५०० आणि १००० रुपयांच्या नोटा
आज रात्रीपासुन ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा कॅन्सल्ड.
#नोटाबंदी #निश्चलनीकरण #demonetization
कळले नाही
'मध्यरात्री फेज़ मॉड्यूलेशन अँप्लिट्यूड मॉड्यूलेशनमध्ये बदलेल' असे कायसेसे लिहिलेले आहे तिथे.
पण म्हणजे काय? आणि नेमके कसे? आणि कशासाठी?
२०१४ चे फतवे
असे फतवे मागे आरबीआयने काढलेले बहूदा.
http://indianexpress.com/article/india/india-others/rbi-to-withdraw-all…
बाप रे गुलाबी? याइक्स.आम्ही
बाप रे गुलाबी? याइक्स.
आम्ही तर १५ पैशाला बबलगम घ्यायचो ब्वॉ ;) आणि २५ पैशाला लहानशी दुचाकी सायकल भाड्याने घेऊन अर्धा तास चाल्वायचो. कसलं ग्लॅमर होतं त्या सायकलला.नंतर नंतर मैत्रिणींच्या भावाची जेंटस सायकल मधुन पाय टाकुन चालवली. शेवटी स्वतःची सायकल घेऊन कँपमधील लायब्ररीच्या दिवाळी-मे महीन्याच्या सुट्टीत वार्या केल्या.
परचलित ५००/१००० च्य सर्व नोटा
प्रचलित ५००/१००० च्य सर्व नोटा रद्द होतील. नवीन प्रकारच्या (ज्यावर महात्मा गांधी आहेत) ५०० आणि २००० रु. चलनाच्या नोटा व्यवहारात आणल्या जातील. पण त्यांची संख्या आणि सर्क्युलेशनवर रिझर्व्ह बँकेची नजर असेल. सध्याचं पाऊल काळा पैसा आणि मुख्य म्हणजे बनावट नोटा चलनातून हद्दपार करण्यासाठी आहे. वित्त सचिवांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं की भारतीय अर्थव्यवस्था २०११ ते २०१६ या काळात ३०% ने वाढली, परंतु व्यवहारातील ५०० व १००० च्या नोटांचं प्रमाण १००% पेक्षा जास्त प्रमाणात वाढलं आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बनावट चलन फिरत आहे (ज्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात टेररिझम फायनान्ससाठी होतो). त्यावर आळा घालण्यासाठी हा उपाय.
बादवे २०००च्या नोटेचा रंग खरोखर भयाण आहे.
प्रश्न
अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बनावट चलन फिरत आहे (ज्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात टेररिझम फायनान्ससाठी होतो). त्यावर आळा घालण्यासाठी हा उपाय.
आणि ह्याचा तोटा सामान्य लोकांना कितपत होईल, याबद्दल काही अंदाज आहेत का?
सामान्य लोक - तुमच्या-आमच्यासारखे किंवा आपल्याला निरनिराळ्या सेवा पुरवणारे, खोटं चलन वापरू नये हे मनापासून मान्य असणारे सगळेच लोक.
---
स्वीडनमध्ये रोखीने व्यवहाराचं प्रमाण, गेल्या ७-८ वर्षांच्या तुलनेत, २०%वर आलं आहे. त्यासंदर्भात गेल्या महिन्यात न्यूयॉर्करमध्ये प्रकाशित झालेला लेख -
Imagining a Cashless World
लेखातला हा भाग भारतासाठी फारच महत्त्वाचा वाटतो -
An Austrian woman, Sigrid, who was perched on a street corner, knitting, said that her Austrian pension had been locked. She’d been bouncing around various cities in Europe. Fortunately, she did not find the Swedes less liberal with their cash on the street than any other nationality she’d encountered, and she had managed to save money that she would use to buy a bus ticket elsewhere. “You won’t need a bank card?” I asked. Sigrid laughed. “No, no!” she said brightly. She was old and poor, and just the sort of person no one thinks of when imagining a thriving future, so I hoped that she was right.
आणि ह्याचा तोटा सामान्य
आणि ह्याचा तोटा सामान्य लोकांना कितपत होईल, याबद्दल काही अंदाज आहेत का?
अजिबात तोटा होणार नाही. थोडा ४-५ दिवस त्रास होइल, पण तेव्हडा सहन केला पाहिजे. खरातर तेव्हडा सुद्धा त्रास होणार नाहीये. टुरीस्ट लोकांना थोडा होइल, पण ते ठीक आहे.
काल मुंबई मधे सोने काळ्याबाजारात ६०००० रुपये तोळ्यानी विकले म्हणे. म्हणजे ह्या उपायाचा थेट परीणाम होतोय हे स्प्ष्ट आहे.
म्हणे १३ लाख कोटींच्या नोटा आहेत बाजारात, त्यातल्या जितक्या परत येणार नाहीत, तितके डेफिसीट थेट कमी होइल म्हणे.
तोटा नव्हे त्रास
आणि ह्याचा तोटा सामान्य लोकांना कितपत होईल, याबद्दल काही अंदाज आहेत का?
अजिबात तोटा होणार नाही. थोडा ४-५ दिवस त्रास होइल, पण तेव्हडा सहन केला पाहिजे. खरातर तेव्हडा सुद्धा त्रास होणार नाहीये. टुरीस्ट लोकांना थोडा होइल, पण ते ठीक आहे.
माझ्या सोसायटीतल्या पाच वॉचमन आणि दोन झाडूवाल्यांना आम्ही नेहमीप्रमाबे ७ तारखेला चेक दिले. त्यांनी ८ तारखेला बँकेत जाऊन ते एन्कॅश केले. त्यातले सुमारे एक दीड हजार रुपये त्यांनी त्याच दिवशी खर्च केले. उरलेले रुपये आठ तारखेला त्यांच्याजवळ पाचशेच्या नोटांच्या स्वरूपात होते. काल सकाळी ते माझ्याकडे (कारण मी सेक्रेटरी आहे) आले. त्यांची वाण्याकडची देणी, इतर खर्च वगैरे करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. सोसायटीच्या पेटीकॅशमध्ये सुद्धा शंभराच्या नोटा वगैरे नव्हत्या. माझ्याकडे आणि इतर कमिटी मेंबर्सकडून काही कॅश जमा करून आम्ही तात्पुरते प्रत्येकी दीड दोनशे रुपये त्यांना दिले. माझ्याकडे सुद्धा आता पर्सनली दोनशेच रुपये आहेत. आजही एटीएम बंद आहेत. मला किरकोळ खर्चाच्या पैशांसाठी आज सुटी घेऊन बँकेत जाणे भाग आहे.
त्रास बर्यापैकी मोठा आहे.
काल पैसे बदलून द्यायला बँकांना परवानगी नव्हती हे ठीक. पण पैसे काढायला का बंदी होती ते कळत नाही.
त्रास बर्यापैकी मोठा
त्रास बर्यापैकी मोठा आहे.
थत्ते चाचा - हे पेटीइश्युज आहेत. काहीच त्रास नाहीये. बर्याच लोकांची वाण्याकडे तशीही महिन्याची उधारी असते. नसली तरी नेहमीचा वाणी उधार नक्की देइल. नाहीतर सोसायटीच्या लोकांनी घरातले गहु तांदुळ द्यायला काहीच हरकत नाही.
काँग्रेस उगाचच नॉन इस्शुचा इश्यु करतीय. गांधींपैकी कोणी मेले की ३-३ दिवस बाजार बंद रहातात, तेंव्हा कसा पुळका येत नाही कोणाला वॉचमन लोकांचा?
३-३ दिवस ?
कोणता गांधी मेला तेव्हा ३-३ दिवस बाजार बंद होता? मो गांधींच्या वेळचं मला ठाऊक नाही. सं गांधी मेला तेव्हा (१९८०) बाजार अर्धा दिवससुद्धा बंद नव्हता. इं गांधी मेली (१९८४) तेव्हा एक दिवस बंद होता. रा. गांधी मेला तेव्हाही (१९९१) बाजार एकच दिवस बंद होता. शिवाय तेव्हा आम्हाला पुळका आलाच नव्हता हे कशाच्या आधारे ठरवले?
अडचण नॉर्मली आली नसती. जर आठ तारखेऐवजी १० किंवा १५ तारखेस हे घडले असते. जस्ट दॅट पगाराच्या तारखेशी ही घटना क्लॅश झाली.
>>काँग्रेस उगाचच नॉन इस्शुचा इश्यु करतीय.
काँग्रेस कशाचा इश्यु करतंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी मला दिसलेल्या अडचणीविषयी बोलतो आहे.
शिवाय "आजच्या आज रद्द" या निर्णयाने नक्की काय फायदा झाला हे अजून कळलेले नाही. नोटा रद्द करण्याला माझा विरोध नाही.
शिवाय "आजच्या आज रद्द" या
शिवाय "आजच्या आज रद्द" या निर्णयाने नक्की काय फायदा झाला हे अजून कळलेले नाही. नोटा रद्द करण्याला माझा विरोध नाही.
"आजच्या आज रद्द" करून कोणत्याही प्रकारे काळ्या पैश्यांची विल्हेवाट लावता येणार नाही असा काहितरी प्रकार असावा. पुण्यातले सोनार दूकान (पी एन जी, कल्याण, रांका) रात्री २ -३ पर्यंत ऊघडे होते आणि सोन्याचा भाव ४५००० रुपये प्रती १० ग्रॅम इथपर्यंत गेला अशी वार्ता आहे. म्हणजे लोकांनी मिळलेल्या अवधीमधे सुद्धा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.
घरी असलेल्या मोलकरीणींची काही तक्रार जाणवली नाही. माझ्या खिशातही फक्त एक दहाची नोट आणि बाकी ५०० च्या नोटा होत्या. घरी सुदैवाने काही १०० - ५० च्या नोटा मिळाल्या त्यावर काम चालवतोय.
दोन दिवस जरा त्रास होईल मान्य आहे, पण मोठा परिणाम साध्य होत असेल तर माझी ह्यासाठी तयारी आहे.
पुण्यातले सोनार दूकान (पी एन
पुण्यातले सोनार दूकान (पी एन जी, कल्याण, रांका) रात्री २ -३ पर्यंत ऊघडे होते आणि सोन्याचा भाव ४५००० रुपये प्रती १० ग्रॅम इथपर्यंत गेला अशी वार्ता आहे. म्हणजे लोकांनी मिळलेल्या अवधीमधे सुद्धा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.
ह्या जुन्या रद्द झालेल्या नोटा घेऊन सोनाराला काय फायदा होणार?
