काल बागेतली भेंडी आणि वांगी घालून पीत्झा केला. मस्त झाला होता. ताज्या, हलकेच भाजलेल्या भाज्या खूपच रुचकर!
पिडा, अदिति, सानिया व रुचीचा बागकाम सीझन बर्यापैकी संपत आला असेल. (पिडा, बटाटे पेरले का?)
तर या धाग्यासाठी स्पेशल प्रश्न - बागेत उगवलेल्या भाज्या-फळांना तुम्ही कुठल्या पदार्थांमधे वापरले? भाज्या, चटण्या, जॅम, वाळवणी, कॅनिंग - फोटो आणि पाकृ दोन्ही द्या!
याआधी: भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५
(व्यवस्थापक : धाग्यांचे क्रमांक दुरुस्त केले आहेत आणि धागा 'बागकाम'मध्ये हलवला आहे.)
धागा क्रमांक ६ वर १०० प्रतिसाद झाल्याने,
(ते कुठले पूर्ण व्हायला? धागा कुंथत होता म्हणून मीच त्याला रेचक दिलं!!!! :) )
आता धागा क्रमांक ७ काढतोय!
तर दोस्तहो, नवीन बातमी म्हणजे,
धागा -३ वर १००पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढतोय.
या धाग्यावर पूर्वीप्रमाणे तुमचे फूल-पान-फळांचे फोटो आणि बागेचे वर्णन तर येऊ द्याच.
पण अॅडिशनली आम्ही (म्हणजे मी आणि ऋषिकेश, विथ रोचनाचा पाठिंबा!!) ठरवतोय की इथे तुमचे जुने अनुभवही येऊ द्या...
म्हणजे तुम्हाला बागकामाची आवड कशी निर्माण झाली?
तुम्ही बागकामाला सुरवात कधी आणि कशी केलीत?
सुरवातीला काय-काय अनुभव आले?
तुम्ही काय प्रयोग केलेत? तुमचे प्रयोग कधी यशस्वी झाले, कधी गंडले?
इत्यादि इत्यादि...
मागच्या धाग्यात शंभरपेक्षा अधिक प्रतिसाद आल्याने पुढील धागा सुरु केला आहे.
या वर्षी बागकाम सुरू करून साधारण दीड महिना उलटून गेला आहे. गेल्या वर्षीचं वाचवलेलं वांग्याचं झाड भरभरून कळ्या आणि फुलं देतंय. तीन फुलं गळून गेली, आत्ता एकूण चार फुलं आहेत. फळाची वाट बघण्याला पर्याय आहे का? ही फुलं -
व्यवस्थापकः या आधीचे २०१४मधील बागकामाचे धागे: १ | २ | ३ | ४
=====
अदितीला सांगितलं होतं की नवीन धागा सुरू कर म्हणून...
पण जोजोकाकू बहुतेक झोपा काढतायत आपला जेटलॅग घालवायला! :)
म्हणून मीच आता हा नवीन धागा सुरू करतोय...
तर स्प्रिंग आला...
चमेलीचा वेल बहरलाय कुंपणावरती.
आधीच्या धाग्यात ९०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा. घरगुती बागकामासंबंधित प्रश्न, शंका, विचार, माहिती, फोटो, योजना, कार्यक्रम, अपडेट्स इत्यादी गोष्टी या धाग्यात लिहिता येतील.
या आधीचे धागे: १ | २ | ३
========
मिरचीच्या झाडाला आता फुले येऊ लागली आहेत, पण कसलीशी अंडी (चहाच्या दाण्यासारखी व इतकी) पानाच्या मागल्या बाजुला दिसू लागली आहेत - ती रोज धुवून काढतोय शिवाय कडुलिंबाची फवारणी चालु आहे.
आधीच्या धाग्यात ९०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा. घरगुती बागकामासंबंधित प्रश्न, शंका, विचार, माहिती, फोटो, योजना, कार्यक्रम, अपडेट्स इत्यादी गोष्टी या धाग्यात लिहिता येतील. धागा क्र १, धागा क्र २