करोना

बखर....कोरोनाची (भाग ५)

इतिहास घडतोय, आपल्यासमोर... वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत. म्हणून या आज घडणारा इतिहास, आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का? बखर वगैरे म्हणजे काय असतं? हेच ना? चला, लिहुयात बखर कोरोनाची!

महाभारतात कोरोना

हस्तिनापुरात गेल्या काही दिवसांपासून कमालीची शांतता जाणवत आहे. धृतराष्ट्राने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केल्यापासून एकंदर आर्यावर्तातल्या प्रत्येक समाजघटकावर याचा विलक्षण परिणाम दिसून येत होता.

Taxonomy upgrade extras: 

ऑस्ट्रेलियात करोना - एक टाईमलाईन

मूळच्या पुण्याच्या आणि आता सिडनीवासी असलेल्या योगिनी लेले यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे व त्याच क्षेत्रात काम करतात. त्यांच्याकडून मिळालेली एक रोचक टाईमलाईन -

१०० वर्षांपूर्वीच्या 'स्पॅनिश फ्लू'च्या आठवणी

कोरोनाच्या साथीमुळे आपण हतबल आहोत, मग शंभर वर्षांपूर्वीच्या त्या साथीमध्ये आपण काय केलं असतं? कारण त्या साथीमध्ये जगभर ५ कोटी लोक मरण पावले. एकट्या भारतात १ कोटी ८० लाख. ना औषध, ना लस, ना कम्युनिकेशन, ना आरोग्याच्या सुविधा. वर्ष होतं, १९१८ आणि साथ होती, 'स्पॅनिश फ्लू'ची. ही साथ बरंच काही शिकवून जाते. लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेचे (NCCS) वरिष्ठ संशोधक डॉ. योगेश शौचे.

कोरोनाची बारी

आज्जीची किस्से सांगण्याची तऱ्हा भन्नाट आहे. एखादी गोष्ट लहानात लहान तपशिलासह सांगण्यात तिचा मोठाच हातखंडा.. म्हणजे रझाकाराच्या बारीतली दहशत सांगताना 'कासीम भाड्याचं नाव ऐकताच गावचा पाटील कसा बायकोच्या पदराआड लपून बसला, अन दारावर येसकराची थाप पडताच त्याने कसे डोळे पांढरे अन धोतर ओले केले' हे विलक्षण मुद्राभिनयाने ती आमच्यासमोर जिवंत करत असे. चाळीस वर्षांपूर्वीच्या किश्श्यातही आजोबांनी रागावून उंचावलेली डावी भुवई, सासूने नापसंतीने मुरडलेलं नाक, चुलीवर उतू जाण्याच्या बेतात असलेलं दूध, जावेची तपकीर ओढण्याची तऱ्हा असे तिच्या लेखी महत्वाचे संदर्भ मुबलकपणे येत असत.

Taxonomy upgrade extras: 

बखर....कोरोनाची (भाग ४)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

Subscribe to RSS - करोना