गैरसोय
पैसे बँकेत भरायला लायनीत उभे राहावे लागेल, हा त्रास तरी एकवेळ चालेल. पण ATM मधून सुट्टे पैसे पुरेसे मिळत नाहीत किंवा खिशात पैसे असूनही (पण ५००,१००० च्या नोटा आहेत म्हणून) वस्तू-सुविधा विकत घेता येणार नाहीत, ही गैरसोय जास्त त्रासदायक होईल, असे मला वाटते.
कुबेरांचे दोन पैसे
'लोकसत्ता'च्या अग्रलेखात मांडलेले मुद्दे पटण्यासारखे वाटले. विशेषतः -
५०० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणण्याच्या व सोबत २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याच्या त्यांच्या घोषणेने नोटा रद्द करण्याची परिणामकारकता शून्यावर येते.
आत्ताच्या ५०० व १०००च्या नोटा बँकेला परत करण्यासाठी, बदलण्यासाठी टप्प्याटप्प्याने दिलेली मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपेल. ही इतकी मुदत देणेही गरजेचे नव्हते.
भारतात याआधीही हजाराची नोट रद्द करण्याचा उपाय करून झाला आहे. परंतु, त्यामुळे देशातील काळ्या पैशाची निर्मिती थांबली नाही.
आणि नोटांमध्ये जीपीएस चिप असल्याचे दावे आतापर्यंत तरी अफवाच ठरल्या आहेत.
भारतासारख्या भ्रष्ट देशात
भारतासारख्या भ्रष्ट देशात काळ्यापैश्याची निर्मिती कधीही थांबेल असे वाटत नाही, आणि ते मोदींना माहित नसेल असेही वाटत नाही. पण आत्ता रद्द केलेल्या ५०० आणि शंभराच्या नोटांमुळे अस्तित्वात असलेल्या काळ्या पैश्यावर लगाम बसला/बसेल की नाही (किमान काही अंशी तरी)?
कुबेरांनी किती दिवसाची मुदत द्यायला पाहिजे असे वाटते म्हणजे परिणाम साध्य झाला असता?
याआधी नेमकी कधी १००० ची नोट रद्द केली गेली होती? आणि त्यावेळी काळ्या पैशाची निर्मिती थांबली नाही म्हणूण आत्ताही थांबणार नाही किंवा लगाम बसणार नाही हे कुबेरांना का वाटते? कुबेरांचा अग्रलेख (?) फारच त्रोटक आणि विरोध करायचाच म्हणून लिहिलेला दिसतो.
बेहिशेबी मालाचा पॅटर्न
>>याआधी नेमकी कधी १००० ची नोट रद्द केली गेली होती?
India has demonetised high-value currency before, in 1978
केवळ एक उदाहरण म्हणून सध्या तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांच्या बेहिशेबी मालमत्तेचा हा तपशील पाहा :
भुजबळांची मालमत्ता २६५३ कोटींची?
हे वाचलंत तर बेहिशेबी पैसे साठवण्याचा साधारण पॅटर्न तुमच्या लक्षात येईल. त्यात कॅशचा वाटा फारसा नसतो. कॅश केवळ तात्पुरती वापरली जाते. त्यामुळे ते फार तर हिमनगाचं टोक असतं.
India has demonetised
India has demonetised high-value currency before, in 1978
त्याकाळात चलनात असणारी १००० च्या नोटांची संख्या आणि सामान्य जनता तिचा करत असलेला वापर बघता, आताच्या परिस्थितीशी तुलना करता येणार नाही.
शिवाय, बेहिशेबी पैसे रोख ठेवण्यात येत नसले, आणि गुंतवणूक इतर मालमत्तेत होत असली तरी, रोख काळा पैसा आहे हे अमान्य करता येणार नाही. अगदी जवळच्या दोन व्यापारी नातेवाईंकाकडे प्रत्येकी दिड ते दोन करोड रोकड आहे. उच्च मध्यम वर्गातल्या लोकांची ही गत तर बाकीच्यांचे काय? सामान्यपणे व्यापारी वर्गाचे दाखवाचे आणि खायचे दात वेगळे असतात.
घेतलेल्या निर्णयामूळे व्यापारी, बिल्डर्स, प्लॉटींग, ई. धंद्यात असलेल्यांची चांगलीच गोची झालेली दिसते. शिवाय, आहे ते वाचवायचे कसे ह्याची धडपडही दिसून येत आहे. सामान्य नोकरदार वर्ग मजा बघतोय.
माझ्यामते या नोटा प्रकरणाचे
माझ्यामते या नोटा प्रकरणाचे खालील फायदे होतीलः
१. खोट्या नोटा चलनाबाहेर जातील.
२. कॅशच्या स्वरूपात काळे पैसे बाळगणार्यांना ते 'रिचवण्यासाठी' जास्त खटपट करायला लागेल.
३. आयकर खातं जास्त सक्रिय होईल.
______________
थोडं तपशिलातः
१. खोट्या नोटा
खोट्या नोटा 'आजच्या तारखेला' चलनाबाहेर जातील. (स्टॉक आणि फ्लो व्हेरिएबल्स या संकल्पनांशी परिचित असणार्यांसाठी - हा स्टॉक व्हेरिएबल असेल.) खोट्या नोटा बनवणारे थोड्या दिवसांनी चलनातल्या नव्या नोटाही खोट्या बनवतील, आणि याचा इफेक्टिव्हनेस संपेल.
२. कॅशवाले लोक (आणि काळे पैसे इन जनरल)
काळे पैसे कॅशमध्येच असतात हा एक अत्यंत लोकप्रिय गैरसमज आहे. खरे काळे पैसे हे अशा स्वरूपात असतात की ते काळे आहेत की पांढरे हे बिलकुल समजू नये. तरी एखादा काळेपैसेधारक माणूस ते कॅशमध्ये ठेवण्याइतका माठ असलाच तर त्याला जरा त्रास होईल. पण तोही कालांतराने - कालिया थियरीनुसार - शिकेल.
३. आयकर खात्याची सक्रियता
हा मात्र खराखुरा दूरगामी परिणाम करणारा घटक आहे. या नोटाप्रकरणातून जी माहिती मिळेल त्याचा उपयोग करून आयकर खातं जास्त सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे.
(आयकर खातं वेगवेगळ्या निकषांवर कोणाची असेसमेंट करायची हे ठरवतं. उदा० रोकड व्यवहार जास्त असणारे व्यवसाय, इतर सरकारी खात्यांकडून मिळालेली माहिती, वगैरे.)
उदाहरणः एका औरंगाबादकर सीए मित्राने सांगितल्याप्रमाणे औरंगाबादेतल्या ऑफिसर्सची संख्या गेल्या वर्षभरात दुप्पट झाली आहे. याचं कारण समजत नव्हतं. आता हळुहळू समजायला लागलंय :)
आजला प्रॉपर्टीच्या
आजला प्रॉपर्टीच्या व्यवहारांचं रजिस्ट्रेशन राज्यसरकारांच्या अखत्यारीत आहे. रजिस्ट्रेशनच्या वेळी पॅन कार्ड मागितले जात असले तरी त्या व्यवहाराची माहिती त्या पॅन नंबरच्या समोर आयकर खात्यात (आपोआप) नोंदली जात नाही. ते इंटिग्रेशन करणे आवश्यक आहे.
-----------------
माझे पॅनकार्ड काढले तेव्हा मी वेगळ्या पत्त्यावर रहात होतो. त्यानंतर मी घर बदलले. गेली कित्येक वर्षे रिटर्न भरताना मी नवा पत्ता फॉर्मवर भरतो. पण तो नवा पत्ता अजूनही माझ्या पॅननंबरवर (आपोआप) नोंदला गेलेला नाही. माझ्यावर खटला दाखल करायचा असेल तर आयकर खात्याकडे जुना पत्ता आहे. (तसा रिटर्नमध्ये लिहिलेला नवीन पत्ता पण आहे. पण मुख्य माहितीत तो अपडेट झालेला नाही).
-----------------
आदुबाळ यांच्यासाठी खास प्रश्न/मुद्दा. माझ्या एका परिचिताने काढलेला.
पूर्वी सुट्ट्या पैशांचा प्रश्न होता तेव्हा बेस्ट बसवाल्यांनी टोकन्स काढली होती आणि सुट्या पैशांऐवजी ती टोकन्स कंडक्टर देत असत. बेस्ट बसचे इतर कंडक्टर ते टोकन स्वीकारत असत. इव्हन काही हॉटेल्स ती स्वीकारत असत. ही टोकन काही खरे पैसे नव्हते पण त्या टोकनचे मूल्य २५/५० पैसे आहे हे "बेस्ट बसचा वापर करणार्या गटात सर्वांना" मान्य होते. तसेच "समांतर काळ्या अर्थव्यवस्थेतल्या सर्वांना" ही जुनी नोट म्हणजे १००० रुपये आहेत असे मान्य असेल तर ह्या नोटा बदलून घेण्याची तसदी ते घेणारच नाहीत. निदान 'काळा व्यवहार टु काळा व्यवहार' करणार्यांना ते चालू शकेल.
त्या व्यवहाराची माहिती त्या
त्या व्यवहाराची माहिती त्या पॅन नंबरच्या समोर आयकर खात्यात (आपोआप) नोंदली जात नाही. ते इंटिग्रेशन करणे आवश्यक आहे.
असं मलाही वाटत असे. पण एकदा एका आयकर अधिकार्याने दोस्तीखात्यात त्यांच्या सिस्टिमबद्दल सांगितलं. तो म्हणाला की तू गेल्या रविवारी कोणत्या हॉटेलात जेवलास हेही मी शोधून काढू शकतो.
______________
सेच "समांतर काळ्या अर्थव्यवस्थेतल्या सर्वांना" ही जुनी नोट म्हणजे १००० रुपये आहेत असे मान्य असेल तर ह्या नोटा बदलून घेण्याची तसदी ते घेणारच नाहीत. निदान 'काळा व्यवहार टु काळा व्यवहार' करणार्यांना ते चालू शकेल.
हो, अगदी खरं आहे. जगातलं जवळजवळ सगळं चलन ही "फियाट करन्सी" आहे. म्हणजे इट्स व्हॅल्यू लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर. क्लोज्ड सिस्टिममध्ये व्यवहार करणारे कशालाही चलन म्हणू शकतात - प्लॅस्टिकचे तुकडे (नवा व्यापार), इलेक्ट्रिकल सिग्नल्स (बिटकॉईन), चामड्याचा तुकडा (ज्ञानेश्वरकालीन पैठण), सोनंचांदीब्राँझचे तुकडे (हॅरी पॉटर). फक्त दोन्ही पार्ट्यांनी ते मानलं म्हणजे झालं. अट ही एवढीच.
