"तारुण्य टिकवून ठेवण्याच्या लढाईतला एक महत्वाचा विजय: "
paper attached.
Post: "तारुण्य टिकवून ठेवण्याच्या लढाईतला एक महत्वाचा विजय: "
जशा बुटाच्या लेसच्या दोन्ही टोकांना प्लास्टिक कॅप्स असतात तशाच आपल्या दोरीसारख्या डी एन ए च्या दोन्ही टोकांना "टेलोमीअर" नावाच्या छोट्या साखळ्या असतात. जेंव्हा पेशींचे द्विभाजन होते, तेंव्हा त्या प्रक्रियेतील बारीक दोषांमुळे दर विभाजनामागे या "टेलोमीअर" ची लांबी थोडीशी कमी होत जाते. आणि सुमारे ४५-५० विभाजनानंतर ती इतकी लहान होते, की पेशींचे विभाजन बंद होते आणि "वार्धक्याचा काळ " सुरु होतो. दर विभाजनामागे कमी होणारी ही लांबी जर परत लांब करता आली, तर पेशींची विभाजन-शक्ती पूर्ववत होते, आणि वार्धक्य टाळले जाते. हे करू शकणारे औषध सापडल्यास आयुष्यमान, आरोग्याचा काळ वाढू शकेल, कर्करोगाची शक्यता बरीच कमी करता येईल आणि कदाचित चिरतारुण्यही मिळू शकेल . पुरुषी हॉर्मोन्स मधले एक औषध "डॅनाझोल" हे करू शकेल असे मांडणारा एक शोधनिबंध (2016) आजच वाचनात आला. औषध चाचणीत "टेलोमीअर" ची लांबी मोजण्याच्या टप्प्यावर जे बारा लोक पोचले होते (दोन वर्षांनी), त्या सर्वांमध्ये टेलोमीअर ची झीज तर थांबली होतीच (१२/१२), पण ११ लोकांमध्ये त्यांची लांबी पूर्वीपेक्षा अधिक झाली होती. प्राण्यांवरील चाचण्यांचा टप्पा ओलांडून मानवांवर हा प्रयोग झाला, तसेच डॅनाझोलचा डोसही नेहमीच्या डोस इतकाच आहे (दिवसाला ८०० मि ग्रॅ ) ही या निबंधाची वैशिष्ट्ये म्हणता येतील. पेशंट्सची अतिशय लहान संख्या हा त्याचा प्रमुख दोष ठरतो . खालच्या दुव्यात संबंध पेपर आहे . संबंधित बऱ्याचशा वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकेन किंवा शोधून काढू शकेन.
http://aisiakshare.com/files/Danazol_Treatment.pdf
पेपरमध्ये यासंबंधी पूर्वी झालेल्या संशोधनाचे सारही सापडू शकेल .
स्त्रियांबाबतही याच प्रकारचे रिझल्ट्स २००५ साली एका कोरियन टीमने प्रसिद्ध केले आहेत. कोणाला हवे असल्यास कळविणे.
Due to a glitch I am unable
Due to a glitch I am unable to give a comment hence this sub comment -
.
One of the major aspects of youth is hormones & Brain. everything is experienced for the first time & that creates a tremendous positive CHAITANYA. How are scientists going to MIMIC that?? They can never be able to do so. So whatever youth retention we achieve is going to be sort of BHRASHT NAKKAL of actual youth, a miraculous & powerful phenomenon.
अजून प्रचंड संशोधन होणे बाकी आहे.
All this is based on an assumption that rearrangement of ATCG automatically takes care of everything. There is no knowledge of how!!!: हे काही प्रमाणात सत्य आहे. पण पेशींचे विभाजन जास्तीतजास्त सुमारे ४५-५० वेळा होऊ शकते (हेफ्लिक लिमिट) , आणि ते थांबण्याचे कारण टेलोमेर ची लांबी फारच कमी होणे हे असते, हे सिद्ध झाले आहे . त्यामुळे ती लांबी जर पूर्ववत करता अली, तर विभाजन चालू राहू शकते, म्हणजेच ( काही प्रमाणात) पुन्हा "तारुण्य" प्राप्त होते. अनेक प्राण्यांमध्ये याने आयुष्य १० तो ५० टक्के वाढते हे दाखविले गेले आहे . हे घडवून आणू शकणाऱ्या अस्ट्रगलस नावाच्या चिनी औषधाने अनेकांची परिस्थिती सुधारते असा (सांगोवांगीचा , शास्त्रीय नव्हे!) पुरावा आहे. अजून प्रचंड संशोधन होणे बाकी आहे. शरीराच्या सर्व पेशीत हे घडवून आणता येईल का, आणि त्याची गरज आहे का हेही अजून माहिती नाही .
