डिजीटल ईंडीया, फ्रि ईंटरनेट आणि नेट न्युट्रॅलिटी

  • डिजीटल ईंडीया हा भारतातील हजारो शहरे, गावे, रस्ते आणि रेल्वे स्थानकं ईंटरनेट ने जोडण्यासाठी पायाभुत सुविधा ऊपलब्ध करून देण्याचा ऊपक्रम.
  • फेसबुक आणि आठ दहा कंपन्या मिळुन जगातल्या अविकसीत आणि विकसनशील देशातल्या ज्या भागातील लोक ईंटरनेटपासुन वंचित आहे त्यांना मोफत ईंटरनेट सेवा ऊपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हणजे internet.org
  • या सेवेत अशा वंचितांना काही अतिमहत्वाच्या सरकारी सेवा आणि त्यासोबत या कार्यक्रमास आर्थिक पाठबळ पुरवणार्या काही कंपन्यांच्या मर्यादीत सेवा ऊपलब्ध होणार आहे. जर त्यांनी पैसा ओतला आहे तर अर्थातच ते स्वतःचे ऊत्पादन विकणार. म्हणजे मोफत ईंटरनेटवर मर्यादीत माहीती ऊपलब्ध होणार. याचसोबत मध्यंतरी काही ईंटरनेट सेवा पुरवणार्या कंपन्यांनी काही विशिष्ट वेबसाईटच ऊपलब्ध होतील असे नेट पॅक पुरवण्याची टुम काढली होती. त्याच्या विरोधात सुरू झालेली लढाई म्हणजे नेट न्युट्रॅलिटी.

आता फेसबुक वरील फोटो तिरंगा करणे म्हणजे internet.org ला पाठींबा देणे हे दाखवण्यासाठी काहींनी फेस्बुक च्या html code चा आधार दिला होता.सदर क्षेत्रातील तज्ञाला विचारले असता तो कोड फक्त फोटो तिरंगा करण्यासाठीच होता असे समजले. त्या दोन गोष्टींत काही संबंध नाही हे सुध्दा सिद्ध झाले आहे. मग तथाकथित बुध्द्दीवादी असे का वागताएत?

दुसरी बाजु:
फोर्ब्स् मॅगझिन मधल्या एका ऊतार्याच्या आधारे अश्या मर्यादीत का होईना पण ईंटरनेट सेवेचा वंचितांना ऊपयोग झाला तर त्या देशाच्या GDP त 0.5% वाढ होऊ शकते.
मग काहींच्या पोटात का दुखतंय?
माहीती तंत्रज्ञान एवढं गुंतागुंतीचं झालंय कि सध्या कोणीही नेट न्युट्रॅलिटी अनुभवतंय हे म्हणणं म्हणजे आभास. छोटं ऊदाहरण द्यायचं तर यु ट्युब वर व्हीडीओ बघतांना कोणती जाहीरात बघायची हे काही आपण नाही ठरवत तर ती आपल्या माथी मारलेली असते (अॅडब्लाॅक हा वेगळा विषय आहे).
तर ह्या सेवेचा ऊद्देश देशाच्या कानाकोपर्यात जिथे ईंटरनेट सुविधा आजवर पोहोचु शकली नाही तेथे ती पुरवणे हा आहे. पण ओरडा करणारे सगळे शहरी भागातले आहेत ज्यांची पोटं आणि खिसे भरलेली आहेत आणि 3G सेवा ऊपभोगताय. खरं तर हा ओरडा त्यांनी मध्यमवर्गियाच्या आवाक्यातल्या (पैशांनी) 4G सेवेच्या ऊपलब्धतेसाठी केला पाहीजे. मग हा विरोध कोणाला आहे? फेसबुकला, देशाच्या नेत्याला, नेट न्युट्रॅलिटीला नसण्याला कि अशी सेवा ज्यांना मोफत मिळु शकते त्यांच्या सुखकर होणार्या आयुष्याला?
जर फुकट ईंटरनेट ते पण विकतच्या सेवेईतके सहज ऊपलब्ध होणारे असेल तर मग ईंटरनेट कंपन्यांनी पैसा कसा काय ऊभा करायचा? रोजगार कसा द्यायचा? घ्यायचं तर पुर्ण घेऊ नाहीतर काहीच नाही म्हणजे खाईल तर तुपाशी नाहीतर ऊपाशी असं झालं.
या सगळ्या मागे काही व्यावसायिक गणितं असतात. शिवाय व्यवसाय हा शेवटी ग्राहकावर अवलंबुन असतो. जर ऊत्पादन खपलंच नाही तर ते बळजबरी माथी मारता येत नाही. मॅक डोनाल्ड ने भारतात पाय ठेवतांना बिफ बर्गर च्या जागी चिकन बर्गर ने सुरूवात ऊगाचच नव्हती केली. त्यातल्या त्यात भारतीय बाजारपेठ आणि ग्राहक वर्ग हा अतिशय चोखंदळ आणि काटकसरी आहे.
बरं अशा अतिदुर्गम भागातील लोकांना फ्लिपकार्ट मिळतंय की अमेझाॅन याने काय फरक पडतो? जर पडलाच तर तो शहरी भागातल्या लोकांना पडेल ज्यांची ऐपत असुन पण फुकट सेवा लाटण्याची ईच्छा आहे. खरंतर ही वेळ हे बघण्याची आहे कि ही मोफत ईंटरनेट खरंच दुर्गम भागात ऊपलब्ध करून दिली जातेय कि तिला शहरातल्या अशा चकटफु ग्राहकांच्या रडण्याला बळी पडुन वंचितांना अजुनच वंचित रहावं लागेल. आणि जेव्हा ती ऊपलब्ध होईल तेव्हा तिथल्या लोकांना तिचा खरोखरंच ऊपयोग होईल का? (ई-साक्षरता). आधी दुध लागेल तरंच श्रीखंड बनवता येईल.
बाकी आपला फोटो तिरंगा करायचा कि नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण तसे करतांना आणि न करतांना आपण एखाद्या कळपातलं खाली मान घालुन चालणारं मेंढरू तर नाही ना होत आहे हा विचार करायला हवा. बर्याचदा छान छान लिहीणारे आणि एखाद्या विषयात गती असणारे सगळीकडेच आपली मतं व्यक्त करतात आणि त्यांच्या कळपातले बाकीचे खाली मान घालुन निघतात आपले बिचारे.
राहीला विरोधाला विरोध तर त्याला काही अर्थ नाही. सत्यनारायणाचा प्रसाद खाल्यावर हातावर हात चोळले म्हणुन प्रसादाचा अपमान झाला असं बोलुन कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवण्यापलिकडे बुद्धीचा वापर व्हायला हवा.(सत्या नाडेलांनी मोदींशी हात मिळवल्यावर हात झतकला त्या संदर्भात) आंधळी श्रद्धा आणि आंधळा विरोध दोन्ही सारखाच अपायकारक.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बरं झालं विषय काढला