जेव्हा एका क्लोज्ड सिस्टिममधून दुसर्या क्लोज्ड सिस्टिममध्ये पैसे पाठवायची वेळ येते तेव्हा ही गुलाबी परिकथा संपते. म्हणूनच, काळा व्यवहार टु काळा व्यवहार करणारे नागडे नाचोत, त्याच्याबद्दल कोणाला प्रॉब्लेमच नाहीये. (किंबहुना, एकदा काळा झालेला पैसा कायमचा काळाच राहिला तर हरकत नाही.) पण त्याला पांढरा करायची वेळ झाली की हे सगळं भोगायला लागेल.
५०० रुपयांच्या नव्या नोटा
५०० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणण्याच्या व सोबत २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याच्या त्यांच्या घोषणेने नोटा रद्द करण्याची परिणामकारकता शून्यावर येते.
हे एकदम चुकीचे आहे. आधी जमलेल्या काळ्या पैश्यावरचा हा उपाय आहे. पुढे होणार्या काळ्या पैश्यावर वेगळा उपाय करायला लागेल.
नविन काळा पैसा निर्माण होऊ शकतो, पण आता लोक नक्कीच घाबरुन असणार भविष्यात.
हा हा हा
>>नविन काळा पैसा निर्माण होऊ शकतो, पण आता लोक नक्कीच घाबरुन असणार भविष्यात.
भारतीय लोक सरकारला घाबरून पुन्हा काळा पैसा निर्माण करायला कचरतील हे कैच्याकै विनोदी आहे. माझ्या ओळखीतले रोख व्यवहारावर अवलंबून असलेले व्यावसायिक कुणाकडून आपल्याकडची रोख रक्कम बँकेत भरता येईल ह्याची व्यवस्था अगदी थंड डोक्यानं लावत आहेत. कुटुंब, मित्रमंडळी, सोसायटीतले शेजारीपाजारी अशा सगळ्यांचा वापर ते करून घेत आहेत. 'माझ्याकडचे साडेसात लाख तुला देतो; दोन महिन्यांत हळूहळू तुझ्या खात्यात भरू शकशील का, अशी नम्र विचारणा मला करण्यात आली होती. इतरांकडून आलेल्या विचारणा प्रामुख्यानं 'मदत करायला मी तयार आहे का, ह्याची चाचपणी' स्वरुपाच्या होत्या. मी हो म्हटलं असतं तर रक्कम कळली असती. तुम्ही भारतीयांना उल्लू समजता आहात असं ह्या निमित्तानं नम्रपणे नोंदवतो आणि खाली बसतो.
चिंज. तुम्हाला ( ऊच्च्भ्रु
चिंज. तुम्हाला ( ऊच्च्भ्रु नोकरदार ) विचारणा होत असेल तर ही स्कीम कीतीतरी यशस्वी होते आहे असे नाही का तुम्हाला वाटत. जो माणुस ते साडेसात लाख भरायला तयार होइल तो २०% तरी कट घेइलच. म्हणजे चोरांना २० टक्क्याचा तरी बांबू बसला ना. नॉट बॅड. काल तर सोने ६०००० रुपये तोळा होते. म्हणजे चोर ५०% नुकसान सोसायला पण तयार आहेत. हे ह्या योजनेच्या यश्स्वीतेची पावती आहे, असे मला तरी वाटते.
काहीच उपाययोजना न करता सिग्रेट चे चटके द्यायला व्हिक्टीम शोधण्यापेक्षा हे बरे आहे.
नॉट बॅड फॉर हूम?
>>जो माणुस ते साडेसात लाख भरायला तयार होइल तो २०% तरी कट घेइलच. म्हणजे चोरांना २० टक्क्याचा तरी बांबू बसला ना. नॉट बॅड.
आं? मला वीस टक्के कट ऑफर केला असं मी कुठे तरी म्हटलंय का? ज्यांनी अशी विचारणा केली ते माझे मित्र किंवा चांगल्या ओळखीतले आहेत. त्यांनी मला कसलाही कट वगैरे ऑफर केला नाही.
तुम्हाला ऑफर केले असे म्हणत
तुम्हाला ऑफर केले असे म्हणत नाहीये मी. पण जो कोण अशी मदत करेल त्याला त्याचा कट मिळेलच ना. मुळ मुद्दा ज्यांनी टॅक्स चुकवला आहे त्यांना कोणत्या तरी रुपानी का होइना भुर्दंड बसला म्हणजे झाले.
आता थोडे वैयक्तीक - तुमचे मित्र टॅक्स न भरलेला पैसा तुमच्या मार्फत पांढरा करायचा प्रयत्न करत आहेत वर तुम्हाला त्यात काही कमिशन ऑफर पण करत नाहीत. हे त्यांचे वागणे चुक आहे. माझे हे मत त्यांना कळवा. मी ४५००० रूपये तोळ्यानी सोने विकले तर ते घ्यायला तयार आहेत का?
बंध रेशमाचे
>> जो कोण अशी मदत करेल त्याला त्याचा कट मिळेलच ना. मुळ मुद्दा ज्यांनी टॅक्स चुकवला आहे त्यांना कोणत्या तरी रुपानी का होइना भुर्दंड बसला म्हणजे झाले.
>> तुमचे मित्र टॅक्स न भरलेला पैसा तुमच्या मार्फत पांढरा करायचा प्रयत्न करत आहेत वर तुम्हाला त्यात काही कमिशन ऑफर पण करत नाहीत. हे त्यांचे वागणे चुक आहे. माझे हे मत त्यांना कळवा.
- ते पैसा पांढरा करताहेत का हे मला कळत नाही. पैसे जसे हळूहळू खात्यात जमा करायचे आहेत तसे नंतर मी माझ्या खात्यातून कॅश काढून त्यांना परत द्यायची आहे. म्हणजे त्यांचा काळा पैसा फक्त रद्द नोटांतून वैध नोटांत बदलणार असं माझं अर्थनिर्णयन होतं.
- भारतात कौटुंबिक संबंधांतून किंवा मैत्रीतून काय काय केलं जातं त्याची तुम्हाला कल्पना दिसत नाही. हे घे कमिशन आणि फूट असा व्यवहार इथे नाही चालत. वर्षानुवर्षांचे आणि पिढ्यानपिढ्या चालणारे हे ऋणानुबंध असतात :-)
- थोडक्यात, काही जणांना काही प्रमाणात भुर्दंड बसत असेलही कदाचित, पण मला तरी आता असं चित्र दिसतंय की कित्येक लोक आपला काळा पैसा विनाभुर्दंड वैध नोटांमध्ये बदलून घेत आहेत आणि ह्या खाजगी वर्तनासह मोदींना सार्वजनिक पाठिंबाही देत आहेत.
बंध रेशमाचे (पुढचा भाग)
माझ्या एका स्नेह्याकडून मला आज वेगळी ऑफर मिळाली -
त्याच्याकडची हजार किंवा पाचशेच्या नोटांमधली रोख रक्कम ३० डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्यानं मी माझ्या खात्यात भरायची. एकूण रक्कम इन्कम टॅक्सवाल्यांना संशय येणार नाही इतकीच असेल. मग पुढची काही वर्षं मी ती रक्कम मला हवी तशी वापरायला मुखत्यार आहे (कारण ऑफरदात्यापाशी पैशाची चणचण नाही आहे). जेव्हा त्याला परत हवे असतील तेव्हा तो ते परत मागेल. एका वेळी पन्नास हजारांहून कमी रक्कम मागितली जाईल. किमान आठवडाभर आधी तशी सूचना दिली जाईल. शिवाय, माझी गैरसोय होणार नाही ह्याची काळजी घेतली जाईल (मी परगावी नाही; अंथरुणाला खिळलेला नाही, वगैरे). थोडक्यात हे एक प्रकारचं व्याजमुक्त कर्ज असेल.
निराशा!
तुमची बाजारातली पत फारच कमी आहे; तुम्हाला प्रत्यक्षात ओळखणारे लोक तुम्हाला पुरेसे घाबरत नाहीत; थोडक्यात तुम्ही अगदीच फालतू आहात; हे म्हणण्याची संधी दिल्याबद्दल आभार.
ही अंमळ व्यक्तिगत स्वरूपाची प्रतिक्रिया झाली खरी. पण तुमचा रथ दोन अंगुळं खाली आणण्यासाठी एवढं करणं, माझं परमकर्तव्य आहे.
असे अनेक ऑफर सध्या चौफेर
असे अनेक ऑफर सध्या चौफेर दिसताहेत. माझ्या एका मित्राच्या वडिलांनी त्यांच्या दुकानातल्या सर्व कर्मचार्यांना ४९,००० च्या आसपास च्या रकमांचे "लोन" दिले. टप्प्या-टप्प्याने तो "लोन" त्यांच्या पगारातून परत घेतला जाईल, असा अलिखित करार केला. पॅन कार्डची गरज नाही, आणि एरवी खातं फारसं न वापरणार्या लोकांनी घरी साठवलेल्या नोटाच फक्त खात्यात घातल्या आहेत, हे सांगायला मार्ग नाही.
(नोकरांनी होकार न दिल्यास दुसरीकडे नोकरी शोधावी लागेल, हे ही त्या अलिखित करारात गृहित होतं का, हे माहित नाही. पण गरजू नोकराचे कागदपत्र ठेवून घेऊन असा करार करणे फारसे कठीण नाही.)
http://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/banking/de…
The Jan Dhan Yojana was launched in August 2014 with an aim to bring the poor into the fold of banking facilities, and empower them financially by encouraging savings, and easing loan delivery and direct cash transfer.
Accounts opened at the time but not used so far have overnight turned flush with funds. Many such accounts, which held only Re 1or Rs 2 till November 8, now have up to Rs 49,000, the upper limit for deposits that can be done without PAN cards.
A few bank officials told TOI on the condition of anonymity that many account-holders were possibly being exploited by middlemen or the rich to lend their accounts to park cash.
कुठे नेऊन ठेवला बांबू आमचा?
जो माणुस ते साडेसात लाख भरायला तयार होइल तो २०% तरी कट घेइलच. म्हणजे चोरांना २० टक्क्याचा तरी बांबू बसला ना.
