचे लिखित प्रश्न विचारात घेतले. त्यात मी अवयवदानाच्या दुरुपयोगाची लोकांच्या मनात असलेली भीती व डॉक्टरांची समाजात खालावत चाललेली प्रतिमा हा मुद्दा घेतला होता.
कोणतीच स्पष्टता नसलेल्या
कोणतीच स्पष्टता नसलेल्या मजकुराबाबत असं म्हणण्यात अर्थ नाही. त्यात स्पष्टता आणणं शक्यही नाहीये.
हाच मुद्दा डोक्यात आलेला पण प्रवाहाविरुद्ध बोलायचं कसं? कारण अनेक लोकांनी येऊन बनवलय म्हणजे बरोबरच असणार :(. त्यामुळे बोलले नव्हते अन तसाही अप्रिय विषय आहे. सो....
.
पण गविंचा प्रतिसाद आवडला.
काल याच विषयावर पुण्याई
काल याच विषयावर पुण्याई सभागृहात परिसंवादाचा कार्यक्रम झाला. रोहीणी पटवर्धन. विद्या बाळ, डॉ संदीप तामणे. अॅड रमा सरोदे या परिसंवादात सहभागी होते. शुभदा जोशी यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. याविषयावर छोटी फिल्म ही दाखवली.
अद्याप म्हणाव तशी जागृती या विषयावर अजून झाली नाही हे रोहिणी पटवर्धन यांनी सांगितले.
विद्या बाळ गेल्यानंतर
विद्या बाळ गेल्यानंतर त्यांच्या आदरांजली सभेत उल्लेख केलेले त्यांचे शेवटचे रेकॉर्डिंग. मार्च 2020 च्या मिळून सार्याजणी मधे आले आहे. स्वेच्छामरण या विषयी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची मते काय होती हे जाणुन घेण्याची उत्सुकता होती.
-------------------------------------------------------------------------
अखेरच आवाहन...
मी विद्या बाळ, १०१, नचिकेत सोसायटी, प्रभात रोड, पुणे - ४, वय ८३ पूर्ण. आज मनाच्या एका अत्यंत गंभीर अशा; पण निर्णायक अवस्थेत बोलते आहे. हा विचार मी आजवर शेकडो लोकांशी बोललीये, पण कुणाला तो इतका गंभीर वाटला, कुणाला नाही, मीही कदाचित थोडी द्विधा मनस्थितीत असेन. पण आज मी अतिशय निर्णायक मनस्थितीत बोलतीये. माझे दात काढल्यामुळे थोडी अस्पष्टता येतीये ती समजून घ्या.
मला असं म्हणायचंय की, मला केव्हापासूनच वाटतंय की माझ्या आयुष्याला आता अर्थ राहिलेला नाही. सगळे माझे प्रियजन सांगताहेत मला की, तुला खूप करण्यासारखं आहे, खूप आयुष्य पुढे आहे, पण मला स्वतःला प्रामाणिकपणे असं वाटतं की, त्याला अर्थ नाहीये, या पुढे बरं होणं, काम करणं, पहिल्या उमेदीनी बरं होऊन काही करणं ही माझी इच्छाही नाहीये आणि मला करायचंही नाहीये. जोशी हॉस्पिटलमध्ये मी ई.ओ.एल. फॉर्म भरलाय - ‘एण्ड
ऑफ लाईफ' म्हणून. काही त्याला अर्थ नाहीये. कारण जोपर्यंत मी प्रत्यक्षात मरण्याच्या स्थितीत येत नाही. तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाहीये हे माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून लक्षात आलंय. तेव्हा हा जो विचार करून, विशेषतः आज विचार करून, मी असं ठरवते आहे की, मला यातून सुटकेचा मार्ग हवा आहे. तो लीगल नाही, हे मला २००% माहितीये; पण तरी तो मला हवा आहे.
मला यावर एक मार्ग सुचतो तो असा : तो ४-८ दिवसात होणारा नाही, त्यामुळे सगळ्यांना सांगण्यास, जाहीर करण्यात आता अर्थ नाही, पण मी बोलतीये. माझ्या असं लक्षात आलं की, याच्यात माणसाच्या जवळ, सज्जन माणसाजवळ, जे नाही (त्याची गरज आहे). पण मला आज एक नवा विचार सुचलाय तो असा की, जी माणसं खरोखरच सुपारी देऊन काम करतात, त्या माणसांच्याकडे कदाचित म्हणजे उदाहरणार्थ क्रूर असे किंवा उद्देश नसलेले (लोक), सर्पमित्र (ज्यांच्याविषयी मला आदर आहे) किंवा त्या प्रकारचे लोक शोधणं आणि त्यांच्या मदतीनी यावर काहीतरी उपाय काढणं शक्य आहे. त्याला वेळ लागेल, पण ते कदाचित शक्य आहे. त्याला काही काळ लागेल तो घ्यावा. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी तो (मार्ग) पूर्ण करावा ज्यामुळे तशी कुणावरच आरोपाची वेळ येणार नाही. कसं, काय, याचे डिटेल्स सिरिअसली ठरवावे लागतील.
