बागेतून ताटात - प्रयोग ३ : मायक्रो -ग्रीन्स

बागेतून ताटात - प्रयोग १ : भोपळा
बागेतून ताटात - प्रयोग २ : पालेभाज्या

कोणतंही धान्य पेरून त्याचे जे अंकुर उगवतात त्यांना मायक्रोग्रीन्स म्हणून खाण्याचं फॅड सध्या वाढलंय. कमी कष्टांत आणि कमी वेळेत उगवून येणारे मायक्रोग्रीन्स नव-बागकामप्रेमींचे आवडते आहेत. मोहरी -अळीव - मूग - अशा घरी असलेल्या कोणत्याही धान्यांचे उगवून आलेले अंकुर मुख्यतः सलाड्स -कोशिंबिरींमध्ये किंवा कोथंबिरीसारखे वरून गार्निश म्हणून वापलेले बघितलेत.  मी जरा वेगळ्या प्रकारे वापरले. 

१. मुगांकुर डाळ 
साहित्य : १ वाटी मुगाची डाळ ( किंवा तूर/ मसूर पण चालेल.) , १ चमचा तूप ( किंवा तेलपण चालेल), जिरे, हिंग, हळद, मीठ , लसूण- मिरची ( ऐच्छिक) आणि हिरवे मूग पेरून उगवलेले अंकुर - १ ते २ वाट्या.    
कृती:

 1. डाळीत हळद मीठ घालून कूकरमध्ये शिजवून घेणे. 
 2. मुगांकुर खुडून स्वच्छ धुवून - गरज वाटल्यास चिरून घेणे. 
 3. तुपात हिंग-जिऱ्याची फोडणी करून मुगांकुर परतणे. 
 4. रंग बदलला की त्यांत शिजलेली डाळ घोटून टाकणे. 
 5. चव आणि गरजेनुसार मीठ -पाणी घालून एक उकळी येऊ देणे. 

1

२. मिश्र डाळींची मायक्रोग्रीन धिरडी  
साहित्य: मूग - मसूर- तूर- उडीद - हरभरा - सगळ्या डाळी मिळून एक वाटी, तांदूळ एक वाटी, हिरवी मिरची - आलं -लसूण - कढीपत्ता - मीठ आणि कोणत्याही धान्याचे अंकुर (मी मोहरीचे वापरले.)
कृती:

 1. मिश्र डाळी आणि तांदूळ वेगवेगळे भिजवणे (रात्रभर किंवा ८ तास ).
 2. आधी डाळी मग तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे. 
 3. वाटताना त्याच मिक्सरच्या भांड्यात धान्याचे अंकुर टाकणे. पिठाचा रंग हिरवा होतो. 
 4. मिरची - आलं -लसूण - कढीपत्ता ह्यांचं वाटण करून ते वाटण आणि मीठ वरील पिठात चवीनुसार घालणे. 
 5. लोखंडी तव्यावर धिरडी टाकून खाणे. 

2

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

धिरडी छानच दिसत आहेत.

मला या अंकुरांबद्दल प्रश्न आहे. आपण मोड आणून जी कडधान्यं खातो, त्यापेक्षा हे निराळे असतात का? मुळात जे पोषण बीमध्ये असतं त्यापेक्षा काय निराळं मोड आणून मिळतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कडधान्ये आणि बियांमध्ये पोषकद्रव्ये कुलूपबंद असतात. मोड आणल्यामुळे शरीरात ती सहजरीत्या शोषली जातात आणि मोड येताना कडधान्यातली कर्बोदके कमी होतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण3
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-ताराबाई
टिप टिप चांदणी

बहुतेक आता हे स्पष्टीकरण लक्षात राहील. थ्यँक्यू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भिजवून, मोड आणून कडधान्ये कच्चीपण खाता येतात / लवकर शिजतात.  पचायला सोपी थोडक्यात. शिवाय वर दिलेले स्पष्टीकरणपण आहेच. 

पण हे अंकुर निराळे - कारण मी फक्त उगवून आलेले अंकुर वापरलेत - हिरव्या पालेभाज्यांसारखे. 

