आईस्क्रीम, कुल्फी इ. इ. की आणखी काही?

आपण जे खातो ते ‘तेच’ आहे का, असा प्रश्न आपल्याला सहसा पडत नाही, म्हणजे बटाटेवडा मागितला आणि मका पॅटीस समोर आले, तर ओळखतोच की पटकन! किंवा तेलपोळीला कुणी पुरणपोळी म्हणू लागले तर त्याला वेडयातच काढू की नाही? पण बाजारात मिळणा-या सगळ्याच पदार्थाबाबत आपल्याला पुरेशी माहिती असतेच, असं नाही होऊ शकत.

IceCream

शिवाय आता अन्नप्रक्रिया उद्योगाने व त्यासंदर्भातील संशोधन व तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केलीय, की नित्य नवीन नवीन चवीचे, आकारा-प्रकाराचे पदार्थ, छान छान रंगीबेरंगी वेस्टनामधून आपल्याला जणू बोलावीत असतात. या, या, मला घ्या, खाऊन तरी बघा, असा आग्रह करीत असतात.

म्हणूनच, आपण नक्की काय खातोय, याची माहिती कशी करून घ्यावी. याचा गृहपाठ करायला हवाच. मुंबई ग्राहक पंचायतीचा शिक्षण विभाग त्यासाठी खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर काय असावे, ते कसे वाचून समजून घ्यावे, यासाठी सर्व वयोगटांसाठी प्रबोधनपर शिबिरे आयोजित करीत असतो. तरीही एक प्रश्न उरतो तो म्हणजे काही पदार्थ असतात. त्यावरचे वेष्टन वाचून समजून घेऊन मग खरेदी करायची हे शक्यच नाही. त्यापैकी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आईस्क्रीम.

उन्हाळा वाढत जातो. तशी आईस्क्रीम, कुल्फी आणि थंडगार पन्हे, सरबत यांची मागणी वाढत जाते. टेट्रॉपॅकमधली लस्सीसुद्धा पटकन प्यायली नाही तर ‘गरम’ होईल. म्हणून आपण ती बनवणा-या कंपनीचे नाव, किंमत काही न बघता, तिच्यात स्ट्रॉ खूपसून ती तोंडाला लावतो. अशा परिस्थितीत आईस्क्रीमचे वेष्टन वाचून ते समजून घेऊन मग खाण्याची कल्पना तरी शक्य आहे का? अहो, ते वितळून जाईल ना!

चॉकोबार असेल तर वरचा चॉकलेटचा थर वेडावाकडा होऊन निसटेल, कोनात घेतलं असले तर ओघळून बाहेरच सांडेल, शिवाय आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम, त्यात काय वेगळे असणार? अगदी बरोबर त्यात वेगळे असतात ते स्वाद. जसे की चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच, ब्लॅक करंट इ. इ. अगदी नुसती ही नावे लिहितानासुद्धा माझ्याच तोंडाला पाणी सुटते.

मग प्रत्यक्ष विकत घेऊन खाताना ते ग्राहक पंचायतीने शिकवलेले मुद्दे कसे बरे आठवणार? पण तरीही आरोग्याबाबत जागरूक असणा-या आमच्या सदराच्या ग्राहक, वाचकांना हे माहीत हवे की ‘आईस्क्रीम’सारखी दिसणारी, भासणारी पण ‘आईस्क्रीम’च्या व्याख्येत न बसणारी उत्पादनेसुद्धा मार्केटमध्ये आहेत. त्यांच्या वेष्टनावर किंवा जाहिरातीतसुद्धा कधीही ‘आईस्क्रीम’ असा शब्द नसतो. पण सामान्य ग्राहकाला ती ‘आईस्क्रीम’च वाटतात. त्या प्रकाराला म्हणतात ‘फ्रोझन डेझर्ट’.

त्यामध्ये पण बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट असे प्रकार असतात. पण आईस्क्रीम म्हणवून घेण्याची मूळ अट म्हणजे केवळ दुग्धजन्य क्रीमच त्यात नसते. त्यात वनस्पतीजन्य ‘फॅट’/तेल/ हायड्रोजनेटेड वनस्पतीजन्य फॅट असते.
आता हे तेल बाजारात उपलब्ध असणारे पाम, शेंगदाणा, कनोला इ. कोणतेही एक (अगर अनेकही) असते. ते नक्की कोणते हे वेष्टनावर सांगणे बंधनकारक नाही. शिवाय त्यात मिल्क सॉलिड्स असतात, जे आईस्क्रीममध्येही असतात. मात्र प्रोटीन दुग्धजन्यच असेल असे नाही. काही फ्रोझन डेझर्टवर ‘सोया प्रोटीन’ असे ‘घटकपदार्थाच्या’ यादीत आढळून आले आहे.