आज मी मनाच्या अत्यंत निर्णायक, भावनाविवश नसलेल्या अवस्थेत बोलतीये. इथे आज या बैठकीला सविता ही माझी सध्याची सेवक, विनीता माझी मुलगी, उर्मिला माझी सून, डॉ. मंगला नाही माया (हजर आहेत). इथे हॉस्पिटलमध्ये मी आत्ता ॲडमिट आहे, तिच्याशीही (मायाशीही) मी बोलले आहे. या सगळ्यांनी कृपया याचा नीट नीट नीट विचार करावा आणि जे जे लोक मृत्युशय्येवर आहेत, किंवा लवाटे यांच्यासारखे प्रामाणिकपणे अशाच अवस्थेत मृत्यूची वाट पाहताहेत त्यांना मार्ग मोकळा करून द्यावा. कृपया तुम्ही सगळ्यांनी इथे विचार करावा. आत्ता ही गोष्ट मोठ्यांनी बोलण्याची नाहीये; पण काही महिन्यात, वर्षात, याचा विचार करावा. आत्ता ते शक्य नाही मला माहितीये. मी तोवर थांबायला तयार आहे; पण कधीच न निघणाऱ्या मार्गापेक्षा हा मार्ग खूप चांगला आहे, अनेकांसाठी चांगला आहे, तुम्ही सर्वांनी यावर विचार करावा. हे सगळे विचार ऐकून घेतलेत आणि त्यातनं सगळे जण शांत, शहाण्यासारखा विचार करतील अशी मला आशा आहे.
माझ्यावर लोकांनी इतकं अपार प्रेम केलंय की, मी असा निर्णय घेणं हे एका परीने खूप क्रूर आणि कृतघ्नतेचं लक्षण आहे. मला असं वाटतं की, अनेक लोकांच्या पुढील हितासाठी हा खूपच आणि विशेषतः माझ्यासाठी उपयुक्त (मार्ग) आहे. कृपया विचार करावा. माझ्या निर्णयाचं काही भलं करावं आणि व्यापक जनतेच्यासाठी काहीतरी करावं.
विद्या बाळ २९ जानेवारी २०२०
संध्या. ७.३०
विषयाच्या संबंधीत नुकतीच एक बातमी वाचली
https://m.lokmat.com/photos/international/netherlands-government-allowe…
लहान मुलांसाठी देशाने असा निर्णय घेणे कितपत योग्य?
भिकार वार्तांकन.
मला त्यात काही वावगं वाटलं नाही. ही कायदा आहे म्हणजे ही सोय उपलब्ध आहे. प्रत्येक मुलाचे डॉक्टर आणि पालक मिळून असा निर्णय घेणं अपेक्षित असणार. कोण पालक हौसेनं आपल्या मुलासाठी असा निर्णय घेतील, आणि डॉक्टरसुद्धा आपल्या पेशंटसाठी धडपड करणं हौसेनं थांबवतील!
मला गंमत वाटली ती लोकमतनं काय पद्धतीनं बातमी दाखवली आहे ह्याची! त्यात कायद्यामागे असलेल्या धारणा, विचार, वैद्यकीय पार्श्वभूमी वगैरे काही नाही. नुस्ती इमोसनल अत्याचार चित्रं!
मृत्यू नावडे सर्वांना
मरण आपल्या हातात नाही ते जेव्हा येईल तेव्हा येईल मात्र नियती किंवा योगायोगाने जे व्हायचे ते होतेच. केवळ आपण दक्षता घेऊ शकतो होऊ नये म्हणून.
एका ओळखीच्या माणसाकडून असे ऐकले होते की त्याच्या नात्यातील एक रुग्ण कैक वर्षे बेडवर झोपून होते. वय पण खूप होते. घरातील लोक जे त्रासले होते ते अक्षरशः वाट पाहत होते ते कधी जातील याची.
जे अशा परिस्थितीमध्ये असतात त्यांना भावनेमागचे शल्य समजते. त्रयस्थपणे जे या घटनेकडे पाहतात त्यांच्या मते असा विचार करणे म्हणजे क्रूरपणा किंवा माणूसकीला काळीमा वगैरे. पण नैसर्गिकरित्या येणाऱ्या मृत्युला आणि इच्छित मृत्यूला वेगवेगळे कंगोरे असणारच.