ह्या हिशोबात एका चोराला २०% बांबू बसला आणि दुसऱ्या चोराला ते काळे २०% मिळाले. काळा पैसा काळाच राहिला आणि चोरांची संख्या वाढली. 'सिग्रेटचे चटके द्यायला व्हिक्टिम वाढले.' आमच्या जंतूला असं चोर नका हो बनवू! जंतू, तुम्ही चोर बनू नका, 'कुठे नेऊन ठेवला जंतू आमचा' असं म्हणावं लागेल.
साडेसात लाख हळू हळू भरले काय
साडेसात लाख हळू हळू भरले काय किंवा एकदम भरले काय. यानी कसा फरक पडेल नाही समजलं. दिड महिन्यात एकूण दोन-अडीच लाखावर कॅश जमा केली तर तुमचा रिटर्न्/उत्पन्न चेक करणार आहेत.
तुम्ही भारतीयांना उल्लू समजता आहात असं ह्या निमित्तानं नम्रपणे नोंदवतो आणि खाली बसतो.
+१. लोक कसा मार्ग काढतील सांगता येत नाही. काही लोकांनी दिल्ली त्रिवेंद्रम राजधानीची तिकिटं बुक केली कॅशनी. ६ तिकिटं ५००००ला पडतात. दोन दिवसांनी क्यांसल करून रिफंड घ्यायचा जो नव्या नोटांमध्ये मिळेल म्हणे.
एकाने परवा रात्री बांद्रा-वर्ली सी लिंकवर पन्नास चकरा मारल्या. प्रत्येक वेळेला ५००रु च्या नोटेने टोल भरला. टोल बहुधा ५० रु आहे.
ख.खो.दे.जा.
चिंतातुर जंतु च्या टीकेला वैतागुन दिव्य मराठीने आज
स्पेशल अग्रलेखच लिहीलेला आहे.
तो ऐसी अक्षरे संस्थळावरील प्रतिसाद कागदी माध्यमे किती गंभीरतेने घेतात याचेच द्य्योतक का काय कस टायपताते आहे.
अग्रलेखाचे नावच " चिंतातुर जंतुंच्या व्यथा " असे आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-editorial-on-note-ban-in-india…
अग्रलेखाचा शेवट या महावाक्याने केलेला आहे ज्यात सरळ सरळ व्यक्तीगत टीका केलेली आहे तो असा
"राम गणेश गडकरींनी जवळपास शंभर वर्षांपूर्वी ‘चिंतातुर जंतू’ या कवितेतून उठता-बसता शंका काढणाऱ्या चिंताग्रस्त प्रवृत्तींची बहारदार खिल्ली उडवली होती. मोदींच्या निर्णयामुळे अशा ‘चिंतातुर जंतूं’ची पैदास वाढल्याचे दिसते. त्याकडे दुर्लक्ष करून प्रामाणिक भारतीयांनी देशहितासाठी थोडा संयम दाखवावा."
धाडसी अग्रलेख
वास्तविक याच राहुलबाबांना एका गोष्टीचे श्रेय जरूर घेता आले असते. भारतीय समाज आणि अर्थव्यवस्थेला मोदी ज्या डिजिटल युगात घेऊन जाऊ पाहत आहेत त्या युगाची पायाभरणी राजीव गांधी यांनी केली. सॅम पित्रोदा आणि अन्य तंत्रज्ञांच्या साहाय्याने राजीव गांधींनी ऐंशीच्या दशकात संगणक युग आणले नसते तर मोदी आजचा ऐतिहासिक निर्णय घेऊ शकले नसते.
संगणक-तंत्रज्ञान आणि अस्तित्वात असलेल्या नोटा रद्द करून नवीन नोटा आणण्याचा संबंध नक्की कसा लागतो, हे मला समजलं नाही. कोणी थोडी मदत करणार का?
‘पेट्रोल पंपावर माझी पाचशेची नोट घेतली नाही’ किंवा ‘बँकेच्या रांगेत किती वेळ तिष्ठत उभे राहायचे?’ अशा तद्दन पांढरपेशा रडगाण्याचे कौतुक करता येणार नाही.
ग्राहकांवरच जळजळीत टीका करण्याचं धाडस आहे ब्वॉ दिव्य मराठीकडे!
ग्राहकांवरच जळजळीत टीका
ग्राहकांवरच जळजळीत टीका करण्याचं धाडस आहे ब्वॉ दिव्य मराठीकडे!
ज्या कमाईवर प्राप्तीकर भरलेला नाही ते काळे धन. प्राप्तीकराच्या व्याप्तीमधे येत नसणार्यांनी केलेला नखशिखांत भ्रष्टाचार दिसत असूनही त्याकडे काणाडोळा करणार्या व हे काणाडोळा करणे कसे नैतिक आहे याचा ढोल वाजवणार्या व्यवस्थेमधे असे ग्राहक (खालील प्यार्यात वर्णिलेले) निर्माण होणारच. व ते अयोग्य नाहीच.
हजार-पाचशेच्या जुन्या नोटा एकदम चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर होताच त्याच रात्री सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी रांगा लागतात. थेट साठ-सत्तर हजार रुपये तोळा दराने सोने खरेदी करण्याची (आणि विकण्याची) तयारी समाजातला एक वर्ग दाखवतो. भ्रष्टाचार, नैतिकता, देशप्रेम वगैरे मोठ्या गप्पा मारणाऱ्या समाजाची ही काळी बाजू गेल्या दोन दिवसांत प्रकर्षाने पुढे आली.
नव्हे.
तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचला नाहीत. मध्यमवर्गाला बँकेत वेळ दवडावा लागला, त्यांची गैरसोय झाली याचं दिव्य मराठीला अजिबात घेणं-देणं नाही; उलट त्या गैरसोयीबद्दल किंचित चिडवण्याचा सूर आहे. हेच मध्यमवर्गीय त्यांचा पेपर विकत घेतात. काळं धन वगैरेंचा संबंध नाही. दोन-चार हजारांची रोकड बाळगणाऱ्यांचीही गैरसोय व्हायची ती झालीच! (उदाहरणार्थ, नितिन थत्तेंनी गैरसोयीचा व्यक्तिगत अनुभव याच धाग्यावर लिहिलेला आहे.)
आणि, तंत्रज्ञान आणि नोटाबदल यांचा संबंधही मला खरंच समजला नाही.
>>नोटा कॅन्सल करणे उत्तम नि
>>नोटा कॅन्सल करणे उत्तम नि धाडसी निर्णय आहे.
धाडसी आहे. उत्तम आहे का ते काळ ठरवील. हा निर्णय यशस्वी/अयशस्वी झाला आहे असं म्हणण्याचे निकष काय असतील? पुढील वर्षी (पासून?) करवसुलीत सिग्निफिकंट वाढ?
भरपूर काळा पैसा नोटांच्या स्वरूपात असेल तर त्या एकतर कर भरून पांढर्या करून घ्याव्या लागतील किंवा फुकट घालवाव्या लागतील. म्हणजे एकतर करवसुली वाढायला हवी किंवा बाजारात कॅशचा ग्लट आला पाहिजे. चौदा लाख कोटीच्या ५००- हजारच्या नोटा आहेत असे म्हटले तर तितक्या रकमेच्या १०० च्या, ५०० च्या नव्या नोटा, २०००च्या नव्या नोटा सरकार बाजारात सोडेल. पण तितक्या बदलून घ्यायला कोणी येणार नाही. म्हणून कॅशचा महापूर येईल. हे बरोबर का? गब्बर, अनु राव यांचे मत जाणून घ्यायचे आहे.
तितक्या रकमेच्या १०० च्या,
तितक्या रकमेच्या १०० च्या, ५०० च्या नव्या नोटा, २०००च्या नव्या नोटा सरकार बाजारात सोडेल. पण तितक्या बदलून घ्यायला कोणी येणार नाही. म्हणून कॅशचा महापूर येईल.
सध्या चौदा लाख रुपयांच्या नोटा आहेत, त्यातल्या म्हणे ८६% ५००-१००० च्या आहेत. ह्या सर्व च्या सर्व नोटा सरकार रीप्लेस करणार नाही.
१.सरकार ह्या वेळेला, त्या सर्वच्या सर्व नोटा बाजारात सोडणार नाहीये. २००० च्या नोटा तर खुप कमी प्रमाणात सोडणार आहे. म्हणजे सरकार १४ लाख कोटींच्या ऐवजी १० लाख कोटीच नोटांच्या रुपानी बाजारात ठेविल.
२.सरकारला आशा आहे की काही प्रमाणात जुन्या नोटा जमा होणार नाहीत. तो सरकारचा/आरबीआय चा थेट फायदा आहे. बजेट डेफीसीट त्यामुळे कमी होइल.
पाचशे आणि हजाराच्या नोटांच्या
पाचशे आणि हजाराच्या नोटांच्या स्वरूपात असलेल्या काळ्या पैशांच्या क्वांटिटीबद्दल काही एस्टिमेट आहे का?
म्हणजे जरी चौदा लाख कोटींच्या नोटा असल्या तरी त्यातल्या फेक किती? जेन्युइन व्हाइट किती? आणि अनाकाउंटेड ब्लॅकमनी किती?
वन टाइम एरंडेलाच्या डोसने किती पो बाहेर पडण्याचा अंदाज आहे?
भरपूर काळा पैसा नोटांच्या
भरपूर काळा पैसा नोटांच्या स्वरूपात असेल तर त्या एकतर कर भरून पांढर्या करून घ्याव्या लागतील किंवा फुकट घालवाव्या लागतील. म्हणजे एकतर करवसुली वाढायला हवी किंवा बाजारात कॅशचा ग्लट आला पाहिजे. चौदा लाख कोटीच्या ५००- हजारच्या नोटा आहेत असे म्हटले तर तितक्या रकमेच्या १०० च्या, ५०० च्या नव्या नोटा, २०००च्या नव्या नोटा सरकार बाजारात सोडेल. पण तितक्या बदलून घ्यायला कोणी येणार नाही. म्हणून कॅशचा महापूर येईल. हे बरोबर का? गब्बर, अनु राव यांचे मत जाणून घ्यायचे आहे.
(१) सर्वंकष संपत्ती = अधिकृत + अनधिकृत संपत्ती. खाली क्र. ५ चा मुद्दा असत्य/नगण्य असेल तर सर्वंकष संपत्ती तेवढीच राहणार आहे.
(२) चलनाचे फक्त डिनॉमिनेशन बदलणार आहे. १००० च्या १ नोटेच्या ऐवजी १०० च्या दहा नोटा. म्हंजे नोटांची संख्या वाढेल हे बरोबर.