Initially YES! But soon, the
Initially YES! But soon, the cultures will adapt.
We have huge, very efficient life-ending technologies (weaponry). Compared to that the resources committed to life extension are rather trivial. Currently-worked-on lifespan-enhancing technologies will also increase the healthspan of each life. And the point is death must be a choice (which many may choose, through sheer boredom!), not a compulsory fate.
And the point is death must
And the point is death must be a choice (which many may choose, through sheer boredom!), not a compulsory fate.
=========
कोणाचा चॉईस?
===========
And on similar lines, will the right of every egg and sperm to birth (in place of compulsory wastage) be recognized? Why or why not?
कोणाचा चॉईस?
अर्थात मरणासन्न/ मरणाकडे वाट्चाल करणार्या व्यक्तीचा!
will the right of every egg and sperm to birth (in place of compulsory wastage) be recognized? Why or why not? : हा पूर्णपणे मानवी-नैतिक आणि समाजशास्त्रीय प्रश्न आहे (निसर्ग न-नैतिक असतो!) . निसर्गात बालमृत्यूचे प्रमाण अफाट असल्यामुळे निसर्ग अर्भकेही अफाट निर्माण करू पाहतो . त्या सर्वांना पुढील विकासाचा न्याय आपण देऊ शकत नाही हे आपण भारतात पहात आहोतच . याउलट उत्तर आणि पश्चिमेकडील देशात लोकसंख्यावाढीचा दर गेली अनेक दशके ऋण आहे. त्यामुळे तिथले नैतिक तत्त्व वेगळे असणार हे उघड आहे .
गांधींपासून प्रेरणा घेऊन
भारत सोडून उर्वरित जगात गांधींचे नाव त्यांच्या क्रांतिकारक अहिँसक सत्याग्रहाच्या कल्पनेशी जोडले गेले आहे आणि त्यांची थोरवी जगन्मान्य आहे (भारतात सध्या त्यांच्या खुन्यांचे राज्य आहे हा मुद्दा अलाहिदा !) . परवा कोलंबिया या देशातील एक सुतार आमच्याघरी दुरुस्तीला आला होता: माझ्या दिवाणखान्यातील गांधींचा मोठा फोटो पाहून तो म्हणाला की यांच्याबद्दल आम्हाला शाळेत खूप शिकवले जाते व यांना मोठा मान दिला जातो . त्याने त्या फोटोच्या पार्श्वभूमीवर स्वतःचे छायाचित्रही काढून घेतले ! मार्टिन ल्यूथर किंग यांना प्रति-गांधी म्हणतात हे आपण जाणतोच!
भारतात कोणी रशियन आला असता
भारतात कोणी रशियन आला असता आणि मी सुतार असतो आणि मी त्याकडे गेलो असतो त्यांना मी त्यांचा उर भरेपर्यंत लेलिन स्टॅलिन बद्दल मला शाळेत काय शिकवले आहे ते सांगीतले असते. म्हणून काय लेनिन स्टॅलिन फार महान झाले का?
==============
जसा मोदी फार जास्त विरोध झाल्यामुळेच शेवटी पंतप्रधान झाला तसेच गांधी फार विरोध झाल्यामुळे महात्मा म्हणून टिकत आला आहे.
====================
जगात गांधींचे नाव त्यांच्या क्रांतिकारक अहिँसक सत्याग्रहाच्या कल्पनेशी जोडले गेले आहे आणि त्यांची थोरवी जगन्मान्य आहे.
