"डोपामीन उपवास':

आपल्या मेंदूत संदेशवहन दोन प्रकारे होते: पेशींमधून निघणाऱ्या "धाग्यांमधून " सरळ विद्युतप्रवाहच जातो. पण या धाग्यांच्या मध्ये गॅप असते, जिला सायनॅप्स असे नाव आहे. या गॅप मध्ये एका बाजूने लहान रासायनिक संयुगे सोडली जातात, जी दुसऱ्या बाजूच्या रिसेप्टर नावाच्या खोबणीला चिकटून पुढचा विद्युतप्रवाह निर्माण करतात. या संयुगांना "न्यूरो-ट्रान्समीटर" असे नाव दिले जाते. मेंदूत किमान सत्तर अशी संयुगे सापडली आहेत, पण त्यातले एक अत्यंत महत्वाचे संयुग म्हणजे डोपामीन .

डोपामीन हे संयुग दोन महत्वाची कामे करते: एखादी गोष्ट "दखलपात्र" आहे हे मेंदूच्या निदर्शनास आणून देणे आणि आपल्याला हवे ते मिळाल्यास त्याचा "आनंद" (प्लेझर) निर्माण करणे. नॉर्मल अवस्थेत ही कामे महत्वाची आहेतच, पण आपल्या मेंदूच्या या जैवरासायनिक वैशिष्ट्याचा गैरफायदा घेत त्यातून मोठी जाहिरातबाजी आणि व्यसनाधीनता निर्माण केली जात आहे. यामुळेच सध्या ज्या देशात पैसा अधिक तिथे दुःख, निराशा अधिक असे विचित्र चित्र निर्माण झाले आहे.

सर्व सोशल मीडिया याचा फायदा उठवितात. तुम्हाला त्या मिडीयम वर अडकवून ठेवण्यासाठी "अटेन्शन इंजिनीअरींग" नावाचे नवे 'शास्त्र" निर्माण झाले आहे, ज्याच्या विकासावर अब्जावधी डॉलर्स खर्च केले जात आहेत. तुमच्यासमोर जाहिरातबाजी करणे असा यामागील सुप्त उद्देश असतो. पाश्चात्य देशात आता याविरुद्ध लोक न्यायालयातही जाऊ लागले आहेत. तसेच अनेक नशेची द्रव्येही हे करतात. शेअर-बाजारातल्या "सट्टेबाजीचे" व्यसन , तसेच जुगाराचे व्यसन यामागेही हे असू शकते.

या सर्व अनिष्ट गोष्टींनी मेंदूत मोठ्या प्रमाणात डोपामीन निर्माण होते. यांच्या "किक" ची एकदा सवय लागली, की कमी डोपामीन देणारी कामे "नकोशी" होतात: उदा. अभ्यास, घरकाम, कोणतेही सीरियस काम, वाचन, स्वच्छता , घराची आवरासावर इ इ . हे घडत असल्यास आपल्याला हा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे/होऊ घातला आहे हे लक्षात घेणे .

तसेच मेंदूमधील एकाच भागात आनंद आणि दुःख/निराशा यांचा खेळ चालतो. कोणत्याही एका बाजूचा अतिरेक झाल्यास, नॉर्मल स्थिती निर्माण करण्यासाठी मेंदू उलट्या बाजूची कृती करतो. यामुळेच सणासुदीच्या, मोठ्या पार्टीच्या "दुसऱ्या दिवशी", ते सर्व संपल्यावर एक विचित्र निराशा, रिकामेपणा , भकासपणा जाणवितो. आणि सतत अशा डोपामीन किक्स चालू ठेवल्यास, मेंदू अधिकच दुःख/निराशा या स्थितीकडे दीर्घकाळ आणि अधिक तीव्रतेने झुकतो, ज्यातून मानसिक समस्या निर्माण होतात.

आपण एकूणच अशा "अति-डोपामीन " जगात सध्या रहात आहोत. पाश्चिमात्य देशात याचे मोठे प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत, आणि भारत त्याच दिशेने चालला आहे असे वाटायला जागा आहे.
यावर मुख्य उपाय सांगितला जातो तो म्हणजे अनेक दिवसांचा (२ आठवडे?) "डोपामीन उपास". यात
- सर्व मीडिया , टीव्ही टाळणे. 'स्क्रीन" नको. कागद-पेन्सिल लेखन, पुस्तक वाचणे चालू शकेल.
- शक्य तितके बाहेर फिरायला जाणे, जमल्यास गावाबाहेर/शहराबाहेर.
- व्यायाम , योगासने.
- मित्र आणि कुटुंबियांशी संबंध वाढविणे.
- घरात आणि आसपास "काय करण्याची गरज आहे" हे बघणे आणि ते करणे.