बाकी चर्चा होतच राहिल वेळे अभावी एक साधा प्रश्न आहे त्याचं उत्तर द्याल काय?

इंटरनेट डॉट ऑर्ग हा प्रकार चॅरीटी आहे की बिझनेस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खर तर ती फार मोठी गोम आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला इथे मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~ योगी

आभार

Mark Zuckerberg's push to bring internet to the poor is business dressed up as charity
Facebook's CEO is making the hunt for new customers sound like a philanthropic calling

दॅट्स ऑल माय मिलॉर्ड! Wink

गरीबांना फुकट इंटरनेट देणे वगैरे या योजनेचे ध्येय्य नाही. तर गरीबांबा फुकटात "फेसबुक" (व अन्य काही सहभागी वेबसाईट्स) वापरू देणे हे आहे.
अर्थात नेट न्युट्रॅलिटीला जोर्दार ठोसा!

आशा आहे

मग हा विरोध कोणाला आहे? फेसबुकला, देशाच्या नेत्याला, नेट न्युट्रॅलिटीला नसण्याला कि अशी सेवा ज्यांना मोफत मिळु शकते त्यांच्या सुखकर होणार्या आयुष्याला?

याचे उत्तर मिळाले असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माय लॉर्ड, मेरे काबिल दोस्त यह भुल रहे हय कि फेसबुक प्रोफाईल तिरंगा बनाना (डिजिटल इडिंया को सपोर्ट) और internet.org का सपोर्ट करना ये दोनो अलग बाते हय|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~ योगी

फेसबुकबाबत एक रोचक लेखः https://www.linkedin.com/pulse/internet-splinternet-facebooks-new-intern...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख ग्रेटच आहे.
.
२ शंका आहेत -

Actually, I don't believe so. Let Facebook pull its stunt. Then Google will. So will Twitter. And eBay. And each telco. And each e-com company. And soon we'll have hundreds of thousands of different so-called internets around the world used by a handful of people each who can't talk or connect to each other.

ही भीती साधार्/व्हॅलिड आहे का?

.
दुसरी शंका ही की फेसबुक्ची रायव्हल गुगल कशी असेल दोन्ही एकदम वेगळ्या सेवा पुरवतात बरोबर?
.

There's no Alibaba, there's no Amazon, there's no eBay. No place these folks can buy, or sell or trade. There's no Kiva or other bottom-of-pyramid money service. No loans they can receive. No government sites, no banks. No Coursera or EdX or Khan Academy - so it's not about education either. Forget about entertainment - there's absolutely none of that. And no LinkedIn, of course. You name any possible site of importance to someone who needs information and opportunities, and it's not there. But, hey, I guess they you can always poke folks in the next village!

असं का? नेट आलं की या साइटस उपलब्ध होणारच ना? की नेट न्युट्रॅलिटी काढून टाकतायत? रामायण झाल्यावर मी रामाची सीता कोण विचारतेय का? Sad
_____

या सेवेत अशा वंचितांना काही अतिमहत्वाच्या सरकारी सेवा आणि त्यासोबत या कार्यक्रमास आर्थिक पाठबळ पुरवणार्या काही कंपन्यांच्या मर्यादीत सेवा ऊपलब्ध होणार आहे.

कळलं कळलं, मर्यादित सेवा मिळणार. ओके गॉट इट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ लेखदेखील उत्तम आहे व अतिशहाणा यांनी दिलेला - दुसरी बाजू दाखविणाराही उत्तम आहेत. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0