(३) ज्या १०००/५०० च्या नोटा बदलून घ्यायला कोणीही येणार नाही त्यांच्या इक्विव्हॅलंट शंभराच्या नोटा RBI बाजारात सोडू च शकणार नाही. म्हंजे त्या नोटा सर्क्युलेशन मधे येणारच नाहीत.
(४) ज्या १०००/५०० च्या नोटा बदलून घ्यायला कोणीही येणार नाही तेवढ्या किंमतीची संपत्ती ही जर unofficially इतर अॅसेट मधे (उदा. सोने) रूपांतरित केली गेली तर ती संपत्ती टिकून राहील. व ती ब्लॅक संपत्तीच असेल.
(५) ज्या १०००/५०० च्या नोटा बदलून घ्यायला कोणीही येणार नाही तेवढ्या किंमतीची संपत्ती ही जर unofficially इतर अॅसेट मधे (उदा. सोने) रूपांतरित केली गेली नाही तर ती संपत्ती लयास जाईल.
(६) क्र. (५) हे होण्याची शक्यता कमी आहे असे माझे गृहितक.
क्या गब्बर खफा खफा है ?
आज इतकी मोठी अर्थशास्त्रीय घटना झालेली आहे. इतका भुकंप झालाय. आणि गब्बर सिंग तसे उदासीनच दिसत आहेत.
त्यांच्या प्रतिसादातुन नविन दृष्टीकोण ज्ञान माहीती मिळेल यासाठी आज लॉग इन झालो व गब्बर यांचे प्रतिसाद शोधले तर फारसे हाती काही लागले नाहीत. गब्बर आज इतके उदासीन कसे इतका महत्वाचा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असुनही.
गब्बर यांच्या अभ्यास्पुर्ण मार्मिक प्रतिसादांच्या प्रतीक्षेत
गब्बर यांची या निर्णयावरची भुमिकाही पुरेशी स्पष्ट कळत नाहीये. की कुठे इतर धाग्यावर चर्चा झालेली आहे व मला माहीत नाही. ?
आज इतकी मोठी अर्थशास्त्रीय
आज इतकी मोठी अर्थशास्त्रीय घटना झालेली आहे. इतका भुकंप झालाय. आणि गब्बर सिंग तसे उदासीनच दिसत आहेत.
माझा मोदींच्या या धोरणाला विरोधच आहे कारण (माझा असा समज आहे की) १००० व ५०० च्या नोटा रद्द करण्याचे हे धोरण काळ्या पैश्याच्या विरोधी आहे म्हणून. जोपर्यंत फडतूसांचे लांगूलचालन अस्तित्वात आहे तोपर्यंत माझा काळ्या पैश्याला थेट पाठिंबा आहे व असेल.
निर्णय जाहीर झाल्यावर बिटकॉईन ची किंमत वधारली होती असं ऐकतो.
--
केनेथ रोगॉफ (अर्थशास्त्री) यांनी "रोकडी चा शाप" या पुस्तकात मोठ्या डिनॉमिनेशन च्या नोटा ह्या मुख्यत्वे करचुकवे लोक व गुन्हेगार बाळगून असतात असा मुद्दा मांडलेला आहे. तेव्हा ह्या धोरणाचा फटका करचुकवे लोक व गुन्हेगार यांना बसेलच. रोगॉफ्फ यांनी अर्थातच मोदींच्या धोरणाची प्रशंसा केलेली आहे.
--
ग्राफ आवडला. (अर्थात मला
ग्राफ आवडला. (अर्थात मला आवडणार नाहीत असे ग्राफ विरळाच...)
याचा अर्थ सध्या काळा काय, पांढरा काय, सगळ्याच रोकडीपैकी सुमारे ८० टक्के पैसा पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटात आहे. कमी किंमतीच्या नोटा सामान्य माणसांकडे बऱ्याच असल्यामुळे काळा पैसा परवडू शकेल अशांचा रोखीत असलेला काळा पैसा हा त्याच नोटांत आहे असं समजायला हरकत नाही. जर हा काळा पैसा काढून टाकण्यासाठी लोकांना दर दहा वर्षांनी पन्नासेक टक्के घालवावे लागत असतील तर त्यापेक्षा टॅक्स देणं बरं असं अनेक जण म्हणतील. चिंतातुर जंतू यांनी लिहिल्याप्रमाणे अनेक जण काही ना काही मार्ग काढतील हे खरं आहे. पण बराच काळा पैसा पांढरा होईल किंवा नाहीसा होईल.
मला एक प्रश्न पडतो. हा पैसा बाहेर आल्याने महागाई वाढेल की कमी होईल? एका बाजूने वाटतं की फिरत्या चलनातला पैसा वाढेल. पण दुसऱ्या बाजूने काळा पैसा बाळगणाऱ्याकडे रोकड जितकी मुबलक प्रमाणात अस्तित्वात होती ती नाहीशी होईल. नक्की चलनफुगवटा होईल की नाही याचा कोणी विचार केला आहे का?
मला एक प्रश्न पडतो. हा पैसा
मला एक प्रश्न पडतो. हा पैसा बाहेर आल्याने महागाई वाढेल की कमी होईल? एका बाजूने वाटतं की फिरत्या चलनातला पैसा वाढेल. पण दुसऱ्या बाजूने काळा पैसा बाळगणाऱ्याकडे रोकड जितकी मुबलक प्रमाणात अस्तित्वात होती ती नाहीशी होईल. नक्की चलनफुगवटा होईल की नाही याचा कोणी विचार केला आहे का?
भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळ आहे. सध्या भाजपाकडे दोन कमळं आहेत. अरविंद सुब्रमण्यम आणि अरविंद पनगारिया. डॉ. पनगारिया यांनी याचा विचार केलेला आहे असे दिसते. Move to demonetize economy will help bring down inflation
बरोबर. टोटल महागाई कमी होईल
बरोबर. टोटल महागाई कमी होईल कारण लोकांकडचा पैसा कमी होईल आणि डिमांड कमी होईल. आणि रेट कट होऊ शकतो.
https://www.bloomberg.com/gadfly/articles/2016-11-09/india-chose-a-bad-…
भाकीत
>>>बरोबर. टोटल महागाई कमी होईल कारण लोकांकडचा पैसा कमी होईल आणि डिमांड कमी होईल. आणि रेट कट होऊ शकतो.
ढेरे शास्त्री थोर द्रष्टे अर्थतज्ञ असल्याचे याठिकाणी जाहीर करण्यात येत आहे.
मंदी येणार आणि ती ही नेमकी कशामुळे येणार याचं भाकीत त्यांनी दोन वर्षापूर्वी वर्तवले होते. मंदी हा शब्द त्यांनी वापरला नसला तरी महागाई कमी होणे याचा परिणाम मंदीत होईल हेच त्यांनी सूचित केले होते.
निराळा प्रश्न
>> अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बनावट चलन फिरत आहे (ज्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात टेररिझम फायनान्ससाठी होतो). त्यावर आळा घालण्यासाठी हा उपाय.
आणि ह्याचा तोटा सामान्य लोकांना कितपत होईल, याबद्दल काही अंदाज आहेत का?
मला प्रश्न विचारताना निराळंच मनात होतं, पण जे प्रतिसाद वर आलेले आहेत तेही माहितीपूर्ण आहेतच.
प्रश्न असा की, जुन्या नोटा रद्दबातल केल्यावर गैरसोय होत आहे ती निराळी. बनावट, नकली नोटांमुळे सामान्य लोकांचं किती आर्थिक नुकसान होईल आणि त्यावर इलाज करण्याची गरज आहे का, वगैरेंसाठी काही अंदाज आहेत का? सामान्य लोक म्हणजे, सर्वसाधारण कायदेभीरू, पापभीरू लोक जे आपल्या औकातीच्या बाहेर भ्रष्टाचार करत नाहीत. आणि गरीबांचं काय, हातावर पोट असणारे लोक; त्यांचं नुकसान कितपत होईल?
इन्फ्लेषन
>>बनावट, नकली नोटांमुळे सामान्य लोकांचं किती आर्थिक नुकसान होईल आणि त्यावर इलाज करण्याची गरज आहे का, वगैरेंसाठी काही अंदाज आहेत का?
माझ्या तुटपुंज्या ज्ञानानुसार बनावट नोटांमुळे मूळ चलनाची किंमत कमी होते. त्यामुळे जर खूप बनावट चलन बाजारात आलं तर चलनवाढीचा धोका संभवतो. हे सामान्यांसाठी वाईट आहे. अर्थात जुन्या (त्यासोबत नकलीसुद्धा) नोटा चलनातून बाद केल्याने सध्या असलेला चलनवाढीचा दर कमी होण्याची कितपत शक्यता आहे हे ठाऊक नाही.
ममता बॅनर्जी, मुलायम सिंग,
ममता बॅनर्जी, मुलायम सिंग, अरविंद केजरीवाल, लालू प्रसाद आणि ममता बॅनर्जी हे सगळे लोक टीका करतायत म्हणजे नक्कीच चांगलं पाऊल आहे हा निर्णय. सगळ्यात मोठा फटका राजकारण्यांना बसणार आहे. महाराष्ट्रात आता निवड्णुका आहेत झेड्पी वगैरेंच्या. अमाप पैसा जमलवला होता उमेदवारांनी वाटायला. भाजपावाल्यांनी देखील. आता सगळ्यांचं धाबं दणाणलं असेल.
विरोधीपक्षांतले नितीश कुमार यांनी एकट्यांनी उघड समर्थन केलं आहे या निर्णयाचं.
थोडी व्हॉटबाउटरी
वन्स अऑन अ टाइम इन जॅन २०१४
http://zeenews.india.com/hindi/news/india/decided-to-change-the-currenc…
भाजपा ने आरोप लगाया कि सरकार ने कालेधन पर काबू पाने के नाम पर वर्ष 2005 से पहले के सभी करेंसी नोट वापस लेने का जो निर्णय किया है वह आम आदमी को परेशान करने और उन ‘चहेतों’ को बचाने के लिए है जिनका भारत के कुल सकल घरेलू उत्पाद के बराबर का कालाधन विदेशी बैंकों में जमा है।
पार्टी ने कहा कि यह निर्णय बैंक सुविधाओं से वंचित दूर दूराज के इलाकों में रहने वाले उन गरीब लोगों की खून पसीने की गाढ़ी कमाई को मुश्किल में डाल देगा जिसे उन्होंने वक्त जरूरत के लिए जमा किया है।
भाजपा प्रवक्ता मीनाक्षी लेखी ने यहां कहा, अवसरों को गंवाने वाले संप्रग के 10 साल के शासन में पी चिदंबरम 7 साल वित्त मंत्री रहे हैं और अब सरकारी की चली चलाई की बेला में वह लोगों द्वारा पूछे जा रहे सवालों से भागने के लिए कालेधन के विषय से जनता के असली मु्द्दों को भ्रमित करना चाहते हैं।
ठळक ठसा माझा.
