SGLT2i नावाचा औषधांचा एक नवा वर्ग , मधुमेहासाठी बाजारात

SGLT2i नावाचा औषधांचा वर्ग जो वर्ग मधुमेहासाठी बाजारात आला आहे (empagliflozin, dapagliflozin, canagliflozin etc.) ,त्यांचे मधुमेह-प्रणित किडनी आणि हृदय रोगावर नवे आणि महत्वाचे परिणाम आढळले आहेत.
आपली किडनी आधी सर्व रक्त फिल्टर करते , आणि मग त्या फिल्टर्ड पाण्यातल्या उपयुक्त गोष्टी परत शोषून घेते.
पण मधुमेहात जेंव्हा रक्तात ग्लुकोजचा अतिरेक होतो, तेंव्हा बरेचसे ग्लुकोज असे परत शोषून घेतेले जाणे अनिष्ट ठरते. या परत शोषून घेण्याच्या प्रक्रियेला ही औषधे प्रतिबंध करतात. ग्लुकोज मूत्रावाटे फेकून दिले जाते आणि त्याचे रक्तातले प्रमाण कमी होते, असा हा उपाय असतो.
पण मधुमेहावरील या थेट उपायाबरोबरच, ही औषधें, दीर्घकालीन मधुमेहाचे हृदय आणि किडनीवरचे अनिष्ट परिणामही बरेच कमी करतात असे आढळून आले आहे. हे औषधी परिणाम हे केवळ ग्लुकोज कमी करण्यातून होत नाहीत, तर या औषधांच्या, हृदय आणि किडनी यांच्या पेशीवरील "थेट" कृतीवरून घडतात असे दिसत आहे. बिन-मधुमेह्यांमध्येही ते दिसत आहेत.
भारतात अनेकांना असणारी सुप्त मधुमेह-पूर्व स्थिती बघता, भारतातले हार्ट फेल्युअर आणि किडनी डिसीझ हे गंभीर आजार मोठ्या प्रमाणावर कमी करण्यासाठी या औषधांचा मोठा उपयोग होऊ शकेल. मात्र अशा "प्रतिबंधक" उपायांना अजून एफ डी ए ची मान्यता मिळालेली नाही.
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33121838/

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

SGLT2i नावाचा औषधांचा एक नवा वर्ग , मधुमेहासाठी बाजारात आला आहे (empagliflozin, dapagliflozin, canagliflozin etc.) .

Invokana, Jardiance वगैरे म्हणताय ना? पण, ही औषधे तर गेली कित्येक वर्षे बाजारात आहेत की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे म्हणणे योग्यच आहे. फक्त त्या औषधांचे किडनी आणि ह्रदयावरचे परिणाम हळूहळू नव्याने प्रकाशित होत आहेत, जे महत्वाचे आहेत. मी पोस्टच्या भाषेत असा फरक केला आहे. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो ते संशोधक आहेत हो! औषधनिर्माण क्षेत्रात ते प्रत्यक्ष संशोधन करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************