मुळात जगात भारताचेच नाव फार थोर आहे. भारताच्या थोर संस्कृतीचा प्रतिनिधी अशी गांधीजींची ओळख आहे. रानट, चोर, खूनी, क्रूर, विकृत नि मागास भारताला माणसात आणणारा सुधारक अशी नाही. भारताने कोणाचेही नाव पुढे केले तर तो नावारुपाला येतो. तो सम्राट अशोक जन्मल्यापासोन्न मरेपर्यंत रानटी, स्वार्थी नि हेकेखोर नि क्रूर होता, पण भारतीय लोकांनी म्हटले म्हणून जगात अलेक्झंडर च्या लायकीचा ग्रेट मानला जातो. हा विद्यमान इतिहास आहे. (माझ्या प्रतिगामी विचारसरणीचे पाईक असे) कितीतरी गुरु फॉरेनात लै प्रसिद्धी पावले आहेत. ही या देशाची गुडविल आहे. नैतर कोणी कुठे म्हणे सत्याग्रह केला आणि स्वातंत्र्य मिलवले?
==============
भारतात सध्या त्यांच्या खुन्यांचे राज्य आहे हा मुद्दा अलाहिदा !
म्हणजे भारतात कधीच न्यायसंस्था नव्हती, नाही नि नसेल हा मुद्दा अलविदा??? ज्या देशात न्यायसन्स्थाच नाही त्या देशाच्या राष्ट्रपित्याची लायकी काय?
भारतात कधीच न्यायसंस्था नव्हती, नाही नि नसेल!!!
आपण महत्वाचा मुद्दा मांडत आहात. साध्या तरी "हिंदूंची " न्याय-बुद्धी ही "ही कृती न्याय/नैतिकशास्त्रानुसार न्याय्य आहे की नाही?" याच्यावर भर न देता "या कृतीने हिंदूंचा फायदा होतो आहे किंवा कसे?" याचा विचार करणारी दिसते. (उदा पोलिसांनी घडवून आणलेल्या खोट्या 'चकमकी".)
गांधी फार विरोध झाल्यामुळे महात्मा म्हणून टिकत आला आहे
गांधीजींच्या माणूस म्हणून व्यक्तिगत आयुष्यातल्या अनेक गोष्टी निंद्य किंवा विनोदी आहेत हे सत्य आहे. उदा. "सत्याचे प्रयोग", किंवा लग्न झालेल्या कार्यकर्त्यांना ब्रह्मचर्याची शपथ घ्यायला लावणे (उदा. जयप्रकाश नारायण!). त्यांना "गरिबीत " ठेवण्यासाठी काँग्रेसला खूप खर्च येत असे हेही मान्य आहे. पण मानवी राजकारण हे पाशवी शक्तीवर न चालता नैतिकतेवर चालले पाहिजे , आणि तशा प्रकारचा नैतिक दबाव (अनेकदा . [हिट्लरविरुद्ध नव्हे!]) यशस्वी होऊ शकतो हा पूर्ण क्रांतिकारक विचार त्यांनीच मांडला असे म्हणावे लागते. तसेच पूर्ण प्रॅक्टिकल दृष्टीनं पाहताही जर प्रजेची संमती नसेल तर राज्यकर्ते राज्य करू शकत नाहीत हेही त्यांनीच पुढे आणले (टिळकांनी त्याची सुरुवात केली होतीच!).
चन्द्रशेखर ह्यांचा धागा
येथीलच जुने अणि जाणते सदस्य चन्द्रशेखर, जे अलीकडे येथे दिसलेले नाहीत, ह्यांनी http://aisiakshare.com/node/2279 ह्या धाग्यामध्ये असेच काही नवे संशोधन पुढे आणले होते. त्यात आणि वर दाखविलेल्या संशोधनात काय फरक आहे?
त्या धाग्यावरील प्रतिसादांमध्ये माझाहि एक प्रतिसाद होता. तो असा:
जर शरीरातील सर्व इंद्रियांचे वय एकाच गतीने वाढत जाईल अशी काही उपाययोजना करता आली तर शारिरिक स्वास्थ्याचा दृष्टीने ती अतिशय फायदेशीर ठरेल असे वाटते.> असे करता आलेच तर होणारा परिणाम फायदेशीर ठरेल काय ह्याविषयी साशंक आहे. समजा सर्वच इंद्रिये सारख्याच वेगाने वाढत राहिली - सारख्याच गतीने वार्धक्याकडे जात राहिली - तर काय होईल? सर्वच अवयव क्षीण होऊ लागतील पण कोठलाच अवयव त्याच्या एकटयाने आयुष्य संपवण्याइतका क्षीण नसेल. हाडे आणि स्नायु क्षीण झाल्यामुळे उठणेबसणे अशक्य होईल, मेंदूची समजहि कमी झालेली असेल पण तरीहि तो मनुष्य जिवंत असल्याने अन्नपाण्याची आवश्यकता टिकून असेल, मलमूत्रविसर्जन चालूच राहील - यद्यपि कमी ताकतीने. असेच अनेक अन्य परिणाम दिसू लागतील. असल्या जगण्यात काय फायदेशीर आहे? केवळ इतरांना भार अशी स्थिति होईल. आजही असे काही लोक दिसतात की त्यांचे शरीर नावापुरते जिवंत आहे आणि इतरांना भारभूत झालेले आहे. पण अशा लोकांची संख्या कमी आहे. प्रत्येक माणूसच आज ना उद्या त्या स्थितीत जाऊन पडावा अशी उपाययोजना म्हणजे 'रोगापेक्षा उपाय भयानक' असे नाही का होणार?