यासाठी या दोन समान भासणा-या व दिसणा-या उत्पादनांमधला फरक आपण समजून घेऊन मग ते खरेदी करावे, फ्रोझन डेझर्टला जे/गे लाटोज असेही नाव आहे, ते स्टॉल्सवर ‘कोन’मधून मिळते. मात्र तिथेही आईस्क्रीम असा शब्द नसतो. शिवाय आईस्क्रीमबाबत आपणाकडे ठोस प्रमाणीकरण (standardisation of product) आहे. म्हणजे कसे की, त्यात कमीत कमी १० टक्के मिल्क क्रीम (स्निग्धता) हवे व चांगल्या आईस्क्रीममध्ये क्रीम १२ टक्के हवे. साखर १५ टक्के त्यानंतर मग दुग्धजन्य घनपदार्थ (एसएनएफ) फळे, स्वाद इ. पण मुळात क्रीम व साखरेचे प्रमाण ठरलेले आहे.

तसेच त्यात ‘शुगर फ्री’सदृश रसायने नसली पाहिजेत. पाहा बरे, आईस्क्रीममधले क्रीम आणि साखरेचे प्रमाण हे एखाद्या क्रीम कुकीपेक्षा खूप कमी आहे. सॉफ्टीमध्ये तर केवळ ६ टक्केपर्यंत फॅट असावी आणि साखर १२ ते १५ टक्के. यावरून कळेल की मर्यादेत खाल्ले तर आईस्क्रीम/ सॉफ्टी आपल्याला खूप सारी साखर किंवा फॅट देत नाहीत.
मात्र डेझर्टबाबत असे निश्चित प्रमाण आढळत नाही. शिवाय त्यातील फॅट, प्रोटीन इ. सर्वाना सोसतील असे नाही. त्यामुळे जर कधी खास करून बालके/ वृद्धांना एखादे फ्रोझन डेझर्ट खाऊन त्रास झाला, तर त्याबाबत जागरूक राहायला हवे. शिवाय ‘हायड्रोजनेटेड् फॅट’ ही आरोग्यासाठी उपकारक समजली जात नाहीत. त्यामुळेच तिचे नियमित सेवन, कदाचित आपल्या नकळत होत असेल, तर त्याचीही काळजी आपणच घेतली पाहिजे.

जे खवय्ये आपली रसना परजून असतात. त्यांना जिभेवर ठेवलेला थंडगार तुकडा आईस्क्रीमचा की फ्रोजन डेझर्टचा हे कळू शकते. ज्याला ‘माऊथफील’ असे म्हणतात, तो या दोन पदार्थाचा वेगळा असतो आणि हो, कुल्फीचा त्याहून वेगळा. ‘कुल्फी’ म्हणजे एकदम ‘जड’ बरे का! ती विकली जाते वजनावर, तर आधीचे दोन भिडू मापाने. म्हणजे मि.ली.च्या प्रमाणात. कारण आईस्क्रीमच्या प्रकारानुसार त्यात ७० ते ९५ टक्के हवा असू शकते. सॉफ्टीत ३० ते ५० टक्के. त्यामुळे ते तोंडात बोचत नाही.

सर्वसामान्य ग्राहकांनाही हे तपशील माहीत असायला हवेत. जेणेकरून आपण जे खातोय ते ‘तेच’ आहे हे समजेल. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्या आरोग्याशी या सा-या गोष्टी थेट जोडलेल्या आहेत, म्हणून त्या जाणून घ्यायलाच हव्यात.

- वसुंधरा देवधर, मुंबई ग्राहक पंचायत
पुर्वप्रसिध्दी - दैनिक प्रहार - प्रतिबिंब

मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

रोचक माहिती.

पूर्ण लेखात फक्त खालचा भागच सांगतो की फ्रोझन डेझर्ट मधे प्रॉब्लेम काय आहे. पण माहिती अपूर्ण वाटते.