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

बाप रे धिरडी काय मस्त जाळी सुटलेली आहेत. मुगांकुर खाऊ शकतो हे माहीत नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक प्रश्न. मी अधनं मधनं वेगवेगळ्या डाळी पेरतो - पिटुकल्या कुंड्या आहेत काउंटरवर, त्यात. काही नाही, मोड येतात, पान उघडतात ते बघायला मजा वाटते म्हणून! कवतिक ओसरलं की टाकून देतो. हा लेख वाचल्यावर डोक्यात आलं की ती कोवळी पानं वगैरे खुडून आमटीत टाकली तर चालतील? आम के आम, गुटलीयों के भी दाम! पण स्वत:चा गिनी-पिग करायची ईच्छा नाहीये. "अहो गेल्याच आठवड्यात गप्पा झाल्या होत्या. मसुरांकुर झकास लागतात सांगत होता. काल कळलं की डायलीसीस वर आहे. त्या मसुरांकुरात म्हणे कायतरी अल्कलॉईड असतं त्याने किडनीज गेल्यात कामातनं. बघायचं आता काय होतं ते." असलं काही नको व्हायला ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मी अधनं मधनं वेगवेगळ्या डाळी पेरतो

शंका: डाळी पेरून मोड कसे येतात? आख्खे धान्य नको काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डाळी = जे काही कडधान्य "अख्खा दाणा" स्वरूपात असेल ते रे बाबा. Rollingeyes

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

...(कडधान्याच्या) दाण्याचे दोन तुकडे केल्याशिवाय ती डाळ म्हणून क्वालिफाय नाही होत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याबद्दल प्रश्नच नाही. डाळी = कडधान्य हे माझ्या प्रश्नापुरतं सिमीत आहे. फाटे नको फोडू, हाती लागेल ते धान्य पेरून आलेले अंकूर / मोड / पानं खाऊ का नको ते सांग आधी.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

रस्त्याने जाताना कोंबड्याच्या शेंगा पडलेल्या वेचून आणायचो. त्यातले मोठे लाल बी पेरले की उगवायचे. बी घासून तापले की चटका बसतो. चिंचोके पेरायचे.

#१ Indian coral tree / पांगारा याचंच लाकूड सावंतवाडीची खेळणी बनवायला वापरतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मसुराचे मोड मुत्रपिंड मारतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेहमीची कडधान्यं पेरून येणारे अंकुर खाऊन काही विशेष त्रास मला तरी झाला नाही. पण आपापल्या जबाबदारीवर प्रयोग करून खाणे. :) 

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

मुगाचे सोडून अजून कुठले खाल्लेस आत्तापर्यंत? आणि खवचटपणा म्हणून नाही हां विचारतंय. "फावा बीन्स" हा प्रकार ऐकलायंस? ते घातलेलं स्ट्यु खाऊन माझा ॲडव्हायझर आडवा झाला होता! पानात काय वाट्टेल ते पडेल ते खाऊन पचवणारा माणूस तो, हास्पिटलात चार दिवस मुक्काम ठोकायला लागला होता. म्हणून मी आपलं लगेच कोचरेकर गुरूजींसारखं विचारून घेतोय - " नाही म्हणजे, काही गडबड नाही ना होणार?" Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

(आगाऊ इशारा: ऐकीव अर्धवट माहिती - अर्थ आपापल्या जबाबदारीवर लावावा.) दुवा १, दुवा २.

Looks like राजमा, झालेच तर तुम्ही सांगितलेली फावा बीन्स, आणि अशा अनेक तत्सम बीन्समध्ये/द्विदल धान्यांत Phytohemagglutinin नावाचे विष असते. (मास्तर मोड ऑन.) बीन्स पुष्कळ वेळ शिजवल्यास ते नाश पावते आणि बीन्स खाण्यास निर्धोक बनतात, परंतु बीन्स पुरेश्या प्रमाणात न शिजविल्यास/कमी तापमानाखाली (जसे, slow cookingमध्ये वगैरे) शिजविल्यास , ते विष पूर्णपणे denature न होता अंशत: तसेच राहाते, नि घात करते. म्हणून अशा बीन्स चांगल्या सणसणीत शिजविल्याशिवाय न खाणे श्रेयस्कर.