काही वर्षापूर्वी मुंबईतील एका वृद्ध जोडप्याने अशीच एक इच्छा व्यक्त केल्याचे स्मरते.
बातमीची लिंक
https://www.google.com/amp/s/www.news18.com/amp/news/buzz/meet-the-mumb…
मरण आपल्या हातात नाही ते
मरण आपल्या हातात नाही ते जेव्हा येईल तेव्हा येईल मात्र नियती किंवा योगायोगाने जे व्हायचे ते होतेच>>>>स्वयंभू हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. गुणवत्तापुर्ण जगण्यासाठी मृत्युचा विचार जगण्याचीही सक्ती आहे... या पुस्तकात असे अनेक मुद्दे घेतले आहेत.
एक शक्यता...
कुठून उचलली असावीत ही रोगांची उदाहरणासाठी घेतलेली नावे..?
आपण Dunston Checks In नावाचा (१९९६ सालचा) इंग्रजी चित्रपट पाहिला आहेत काय? (याची एक हिंदीतून डब्ड आवृत्तीसुद्धा 'एक बंदर होटल के अंदर' या नावाने (इंग्रजी आवृत्तीबरोबरच) हिंदुस्थानात चालली होती.)
त्या चित्रपटात, डन्स्टनला लपविण्याकरिता त्याच्या नावाने खोली बुक करण्याची वेळ जेव्हा येते, तेव्हा त्याच्याकरिता Lam Binh Ngoc हे नाव धाकटा काइल ज्या पद्धतीने शोधून काढतो, साधारणतः तशाच प्रकारची काही पद्धत येथे अवलंबिण्यात आली असावी, असा संशय येतो.
बोले तो, Diseases having no cure असा काही गूगलसर्च मारला असावा. (Incurable diseases असा सर्च मारण्याइतपत शब्दसंपदा त्यांच्याजवळ नसावी; अन्यथा, ते तिय्यम दर्जाच्या मराठी वर्तमानपत्रात नोकरी करते ना. तसेच, Diseases without a cure असा सोप्या परंतु शुद्ध इंग्रजीतील पर्याय त्यांना सुचला नसावा, कारण, पुन्हा, अन्यथा, इ. इ.)
असा सर्च मारून आलेल्या परिणामांतून, Common Cold हा पर्याय सर्वज्ञात (आणि ऑब्व्हियस) म्हणून वगळला असावा. (कम ऑन! तेवढे इंग्रजी हे तिय्यम दर्जाच्या मराठी नियतकालिकाच्या वार्ताहराससुद्धा आजकाल समजत असावे.) उरलेल्या परिणामांतून कोणतीतरी तीन रँडम (आणि अगम्य अशी) नावे अडम तडम तडतड बाजा पद्धतीने निवडली असावीत. ठोकुनि देतो ऐसा जे!
बाकी, त्या बातमीबरोबर जी (अपॅरंटली निरोगी तथा सुदृढ) बाळांची चित्रे छापून एका प्रकारचा इमोशनल अत्याचार करण्यात आलेला आहे, तो करण्याकरिता जो एक स्पेशल प्रकारचा (अजेंडा-ड्रिव्हन) हलकटपणा लागतो, त्याबद्दल, एक तर असभ्यतेबद्दलच्या संकेतांपायी, आणि, दुसरे म्हणजे, परधर्मीयांच्या भावना दुखावू नयेत, या सद्भावनेपोटी, कोणतेही जाहीर अचकटविचकट विधान करू इच्छीत नाही. (अन्यथा, वेगवेगळ्या सिन्स ऑफ ओमिशन अथवा -कमिशनकरिता, 'तेहाची माय...'-छापाच्या जाहीर विधानांची परंपरा महाराष्ट्रास आहेच.) आमच्या देशात असल्यांचा केवळ सुकाळच नव्हे, तर (राजकीय) प्रस्थसुद्धा आहे. इट्स अ ब्लडी रॅकेट! ते असो, परंतु हिंदुस्थानातसुद्धा असल्यांची चलती आहे, हे नवल आहे.
असो.
मरणाची इच्छा की इच्छा मरण.
अतिशय तीव्र नैराश्यातून आलेला जीवनाविषयी तिटकारा,आणि रागाच्या भरात काही वेळासाठी झालेली तीव्र झालेली मरणाची ईच्छा ह्या मधून घडलेल्या आत्महत्या हा प्रकार इच्छा मरणाच्या व्याख्येत च येतो (नोट: ही मी स्वतः केलेली व्याख्या आहे)
फक्त हा आवेग काही वेळा पुरताच असतो त्यावेळेस त्यांनी आत्महत्या केली नाही तर इच्छा मरणाची निघून जाते
आणि ह्या इच्छा मरणाला वयाची,लिंगाची,शारीरिक क्षमतेची,निरोगी पणाची अशी कोणतीच अट नसते.