डेझर्टबाबत असे निश्चित प्रमाण आढळत नाही. शिवाय त्यातील फॅट, प्रोटीन इ. सर्वाना सोसतील असे नाही. त्यामुळे जर कधी खास करून बालके/ वृद्धांना एखादे फ्रोझन डेझर्ट खाऊन त्रास झाला, तर त्याबाबत जागरूक राहायला हवे. शिवाय ‘हायड्रोजनेटेड् फॅट’ ही आरोग्यासाठी उपकारक समजली जात नाहीत. त्यामुळेच तिचे नियमित सेवन, कदाचित आपल्या नकळत होत असेल, तर त्याचीही काळजी आपणच घेतली पाहिजे.

प्रश्न-

सोसत नाहीत म्हणजे नेमके काय? काय त्रास होऊ शकतो?

नियमितपणे फ्रोझन डेझर्ट खाऊ नका, *एवढेच* म्हणणे आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण आईस्क्रीम म्हणवून घेण्याची मूळ अट म्हणजे केवळ दुग्धजन्य क्रीमच त्यात नसते

या वाक्यात "असते" असं पाहिजे. किंवा पुढच्या वाक्यात बदल हवा.

लेख आवडला. कारण "डालडा आईस्क्रीम" आणि इतर कायच्याकाय शब्द वापरुन निव्वळ घृणाच उत्पन्न करायला काढलेल्या अजेंडायुक्त फॉरवर्डसपेक्षा योग्य माहिती समोर ठेवली आहे हे आवडलं.

सर्व फ्रोजन डेझर्टसमधे हायड्रोजनेटेट व्हेजिटेबल ऑईलच असतं असं नाही. आणि कोलेस्टेरॉलबाबत त्या शुद्द दूधवाल्या डेयरी फॅट्सच घातक असतात (व्हेजिटेबल ऑईलमधे सॅच्युरेटेड फॅट्स नसल्याने फ्रोझन डेझर्ट हा बेटर चॉईस आहे) हेही नोंदवलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>कोलेस्टेरॉलबाबत त्या शुद्द दूधवाल्या डेयरी फॅट्सच घातक असतात>>

+१. म्हणून बटर ऐवजी न्यूट्रालाइट वगैरे वापरतात असे ऐकले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कारण "डालडा आईस्क्रीम" आणि इतर कायच्याकाय शब्द वापरुन निव्वळ घृणाच उत्पन्न करायला काढलेल्या अजेंडायुक्त फॉरवर्डसपेक्षा योग्य माहिती समोर ठेवली आहे हे आवडलं.

+१
येऊ देत असेच लेख

==
त्या डालडा आयस्क्रीमची फॉर्वर्ड्स बघुन आता योग-गुरू फेम ब्रॅन्डचं आईस्क्रीम (साक्षात गोमातेच्या खर्‍या खर्‍या दुधापासून बनवलेले अशा अ‍ॅडसह) येणार अशी भविष्यवाणी आम्ही वर्तवली होती. अर्धा उन्हाळा सरला तरी तशी लक्षणे दिसत नैयेत पण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बोले तो कॉलेस्टेरॉलच्या दृष्टीने डालडा बेटर द्यान दूध/साय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

डालडा नव्हे. नॉन हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑईल्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"नॉन हायड्रोजनेटेड" नव्हे "हायड्रोजनेटेड"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डालडा हा हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑईलचा ब्रँड असल्याने तो जनरली हायड्रोजनेटेड अशा अर्थाने वापरला जातो. त्यात सॅच्युरेटेड फॅट्समुळे वाईट कोलेस्टेरॉल जास्त असतं. नॉन हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑईलमधे अशा फॅट्स शून्यवत् असतात. काही ठिकाणी लेखांमधे वाचल्यानुसार फ्रोझन डेझर्टच्या दर्जेदार कंपन्या तरी हायड्रोजनेटेड ऑईल वापरत नाहीत.

बाकी अधिक तपशील त्या क्षेत्रातला अभ्यास असणारे सांगू शकतील.

जनरल माहिती म्हणून हे पेज पाहता येईल.

http://www.kwalitywalls.in/cold-dessert-myths-and-facts.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या पेजवरील पहिलाच भाग मुद्द्याला बगल देणारा आहे. केवळ व्हेजिटेबल फ्याट्स नसतात कै, मिल्क सॉलिड्स (म्हणजे स्किम्ड मिल्क पावडर), चॉकलेट, ड्रायफ्रूट सुद्धा असतात.