डिस्क्लेमर:
१. ऐकीव माहिती. मला यातले शष्प समजत नाही. तज्ज्ञांकडून सविस्तर खुलासा मिळू शकल्यास स्वागत आहे.
२. कोणत्या बीन्समध्ये/कडधान्यांत किती प्रमाणात हे विष असते, कल्पना नाही. मॉरल ऑफ द स्टोरी, खात्रीलायक माहिती असल्याखेरीज कोणतीही कडधान्ये अथवा बीन्स ही भरपूर वेळ (आणि चांगल्या उकळत्या पाण्यात) शिजविल्याखेरीज खाणे धोक्याचे. (पुरेसा वेळ म्हणजे किती वेळ, हे आपापल्या जबाबदारीवर शोधून काढावे. वेगवेगळ्या बीन्सकरिता आणि शिजविण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींप्रमाणे हे वेळाचे प्रमाण वेगवेगळे असू शकते.)
३. मोड काढण्याने (sprouting) या विषावर काही फरक होतो किंवा कसे, किंवा होत असल्यास कितपत प्रमाणात होतो, कल्पना नाही.
४. मूग, मटकी वगैरे कडधान्यांत या विषाचे प्रमाण तुलनेने कितपत कमीजास्त असते (आणि, वरील ३.च्या अनुषंगाने, कच्चे मुगांकुर किंवा कच्चे मटक्यांकुर तुलनेने कितपत निर्धोक असतात), कल्पना नाही. (अंकुर शिजविल्यास बहुधा प्रॉब्लेम नसावा. बोले तो, मटकीची उसळ खाऊन फारसे कोणाचे पोट बिघडल्याचे निदान ऐकण्यात तरी नाही. अर्थात, याला ॲनेक्डोटल डेटा अत एव सांगोवांगीची कथा म्हणून निकालात काढता यावे.)

बॉटमलाइन:
१. असले प्रयोग स्वत:च्या जबाबदारीवर करावेत.
२. सणकून शिजविण्याने धोका कमी होऊ शकतो.

(चूभूद्याघ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहीती आणि दुव्यांबद्दल धन्यवाद. राजमाबद्दल ही माहीती नव्हती. "भिजवून चावणेबल झालं कडधान्य की सॅलडात घालता येतं" ही माझी समजूत चुकीची आहे *straightface*. अगदी "शवपेटीकेची" वेळ नाही आली तरी न करणं श्रेयस्कर!

सेमी अवांतर: सध्या किनवाचं कौतुक चालू आहे, एका कुकिंग शोमधे "ड्रॅगन फ्रूट" पहिल्यांदा बघितलं. पण माझ्या माहीतीत असलेल्या अशा उदाहरणात तरी जगातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात आधीच माहीती असलेलं / सरसकट खाल्लं जाणारं काहीतरी - ईंटरनेट आणि वस्तूंची सहजगत्या करता येणारी आयात/निर्यात - यांच्यामुळे उजेडात येतं ईतकंच. पण साउथ अमेरीकेतला कोणी ते पचवू शकतो म्हणजे मलाही चालेलंच असं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

हरभरा, मेथी, मोहरी, मूग, चवळी, अळीव - ह्यांचे अंकुर खाऊन मला आणि माझ्या घरच्यांना काहीही त्रास झालेला नाही. तरीही आपापल्या जबाबदारीवर खाणे.  :) 

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

यांमध्ये फरक असा की डाळींतले 'ट्रिप्सिन ' किंवा एक द्रव्य प्रोटिन्स पचू देत नाही. मोड आल्यावर ते नष्ट होते. म्हणजे पचायला हलके होते. जनावरांमध्ये ट्रिप्सीन नष्ट करण्याची शक्ती/कुवत असते.
मसुर,शेंगदाणे,बटाटा ही पिके थंडीत वाढतात. पाने जेमतेम ऊष्ण प्रकाशातही अन्न तयार करून पिकात साठवतात. ती कुणी जनावरांनी खाऊ नये म्हणून विषारीपणा असतो. (बाजरी आणि गहूही थंडीतच येतात. झाड खाऊ नये म्हणून कुसं असतात . यांचा कडबा म्हणून उपयोग होत नाही. )
सोयाबिनचे दाणे/पीठही ट्रिटमेंट केलेले असते म्हणतात.
आंबवण्यानेही प्रोटिनचे विघटन होऊन हलके होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0