paper attached.
Post: "तारुण्य टिकवून ठेवण्याच्या लढाईतला एक महत्वाचा विजय: "
जशा बुटाच्या लेसच्या दोन्ही टोकांना प्लास्टिक कॅप्स असतात तशाच आपल्या दोरीसारख्या डी एन ए च्या दोन्ही टोकांना "टेलोमीअर" नावाच्या छोट्या साखळ्या असतात. जेंव्हा पेशींचे द्विभाजन होते, तेंव्हा त्या प्रक्रियेतील बारीक दोषांमुळे दर विभाजनामागे या "टेलोमीअर" ची लांबी थोडीशी कमी होत जाते. आणि सुमारे ४५-५० विभाजनानंतर ती इतकी लहान होते, की पेशींचे विभाजन बंद होते आणि "वार्धक्याचा काळ " सुरु होतो. दर विभाजनामागे कमी होणारी ही लांबी जर परत लांब करता आली, तर पेशींची विभाजन-शक्ती पूर्ववत होते, आणि वार्धक्य टाळले जाते. हे करू शकणारे औषध सापडल्यास आयुष्यमान, आरोग्याचा काळ वाढू शकेल, कर्करोगाची शक्यता बरीच कमी करता येईल आणि कदाचित चिरतारुण्यही मिळू शकेल . पुरुषी हॉर्मोन्स मधले एक औषध "डॅनाझोल" हे करू शकेल असे मांडणारा एक शोधनिबंध (2016) आजच वाचनात आला. औषध चाचणीत "टेलोमीअर" ची लांबी मोजण्याच्या टप्प्यावर जे बारा लोक पोचले होते (दोन वर्षांनी), त्या सर्वांमध्ये टेलोमीअर ची झीज तर थांबली होतीच (१२/१२), पण ११ लोकांमध्ये त्यांची लांबी पूर्वीपेक्षा अधिक झाली होती. प्राण्यांवरील चाचण्यांचा टप्पा ओलांडून मानवांवर हा प्रयोग झाला, तसेच डॅनाझोलचा डोसही नेहमीच्या डोस इतकाच आहे (दिवसाला ८०० मि ग्रॅ ) ही या निबंधाची वैशिष्ट्ये म्हणता येतील. पेशंट्सची अतिशय लहान संख्या हा त्याचा प्रमुख दोष ठरतो . खालच्या दुव्यात संबंध पेपर आहे . संबंधित बऱ्याचशा वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकेन किंवा शोधून काढू शकेन.
http://aisiakshare.com/files/Danazol_Treatment.pdf
पेपरमध्ये यासंबंधी पूर्वी झालेल्या संशोधनाचे सारही सापडू शकेल .
स्त्रियांबाबतही याच प्रकारचे रिझल्ट्स २००५ साली एका कोरियन टीमने प्रसिद्ध केले आहेत. कोणाला हवे असल्यास कळविणे.
Taxonomy upgrade extras