अबे घोचू !! फॅट्स मध्ये फक्त वेजिटेबल फॅट्स असतात मिल्क फॅट नसते असं म्हणणं आहे. पण त्या भागावरून "मिल्क फॅट्स मुळीच नसल्याची" कबुली दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>> त्या पेजवरील पहिलाच भाग मुद्द्याला बगल देणारा आहे. <<

मुळात क्वालिटी वॉल्सच्या पानावर माहिती नाही, तर जाहिरात असणार हे उघड आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणूनच सदरील लेखाप्रमाणे ग्राहक पंचायत आदिंचे लेख जास्त आवश्यक आणि समतोल साधणारे. महत्वाचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हायड्रोजनेशन केल्यामुळे वनस्पती तेलाचा डालडा होतो. म्हणजे तेलापासून तूपसदृष्य रूप येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> आणि कोलेस्टेरॉलबाबत त्या शुद्द दूधवाल्या डेयरी फॅट्सच घातक असतात (व्हेजिटेबल ऑईलमधे सॅच्युरेटेड फॅट्स नसल्याने फ्रोझन डेझर्ट हा बेटर चॉईस आहे) हेही नोंदवलं पाहिजे. <<

आता ह्याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामागे अनेक कारणं आहेत. ज्या क्लिनिकल स्टडीजमधून हा निष्कर्ष काढला गेला त्याच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्न आहेत. त्याविषयीचा हा एक लेख पाहा.

Not surprisingly, numerous studies have actually shown that Keys’ theory was wrong and saturated fats are healthy, including these studies from Fallon and Enig’s classic article The Skinny on Fats: [xxii]

A survey of South Carolina adults found no correlation of blood cholesterol levels with “bad” dietary habits, such as use of red meat, animal fats, fried foods, butter, eggs, whole milk, bacon, sausage and cheese. [xxiii]

A Medical Research Council survey showed that men eating butter ran half the risk of developing heart disease as those using margarine. [xxiv]

Of course, as Americans cut out nutritious animal fats from their diets, they were left hungry. So they began eating more processed grains, more vegetable oils, and more high-fructose corn syrup, all of which are nutritional disasters.

It is this latter type of diet that will eventually lead to increased inflammation, and therefore cholesterol, in your body. So don’t let anyone scare you away from saturated fat anymore.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कोलेस्टेरॉलचा प्रश्न मुळात असेल असं गृहीत धरल्यास डेअरी फॅट्स जास्त वाईट कोलेस्टेरॉलवाल्या असतात. समजा मूळ गृहीतक चुकीचं ठरलं तर उत्तमच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्नात कोलेस्टेरॉल असतं म्हणून ते सगळं शरीरात शोषलं जातंच असं नाही. अन्नातून कमी कोलेस्टेरॉल खाल्लं तर शरीर स्वतः ते बनवतं. त्यामुळे कोलेस्टेरॉल आहेत म्हणून ठराविक अन्न वाईट, असं सरसकटपणे म्हणता येत नाही.

(पोषण हा विषय विज्ञान म्हणून किती हाताळला जातो आणि लॉबी/उद्योजकांचं हित साधण्यासाठी कसा वापरला जातो, ह्या गंमतीशीर गोष्टी असणार. वरवर वाचूनही अशी शंका येते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(पोषण हा विषय विज्ञान म्हणून किती हाताळला जातो आणि लॉबी/उद्योजकांचं हित साधण्यासाठी कसा वापरला जातो, ह्या गंमतीशीर गोष्टी असणार. वरवर वाचूनही अशी शंका येते.)

सीर्यसलि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पोषण विषयातला 'वैज्ञानिक दृष्टीकोन' ह्या संदर्भात अलिकडेच हा लेख वाचला.
The sugar conspiracy

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद, वाचून पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दुवा गंडका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

खाण्यातुन शरीरात गेलेल्या कोलेष्ट्रॉल चा वाईट परीणाम होत नाही असा काहीतरी निष्कर्ष नुकताच काढलेला वाचलेले आहे. बाहेरून कोलेस्ट्रॉल घेतले नाही तरी शरीर भरपुर तयार करते. अंड्याच्या बलकावरची वॉर्निंग काढण्यात आली आहे म्हणे.
हा प्रकार बर्‍यापैकी जेनेटीक असल्याचे पण लक्षात येते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आईसक्रीम खाताना त्यात हेल्दी अनहेल्दी काय बघता? दुधाचं आइसक्रीम चांगलं लागतं तर ते खायचं (ते अनहेल्दी असलंच तरी!!!).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हो ना! मॅगी निदान अनेकांचं स्टेपल फूड होतं! आईसक्रिमचं तर तसंही नाही Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!