मरणाची इच्छा ही हळुवार घडणारी प्रक्रिया आहे ह्या मध्ये प्रतेक मिनिटां त विचार बदलत असतात ठाम असे काहीच नसते.
आजारपणं मुळे,वया मुळे आलेली हतबलता ह्या मुळे होत असलेली मरणाची ईच्छा ही बिलकुल तीव्र नसते.
काही सकारात्मक घडायला लागले की मरणाची ईच्छा निघून जाते परत जगवस वाटत.
त्या मुळे अशा व्यक्ती च्या इच्छा पत्राला काहीच किँमत नाही.
ह्यांची मरणाची इच्छा आहे की नाही हे लक्षात न घेता डॉक्टर आणि नातेवाईकंकडून कडूनच निर्णय अपेक्षित आहे.
फक्त कडक नियमावली ची आवश्यकता आहे.
स्वयंभू वेदना विरहीत हा मुद्दा महत्वाचा आहे
हे यंत्र एखाद्या व्यक्तीला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडपासून वंचित ठेवून मरणास मदत करते. त्या व्यक्तीला कोणतीही वेदना किंवा भीती वाटत नाही. हे जे बातमीत म्हटलय त्याबद्दल (वेदना) साशंकता वाटते. भूल दिल्यावर जर नंतर मृत्यु आला तर तो सगळ्यात वेदनाविरहीत असू शकतो.
इच्छा पत्र लिहून घेणाऱ्या व्यक्ती चा
ज्यांनी मरणाची ईच्छा व्यक्त केली आहे त्याच्या संपत्ती शी वारसा हक्क नी पण संबंध असला नाही पाहिजे.
त्रयस्थ तज्ञ व्यक्ती आणि सरकारी उच्च अधिकारी ह्यांना च तो अधिकार असावा.. .
आणि अशा प्रकरणात त्याची सर्व स्थावर मालमत्ता आणि बँक बॅलन्स मृत्यू नंतर सरकार कडे हस्तांतरित झाली पाहिजे
क्रियाकर्म मृत्युपत्र
वैद्यकीय मृत्युपत्र आणि रेग्युलर मृत्युपत्र याशिवाय, एक क्रियाकर्म मृत्युपत्र देखील करावे असे माझ्या मनांत आहे. माझ्या बाबतीत ते अशा प्रकारचे असेल.
१. मृत्यु झाल्यापासून कमीतकमी वेळात माझ्या मृतदेहाची वासलात लावण्यात यावी. अंत्यदर्शनासाठी कोणत्याही आप्ताने वा अन्य व्यक्तिने माझे प्रयाण लांबवु नये.
२. माझ्या शवावर कोणीही हार, फुले वगैरे घालण्याचा प्रयत्नही करु नये. या प्रकाराची मला आत्यंतिक चीड आहे.
३. मृतदेह ॲम्ब्युलन्सनेच न्यावा, कोणीही माझे ओझे उचलु नये.
४. स्मशानातही कुठल्याही प्रकारची धार्मिक क्रिया करु नये. मुलाला कपडे ओले होतील अशा तऱ्हेने मडके घेऊन प्रदक्षिणा घालायला लावणे मला हास्यास्पद वाटते.
५. माझा फोटो फ्रेम करुन घरांत लावू नये. मी प्रसिद्ध व्यक्ति नसल्याने माझा पुतळा बनणार नाही, याचे मला अतीव समाधान आहे.
६. माझ्या अस्थि तिथून आणून तीर्थक्षेत्री सोडून येण्याचा प्रकारही कोणी करु नये.
ते तुम्ही कुठे देहत्याग करत आहात त्या वर अवलंबून आहे
तुम्ही मृत्यू पत्र केले तरी तुमचा मृत्यू झाला आहे हे सरकारी यंत्रणांना कळवणे हे काम कोणाला तरी करावेच लागेल.
तुम्ही जसे lihle आहे तसेच घडत आहे का?
ह्या वर लक्ष ठेवावे लागेल.
त्या पेक्षा जंगलात,निर्मनुष्य ठिकाणी देह त्याग केला तर कोणालाच काहीच जबाबदारी घेण्याची गरज नाही.
सध्या असे इच्छापत्र करता येत
सध्या असे इच्छापत्र करता येत नाही का?अशी बरीच इच्छापत्रे जमली की त्यासाठी मग एक रीतसर कायदा आणि मागणी करण्याचा विचार आहे काय?