येथेहि हाच प्रतिसाद लागू पडेल काय?
उत्तम लेख , वेगळी यंत्रणा!
प्रश्न उत्तम आहे, आणि आधीच लेखही वाचला तोही चांगला आहे . मात्र त्यात मांडलेली यंत्रणा वेगळी आहे; जनुकांवर "मेथिल" (एक कार्बन, त्याला तीन हायड्रोजन ) हा ग्रुप चिकटवला की जनुकांचा तेथील भाग बुळबुळीत होऊन त्यावर एंझाइम बसू शकत नाही, व त्या भागाचा अविष्कार (प्रथिनांची निर्मिती) बंद होतो , ही यंत्रणा निसर्ग वयाच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये जनुकांचे काम चालू आणि बंद करायला वापरतो, असा त्या लेखाचा सारांश आहे, आणि ही यंत्रणा मानवाच्या फायद्यासाठी कशी वापरावी यावरही संशोधन चालू आहे. मी मांडलेल्या बातमीत तेलोमीअर आखूड होत जाणे अशी वेगळी यंत्रणा वापरण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही संशोधने पूर्ण बाल्यावस्थेत आहेत. But "What is the use of a newborn baby?" Michael Faraday
ट्रांझिशन च्या काळात भयानक प्रकार
विज्ञानाचा आजवरचा इतिहास बघता हेही होतील याची जवळजवळ खात्री आहे. साध्या नव्या औषधांच्या चाचण्यांमध्ये (ज्यात प्राण्यावरचा भरपूर विष-वैज्ञानिक डेटा उपलब्ध असतो!) त्यात आज भरपूर लोक मरत आहेत . अर्ध्याकच्च्या विज्ञानाच्या भयंकर परिणामांवर भरपूर विज्ञानकथा लिहिल्या जात आहेत. कोणत्याही थोर व्यक्तीस आयुष्य वाढविण्याच्या वैद्यक -विज्ञानाची वेगळी वाट माहिती असल्यास ती जरूर दाखवावी . मात्र हे केवळ भौतिक विज्ञान-संशोधन आहे. मृत्यूचा "मित्र" म्हणून स्वीकार वगैरे आध्यात्मिक विचार हे एक वेगळे (आणि आदरणीय !) क्षेत्र आहे , पण त्याचा इथे संबंध लावू नये. भौतिक वेगळे आणि अधिभौतिक वेगळे !
जंतू-संसर्गाचे बरेचसे रोग पूर्ण बरे होतात.
Forget all this, allopathy doesn't cure a single human disease in true sense of the word cure. : हेही काही प्रमाणात सत्य आहे. पण जंतू-संसर्गाचे बरेचसे रोग पूर्ण बरे होतात हे एक फार मोठे सत्य आहे, आणि भारतासारख्या देशाला ते महत्वाचे आहे . हगवणीपासून क्षयापर्यंत सर्व रोगांचे भारत हे एक मोठे भांडार आहे, पण मृत्युसंख्या उत्तम घटली आहे हे सत्य आहे.
I really like this guy Milind
I really like this guy, because he agrees with me to the point. He knows the cost of agreeing with Ajo on Aisi on controversial matters but he agrees at least partially stating correctly what I meant. What I like more about him that he agrees with me on all points that work against him just because they are true.
===========
Of course I know he doesn't coincide with me completely but then it is very rare in the web world to be so candid with your opponent. People even with 1/10 th his reading of the subject, react strangely.
शरिरातल्या सगळ्या पेशिंचं तसं
शरिरातल्या सगळ्या पेशिंचं तसं झालं पाहिजे.