आर के लक्ष्मण
आजच्या मटा.च्या महामुंबई पानावर (पान ६) लक्ष्मण यांचे एक जुनं कार्टून प्रसिद्ध झालं आहे. मोरारजीभाईंनी १९७८ साली नोटा रद्द केल्या त्या वेळचं. सध्याच्या परिस्थितीलासुद्धा अगदी चपखलपणे लागू पडतंय ते. मला लिंक देता येत नाहीय. कुणाला शक्य असेल तर प्लीज़ द्या. त्यात काळापैसारूपी वाघाला पिंजर्यात बंद करण्यासाठी एक खेळण्यातला पिंजरा लावलाय, त्या वाघाच्या शेपटीचं टोकसुद्धा त्या पिंजर्यात जाऊ शकत नाहीय आणि मोरारजी वगैरे मंडळी एका झाडामागे लपून बघतायत की कसं पकडलंय बेट्याला किंवा आता कुठे पळशील बेट्या. वाघाच्या आणि नेतेमंडळींच्या चेहर्यावरचे भाव बरंच काही सांगून जातात.
Modi Goes To Daulatabad हा
हा लेखक बास्तिया पारितोषिक विजेता आहे. लेखात हायेक चे क्वोट्स आहेत.
पण हे असं चक्रमासारखं का लिहिलंय ते मात्र समजत नाही.
The larger point, though, is that most truly rich people don’t keep their wealth in the form of cash, but in the form of real estate, gold, deposits in foreign bank accounts and other benaami investments. They will be largely unhurt. This brings me to my next point.
Two, it is the poor who will be hurt the most by this. A large chunk of India’s economy, especially at the bottom of the ladder, is a cash economy. Small traders and businessmen deal in cash for convenience, and pay their workers that way. I pay my domestic help in cash, and her savings are entirely in 500 and 1000 rupee notes. Yes, she can go to a bank and convert them, but that requires an ID, and not all poor people have IDs. Also, there is the significant transaction cost of doing so, as well as the opportunity cost of the time spent. (In case you wonder what kind of poor people have plenty of cash but no ID, google your way to an excellent tweet storm by Twitter user @AmbaAzaad that outlines the kinds of poor folk who are likely to be hurt by these.)
ज्या व्यक्तीकडे सेव्हिंग्स असतात जी ५०० व १००० च्या नोटांच्या डिनॉमिनेशन मधे असतात त्या व्यक्तीला गरीब का म्हणायचे ?? हा प्रश्न गेला तेल लावत. नैका ??
जी व्यक्ती स्वतःचा ID सुद्धा काढत नाही तिचे निर्लज्ज समर्थन का केले जातेय ?? - हा प्रश्न गेला गाच्यागात. नैका ??
विमुद्रीकरणाच्या आवृत्या
http://blogs.economictimes.indiatimes.com/onmyplate/the-cycles-of-demon…
विमुद्रीकरणाच्या (demonetization) आवृत्यांवर भाष्य करणारा हा लेख आवडला.
आणखी अनुभव. एचडिएफसी बँकेत
आणखी अनुभव.
एचडिएफसी बँकेत गेलो होतो. माझ्याकडे ५०० च्या तीन नोटा होत्या त्या बदलायच्या होत्या आणि १०००० रुपये काढायचे होते.
मोठी लाईन होती. बँकेची वेळ ९.३० ते ३.३० होती . बँकेने रांगेची व्यवस्था बर्यापैकी ठेवली होती. मुख्य म्हणजे बँकेच्या आत जास्त माणसांना सोडत नव्हते. बँकेचा एक गार्ड सतत फक्त २००० च्याच नोटा मिळतील इतर कुठल्याही नोटा मिळणार नाहीत असे सांगत फिरत होता. त्याच्याजवळ पाण्याची बाटली होती. मागेल त्याला तो पाणी देत होता. सुमारे १२ वाजता नवीन माणसांना रांगेत घेणे बंद केले बँक साडेतीन वाजता बंद होईल अशी घोषणा तो करू लागला. टोटल दिडशे ते दोनशे लोकांची सोय आज झाली असावी. १२ नंतर आलेल्या लोकांची निराशा झाली.
बँकेसमोर बर्याच लोकांनी दुचाक्या आणि चारचाक्या उभ्या केल्या होत्या. त्यात कायद्याचे काही प्रमाणात उल्लंघन होते. काही वेळाने ट्रॅफिक पोलिसांची टोइंग व्हॅन आली तेव्हा लोकांनी त्यांच्याशी हुज्जत घालून वाहने उचलू दिली नाहीत. त्यांनीही लोकांची संख्या पाहून माघार घेतली.
दोन हजारच्याच नोटा मिळणार त्यामुळे माझ्या तीन नोटा कशा बदलून देणार असा प्रश्न मला पडला होता. शाखेत फिरणार्या एका कर्मचार्याने तर मला आज तीन नोटा बदलून मिळणार नाहीत असेच सांगितले. पण काउंटरवरील कर्मचार्यांनी त्यातून मार्ग काढला. आणि मला नोटा बदलून मिळाल्या. त्यांनी काढलेला मार्ग इथे लिहीत नाही.
मधल्या काळात शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाण्याचे ग्लास आणि ग्लुकोज बिस्किटांचे छोटे पुडे वाटले. ते अर्थात फोटोग्राफरसहित आले होते. लोकांनी "वडापाव आणि चहा नाही का?" असे विचारले. ;)
सुमारे साडेतीन तास लायनीत उभे रहावे लागले.
--------------------------------------------------
शेजारी स्टेटबँकेची शाखा आहे. तिथली लाईन आणि केऑस खूपच मोठा होता.
आयसीआयसीआय ब्यांकेत कॅश
आयसीआयसीआय ब्यांकेत कॅश डिपॉझिट करायला पाऊण तास लागला. अजून कमी लागला असता पण एकाने ऑल्मोस्ट २० मिनिटं घेतली. बाकी स्मूथ. एक अशिक्षित बाई आली होती. बँकेच्या लोकांनी तिला फॉर्म भरून दिला. आंगठा कुठे लावायचा ते सांगितलं. ती बाई बँकेची ग्राहक देखील नव्हती. बँकेचा स्टाफ खूप हेल्पफुल होता.
===
केरळमध्ये CPMने आपल्या बॅंक युनिअनला घाऊक सुट्टी घ्यायला लावली असं वाचलं.
सेव्हिंग्ज एस्बीआयला, करंट
सेव्हिंग्ज एस्बीआयला, करंट पर्सनल अॅक्सिसला आणि फर्म चे अकाउंट लोकल कोऑपरेटिव्हच्या दुर्लक्षित ब्रांचमध्ये ठेवण्याची रणनीती उपयोगी पडली.
कोऑपरेटिव्हने विदाउट लैन सगळी कॅश स्वीकारली. ह्या बँकेचे एटीएम दरिद्री आहे आणि चालतही नाही. खर्चाला द्या की थोडे अशी विनंती केल्यावर २० चे दोन आणी १० चे एक बंडल दिले. ते पुरेसे आहेत. आठवड्यात २० के चे विड्रावल अलौड आहे.
अॅक्सिसवाले फोनवर मेसेजावर मेसेज फेकायलेत. बँक चालू आहे. या ना म्हनून.
आता चेकाने तिकडे अमाउंट फेकावी. अॅक्सिसचे कार्ड वापरायला मोकळा.
आयसीआयसीआय ब्यांक. २ तास वेळ
आयसीआयसीआय ब्यांक. २ तास वेळ लागला, २००० च्याच नोटा फक्त. ब्यांक स्टाफ हेल्पफुल होता पण गर्दीच मोठी होती.
एटीएममधून १०० च्या नोटांसाठी अडीच तास फिरलो. बहुतेक सगळी एटीएम बंद होती विथौट क्याश. एका चालू असलेल्या लायनीत थांबलो तर थोड्या वेळाने क्याश संपली. दुसरीकडे गेलो तर नेमका माझा नंबर आल्यावर मशीन हँग झाले. गार्डने सरळ बंदवाली पाटीच लावली. पण तसाच थोडा वेळ थांबलो मग आपसूक मशीन परत सुरू झाले आणि अखेर एकदाचे पैसे मिळाले. हुश्श.
बँकेत
दोन लायनी होत्या- एक अकौंट होल्डर व नॉन अकौंट होल्डर. अकौंट होल्डर लाईनमधून जास्त लोकांना आत सोडत होते. त्यावरून बरीच बाचाबाची झाली, एक गुंठामंत्रीछाप आणि एक सडकछाप अशा दोघांनी बँक कर्मचार्यांची आईमाई काढून "फोडून टाकू" वगैरे बोलायला सुरुवात केली. बँकवाल्यांनी लगेच सायरन वाजवला आणि जास्त आरडाओरडा केल्यास बँक बंद करून टाकू असे सांगितले. थोड्या वेळाने पोलिस आल्यावर तणाव निवळला. तोवर महिला वर्गातही रांगेतल्या स्थानावरून एक भांडण झाले. तेही नंतर मिटले.
मुंबई मधे झवेरी बाजारात १०००
मुंबई मधे झवेरी बाजारात १००० च्या नोटा ६०% डिस्काऊंट ला खरेदी करणारे लोक होते.
The most blatant barter was on at Zaveri Bazaar, where Mirror's camera caught a currency trader charging 60 per cent to swap the demonetised notes. We have a recording of the conversation in which he is heard saying he can give 100-rupee notes for 500- and 1000-rupee notes after keeping a chunk of the value. "I can give you Rs 400 for a 1,000-note and Rs 200 for a 500-note," he boasted to us. On normal days, he exchanges tattered notes for new ones.
कलकत्त्यात ४० % च्या वर दर
कलकत्त्यात ४० % च्या वर दर गेलेला दिसत नाही. मी ५०० = ४००, ३००, आणि १००० = ६००, ७०० असे दर पहिले दोन-तीन दिवस ऐकत होते. पण आज सकाळी आमच्या एका सोनार स्नेह्याने सांगितलं की हा बाजारही आता बंद होतोय. कारण एक तर १०० च्या नोटा सहज मिळत नाहीयेत, आणि नवीन नोटा यायचं लांबत चाललंय.
