Skip to main content

अलीकडे काय पाहिलंत?

डिजीटल ईंडीया, फ्रि ईंटरनेट आणि नेट न्युट्रॅलिटी

  • डिजीटल ईंडीया हा भारतातील हजारो शहरे, गावे, रस्ते आणि रेल्वे स्थानकं ईंटरनेट ने जोडण्यासाठी पायाभुत सुविधा ऊपलब्ध करून देण्याचा ऊपक्रम.
  • फेसबुक आणि आठ दहा कंपन्या मिळुन जगातल्या अविकसीत आणि विकसनशील देशातल्या ज्या भागातील लोक ईंटरनेटपासुन वंचित आहे त्यांना मोफत ईंटरनेट सेवा ऊपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हणजे internet.org

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अलीकडे काय पाहिलंत? - १५

(जुन्या धाग्यात १००च्या जवळपास प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)

***

'आयायटी बॉम्बे'मध्ये 'साथी' नावाचा एक LGBTQ सपोर्ट ग्रुप आहे. साथी आणि कशिश-फॉर्वर्ड यांनी मिळून आयोजित केलेला एक कार्यक्रम काल पाहिला. 'क्रश-शेक', 'क्यों की' आणि 'मित्रा' असे तीन लघुचित्रपट आणि नंतर त्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांशी गप्पा असं त्याचं स्वरूप होतं.

इशारा: पुढे सिनेमाच्या गोष्टी आणि इतरही काही रहस्यभेद आहेत. नको असल्यास, वाचू नका.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अमोघ वक्तृत्वशैलीचा बहर

पंचावन्न किंवा साठ वर्षांपूर्वीची एक स्पष्ट आठवण मला अजूनही आहे. मी त्या वेळेस एक शाळकरी मुलगा होतो. एका रविवारच्या दुपारी माझे एक मामा टापटिपीचे कपडे करून कोठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत मला दिसले होते. हे माझे मामा चाकरमानी असल्याने रविवार म्हणजे आपला हक्काचा सुट्टीचा दिवस असे बहुसंख्य चाकरमान्यांप्रमाणे मानत आणि रविवारची दुपार सर्वसाधारणपणे लोळण्यात आणि वृत्तपत्र वाचनात घालवत असत. साहजिकच मला आश्चर्य वाटले व मी मामाकडे तो आज रविवार दुपारचा कसा काय आणि बाहेर कोठे चालला आहे? अशी पृच्छा केली. त्याने मला आपण एका मीटिंगला चाललो आहोत एवढेच सांगितले. मला फारसे काही कळले नाही व मी गप्प राहिलो.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

टोनी सोप्रानो

१९९९ साली अमेरिकेत नवानवा आलेलो होतो. इंटरनेटसुद्धा नवंनवंच होतं. फास्टम फास्ट इंटर्नेट, स्मार्ट फोन्स, सोशल मिडिया, गूगल-फेसबुक जन्माला आलेले नव्हते. स्ट्रीमिंगचा स्फोट व्हायचा होता. "सेक्स अँड द सिटी" आणि "द सोप्रानोज" या सिरियली साधारण एकाच वर्षी "एचबीओ" वर आलेल्या होत्या. 

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

बागकामप्रेमी ऐसीकर २०२०

मला २०१९ पर्यंत नारळाचं झाड आणि क्याक्टस - एवढा ढोबळ फरक ठाऊक होता.
आणि वडाचं झाड.
बाकी झाडं जवळपास सारखीच वाटायची. म्हणजे फार तर मोठी-मध्यम-छोटी इतका फरक समजायचा.
पण मोठे लोक जसं एखाद्या झाडाखाली उभं राहून - "कलमी आहे, पानंच बघा ना!" वगैरे म्हणून माना डोलावतात, तसलं काही कळत नाही.
निव्वळ पानं बघून झाड ओळखणं तर जादू वाटते.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अलीकडे काय पाहिलंत? - ३२

आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.

या धाग्याचा वापर करणाऱ्या सर्वांना विनंती - कृपया लिंक द्यावी. शक्यतो व्हिडियो एम्बेड करू नये. धागा लोड होईपर्यंत वृद्धापकाळ येतो.

-------

नागराज मंजुळे यांची शॉर्ट फिल्म 'पिस्तुल्या' आता अधिकृतरीत्या यूट्यूबवर उपलब्ध आहे.

https://www.youtube.com/watch?v=ovimYnrk07o

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अलीकडे काय पाहिलंत? - ३१

आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.
---

american history X पाहिला. एडवर्ड नॉर्टन काय भारी आहे राव!
विचारांना चालना देणारा सिनेमा. आपल्याकडे एवढं भारी, गुंतागुंतीचं काही बनावं असं वाटतं.