(मार्च महिन्याचे निरुपण इथे)
प्रलयकाळ !!
महिन्याची सुरुवात झाली रोज नवीन एक्यांऐशी हजार केसेसनी आणि शेवट झाला रोज नवीन चार लाखांहून जास्त केसेसनी.
पाचपट वाढ... एका महिन्यात...
रोज नवा जागतिक उच्चांक!!!
बायडेनमामानी याच काळात केसेस आणल्या सत्त्याहत्तर हजारावरून साठ हजाराच्या आत!!
बोरीसकुमारांनी अखेर लॉकडाऊन उठवला, पण तेव्हापर्यंत देशातला रोजचा आकडा दोन-तीन हजाराच्या आत आणला.
आणि हो, देशातल्या ५० टक्क्यांहून जास्त लोकांना लसीचा किमान एक डोस एवढं जमवलं.
अपेक्षेप्रमाणे आमच्याकडे लसटंचाई सुरू झाली. लसधोरणच असं आखलं की हे होणारच होतं (वाचा : लघुदृष्टी आणि दूरदृष्टी)
निवडणुकीच्या लाखालाखाच्या सभा चालू होत्या वीस तारखेपर्यंत.
कुंभमेळाही जोरात चालला.
नक्की काय चाललंय इथे हे वेगळं लिहिणार नाही.
सगळ्यांनी बघितलं आहे. कुठे ना कुठे. पेपर, टीव्ही, सोमी.
एका राज्याच्या मुख्यमंत्र्यानी आयडिया चांगली काढली यावर -
कसल्याही टंचाईची, बेड्स असोत, ऑक्सिजन असो, औषधे असोत, त्याची बातमी द्यायची नाही कुणी.
दिली तर गुन्हा दाखल केला जाईल असा ढोस!!
कोरोनाकंट्रोलपेक्षा कोरोना आकडे आणि बातम्या यांवरच कंट्रोल असा प्रकार एकंदरीत.
एकंदरीत कोरोनाने सध्यातरी आमच्यावर विजय मिळविला आहे असे चित्र आहे!!!
कसे काय विचारता?
खालचा ग्राफ बघा, येईल लक्षात सगळं.
तेव्हा महाराजा सध्यातरी म्हणा -
रामराम रामराम सीताराम सीताराम,
पुंडलिकवरदे हारी विठठल!!!
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय!!!
(मे महिन्याचे निरुपण इथे)