सगळीकडे नुसता गोंधळ चालू आहे. ठिकठिकाणी २००० रु. च्या नवीन नोटा देखील लोक स्वीकारत नाहीयेत. १० रु. चे नाणं देखील का कोण जाणे लोक घेत नाहीयेत. काल एका दुकानात त्यावरून धक्का बुक्की झाली.
सगळीकडे नुसता गोंधळ चालू आहे.
सगळीकडे नुसता गोंधळ चालू आहे. ठिकठिकाणी २००० रु. च्या नवीन नोटा देखील लोक स्वीकारत नाहीयेत. १० रु. चे नाणं देखील का कोण जाणे लोक घेत नाहीयेत. काल एका दुकानात त्यावरून धक्का बुक्की झाली.
अनिल बोकील साधारण असं म्हणाले की भारतामधे भारतीय चलन स्वीकारण्यास नकार देणे हा फौजदारी गुन्हा आहे. खखोदेजा.
मुलाखतः अनिल बोकील यांची अर्थक्रांती आणि आजची परिस्थिती
श्री अनिल बोकील यांची अर्थक्रांती आणि आज असलेली परिस्थिती या विषयीची लेटेस्ट मुलाखत ए बी पी माझावर घेतली गेली ती पाहण्यात आली. पहा
http://abpmajha.abplive.in/videos/abp-majha-katta-anil-bokil-313842
नोटा रद्द करण्यामुळे महागाई
नोटा रद्द करण्यामुळे महागाई कमी होईल आणि वस्तूंचे भाव खाली येतील हे कोणत्या गृहितकावर आधारित होतं हे समजलं नाही.
मुलाखतीत अनेक "स्वीपिंग स्टेटमेंट्स" होती. (उदा० मोठ्या डिनॉमिनेशनच्या नोटा असणं हे शेतकर्यांच्या आत्महत्येचं कारण आहे, मुक्त अर्थव्यवस्थेत फक्त हॅव आणि हॅवनॉट्स हे दोनच वर्ग असतात, वगैरे.) ही नेहेमी अशीच असतात की या मुलाखतीसाठी सरसकटीकरण केलं होतं?
काहीही झालं तरी "ट्रान्झॅक्शन टॅक्स" (अर्थक्रांतीचं मूळ प्रपोजल) आणू नये हे आपलं माझं वैयक्तिक मत.
नोटा रद्द करण्यामुळे महागाई
नोटा रद्द करण्यामुळे महागाई कमी होईल आणि वस्तूंचे भाव खाली येतील
मी मुलाखत बघितली नाही. पण हे विधान काही पूर्णपणे बरोबर वाटत नाही. त्यात तथ्याचा भाग असा आहे की चलनफुगवटा झाला की बाजारात महागाई वाढते - म्हणजे सरकारने जर कर्ज फेडण्यासाठी नोटा छापल्या तर भाव वाढतात - तसंच चलन नष्ट झालं तर बाजारात भाव कमी होतील हे पटतं. याचं कारण तितक्याच वस्तू बाजारात कमी पैशांसाठी स्पर्धा करतील. (क्वांटिटी थियरी ऑफ मनी)
मात्र हे सर्क्युलेशनमध्ये असलेल्या पैशाबाबत आहे. जर तिजोऱ्यांमध्ये पडलेला पैसा अचानक बाहेर आला - बाहेर पडताना कदाचित त्यातला काही नष्टही होईल हे गृहित धरूनही - तरीही काही काळापुरता तरी सर्क्युलेशनमधला पैसा वाढेलच. हा पैसा बॅंकांमध्ये जाईल, बॅंकांकडून कर्जं स्वस्त प्रमाणात मिळतील. म्हणजे पुन्हा पैसा स्वस्त, सर्क्युलेशन जास्त - तेव्हा महागाई वाढेल. लोकं रोखीऐवजी सोनं घेतील - सोन्याचे भाव वाढायला लागतील. कदाचित स्टॉक मार्केटमधले पैसे काढून लोक सोन्यात घालतील. त्यातून सोन्याच्या किमतीत फुगा निर्माण होऊ शकेल. स्टॉक मार्केट किंचित काही आपटू शकेल. अर्थात हे माझे तर्क आहेत. काय होतंय ते आपण पाहूच.
शिवाय महागाई ही बहुधा टोटल
शिवाय महागाई ही बहुधा टोटल मनी सप्लायवर अवलंबून असते. नुसत्या नोटा किती आहेत यावर नाही.
अर्थक्रांतीचे बायर्स मुख्यत्वे मध्यम वर्ग असणारच कारण त्यात इन्कमटॅक्स सहित सर्व टॅक्स रद्द करण्याची शिफारस आहे.
बाकी कॅशलेस सोसायटीकडे वाटचाल हे चांगलेच ध्येय आहे.
माझे गोड अनुभव
काल रात्री मी बस स्टॉपवर उभा होतो. एक ओला कॅबवाला आला. मला कुठे जायचंय म्हणून त्यानं विचारलं. मी सांगितलं. त्यालाही त्याच बाजूला जायचं होतं. तो म्हणाला मी सोडतो. मी म्हटलं माझ्याकडे कॅशची तंगी आहे म्हणून तर बस स्टॉपवर उभा आहे ना भाऊ. तो म्हणाला हरकत नाही; १० रुपये द्या. (एरवी रिक्षानं सुमारे ७० रुपये भाडं झालं असतं.) मग मी गाडीत बसलो. आम्ही गप्पा मारल्या. तो म्हणाला परिस्थिती फार तंगीची आहे. लोक बाहेर पडतच नाहीत किंवा पेटीएम वगैरे मार्गानं डायरेक्ट खात्यात भाडं जमा करणारी गिर्हाइकंच भेटताहेत. बँकेत गेलो तरी किमान ३ तास जाणार म्हणजे तेवढा धंदा बुडणार. आता कॅश संपत आली आहे त्यामुळे उद्या ते करणं भागच आहे.
आज दुपारी पुन्हा बस स्टॉपवर उभा होतो. काही वेळानं एक ज्येष्ठ महिला तिथे आली. थोडा वेळ बसची वाट पाहून त्यांनी रिक्षा केली. मला त्यांनी लिफ्ट ऑफर केली. माझं गंतव्य स्थान नेमकं त्यांच्या वाटेवर होतं. मग आम्ही गप्पा मारत प्रवास केला. माझी कॅश वाचली. त्या म्हणाल्या पाहा देवालाच तुमची काळजी होती. मी खरं तर म्हणणार होतो की खरं तर मोदींच्या रूपानंच आपल्याला देव भेटला आहे, किंवा खरं तर मोदींची काळजी देव वाहतो आहे; मी तर केवळ एक सामान्य क्षूद्र पापी माणूस. पण असं काही न बोलता मी फक्त त्यांचे आभार मानले.
तात्पर्य : असे सुंदरसुंदर जीवनानुभव दिल्याबद्दल आणि माणुसकीचा परिमळ माझ्या परिसरात कसा दरवळतो आहे त्याचा दैनंदिन प्रत्यय देण्यासाठी मी पंतप्रधानांचे जाहीर आभार मानतो.
जीडीपीच्या २% (टोटल जीडीपीच्या २०%) काळा पैसा नष्ट होईल
इटी एडीटरच्या मते जीडीपीच्या २% (टोटल जीडीपीच्या २०%) काळा पैसा नष्ट होईल.
http://blogs.economictimes.indiatimes.com/et-editorials/new-currency-wo…
अजय शहा यांच्या ब्लॉगवरचा हा लेख भराभर वाचलाय. बराच मोठा आहे. पुन्हा एकदा शांत बसून वाचावा लागेल.
https://ajayshahblog.blogspot.in/2016/11/trumping-black-money.html?utm_…)
लेख पूर्ण वाचला. चांगला
लेख पूर्ण वाचला.
चांगला आहे. मुद्दे पटतात. त्यांनी जो कॉस्ट बेनिफिट चा मुद्दा मांडला आहे तो व्हॅलिडच आहे. पण तसे कॉस्ट बेनिफिट अॅनालिसिस आत्ता करणे शक्य नाही. सर्व धुरळा खाली बसल्यावर किती काळा पैसा उघडकीस आला आणि त्याने पुढील काळ्यापैशाच्या निर्मितीवर किती परिणाम झाला हे पहावे लागेल. तत्काळ बेसिसवर किती पैसा बाहेर आला हे (म्हणजे तो काळा होता हे कळून आले आणि त्यावर दंडात्मक कारवाई झाली) ; आणि दीर्घ काळाने काळ्यापैशाची निर्मिती थांबली का हे पहावे लागेल.
त्यांचे म्हणणे हा सर्वसामान्य* प्रामाणिक लोकांवर मोठ्या कॉस्ट लावणारा तात्पुरता उपाय आहे असे दिसते.
*सर्वसामान्य म्हणजे गरीब लोक असे नाही. ज्यांच्या व्यवसायात मोठा कॅश व्यवहार नेहमीच होत असतो ते व्यावसायिक सुद्धा.
--------------------------------------------------
काळा पैसा म्हणाजे भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा अशी सामान्यपणे मध्यमवर्गीयांची समजूत असते आणि त्यामुळे आपण काळ्यापैशाच्या निर्मितीतले भागीदार नाही अशीसुद्धा त्यांची समजूत असते. खरे तर १३-१४ टक्के व्हॅट/सर्विस टॅक्स लागू नये म्हणून दुकानदाराकडून विदाउट बिल वस्तू खरेदी करणारे किंवा रंगार्याकडून विदाउट बिल रंग लावून घेणारे सुद्धा यातले भागीदार असतात.
http://atmsearch.in/ ही एक
http://atmsearch.in/ ही एक वेबसाइट सुरू झाली आहे. तुम्हाला हव्या त्या भागात कोणती ATM चालू आहेत हे त्यावर दिसेल. तुम्हाला कुठलं ATM चालू आहे असं दिसलं तर त्यावर प्लीज अपडेट करा.
डेली अपडेट
- आज एक रिक्षावाला भेटला. पन्नास टक्के धंदा बसला आहे म्हणाला.
- आज एक इंटिरियर डेकोरेटर मैत्रीण भेटली. सगळा धंदा बसला आहे म्हणाली. तिचे पुरवठादार म्हणतात की कॅश द्या नाही तर व्हॅट भरा. तिचे क्लायंट म्हणतात की व्हॅट भरणार नाही आणि कॅश नाही.