आपल्याला यापासून तीन प्रकारे दूर ठेवता येते:
१. समय: उदा. फेसबुकवर संध्याकाळी सहानंतरच जाणे, आणि केवळ २० मिनिटेच त्याला देणे.
२. अंतर : कॉम्प्युटर आणि फोनपासून स्वतःला नियोजित काळ दूर ठेवणे. अमेरिकन मुले दर तासाला वीस वेळा फोनकडे बघतात. अगदी नोकरीचा इंटरव्ह्यू चालू असतानाही त्यांना हे केल्याशिवाय राहवत नाही. अशा परिस्थितीत ठरलेला काळ (उदा. दोन तास) फोनपासून दूर राहणे एव्हढा एकच मार्ग उरतो.
३. प्रकार: यातील अति-हानिकारक प्रकारांपासून (उदा. जुगार) स्वतःला पूर्णपणे दूर ठेवणे.

यातून बाहेर पाडण्यासाठी जे मनोबल लागते ते सर्वांकडे असतेच असे नाही. अशा वेळी एखाद्या जवळच्या व्यक्तीला याबाबत सहाय्यक मानून , आपली याबाबतची प्रगती/अधोगती अत्यंत प्रामाणिकपणे तिच्यासमोर मांडत राहिल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो.

- मुख्य म्हणजे आपल्याला असे 'नादावले" जात आहे याचे सतत भान ठेवून राहणे . सोशल मीडिया "सुरु" होण्याआधी आपण कसे रहात होतो याचा विचार ठेवा. ते आयुष्य वाईट नव्हते!.

डोपामीन अनेक प्रकारे उपयुक्तही असतेच, उदा . स्नायूंचे चलन-वळन . डोपामीन -निर्मात्या पेशी अतिशय कमी होऊन डोपामिनचे प्रमाण अतिशय घटल्यास "कंपवात" (पार्किन्सन्स डिसीझ ) होऊ शकतो. पण निरोगी, नॉर्मल माणसात हे होत नाही. डोपामीन उपवासाशी याचा संबंध नाही.

- मेंदू हळूहळू नॉर्मलला नक्की येतो.

(अधिक अभ्यासासाठी , अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या ऍडिक्शन -उपचार विभागाच्या प्रमुख Dr. Anna Lembke यांचे "Dopamine Nation: Finding Balance in the Age of Indulgence" हे पुस्तक उपयोगी पडू शकेल.)

शुभेच्छा!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काही विदुषींना विशिष्ट कविंच्या कविता वाचताना ऑरगॅझमचा अनुभव येतो म्हणे!
त्यावेळी त्यांच्या मेंदुत डोपामाईनच स्त्रवते का जास्त ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवी आणि विदुषी , दोघेही थोरच मानले पाहिजेत. सम्भोगातील ऑरगॅझम मध्ये डोपामिन स्त्रवते (आणि संभोगात सर्व तर्कशक्ती नष्ट होते!) हे विज्ञानाला माहिती आहे इतकेच म्हणून थांबतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आला कुणा बाईला ऑरगॅझमचा अनुभव, आणि तो तुमच्या बुकांमध्ये नसेल बसत, म्हणून तिच्याबद्दल खवचटपणे लिहायची काही गरज नाही. लोकांना, विशेषतः बायकांना, कशातून ऑरगॅझमचा अनुभव, आनंद मिळतो, हे उलट समजून घेतलंत तर कदाचित तुम्हालाही जास्त आनंद मिळू शकेल.

गेला आठवडाभर विचार करत्ये की हे लिहावं का जाहीररीत्या, कारण हे लिहून माझ्या शरीरात काही काळ तरी डोपामिनचा दुष्काळच पडेल. पण नाही लिहिलं तरी ही पुरुषप्रधान स्नॉबरी सुरूच राहणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

There are at least 70 known neurotransmitters. So dopamine may not be the "only" culprit but it certainly IS a main player. The link is basically meaningless . The phenomenon is well-documented, and just because a few people react in a silly way does invalidate the basic phenomenon.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान माहीती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरीच तुम्ही फेसबुकवरनं गायब आहात!
तुम्ही लिहिलंय ते पाळण्याचा इच्छा अनेक दिवसांपासून आहे, पण जमत नाहीये. आता नव्याने प्रयत्न करते. धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

मी फेबुवरून गायब असायला पाठीचे मोठे दुखणे हेही एक मोठे कारण आहेच. पण फेबु थांबविल्यापासून महत्वाच्या गोष्टी हातून घडू लागल्या आहेत हेही खरेच आहे.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखामधील हे वाक्य खूप महत्वाचे आहे.
"आपल्याला हवं ते मिळाल्यास त्याचा आनंद निर्माण करणे" किंवा आनंद वाटणे.
आनंद देणारे हवं ते प्रत्येकाचे वेगळे असते.

हे असे का .ह्याचे उत्तर शास्त्रीय रित्या मिळत नाही तोपर्यंत dopamin विषयी काय बोलणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- मेंदू हळूहळू नॉर्मलला नक्की येतो.

अरे देवा ... म्हणजे सध्या सोशल मिडियावर ॲक्टीव्ह असणाऱ्यांचे मेंदू नॉर्मल नाहीत असे म्हणताय की काय तुम्ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||