- आणि मोदी म्हणतात की काळा पैसावाल्यांना धडा शिकवेन. कोणता धडा कोण कोणाला शिकवतं आहे ते कळण्याची मी वाट पाहतो आहे
त्या रिक्षावाल्याने
त्या रिक्षावाल्याने प्राप्तीकर भरला नसेल तर त्याला धडा शिकवण्यात आलेला आहे. व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न १ रुपया जरी असेल तरी त्याने त्यातला किमान १७% प्राप्तीकर भरायला हवा. प्राप्तीकर भरला नसेल तर ते उत्पन्न हे काळापैसाच. दणका बसला ते बरं झालं. फार लाड झालेत या लोकांचे.
का-ही-ही
लोकांकडे सुट्टे पैसे कमी आहेत, रिक्षावाल्याला कार्डाने पैसे देता येत नाहीत म्हणून लोक रिक्षाने प्रवास टाळत आहेत. तशा अर्थाचा एक प्रतिसाद चिंतातुर जंतूंनी दिलेला आहेच. फेसबुकवर अनेकांनी लिहिलेलं वाचलं की सध्या फुटकळ खरेदी बंद आहे, उगाच टपरीवर जाऊन चहा-सिग्रेट मारणं, उगाच वडापाव किंवा सँडविच खाणं, अशा छापाची.
यात रिक्षावाल्याचा पैसा काळा का गोरा याचा काय संबंध?
हस्तिदंती मनोऱ्याची बदनामी थांबवा!
हस्तिदंती मनोऱ्यातल्या लोकांना फडतुसांची दुःखं, गाऱ्हाणी समजत नाहीत. मनोऱ्यातल्या लोकांना मनोऱ्याबाहेरच्यांची काळजी नसते असं नाही; त्यांना त्या लोकांशी संवाद साधता येत नाही. तुम्हाला फडतुसांचं अस्तित्वही सलतं. दोन्हींत किंचित फरक आहे. हस्तिदंती मनोऱ्याची बदनामी थांबवा!
•आज एक इंटिरियर डेकोरेटर
•आज एक इंटिरियर डेकोरेटर मैत्रीण भेटली. सगळा धंदा बसला आहे म्हणाली. तिचे पुरवठादार म्हणतात की कॅश द्या नाही तर व्हॅट भरा. तिचे क्लायंट म्हणतात की व्हॅट भरणार नाही आणि कॅश नाही.
ही कीती उत्तम बातमी आहे. आत्ता पर्यंत लोकांनी कीती व्हॅट चुकवला असेल? आता ह्यापुढे तरी नीट वागावे.
चांगली आणि वाईट
नाही, बातमी उत्तमच आहे. पण त्याहून वैट बातमी ही आहे की या इंटिरिअर डेकोरेटरचे कष्टंबर इतकं झाल्यावरही व्हॅट देणार नाही असं म्हणतायत.
शिवाय हेच कष्टंबर सोशल मीडियावर मोदींच्या धाडसी निर्णयाचं कौतुक करत असतील.
दहा लाख सामान्य लोक > एक हजार इंटिरिअर > दहा सप्लायर > एक मॅन्युफॅक्चरर. या साखळीतले दहा लाख लोक व्हॅट भरणार नाही म्हणतायत.
देश बदल रहा है.
पण त्याहून वैट बातमी ही आहे
पण त्याहून वैट बातमी ही आहे की या इंटिरिअर डेकोरेटरचे कष्टंबर इतकं झाल्यावरही व्हॅट देणार नाही असं म्हणतायत.
थत्तेचाचा - ही काय तुमच्यासाठी नविन बातमी आहे का? मोदीनी स्वताच्या मतदारांना पण सोडले नाही हे तुम्हाला कबुल करावे लागेल :-)
ह्याच उदाहरणात इंटीरीअर डेकोरेटर ला धंदा पाहिजे असेल तर स्वताच्या किमती कमी करुन ग्राहकाला पूर्वी इतक्याच किमतीत सेवा देऊ शकतो. नकोच असेल धंदा तर ठीक आहे.
कर चुकवण्याचे मार्ग कमी आणि जास्त कष्टप्रद झाले की लोक सुधारतील.
•आज एक रिक्षावाला भेटला.
•आज एक रिक्षावाला भेटला. पन्नास टक्के धंदा बसला आहे म्हणाला.
त्याला २५% म्हणायचं असावं, कारण एरवी सगळं आलबेल असताना हे माजुरडे रि़क्षावाले पब्लीकला जिथे जायचं असतं तिथे येत नाहीत; झोपा काढतात नाहीतर रस्त्यावर पिचकार्या मारत बसतात. त्यांचा ५०% धंदा तिथेच बसलेला असतो. आता काही दिवस बसा म्हणावं बोंबलत.
बाकी, कितीतरी रिक्षावाले पेटीय्मवर पैसे घेतात. ओला वरून रिक्षा मागवता येते जिथे कॅश द्यावी लागत नाही.
•आज एक इंटिरियर डेकोरेटर मैत्रीण भेटली. सगळा धंदा बसला आहे म्हणाली. तिचे पुरवठादार म्हणतात की कॅश द्या नाही तर व्हॅट भरा. तिचे क्लायंट म्हणतात की व्हॅट भरणार नाही आणि कॅश नाही.
तुमची मैत्रीण कॅश घेते म्हणजे तिचा काळा पैसा आहेच तेव्हा तिच्या धंद्यावर परिणाम झाला ते योग्यच (हेच इतर धंदेवाल्यांनीही लागू). तिच्या क्लायंटचं काम अर्धवट राहिलं आणि त्यांना अप्रत्यक्ष झळ पोचतेय ते पण योग्यच्.
सुदैवाने
पाचशेच्या नोटा नव्हत्या. हजाराच्याही नाही. जवळ कधीच रोख पैशे ठेवत नसल्याने डोक्याला ताप नाही. ;) जय हो!
इथं ओळखीच्या काही लोकांकडे पंधरा-वीसहजार वगैरे रुपै होते. धावतपळत एअरपोर्टवर जाऊन एक्चेंज करायचा प्रयत्न केला तर ती 'सुविधा' एक दोन दिवसात बंद झाली आहे असे कळले. आता सुटीच्या कालावधीत कोणी भारतात जाणार असेल तर चेंज करुन आणण्याची विनंत्या चालू आहेत.
----
घरी आईबाबांकडे ( त्यांचा एटीएमवगैरेंवर विश्वास नसल्याने ) दवाखाना-हॉस्पिटल वगैरे इमर्जन्सीला लागतील म्हणून काही कॅश होती. ती डिपॉझिट करण्यासाठी बँकेच्या वाऱ्या चालू आहेत.
स्वतः बारामतीला
परवा मोदी स्वतः बारामतीला जाऊन पवारांचा सगळा काळा पैसा बाहेर काढून पवारांना जबर दंड करून देशोधडीला लावून आले म्हणे !!
http://www.loksatta.com/agralekh-news/narendra-modi-and-their-ministers…
बँकेच्या रांगेत उभे राहणारे
बँकेच्या रांगेत उभे राहणारे पब्लीक हे जनरली मध्यमवर्गीय पब्लीक आहे ज्यांना लगेचच पैश्यांची गरज आहे. तुम्ही म्हणताय त्यापैकी किती लोकांना तातडीने चार ते दहा हजाराची गरज असू शकते. शिवाय ते रांगेत उभे असले (नेता, सेलेबब्रिटी सोडून) तर कोणाच्या लक्षात येणार आहे की हा मोठ्ठा बिल्डर आहे म्हणून. शरद पवार, सोनिया गांधी एरवी किती जणांना बॅकेत जाताना दिसलेत म्हणून आता दिसतील. शिवाय ३० डिसेंबर पर्यंतची मुदत असताना हे लोक लगेच घाईने रांगेत का उभे राहतील. ह्या लोकांचा मुख्य प्रश्न असा आहे की असलेल्या अनधिकृत रकमेची विल्हेवाट कशी लावायची? विल्हेवाट नाही लावता आली तर त्यांना ह्या पैश्यांवर पाणी सोडायलाच लागेल, पण जाहीरपणे कोण कबूल करेल?
जनरल पब्लीकला थोडा त्रास होतोय हे मान्य आहे, पण त्याबद्दल फारशी कुणाची तक्रार दिसली नाही. तक्रार असेलच तर ५ ते १०% लोकांची जो काही फार मोठा आकडा वाटत नाही. टाईम्स न्यूजवर घेतलेल्या पोलमधे ८२%मत "गुड आयडीया, वेल एक्झीक्युटेड" १४% मत "गुड आयडीया बॅडली एक्झीक्युटेड" आणि ४% मत "बॅड आयडीया बॅडली एक्झीक्युटेड" असे दिसते ह्यावरून लोकांना डिमोनीटायझेशन बद्दल काय वाटते ते लक्षात यावे.
Poll: What do you think of
Poll: What do you think of the demonetisation of notes?
हास्य उपरोधिक आहे असे वाटले.
हास्य उपरोधिक आहे असे वाटले. पण उपरोध का ते कळले नाही.
जिल्हा मध्यवर्ती बँकात अदलाबदल व पैसे जमा करायला घातलेल्या बंदीने बर्याच ओळखीच्या व्यक्तिंना व कुटुंबियांना त्रास होत आहे, रांगेत उभे रहायला लोकांची ना नाही पण आपले खाते असलेल्या सरकारी बँकेत पैसे बदलून मिळत नाहीत (किंवा जमा करुन घेतले जात नाहीत) त्यामुळे ताप होत आहे.
जिल्हा सहकारी बॅ़ंकामधे
जिल्हा सहकारी बॅ़ंकामधे केवायसी नियमांचे नीट पालन केले गेले नसल्यामुळे, तिथे जमा होणार्या पैश्याबद्दल ( त्याच्या स्रोताबद्दल ) आरबीआय ला शंका आहेत. सुक्या बरोबर ओले जळते ह्या न्यायानी तुमच्या नातेवाइकांना त्रास होतोय. पण असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ हे सर्वांनीच लक्षात ठेवावे.
फतवा???
'आज रात्रीपासून' वगैरे???
(अवांतर: अशीच 'आज रात्रीपासून पंतप्रधान क्यान्सल' म्हणण्याची सोय पब्लिकला असती, तर किती बहार आली असती!)
(अतिअवांतर: काय 'गांधी सीरीज़' रद्द करून पुढेमागे 'मोदी सीरीज़' वगैरे आणण्याचा इरादा आहे काय?)